रोहे वरसगाव येथे ०२ ऑक्टो.रोजी कै.गुरुवर्य पट्टे तुकाराम वस्ताद यांची ३२ वी पुण्यतिथी सोहळा व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन.. खारी/ रोहा (केशव म्हस्के) रोहे तालुक्यातील वरसगाव पद् मावती नगर येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत तुकाराम आंब्रुस्कर यांचे पिताश्री कै.गुरुवर्य पट्टे तुकाराम वस्ताद यांची ३२ वी पुण्यतिथी सोहळा व श्री सत्यनारायणाची महापूजा सोमवार ०२/ऑक्टोंबर/ २०२३ रोजी समस्त अजित अनंत आंब्रुस्कर ( वरसगाव ग्रा.पं.सदस्य)परिवार व आदिशक्ती कलगी तरुण मित्र मंडळ रोहा - माणगाव - सुधागड यांच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे... वरसगाव चे आराध्य ग्राम दैवत सापया महाराजांच्या कृपाशिर्वादाने वरसगाव पद् मावती नगर येथील ग्राम पंचायत सदस्य अजित अनंत आंब्रुस्कर तसेच समस्त आंब्रुस्कर परिवार आणि आदिशक्ती कलगी तरुण मित्र मंडळ रोहा - माणगाव - सुधागड यांच्या सहकार्याने सोमवार दि.०२/ऑक्टोंबर/ २०२३ रोजी कै.गुरुवर्य पट्टे तुकाराम वस्ताद यांची ३२ वी पुण्यतिथी सोहळया निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा पुरोहित महेश ज
Posts
Showing posts from September, 2023
- Get link
- Other Apps
खैराट ग्रामस्थ व मुंबई मंडळ नवतरूणांच्या संकल्पनेतून गणपती सजावट स्पर्धा! किल्ले रायगड देखाव्याला सर्व प्रथम क्रमांक तळा प्रतिनिधी कृष्णा भोसले खैराट ग्रामस्थ मंडळ व खैराट मूंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व नवतरुणांच्या संकल्पनेतून यावर्षी प्रथमच "गणपती सजावट स्पर्धा "........ २०२३ साली आयोजित करण्यात आली. या झालेल्या गणपती सजावटीच्या स्पर्धेत १३ गणेश भक्तांनी भाग घेतला. तीन प्रमुख पारितोषिकांमध्ये प्रथम क्रमांक श्री. गोविंद नारायण भोईर (किल्ले रायगड देखावा), द्वितीय क्रमांक श्री. प्रकाश दामोदर आडखळे (गड जेजुरी), आणि तृतीय क्रमांक श्री. अनंत नारायण नाडकर (चंद्रयान-३) यांना मिळाला. श्री.गोविंदशेठ भोईर ,श्री.नथुराम भोईर ( अध्यक्ष मुंबई मंडळ) श्री.राम नाडकर,श्री. अनंतशेठ नाडकर , श्री.संतोष भोईर, श्री. तुकाराम नाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. सजावट साहित्य तयार असलेले बाजारातून विकत न घेता आपल्या घरातील नैसर्गिक पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून कमीत कमी खर्चात निर्माण करुन आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन घडावे या
- Get link
- Other Apps
सा माजिक सभागृहासाठी एक कोटी- खासदार सुनील तटकरे तळा-संजय रिकामे तळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी खा.सुनील तटकरे यांनी वेळोवेळी विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी मंजूर करून विकास कामांना गती दिली. तळा शहरात कुणबी समाज बांधवांचे भव्य दिव्य सभागृह व्हावे आणि समाज बांधवांची सोय व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खा.सुनील तटकरे एक कोटी रुपये उपलब्ध करून देणार असून पहिल्या टप्प्यात ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. उर्वरित ४५ लाखांचा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही यावेळी खा.तटकरे यांनी दिली.यावेळी पहिल्या टप्प्यातील ५५ लाख रुपयांच्या मंजुरीचे पत्र कुणबी समाजाचे ग्रामीण व मुंबई पदाधिकारी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यामध्ये खा.सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून २५ लाख,महिला बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे यांच्या आमदार फंडातून १५ लाख आणि आ.अनिकेत तटकरे यांच्या आमदार फंडातून १५ लाख अशा प्रकारचा विकासनिधी उपलब्ध करून दिला गेलेला आहे.समाजाच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी प्रबोधन, स्पर्धा परीक्षा,मार्गदर्शन केंद्र,अभ्यासिका
- Get link
- Other Apps
तळा तालुक्यातील ४१२० लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप तळा किशोर पितळे ढोल ताशे, बँड पथक,बेंजोच्या तालावर मिरवणुका काढत, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ च्या जय जयकारात लाडक्या बाप्पाला तळा तालुक्यातील गणरायांना निरोप देण्यात आला.दिड दिवसाचे १४०८,पाच दिवसांचे २७१२ तर अनंत चतुर्थी ७८ विसर्जंन बाकी आहेत.तालुक्यात ४२०० गणपती असून एकही सार्वजनिक मंडळाचा गणपती नाही.जिल्ह्यातील ५८७४ घरगुती गणेशमूर्ती बरोबर गौरींचेही विसर्जन सर्वत्र करण्यात आले.भाद्रपद चतुर्थीलागणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.चार दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर शनिवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौरीसह मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असल्याने शहरासह ग्रामीण भागात प्रमुख विसर्जन स्थळांवर पोलीस यंत्रणेकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.चौथ्या दिवशी गौरीसमवेत विसर्जन करणाऱ्या गणेश मूर्तींची संख्या तालुक्यात वाढली होती.कोरोना काळात चाकरमानी गावाकडे न आल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे निवासस्थानी शहरात गणपती बाप्पाची सण साजरा केला. मात्र या वर्षी भाविकांनी गावाकडचे गणप
- Get link
- Other Apps
तळ्यामध्ये होणार अखंडित वीजपुरवठा; १८ कोटींच्या भूमिगत विजवाहिनीच्या प्रकल्पाला मंजुरी महिला बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश तळा संजय रिकामे कोंकण आपत्ती प्रकल्पा अंतर्गत कामाचे नियत वाटप आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडील शासन निर्णय दि.१४.९.२०२३ तळा शहर येथे भूमिगत विद्युत वाहिनी टाकणे यासाठी १८,४७,१९००० रुपयांचा निधी मंजूर झाला असून यासाठी महिला बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे यांनी विशेष पाठपुरावा केला आहे.दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या तळा शहराचा वीजपुरवठा खंडित होणे हे पाचवीलाच जणू पुजलेले; पण हे दैन्य संपणार आहे. वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येत असल्याने हा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे १२ कोटी ४७ लाख रुपये आहे. तळा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होणे हा प्रश्न अग्रस्तानी आहे. सोसाट्याचा वारा, चक्रीवादळामुळे रहिवाशांना तासंतास अंधारात राहण्याची वेळ येते. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी तळा शहरात भूमीगत वीज वाहिन्यांचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे.चक्रीवादळ येणाऱ्या संभाव्य परिसरात चक्रीवादळामुळे
- Get link
- Other Apps
खारी /रोहा (केशव म्हस्के ):- रोहे कोलाड वाण्याची तळवळी येथील हभप.नंदकुमार तेलंगे महाराजांच्या निवासस्थानी गुरुवर्य गणेश नाथ महाराज, गुरुवर्य हरिश्चंद्र पाटील गुरुकुल खारपाले यांच्या कृपाशिर्वादाने पुरुषोत्तम अधिक श्रावण मास आणि नीज श्रावण निमित्ताने सलग ५८ दिवस श्री मद भागवत पारायण सोहळा आणि रामकृष्णहरी दिव्य मंत्राचे नामस्मरण जप यज्ञ, श्रावण सप्ताह त्याअनुषंगाने विविध अध्यात्मिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात आले १५ सप्टेंबर २०२३ रोजी रायगड भूषण हभप.मारुती महाराज कोल्हाटकर यांची प्रवचन सेवा दिपोत्सव साजरा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .. याप्रसंगी कोलाड वारकरी सांप्रदायिक हभप.नारायण महाराज दहिंबेकर, ग.रा.गोरीवळे,हभप.अनिल सानप,अनंत सानप,महिला भगिनी ग्रामस्थ मंडळी आदी भाविक भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढविली... छायाचित्र:- केशव म्हस्के (खारी/ रोहा)
- Get link
- Other Apps
कु.जिजा हिच्या वाढदिवसानिमित्त आनंद वाडी येथे रंगणार शक्ती तुरा नाचाचा जंगी सामना. तळा प्रतिनिधी- कृष्णा भोसले. तळा तालुक्यातील आनंदवाडी येथील राजेश रामदास पेलणेकर यांची कन्या कु. जिजा हीच्या प्रथम वाढदिवसा निमित्ताने मंगलवार दि. १९ सप्टेंबर २०२३ रोजी दु. ३ वाजता शक्ती तुरा नाचाचा जंगी सामन्यांचे आयोजन आनंद वाडी तळा येथे करण्यात आले आहे. तुरेवाले शंभूराजे घराण्यातील कै. काशीराम कुंभार यांचे शिष्य श्री गोविंद नामदे, बाजी पांडुरंग आणि गुरुवर्य लोकशाहीर तुकाराम मानकर यांचे पट्टशिष्य एकनाथ तु. घागरुम मु.रहाटाड ता. तळा चमत्कार नाच मडंळ रहाटाड कोळीवाडा मार्गदर्शक अशोक पदया पाटील कोरस मोरेश्वर घागरुम ,नामदेव म्हाशा ढोळकी पट्टु उदेश तळकर,भरत माणेकर, अशी तुरेवाले मंडळीअसणार आहे. तर शक्तीवाले गुरुवर्य भजन सम्राट मेंदाडकर श्री महादेव माने गुरुवर्य शाहीर कै. सदाशिव लक्ष्मण मानकर यांचे शिष्य अजय स मानकर मु.मादांड ता. तळा काळभैरव नृत्य कला पथक सहगायक श्री प्रभाकर श्री विजय वस्ताद श्री नथुराम साधु ढोळकी पट्टु नवनाथ पाट
- Get link
- Other Apps
मनवामिट हाॅटेलचे शानदार उद्घाटन खारी/रोहा (केशव म्हस्के) रोहे तालुक्यातील ग्रा.पं.खारगाव हद्दीतील मौजे खारी - काजुवाडी येथील गंगाजल शुद्ध पिण्याचे पाणी वितरक तरुण मराठी उद्योजक व्यावसायिक मनेष लिलाधर खिरीट यांच्या'manvameet ' हॉटेलचे शानदार उद्घाटन करण्यात आले.. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा मालक लिलाधर खिरीट,तंटा मुक्ती अध्यक्ष चंद्रकांत टिकोणे,तुकाराम शिर्के, swar Balloon डेकोराटर्स चे उमेश काळे,शैलेश खिरीट आदी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींनी सदिच्छा भेट देत अभिनंदन करून पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या... छायाचित्र :- केशव म्हस्के (खारी/ रोहा)
- Get link
- Other Apps
वावेहवेली येथे खोडकिडा नियंत्रणा बाबत शेतकरयांना माहिती. तळा कृष्णा भोसले वावे हवेली येथे भात पिकावर पडलेल्या खोडकिडा, करपा ई. कीड व रोग बाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. खोडकिडा नियंत्रणासाठी Quinolphos २५% ई.सी प्रवाही २५ मि.ली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा कॉरटॉप हायड्रोक्लोराइड ४% दाणेदार ६ किलो/एकर प्रमाणे वापर करावा.. तसेच करपा रोगासाठी ट्रायसाक्लोझोल 75 % डब्ल्यू.पी. १० ग्रॅम /प्रति १० लि.पाण्यात फवारणी करावी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट ५ ग्रॅम/ दहा लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला. तसेच कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत भात पिकाचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाची भित्तीपत्रके समाज मंदिर वावे हवेली येथे लावण्यात आले..यावेळी शेती शेती शाळेचा ४ था वर्ग घेण्यात आला. शेतीशाळेत शिवार फेरी घेण्यात आली व श्री.बाळू रामजी वारंगे यांच्या नियंत्रित प्लॉट येथे भात पिकाचे कीड व रोग व त्यांच्या व्यवस्थापनाबाबत कृषी पर्यवेक्षक श्री.जितेंद्र गोसावी व कृषी सहाय्यक श्री.योगेश
- Get link
- Other Apps
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेला सुरवात तळा कृष्णा भोसले तळा कृषी विभागाकडून सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रसायनांचा अतिरिक्त अधिकचा वापर त्यामुळे खालावलेला जमिनीचा पोत तसेच रासायनिक किटकनाशकाच्या फवारणीचे मानवी आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम याला पर्याय म्हणून सेंद्रिय व जैविक शेतीस चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचा या योजनेची सुरवात ताळा तालुक्यात करण्यात आली आहे या योजनेचा कालावधी ४ वर्षांचा असणार आहे ही योजना राज्यशासनाची महत्वकांक्षी योजना असल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र सेंद्रिय शेती मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या योजनांची मदत शेतकऱ्यांना करणार आहे त्यासाठी तालुक्यातील जास्तीत ज्यास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केले आहे. योजनेचा उद्देश पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, मोठ्या क्षेत्रावरचे प्रमाणीकरण व कृषी विकास योजनेतून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील श
- Get link
- Other Apps
नाभिक समाज तळा फोंडलवाडी सामाजिक सभागृह उद्घाटन व संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी तळा- किशोर पितळे नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे निमित्ताने सामाजिक सभागृहाचे उद्घाटन व वास्तुशांती समारंभ आज ११सप्टेंबर २०२३ रोजी शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून व फित कापून उद्घाटन करण्यात आले.त्यापूर्वी वास्तूचे पूजन, होम हवन व संत श्रेष्ठ सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे पुजा विधीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ७ वाजता वास्तुशांती कार्यक्रम संत सेना महाराज व वीर भाई कोतवाल यांच्या प्रतिमांना पुष्पमालिका अर्पुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला कोअर कमिटी सदस्य तथा स्वीकृत नगरसेवक लिलाधर खातू,नगरसेवक नरेश सुर्वे,माजी सरपंच नमित पांढरकामे,उपतालुका प्रमुख तांदळेकर, शशी ठमके,ज्येष्ठ समाज बांधव मारुती शिर्के व्यासपीठा वर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ठसाळ म्हणाले की तळा येथील नाभिक समाज यांची माननीय आमदार भरत शेठ गोगावले व जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या सह
- Get link
- Other Apps
खारी गावच्या वारकरी सांप्रदायिक सेवाभावी वृत्तीच्या सुलोचना म्हस्के यांचे निधन.. खारी/रोहा (केशव म्हस्के) रोहे तालुक्यातील खारगाव ग्राम पंचायत हद्दीतील मौजे खारी - काजुवाडी येथील वारकरी सांप्रदायिक सेवाभावी परोपकारी वृत्तीच्या सुलोचना(सखुबाई) पंढरीनाथ म्हस्के यांचे (कृष्ण जन्माष्टमी)बुधवार दि.०६ सप्टेंबर रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले... श्रीक्षेत्र देहू आळंदी - पंढरपूर ची नित्यनेमाने वारी करणाऱ्या वारकरी सांप्रदायिक विचारांची परंपरा जोपासणा- या सेवाभावी परोपकारी वृत्तीच्या सुलोचना(सखुबाई) पंढरीनाथ म्हस्के या अत्यंत प्रेमळ दयाळू क्षमाशील मन मिळावु स्वभावाच्या होत्या त्यांच्या निधनाची वार्ता समजताच आरे - चणेरा,धाटाव - किल्ला पंचक्रोशी परिसरातील वारकरी सांप्रदायिकसह स्वाध्याय परिवार,कुणबी समाज बांधव सामाजिक,शैक्षणिक,औद्योगिक,राजकीय आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने अंतयात्रे विधी प्रसंगी उपस्थिती दर्शवत अंतिम दर्शन घेत भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली... त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,दोन भाऊ,
- Get link
- Other Apps
जय लोटणेश्वर खारी महिला व तरुण युवा गोविंदा पथकाने मारली बाजी.. खारी/रोहा (केशव म्हस्के) :- खारी गावची पोर हुशार..एकच पाऊल टाका आला रोह्याचा नाका गोपाळ काला निमित्ताने जय लोटणेश्वर खारी महिला व तरुण युवा खारी गावच्या महिला व तरुण बाल गोपाळ गोविंदा पथकाने दमदारपणे आ.भरत शेठ गोगावले महाड आणि रोहे शहरातील सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित दही - हंडी सहा थर लावून सन्मानपूर्वक मानवंदना सलामी देत सही सलामतपणे एकाच दिवसात हजारो रुपयांची पारितोषक कमविल्याने सर्व गोविंदा तरुण बाल गोपाळ आणि महिला गोविंदा पथकामध्ये आनंददायी व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र कौतुक व अभिनंदन,शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे .
- Get link
- Other Apps
खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमिपूजन तळा संजय रिकामे तळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाचा उपयोग समाजातील मुला-मुलींच्या राहण्याची सोय,वयोवृद्ध समाजबांधव यांना हक्काची जागा, समाजातील विविध कार्यक्रमांची सोय, तसेच इतर महत्वाच्या सभा मिटींगसाठी तर उपयोगी ठरणार असून हे समाजभवन समाजाच्या विकासाचं महत्वाचं केंद्र बिंदू ठरेल, असे प्रतिपादन रायगडचे खा.सुनील तटकरे यांनी केले.तळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमिपूजन खा.तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेल रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव,रायगड जिल्हा उपाध्यक्ष कैलास पायगुडे,माजी राजिप सभापती गीता जाधव ,तालुका अध्यक्ष नाना भौड,बौध्दजन पंचायत समिती तळा तालुका अध्यक्ष अनंत मोरे,सचिव किशोर मोरे, सरपंच विमल जगताप ,माजी अध्यक्ष रामदास मोरे,धनराज गायकवाड,प्रकाश गायकवाड,माजी सरपंच तानाजी कालप, किशोर शिंदे,नामदेव जाधव,लक्ष्मण तांबे,चिंतामण नाकते गणेश तांबे,दीपक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.ते म्हणाले की, तळा शहरात हे बहुउपयोगी असे भव
- Get link
- Other Apps
मुरुड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच युवासेना शिवसेनाच्या माध्यमातून 1 लाखाच्या दहीहंडीचे आयोजन - रोह्यातील खारगाव कोळीवाडा 6 थर लावून ठरला पहिल्या नंबरचा मानकरी... शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या कडून आयोजक युवसेना उपजिल्हा प्रमुख परेश दादा किल्लेकर यांचे कौतुक... प्रतिनिधी - दीप वायडेकर युवा सेना शिवसेनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच युवासेना उपजिल्हा प्रमुख परेश दादा किल्लेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती भाविका परेश किल्लेकर यांच्या माध्यमातून एक लाखाच्या भव्य दिव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम विजेते रोहा तालुक्यातील खारगाव कोळीवाडा हा ठरला. स्पर्धेमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच लावणी सम्राज्ञी स्वप्नाली कलमकर (अलिबागकर), शरयू मोरे यांचे नृत्य प्रदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आराध्य डान्स ग्रुप यांचे सुद्धा नृत्य प्रदर्शन करण्यात आले. स्पर्धेकरिता जवळपास तालुक्यातील 15 पथकांनी समावेश दर्शवला होता. स्पर्धेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला. कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्
- Get link
- Other Apps
विकासासाठी आपण सरकारमध्ये सामील झालो असून परिवार म्हणून काम करत आहोत-खा.सुनील तटकरे काकडशेत सरपंच शरद सारगे यांचा ग्रामपंचायत सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश तळा संजय रिकामे राज्याच्या विकासासाठी आपण सरकारमध्ये सामील झालो असून, परिवार म्हणून काम करत आहोत, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून, राज्यातले प्रश्न सोडवता येणार असल्याचं अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तळा तालुका येथे पक्ष मेळावा आणि जाहीर प्रवेश कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यां समवेत संवाद साधला यावेळी काकडशेत ग्रामपंचायत सरपंच शरद सारगे यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला खा.सुनील तटकरे यांनी पुष्गुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाल घालून त्यांचे स्वागत केले या पक्ष सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नाना भौड,नगराध्यक्ष माधुरी घोलप,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे,शहर अध्यक्षा मेघा सुतार, मागासवर्गीय रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव,जिल्हा उपाध्यक्ष कैलास पायगुड
- Get link
- Other Apps
भानंग गावाने इतिहास घडविला ४० वर्षाने गोविंदा एकत्र खेळविला. तळा प्रतिनिधी- कृष्णा भोसले तळा तालुक्यातील भानंग गाव हे अनेक वर्षे गटातटात विभागला गेला होता. परंतु यावर्षी सर्व मतभेद विसरून ४० वर्षानी गावकरी एकत्र येत या वर्षीचा गोविंदा पथक गावातुन एकत्र निघत इतिहास घडविला आहे. यामध्ये भानंग ग्रामविकास मंडळ मुंबई अध्यक्ष नथुराम दगडु वाघरे व त्यांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मंडळ भानंग स्थानिक अध्यक्ष काही भागोजी विचारे व त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे संकल्पनेतून यावर्षी एकत्रित गोविंदा खेळविण्यात आला या संकल्पनेचा आदर राखत गावातील तरुण मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले. त्यामुळे गावात आनंदाचे वातावरणात निर्माण झाले आहे. यावर्षी गोविंदा पाहण्यासाठी गावातील आबालवृद्ध, महीला, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील वयोवृद्ध माणसांनी सुद्धा हा गोविंदा डोळे भरून पाहीला. आजारी माणसाने हा गोविंदा व्हिडिओ व्दारे सुद्धा पाहीला. गावाच्या ऐक्यासाठी अनेक मंडळी पुढे येत असून गावाच्या एकीचे दर्शन घडत आहे. गावाच्या एकीसाठी टाकलेले हे पाऊल भविष्याची एकात्मता वाढीस लागणारआहे
- Get link
- Other Apps
तळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक जगदीश कासे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर. तळा- किशोर पितळे तळा तालुक्यातील चरई आदीवासीवाडी येथे कार्यरत असलेले जगदिश हिंरु कासे यांना यंदाचा सन २०२३ चा रा.जि.प. अलिबाग शिक्षण विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कारजाहीर झाला आहे. तालुक्यातील २० वर्ष सेवा झाली असून मांदाड,वाशी महागांव, बहुलेवाडी अशा ग्रामीण भागातील विद्यार्थी पालक यांना प्राथमिक शाळेतून मिळणाऱ्या सोयी सवलती, शैक्षणीक दर्जा,शालेय उपक्रमाची जनजागृती करून पालकांचा ओढा प्राथमिक शाळेकडे येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विद्यार्थांच्या गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी लक्ष देत विद्यादानाचे काम केले आहे अशा पवित्र कामाची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिन ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षण हा समाजाचा सर्वांगीण पाया असून समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो.प्राथमिक शिक्षक ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास प्रयत्न करीत असतो. त्याला शिकवणे,टिकवणे यासारखे मोलाचे कार्य
- Get link
- Other Apps
अलिबाग येथे माविम संचलित ओम साई प्रेरणा साधन केंद्राची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न... खारी/रोहा (केशव म्हस्के) :-तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरणकार्यक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित साई प्रेरणा लोकसंचलित साधन कें ओम द्राची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.०४/०९/२०२३ रोजी भाग्यलक्ष्मी हॉल अलिबाग येथे मोठ्या आनंददायी व उत्साहात संपन्न झाली.. माविम रायगड जिल्हा समन्वयक अशोक चव्हाण (D.C.O) सहाय्यक जिल्हा समन्वयक वर्षा पाटील,MIS ऑफिसर दिपक पोटभरे, रायगड जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थपक जी.एस. हरळय्या, खादी ग्रामोद्योग मंडळ व्यवस्थापक राजेश श्रीहरी सुरुंग,रा.जि.प. समाजकल्याण मा.सभापती श्री दिलीप(छोटम शेठ) भोईर,ICICI सेल्स मॅनेजर विजय थोरात,वैभव पाटील DUGKVY कर्जतचे प्लेसमेंट ऑफीसर दिनेश खैरनार,CMRC व्यवस्थापक शमिम चौधरी, अध्यक्षा प्रमिला गावडे,दत्तात्रय खिलारे उपजीविका सल्लागार CMRC अलिबाग.आदी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केले तदनंतर
- Get link
- Other Apps
महिलांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देण्यासाठी हा आमचा प्रयत्न - नामदार आदिती तटकरे ४० संघामधे प्रथम क्रमांक समर्थ नगर तळा यांनी पटकावला. तळा- (किशोर पितळे) श्रावण महिन्याचे औचित्य साधून तळा तालुक्यात भव्य श्रावणसरी नृत्य स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आले. ३ सप्टेंबर २३ रोजी कुणबी समाज हाॅल पिटसई येथे आयोजित केले होते. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे म्हणाल्या की महिलांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आम्ही हा प्रयत्न करत असतो. जेणेकरून तिला सुध्दा घरातील कामातून बाहेर पडून आनंद घेता येईल. ग्रामीण भागातील महिला एवढ्या छान नृत्य करतात हे बघून मला खुप आनंद झाला आहे तसेच यावेळी नृत्य स्पर्धांसाठी जागा कमी पडली हे दिसून आले आहे तर पुढील वर्षी आपण खूप मोठी जागा उपलब्ध करून घ्या अशा सुचना केल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नाना भौड, महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे,माजी महिला व बालकल्याण सभापती गीताताई जाधव, माजी पंचायत समिती सभापती अक्षरा कदम, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे ,युवक अध्यक्ष नाग
- Get link
- Other Apps
रोह्यात गोकुळाष्टमी निमित्ताने हंडीला आणि शिंकाळ्याला वाढती मागणी... खारी/रोहा (केशव म्हस्के) सृष्टी चालक अखीलकोट ब्रह्मांडनायक भक्तजन पालक सकल जीवांचा प्राणसखा पूर्णावतार भगवान श्री कृष्णाचे जन्मोत्सव तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गोपाळकाला गोविंदा निमित्ताने दही - हंडी करिता मातीच्या मडक्याचा हंडीला आणि शिंक्याला वाढती मागणी लक्षात घेता रोहे बाजार पेठेमध्ये नगर पालिका,दमखाडी नाका,सागर डेअरी आदी ठिकठिकाणी हंडी मडके विकण्यास कुंभार समाज बांधव सज्ज झाल्याचे दिसून येत आहेत... भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यास अधिक मास पुरुषोत्तम मास श्रावण महिन्यात आल्याने दुग्ध शर्करा योग जुळून आल्याने विशेषत्वाने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.. श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा अशी देखील विशेष ओळख म्हणून श्रावण महिना उजाडले की सर्वत्र पांडव प्रताप,गुरू चरित्र,शिवलीलामृत,श्री हरी विजय भक्तिमय वातावरण निर्माण होते जणूकाही भक्ती चा महापूर येतो श्रावणी सोमवार,श्रावणी शनिवार,निमित्ताने भक्तिभावपूर्वक सर्वत्र आल्हाददायक व प्रसन्नता अध्यात्मिक व धार्मिक का
- Get link
- Other Apps
स्व.चंद्रकांत आपणकर गुरुजी यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनी आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद. तब्बल ६० रक्तदात्यांने उत्स्फूर्तपणे केले रक्तदान.. खारी/रोहा (केशव म्हस्के) रोहा तालुक्यातील खारगाव ग्राम पंचायत हद्दीमधील मौजे खारी येथील हनुमान मंदिर सभागृह येथे आज रविवार दिनांक.०३ सप्टेंबर २०२३ रोजी आदर्श शिक्षक जेष्ठ समाज सेवक स्वर्गीय चंद्रकांत गोविंद आपणकर गुरुजी ( चंदूभाई) यांच्या तृतीय (पुण्यस्मरण) स्मुर्ती दिनाचे औचित्य साधत आपणकर परीवाराच्या वतीने राज्य रक्त संक्रमण परिषद ब्लड बँक - अलिबाग यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभले... शुभारंभ प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन,आदर्श शिक्षक स्व.आपणकर गुरुजी यांच्या प्रतिमेल अर्पण करून आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतावेळीस सतेज आपणकर,श्रीमती.गुलाब ताई आपणकर,यांनी आपले भावनिक मनोगत व्यक्त करताना स्व.आपणकर गुरुजींच्या प्रती आठवणींना उजाळा देत अत्यंत भाव विभोर अश्रूंनी आपल्या भावना व्यक्त केल्याने उपस्थितांच्या मनामध्ये देखील गुरुजीं बद्दलच्या
- Get link
- Other Apps
रानभाज्यांचे संवर्धन आवश्यक -आ.अनिकेत तटकरे महिला बचत गट भवनसाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आ.तटकरे यांची घोषणा तळा संजय रिकामे रानभाज्या व गावठी भाज्यांना इतर भाज्यांपेक्षा अधिक मागणी आहे. आपल्या आरोग्यासाठी रानभाज्या आवश्यक आहेत. रानभाज्यांचे संर्वधन करण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार अनिकेत तटकरे यांनी केले. तळा तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामार्फत गणेश मंगल सभागृह तळा येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला. या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये सुमारे १५ बचत गटांमार्फत विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात आले. यानिमित्त रानभाज्या पाककला स्पर्धा घेण्यात आली.आमदार तटकरे यांनी सर्व स्टॉलना भेट देऊन पाहणी केली. आमदार तटकरे म्हणाले, ‘‘लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचे काम कृषी अधिकारी करत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचून त्यांना लाभ घेता येतो. रानभाज्या व गावठी भाज्यांना इतर भाज्यांपेक्षा मागणी आहे. आपल्