भानंग गावाने इतिहास घडविला ४० वर्षाने गोविंदा एकत्र खेळविला.
तळा प्रतिनिधी- कृष्णा भोसले
तळा तालुक्यातील भानंग गाव हे अनेक वर्षे गटातटात विभागला गेला होता. परंतु यावर्षी सर्व मतभेद विसरून ४० वर्षानी गावकरी एकत्र येत या वर्षीचा गोविंदा पथक गावातुन एकत्र निघत इतिहास घडविला आहे.
यामध्ये भानंग ग्रामविकास मंडळ मुंबई अध्यक्ष नथुराम दगडु वाघरे व त्यांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मंडळ भानंग स्थानिक अध्यक्ष काही भागोजी विचारे व त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे संकल्पनेतून यावर्षी एकत्रित गोविंदा खेळविण्यात आला या संकल्पनेचा आदर राखत गावातील तरुण मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले. त्यामुळे गावात आनंदाचे वातावरणात निर्माण झाले आहे.
यावर्षी गोविंदा पाहण्यासाठी गावातील आबालवृद्ध, महीला, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील वयोवृद्ध माणसांनी सुद्धा हा गोविंदा डोळे भरून पाहीला. आजारी माणसाने हा गोविंदा व्हिडिओ व्दारे सुद्धा पाहीला. गावाच्या ऐक्यासाठी अनेक मंडळी पुढे येत असून गावाच्या एकीचे दर्शन घडत आहे. गावाच्या एकीसाठी टाकलेले हे पाऊल भविष्याची एकात्मता वाढीस लागणारआहे. या गावातील बौद्ध समाज, मुस्लिम समाज हा सुद्धा या कार्यक्रमात विलीन झाला होता. एकंदरीत गाव एकतेच्या या टाकलेल्या पाऊलाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Comments
Post a Comment