Posts

Showing posts from January, 2022
Image
"योग्य लोकप्रतिनिधी निवडून दिल्यास विकास शक्य"-पंडीत पाटील रोहा-महेश मोहिते  शेतकरी कामगार पक्ष आजही जिल्ह्यातील प्रमुख पक्ष आहे.पक्षाने जनतेचा पैसा विकासकामांच्या माध्यमातून जनतेसाठीच आजवर खर्च केला आहे. पक्षाच्या माध्यमातून बिरवाडी सह चणेरा विभागात आजवर मोठया प्रमाणात विकासकामे झाली आहेत.शेतकरी कामगार पक्ष कधीही विजयाने उन्माद होत नाही किंवा पराभवाने खचत नाही.जनतेचा पैसा जनतेसमोर आणून विकासकामे करणारा पक्ष असून आज आमदार नसलो तरी बरीच विकासकामे मार्गी लावली आहेत.या विभागातील औद्योगिक विकासाला शेकापच कधीही विरोध नव्हता. मात्र तुम्ही आपल्या जमिनी बाहेरील लोकांना विकु नका.विद्यमान आमदारांचा विकासकामांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे हे आता येथील जनतेला कळून आले आहे. त्यामुळे योग्य प्रतिनिधी निवडून दिला तरच विकास होतो याचा अनुभव आता चणेरा सह मतदारसंघातील नागरिकांना येत आहे.असे प्रतिपादन  माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी केले.             चणेरा विभागातील खांबेरे ग्रामपंचायत अंतर्गत  बिरवाडी येथील प्राथमिक शाळा,भवानी मंदिर सुशोभीकरण लोकार्पण प्रसंगी बिरवाडी येथे आयोजित जाहीर सभेत उपस्थ
Image
    संकल्प सेवा ग्रुप व एंजॉय मित्र ग्रुप मंडळ महाड आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद महाड-इस्माईल मापकर दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संकल्प सेवा ग्रुप महाड व एन्जॉय मित्र मंडळ महाड यांच्या संयुक्त विद्यमानाने जनकल्याण रक्तपेढी महाड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.   सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून व  स्वर्गीय मोहन जंगम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करु न तसेच प्रसिद्ध माध्यमिक  शिक्षक तथा पत्रकार स्वर्गीय शिंगटे सर यांना श्रद्धांजली अर्पण करून संजय भाई मेहता,मोहन काका शेट ,गणेश जंगम, विजय लाड इत्यादी मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घघाटन संपन्न झाले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेने संकल्प सेवा ग्रुप आणि एन्जॉय मित्र मंडळ यांच्या आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 50 रक्तदात्यांनी रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले .या दोन्ही संघटनांना महाड शहरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या रक्तदानाच्या कार्याबद्दल नागरिकांची कौतुकाची थाप पडत आहे .याच कार्यक्रमात डॉक्टर
Image
  ग्रुप ग्रामपंचायत सानेगांव-यशवंतखारच्या वतीने डिजिटल शाळा,व्यायामशाळा साहित्य इ.विकासकामांची पुर्तता रोहा-प्रतिनिधी रायगडचे खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायत सानेगाव-यशवंतखार मध्ये विकासकामांचा धडाका सुरु आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर यांचे नेतृत्वाखाली व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहयोगातून ग्रामपंचायत क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेला दिसत आहे. आधुनिक युग हे तंत्रज्ञानाचे युग समजले जाते. प्राथमिक शाळेपासून जर विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळाले तर खेड्यातील मुले सुद्धा शहरातील मुलांइतकेच तंत्रज्ञानात निपुण होतील, या उदात्त हेतूने ग्रामपंचायत सानेगाव-यशवंतखारच्यावतीने रायगड जिल्हा परिषद शाळा यशवंतखार या शाळेसाठी संगणक  प्रदान करण्यात आला. काळाच्यागतीने यशवंतखार शाळा आता डिजिटल शाळा झाली आहे.ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोग योजनेतून सदरचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांना मधील युवा पिढी सुदृढ व्हावी यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तरुणांसाठी व्यायाम शाळेच्या साहित
Image
"माणसाची उंची त्याच्या कर्तृत्वाने वाढत असते" - रायगड भूषण ह.भ.प.बाळाराम शेळके महाराज यांचे प्रतिपादन खारी/ रोहा-केशव म्हस्के जीवन जगत असताना माणसाने आपल्या कर्तव्यापासून दूर न राहता नित्यनेमाने भगवंतांच्या नामस्मरणामध्ये राहिले पाहिजे. अनुसंधान चुकता कामा नये, कारण माणसाची उंची ही त्याच्या नित्य कर्तव्य चांगले कर्म व कर्तृत्वामुळेच वाढत असते असे प्रतिपादन रायगड भूषण पुरस्कार प्राप्त हभप.बाळाराम महाराज शेळके यांनी वाशी येथील थोर समाज सेवक वतनदार मारुती लहाने साहेब यांच्या गुरुवार दि.२७/०१/२०२२ अंतिम धार्मिक विधी बारावे प्रसंगी प्रवचन सेवे दरम्यान केले.   रोहा वाशी येथील थोर समाज सेवक तथा कुणबी समाज माजी अध्यक्ष,ग्रू. ग्रा.पं.वाशी माजी उपसरपंच,वाशी - धाटाव - तळाघर विविध विकास सहकारी संस्थेचे चेअरमन वतनदार मारुती राव हरी लहाने यांच्या अंतिम धार्मिक विधी बारावे प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की मारुती लहाने यांनी आपले संपूर्ण जीवन गोर - गरीब,गरजवंत शेतकऱ्यांसह सर्व सामान्य माणसाच्या आर्थिक तसेच सामाजिक उन्नती,उत्कर्ष व प्रगती व्हावी याकरीताच वाहिले त्यामुळेच आज त्या
Image
माणुसकी प्रतिष्ठान ग्रंथालय व कार्यालय वर्धापन दिन साजरा अलिबाग -प्रतिनिधी  दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून माणुसकी प्रतिष्ठान जितनगर महाराष्ट्र व रायगड पोलिस कल्याण शाखा अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा पंधरवडा निमित्त विविध मराठी  सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये काव्य संमेलन, परिसंवाद, अभिवाचन, प्रश्नमंजुषा, अंताक्षरी असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले.बहुतांश पोलीस,विद्यार्थी व लोकांनी सहभाग घेतला होता.   माणुसकी ग्रंथालय व कार्यालयाच्या एक वर्ष पुर्ती निमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास रायगड पोलीस निरीक्षक,श्री. भास्कर पवार हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, श्री रमेश धनावडे, ज्येष्ठसाहित्यिक, कवी व रिलायन्स जनसंपर्क अधिकारी रायगड,रायगड जिल्हा समन्वयक जयवंत गायकवाड, संवादतज्ञ सुरेश पाटील,डॉ. चंद्रशेखर साठे, डॉ. कीर्ती साठे,  रायगड भूषण निळकर महाराज, भावेश्री उमेश वाळंज, देवेंद्र केळुसकर, रेश्मा वारगे, जीवीता पाटील अध्यक्षा तेजस्विनी फाउंडेशन, निलेश थळे संगीतकार अध्यक्ष नव कलाकृती फाउंडेशन, संज
Image
डॉ.जगदीश शिगवण यांनी मिळवली पी.एच.डी पदवी कुणबी युवा तळा ग्रामीण तर्फे सत्कार तळा-किशोर पितळे तळा तालुक्यातील कर्नाळा गावचे सुपुत्र प्राध्यापक डॉ.जगदीश हिराजी शिगवण यांनी नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे वाणिज्य आणि व्यवस्थापन या विषयात पी.एच.डी.पदवी प्राप्त केली.त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल कुणबी युवा तळा ग्रामीण यांनी त्यांचे कौतुक करून सत्कार केला.डॉ.जगदिश शिगवण हे कर्नाळा गावचे सुपुत्र असून गरीब शेतकरी कष्टकरी कुटुंबातील असून प्रतिकुल परिस्थिती वर मात करून जिद्द,चिकाटी,आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी हिपदवी प्राप्त करीत असताना अनेक संकटांना आणिअनेकसमस्यांना तोंड द्यावे लागले.उच्च शिक्षणा शिवाय पर्याय नाही.इंजिनिअरिंग,डॉक्टर सर्वजण होतात पण विद्यार्जनाचे मनापासून करण्याची ईच्छा असल्याने मी हे क्षेत्र निवडले.असे सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. त्यांनी आपल्या शिक्षणाचा व जीवनाचा खडतर प्रवास सांगितला. यावेळी मान्यवर व विद्यार्थी त्यांची प्रेरणा घेऊन भारावून गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले.डॉ.जगदीश शिगवण यांनी एम.ए.लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नालीटिकल
Image
गोवे महिला बचत गटांनी तयार केलेल्या मसाल्याची चव महाराष्ट्राने चाखावी - खासदार सुनिल तटकरे  रोहा-शरद जाधव       गोवे ग्रामपंचायतीसह आजुबाजुच्या परिसरातील बुजुर्ग नेते मंडळींनी हा परिसर घडवीला त्याच पध्दतीने तरुणवर्गही लक्ष घालीत आहे. गोवे गाव एकसंघ झाला, कटुता संपली ,याचा मनस्वी आनंद माझा सारख्या कार्यकर्त्यांला असुन या गावातील जिजाऊ महिला बचत गटानी विविध प्रकारच्या मसाल्याचा उद्योग सुरु केला आहे. त्यामुळे माझ्या माता-भगिनीनी तयार केलेल्या या मसाल्याची चव महाराष्ट्राने चाखावी ईतकी भरभराट उद्योगाची व्हावी, असे वक्तव्य खासदार सुनिल तटकरे यांनी केले. गोवे येथील ग्रामपंचायत इमारतीचे उध्दघाटन ,नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन इ. विकास कामांच्या उध्दघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्या सपिठावर आमदार अनिकेतभाई तटकरे, सुरेश दादा महाबळे ,रामचंद्र चितळकर ,महेंद्र पोटफोडे  बाबूराव बामणे,नारायण धनवी, तानाजी जाधव,प्रकाश थिटे, राम कापसे, नंदा कापसे, प्रितम पाटील, नरेंद्र जाधव, वसंत भोईर, संजय माड़लुस्कर ,प्रशांत म्हशीलकर ,प्रमोद म्हसकर, मनोज शिर्के, दशरथ साळवी, उपसरपंच उत्तम बाईत आदी कार्यकर्ते उपस्थित होते
Image
दुरावलेल्या मित्रांना सोशल मीडियाने आणले एकत्र २८ वर्षानंतर सवंगड्यांनी अनुभवला "हायस्कूलचा एक दिवस" रोहा-प्रतिनिधी      रोहा तालुक्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या धाटाव हायस्कूलमधील १९९३-९४ च्या दहावीच्या बॅचने तब्बल २८ वर्षांनंतर ‘पुन्हा एक दिवस हायस्कूलचा’ अनुभवला.सोशल मीडियाच्या माध्यमातून दुरावलेल्या मित्र,मैत्रिणी एकत्र येऊन शालेय जीवनातील असंख्य आठवणीना उजाळा देत एकमेकाशी हितगुज केले.अगदी शाळेच्या प्रार्थनेपासून ते थेट वर्गातील धूमशानापर्यंतच्या सर्व गोष्टी करून या एका दिवसात सर्वांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले.     आपण कितीही मोठे झालो,वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो तरी शालेय जीवनातील मौज काही वेगळी असते. आपली शाळा आणि शाळेतील ते सोनेरी दिवस कोणी विसरू शकत नाही; पण काळ कधी थांबत नाही.सरलेले दिवस पुन्हा येत नाहीत.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उत्तम म्हस्कर यांने या बॅचच्या काही मित्र-मैत्रिणींचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला.अनेक मित्र-मैत्रिणी हळूहळू या ग्रुपमध्ये सहभागी होत गेले आणि ‘गेट टुगेदर’ची संकल्पना पुढे आली.दिवस ठरला रविवार २३ जानेवारी स्नेहसंमेलनाचा.त्या द
Image
राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयोत्सव नवनिर्वाचित नगरसेवक खासदार सुनिल तटकरे यांच्या भेटीला तळा -किशोर पितळे   तळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तुंग यश संपादन केले, विजयाचा गुलाल अंगावर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांनी सर्वप्रथम रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांचे सुतारवाडी कार्यालय गाठले.तळा नगरपंचायतीत गेली वीस वर्षे शिवसेना पक्षाची सत्ता उलथवून शिवसेना उमेदवारांचा दारुण पराभव करीत विजय मिळवल्या नंतर रायगडचे खासदार सुनिल तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांची त्यांनी सर्वप्रथम भेट घेतली व राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचा झालेला विजय हा तळा शहरातील सर्वसामान्य जनतेचा विजय असून तटकरे परिवाराने घेतलेल्या मेहनतीचे फळ असल्याचे यावेळी नगरसेवकांनी सांगून त्यांचे आभार मानले.                     खासदार सुनिल तटकरे यांनी तळा तालुक्यातील विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्त्यांना कायमच ताकद देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. तटकरे यांच्यावर असलेली निष्ठा हिच उमेदवारांच्या विजयासाठी सत्कारणी लागली आहे.नगरपंचायत निवडणुकीत ही त्याचा प्रत्यय आला.तळा श
Image
गोवे ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांचा धडाका तटकरे कुटुंब गावच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांची वचन पूर्तता व विकास कामांचे भूमिपूजन   कोलाड-श्याम लोखंडे कोकणचे भाग्यविधाते, विकासाचे शिलेदार व रायगड- रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे ,पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे,आ.अनिकेत तटकरे हे गावच्या सर्वांगिक विकासासाठी कटिबद्ध असून रोहा तालुक्यातील गोवे ग्राम पंचायत हद्दितील विकास कामांची वचनपूर्तता करत गोवे ग्राम पंचायत हद्दितील मुठवली बु. येथे सायं 5 वा. व गोवे येथे सायं 6 वा.दिलेल्या वचनांचे पालन करत गावातील जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या विकास कामांचा तसेच अंतर्गत रस्त्यांचा शुभारंभ व उर्वरीत विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकप्रिय खा.सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थित व त्यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.  रोहा तालुक्यात विकास कामात आघाडी घेत असलेल्या गोवे ग्रामपंचायत हद्दीतील गोवे व मूठवली बु. येथे खा.सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते व आदितीताई तटकरे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड, यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थ
Image
वाशी गावचे जेष्ठ समाजसेवक वतनदार मारुती हरी लहाने यांचे निधन खारी रोहा-केशव म्हस्के        रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाशी येथील रहिवासी तथा तळाघर - बोरघर विभाग विविध विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन जेष्ठ समाजसेवक वतनदार श्री.मारुती हरी लहाने साहेब यांचे रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी वयोमानपरत्वे अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले.  तरुणांना आदर्शवत, कर्तृत्ववान,पितृतुल्य नेतृत्व हरपले.  मारुती लहाने एक आधारवड  रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती मनोहर विष्णू पाशिलकर उर्फ भाईसाहेब पाशिलकर यांचे अत्यंत निकटचे निष्ठावंत व विश्वासू सहकारी होते.  पुढे त्यांच्याच पुढाकाराने, मार्गदर्शनाने व सहकार्याने तालुक्यातील राजकीय दृष्ट्या नावाजलेल्या ग्रुप ग्राम पंचायत वाशी चे सलग पंधरा वर्षे  बिनविरोध माजी उपसरपंच पद भूषविलेले मारुती लहाने यांचा ग्रामपंचायत हद्दीतील विविध सामाजिक विकास कामे मोठ्या प्रमाणावर मार्गी लावण्यात सिंहाचा वाटा होता,तसेच किल्ला-धाटाव ग्रुप कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष तथा कृषिनिष्ठ शेतकरी तळाघर - बोरघर - लांढर
Image
आई एकविरा हॉटेलचे शानदार उध्दघाटन खवय्ये रोहेकरांच्या सेवेसाठी रुचकर जेवणाची पर्वणी रोहा - शरद जाधव          रोहा नगर परिषद हद्दितील अष्टमी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य नंदूशेट म्हात्रे व शशिकांत कडू यांच्या मालकिच्या आई एकविरा हाॕटेलचे शानदार उध्दघाटन राष्ट्रवादी काँग्रेस  जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर शेट पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.     यावेळी सभापती जनाबाई वाघमारे,विजयराव मोरे, विनोद भाऊ पाशीलकर, अनिल भगत,उपसभापती रामचंद्र  सकपाळ,लक्ष्मण महाले, गणेश मढवी ,अनंत देशमुख ,सुनिल देशमुख, पांडूरंग कडू, वसंत भोईर ,किरण मोरे आदी कार्यकर्ते  व मित्र परिवार उपस्थित होते.              रोहा शहराला लागुन असलेल्या कुंडलिका नदी पूलाला लागुन अष्टमी रस्त्यावर एकविरा हाॕटेल हे प्रवासी व पर्यटकांसाठी सज्ज झाले आहे. येथे कोकणी पध्दतीचे घरगुती रुचकर शाकाहारी- मांसाहारी जेवणाची उत्तम सोय आहे.कोळी-आगरी पध्दतीचे मांसाहारी जेवण हे या हाॕटेलचे वैशिष्ट्ये आहे.       सर्वसामान्यांपासून मध्यम वर्गियांपर्यंत त्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात ग्राहकांना जेवणाचा आस्वाद घेता येणार असल्याचे हाॕटेलचे मालक नंदू शेट
Image
मुबंई गोवा महामार्गावरील खांब गावानजिक जीवघेणे खड्डे खड्डयांमधून प्रवाशी जखमी झाल्यानंतर खड्डे भरण्यासाठी ठेकेदाराला जाग येते का ? संतप्त प्रवासी वर्गाचा सवाल                   कोलाड -श्याम लोखंडे   मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खांब गावाच्या बायपास रस्त्याच्या बाजूकडून सनी ढाब्या समोरील कोलाडकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठया प्रमाणात पडलेल्या खड्डयांमुळे दुचाकी स्वार व प्रवासी वर्गाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या खड्डयांमधून प्रवाशी जखमी झाल्यानंतर खड्डे भरण्यासाठी संबधित ठेकेदाराला जाग येते काय? असा संतप्त सवाल प्रवासी वर्गाकडून केला जात आहे.                    मुंबई-गोवा हायवे वरील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेली बारा वर्षापासून सुरु आहे. काम अद्यापही पुर्ण झाले नाही ही मोठी गंभीर समस्या आहे. हे काम केव्हा पुर्ण होईल? याची खात्री ही देता येत नाही.दोन महिनापूर्वी या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाढीव रक्कम ही मंजूर केली. तरीही या रस्त्याच्या कामाला गती आलेली दिसत नाही.रस्त्याचे काम सुरु करणे राहिले दूरच , पावसाळ्यात पडलेले खड्डेही भरले गेले नाही
Image
सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात संपन्न रोहा-सचिन साळूंखे भारत सरकार युवा खेल मंत्रालय यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार प्राप्त असलेली संघटना सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान या संघटनेचा 12 जानेवारी २०२२ रोजी पाचवा वर्धापन दिन रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात संपन्न झाला. वर्धापन दिन कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनास रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रदिप उर्फ आप्पा देशमुख,अमित घाग (भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ), सलाम रायगड चे संपादक, तरुणांचे मार्गदर्शक राजेन्द्र जाधव, संपादक सचिन साळुंखे, पत्रकार जितेंद्र जाधव,  महेश मोहिते, पत्रकार तथा आदर्श शिक्षक नंदकुमार मरवडे , विजय खेरटकर यांसह अनेक मान्यवर उपस्थिती होते.  यावेळी मान्यवरांचे हस्ते सुराज्यच्या वेबसाईटचे उद्धघाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद व जिजाऊ माँसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. थोर समाजसेविका,अनाथांची माय सिंधूताई सपकाळ ह्यांना आदरांजली वाहण्यात आली.  भारत सरकारच्यावतीने युथ संमेलन आयोजन करण्यात आले होते.सदर युथ
Image
ऐनघर ता.रोहा येथे जिजाऊ जयंती साजरी  रोहा-प्रतिनिधी शिवरायांना घडविणाऱ्या,स्वराज्याचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या व ते सत्यात उतरविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या राजमाता जिजाऊ  माँसाहेबांची आज जयंती. दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी ऐनघर ता.रोहा येथे सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती  साजरी करण्यात आली.यावेळी  कोरोना नियमांचे पालन करून व सुरक्षित अंतर राखण्यात आले,  कमीत-कमी लोकांमध्ये एक तासाच्या कालावधीमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायतीच्या सरपंच ,सर्व सदस्य व ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते,तसेच शिवनेरी ग्राम संघाचे पदाधिकारी,महिला समूहाचे अध्यक्ष,सचिव ,वांगणी ग्राम पंचायत सी.आर.पी.दिपाली गोळे, बँक सखी वर्षा जांबेकर व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Image
रायगड जिल्हा भोई समाजाच्यावतीने डॉ.प्रेमळ मुसळे हिचा सत्कार .     कोलाड -श्याम लोखंडे   रोहा तालुक्यातील गोवे गावची सुकन्या डॉ. प्रेमळ सुरेश मुसळे हिने (बी.ए.एम.एस./मुंबई) ही पदवी घेऊन डॉक्टर झाल्यामुळे तिचा रायगड जिल्हा भोई समाजातर्फे सन्मान करण्यात आला.             रायगड जिल्हा भोई समाज सेवा संस्थेची ६२ वी वार्षिक परिषद व १७ वी वार्षिक अहवाल सभा शनिवार दि.८ जानेवारी २०२२ रोजी रोहा तालुक्यातील म्हसकरवाडी येथे संपन्न झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाकर मधुकर कनोजे  सर व कार्यक्रमाचे उद्धघाटक खा.सुनिलजी तटकरे हे होते.या कार्यक्रमात गोवे गावची सुकन्या व सध्या ठाणे येथे राहणारी कु. प्रेमळ सुरेश मुसळे ही बी.ए.एम.एस.(मुंबई)ही पदवी घेऊन डॉक्टर झाल्यामुळे म्हसकरवाडी येथील कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.                             या कार्यक्रमाचे उद्धघाटक खासदार सुनिलजी तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, भोई समाज सेवा संस्था या समाजाचे कार्य दिवसेंदिवस प्रगती पथावर जात असून या समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत व आम्ही ही कोठे कमी नाही हे एका खेडेगावातील मुलगी प्रेमळ सु
Image
ब्राह्मण मंडळ रोहा आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद रोहा-निखिल दाते ब्राह्मण मंडळ रोहा व अभंग सेवा मंडळ रोहा तर्फे रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रोहेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला, या शिबिरात 64 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. सदर रक्तदान शिबिराचे उद्धघाटन व दीपप्रज्वलन ब्राह्मण समाजातील दानशूर व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री. सुभाषदादा मेहेंदळे, तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. श्रीकांत ओक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी श्री. सुभाषदादा मेहेंदळे यांनी ब्राह्मण मंडळ रोहाच्या कार्याला शुभेच्छा देऊन मंडळाच्या कार्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचा मानस व्यक्त केला. सदर रक्तदान शिबिराला रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी सदिच्छा भेट दिली,यावेळी त्यांनी शिबिराच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले. त्यांच्यासमवेत नगरसेवक महेंद्र गुजर, महेंद्र दिवेकर, महेश कोल्हटकर, शहर अध्यक्ष अमित उकडे, चंद्रकात पार्टे आदी मान्यवर उपस्थित होते. रोह्याचे माजी नगराध्यक्ष संजय कोनकर,समीर शेडगे, भाटे वाचनालय अध्यक्ष किशोर तावडे, ज्वेलर्स असो
Image
शेतक-यांच्या फसवणुकी विरुद्ध अखेर गुन्हा दाखल,रोह्यातील दलाल लाॅबीला मोठा धक्का सर्वहारा जनआंदोलन संघटनेच्या प्रयत्नांना मोठे यश  कोलाड - श्याम लोखंडे  रोहा तालुक्यात चणेरा विभागात बल्क ड्रग्ज फार्मा पार्कसाठी जमीन संपादन सुरू असलेल्या गावामध्ये शेतक-यांची फसवणुक व जमिनीचे गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने या प्रकरणांची पोल-खोल करण्यासाठी सर्वहारा जन आंदोलन च्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांचे लक्ष वेधण्याचा शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्यायासाठी प्रयत्न केला होता. याबाबत चर्चा करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक दुधे साहेब यांनी दि. 5/1/2022 रोजी सर्वहारा जनआंदोलन संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा उल्का महाजन व रायगड जिल्हा अध्यक्ष सोपान सुतार सह आदिवासी व शेतकरी बांधवांना याकरिता बोलावले होते.  सदरच्या चर्चेत जिल्हा पोलिस अधिक्षक दुधे यांनी प्रथमतः त्यांचे प्रश्न समजून घेऊन यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश रोहा पोलिस स्टेशन च्या अधिका-यांना दिले. सदर फिर्यादीनी तक्रार नोंदवून आता पाच महिने उलटले आहेत. तरीही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळ
Image
कु.सानिका बेंडेकरने सुमधुर गीत गाऊन श्रोत्यांची जिंकली मने   सहा.पोलीस उपनिरीक्षक राम पवार यांनी केला गुणगौरव कोलाड-श्याम लोखंडे   स्वानंद सुखनिवासी सदगुरु शिगवण महाराज स्थापित हरी ओम सतनाम वारकरी संप्रदाय समाज आयोजित अखंड हरिनाम सप्ताह महा नाम जप यज्ञ केले व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन नुकतेच श्रीक्षेत्र शिरगाव तालुका चिपळूण येथे करण्यात आले होते. सदर सप्ताह दि. २९ डिसेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.या सप्ताहामध्ये राधाकृष्णाचे उत्कृष्ट गीत गाऊन मने जिंकणाऱ्या सानिका दिपक बेंडकर राहणार कुंभार्ली सांगळेवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या विद्यार्थिनीचा सुधागड-पाली पोलिस स्टेशनचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.राम मारुती पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. सानिकाने भावी जीवनात खूप प्रगती करून आपल्या आई-वडिलांचे,गुरुजनांचे ,गावाचे नाव लौकिक करावे म्हणून शुभेच्छा देऊन कौतुक केले. स्वानंद सुखनिवासी सदगुरु शिगवण महाराज संस्थापित हरिओम सनातन वारकरी संप्रदाय समाज आयोजित अखंड हरिनाम सप्
Image
श्री.दत्तात्रेय चंदर चव्हाण तथा डि.सी.काका यांची ग्रुप ग्रामपंचायत नवघर उपसरपंचपदी बिनविरोध निवड  पाली-प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री. दत्तात्रेय चंदर चव्हाण तथा डि.सी.काका यांची ग्रुप ग्रामपंचायत नवघर उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सुधागड तालुक्याचे सभापती रमेश सुतार, नवघर ग्रामपंचायत सरपंच स्वाती कदम, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ,संजय कदम,शशिकांत  लांगी,राजेश मांगले,नारायण सुतार, एकनाथ जेधे,गंगाराम सुतार,मोरेश्वर चव्हाण,यशवंत काजारे,विवेक रोकडे,रवींद्र जाधव, दिपक सुतार,सचिन खोले, अरुण साळवी,प्रभाकर पोरे  लक्ष्मण सुतार ,नारायण जाधव,बळीराम मांगळे,दगडु साळवी,मोरेश्वर दळवी,सौ.दर्शना सतेरे,रोशनी चव्हाण आणि नवघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान श्री.दत्तात्रेय चंदर चव्हाण तथा डि.सी.काका यांच्या ग्रामपंचायत नवघर उपसरपंचपदी निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
Image
हरिनामाच्या घोषात खासदार सुनिल तटकरे यांनी धरला ठेका वरसे येथे अखंड हरिनांम सप्ताहाची सांगता  रोहा -शरद जाधव रोहा तालुक्यातील धाटाव किल्ला पंचक्रोशीचा 36 वा अखंड हरिनांम सप्ताह मोठ्या उत्साहात माऊलींच्या जयघोषात संपन्न झाला. काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.यावेळी खासदार सुनिल तटकरे यानी आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, राष्ट्र वादी तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर,विजयराव मोरे,सुरेश मगर,रामचंद्र सकपाळ,शिवराम शिंदे, रामा म्हात्रे, सरपंच नरेश पाटील, हेमंत कांबळे, अनिल भगत, अप्पा देशमुख,अमित मोहिते,हभप हरिश्चंद्र पाटील महाराज आदि मान्यवर उपस्थित होते. मागिल 36 वर्षांपासुन सातत्याने  अखंड हरिनांम सप्ताह तितक्याच उत्साहात सुरू आहे. या वर्षी सप्ताहाचे यजमानपद वरसे ग्रामस्थांकडे असल्याने मधुकर पाटील,रामा म्हात्रे, सरपंच नरेश पाटील, हेमंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थ,तरुणवर्ग सप्ताह सोहळा पार पाडण्यासाठी एकवटले होते. यावेळी बीड,लातूर,पंढ़रपूर येथील नामवंत कीर्तनकार,महंत यांची किर्तनसेवा आयोजित करण्यात आली होती.सप्ताह काळात जणू विठूरायाच
Image
यशवंतखार येथे बंदरआळी वरचापाडा सामाजिक सभागृह बांधण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न   रोहा-प्रतिनिधी खासदार सुनिलजी तटकरे,पालकमंत्री आदितीताई तटकरे व कुशल संघटक आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुक्यातील यशवंतखार ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांचा धुमधडाका सुरू आहे.विविध विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर प्रामाणिकपणे प्रयत्न करित आहेत.  त्याचप्रमाणे यशवंतखार ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या खारगांव जिल्हापरिषद मतदार संघातील क्रियाशील जि.प. सदस्य आस्वाद पाटील यांचे जि.प.शेष फंड निधीतुन मंजुर विकास कामे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवार दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी यशवंतखार गावातील बंदरआळी वरचापाडा सामाजिक सभागृह बांधण्याच्या कामाचा शुभारंभ गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर,युवा नेते संतोष भोईर,तंटामुक्त गाव अध्यक्ष हरिभाऊ दिवकर, पांडुरंग भोईर, मधुकर तांबडे, मंगेश सुरणकर,ताई दिवकर, माधुरी दिवकर, मथुरा दिवकर, जनाबाई म्हात्रे, उषा दिवकर, हिरा पांडुरंग म्हात्रे परेश
Image
रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंबेवाडी व रोठखुर्द येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहाने साजरी रोहा-प्रतिनिधी आद्य स्त्रीशिक्षिका,सामाजिक क्रांतीच्या अग्रणी,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 131 वी जयंती,रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने साजरी करण्यात आली.आंबेवाडी आणि ग्रामपंचायत रोठखुर्द या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.  बालिका दिनाचे औचित्य साधून यावेळी शिक्षणक्षेत्रात व कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रोहा तालुक्यातील क्रियाशील महिला तालुका अध्यक्षा सौ.प्रितमताई पाटील यांच्या समवेत रोठखुर्द सरपंच गीताताई मोरे, उपसरपंच सुनिता मोरे,ज्योती डाके,सर्व ग्रामपंचायत सदस्य,स्नेहा ताडकर,समीक्षा घावटे,सुरेखा पार्टे,शितल बंगाल,रोशनी बेर्डे, अपर्णा कोंडे, प्रणाली सानप, तसेच सर्व शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका,मदतनीस व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Image
खैराळे येथील गंभे परिवाराचे कुलदैवत प्राणप्रतिष्ठापण सोहळा जलौषात साजरा कोलाड - श्याम लोखंडे  रोहा तालुक्यातील चणेरे पंचक्रोशीतील खैराळे येथे शनिवार दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी नववर्षाच्या प्रथमदिनी व मार्गशीर्ष महिन्याचे औचित्य साधून गंभे परिवार कुलदैवत प्राणप्रतिष्ठापण सोहळा जलौषात साजरा झाला.खैराळे गावचे गंभे कुटुंब गावातील व पंचक्रोशीतील सर्वात मोठे कुटूंब तब्बल ६९ उंबऱ्यांचे.कुलदैवताचे भक्त श्री. चंद्रकांत दामोदर गंभे यांच्या शुभहस्ते जागृत देवस्थान खंडोबा, काळ भैरव, चेडोबा यांची प्राणप्रतिष्ठा पूजा स्थापना मोठ्या उत्साह व आनंददायी वातावरणात करण्यात आली .  ऐतिहासिक वारसा असलेल्या भैरी आई, भवानी आई, या देवी देवतांची ओटी खणा नारळानी मुकुंद गंभे-मंदा गंभे व गोपीनाथ गंभे-दमयंती गंभे यांच्या हस्ते भरण्यात आली.विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.यावेळी गंभे परिवार व गावातील  सकपाळ,तांबे, सावंत, आयरे,खेरटकर,मयेकर, मांडवकर कुटुंबातील  माहेरवाशीनी महिला वर्ग  रंगीबेरंगीत नऊवारी साड्या परिधान करून व पुरुषवर्ग पारंपरिक वेष परिधान करुन उपस्थित होते.  हाती वैष्णव ध्वजा घेऊन अबालवृध्द भ