"माणसाची उंची त्याच्या कर्तृत्वाने वाढत असते" - रायगड भूषण ह.भ.प.बाळाराम शेळके महाराज यांचे प्रतिपादन


खारी/ रोहा-केशव म्हस्के

जीवन जगत असताना माणसाने आपल्या कर्तव्यापासून दूर न राहता नित्यनेमाने भगवंतांच्या नामस्मरणामध्ये राहिले पाहिजे. अनुसंधान चुकता कामा नये, कारण माणसाची उंची ही त्याच्या नित्य कर्तव्य चांगले कर्म व कर्तृत्वामुळेच वाढत असते असे प्रतिपादन रायगड भूषण पुरस्कार प्राप्त हभप.बाळाराम महाराज शेळके यांनी वाशी येथील थोर समाज सेवक वतनदार मारुती लहाने साहेब यांच्या गुरुवार दि.२७/०१/२०२२ अंतिम धार्मिक विधी बारावे प्रसंगी प्रवचन सेवे दरम्यान केले.



  रोहा वाशी येथील थोर समाज सेवक तथा कुणबी समाज माजी अध्यक्ष,ग्रू. ग्रा.पं.वाशी माजी उपसरपंच,वाशी - धाटाव - तळाघर विविध विकास सहकारी संस्थेचे चेअरमन वतनदार मारुती राव हरी लहाने यांच्या अंतिम धार्मिक विधी बारावे प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की मारुती लहाने यांनी आपले संपूर्ण जीवन गोर - गरीब,गरजवंत शेतकऱ्यांसह सर्व सामान्य माणसाच्या आर्थिक तसेच सामाजिक उन्नती,उत्कर्ष व प्रगती व्हावी याकरीताच वाहिले त्यामुळेच आज त्यांची चांगली कीर्ती  ऐकावयास मिळत आहे "मरावे परी कीर्ती रुपी उरावे"म्हणून माणसाने आपले कर्तव्य कर्म करीत असताना सामाजिक भान ठेवूनच पुढील पाऊल टाकावे आपल्या विघातक कृत्यामुळे समाजाची हानी अथवा नुकसान होणार नाही याची सतत दक्षता व काळजी घेत नेहमी सावध राहिले पाहिजे तात्पर्य आपले नित्य कर्तव्य कर्म पार पाडीत असताना आपल्या कर्तव्यापासून दूर न राहता नित्यनेमाने भगवंतांच्या नामस्मरणामध्ये राहिले पाहिजे भगवंताचे अनुसंधान चुकता कामा नये, कारण माणसाची उंची ही त्याच्या नित्य कर्तव्य चांगले कर्म व कर्तृत्वामुळेच वाढत असते असे प्रतिपादन रायगड भूषण पुरस्कार प्राप्त हभप.बाळाराम महाराज शेळके यांनी उपस्थितांना संबोधित करीत सामाजिक प्रबोधन केले.

Comments

Popular posts from this blog