Posts

Showing posts from June, 2022
Image
मुंबई गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील पोलादपूर येथील सर्विस रोडची दुरुस्ती पोलादपूर-ऋषाली राजू पवार          ‌ मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील पोलादपूर येथील सर्व्हिस रोडची दुरुस्ती तसेच डांबरीकरण करण्यात आले.           पोलादपूर येथे अंडरपास सुरू करण्यात आला आहे. परंतु बस स्थानक तसेच महाबळेश्वर फाटा व अनेक ठिकाणी जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता असून अनेक रिक्षा एस.टी. बस तसेच खासगी वाहने या सर्विस रोडचा वापर करतात.              मान्सूनला सुरुवात झाल्याने सर्व्हिस रोडची दुरावस्था झाली होती .महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे अनेक वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. लहान-मोठे अपघातही काही प्रमाणात होत होते. त्यामुळे संबंधित कंपनी मार्फत सर्विस रोडची दुरुस्ती करून काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे.                वाहन चालक व रोड लगत असलेली दुकाने- हॉटेल्स  यांना वारंवार पावसाचे पाणी साचल्यामुळे तसेच होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता सर्विस रोड चे काम करण्यात आल्यामुळे काही प्रमाणात वाहनचालक व दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.
Image
रेल्वे प्रवासी संघर्ष समितीची सी.एस.टी.मुख्य कार्यालयात धडक रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन सादर रेल्वे प्रवासी संघर्ष समितीच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार- रेल्वे अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन  रोहा-प्रतिनिधी रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन मध्य रेल्वे डी.आर.एम.मुंबई यांना महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघातर्फे सी.एस.टी.येथील मुख्य कार्यालयात देण्यात आले.   कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांबाबतच्या समस्या, दिवा - रोहा पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात,रेल्वे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी मिळावी ,जेष्ठ नागरिक आणि दिवा-पनवेल फेऱ्या वाढवणे अशा अनेक विषयांवर मध्य रेल्वेच्या सिनियर डिसीम श्रीमती की.सुषमा यांनी निवेदन स्विकारले. रोहा - दिवा पॅसेंजर गाडीच्या 🚆 फेऱ्या वाढविण्यासाठी आणि  रोह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध विषयावर, रेल्वेच्या संबंधित अधिकारी यांच्या दिनांक २९ जून २०२२ रोजी होणाऱ्या मिटींगमध्ये प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी श्री.अभिजित धुरत साहेब, अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे महासंघ,अरूण पराडकर, काशिनाथ आंग्रे,प्रभू महाले,
Image
  कुर्ले विद्यालयाची १००% निकालाची हॕट्रिक महाड-प्रतिनिधी जनहित सेवा संस्था महाड संचलित कै. तात्यासाहेब नातू माध्यमिक विद्यालय कूर्ले तालुका महाड यांनी आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सलग तीन वर्षे शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शंभर टक्के निकाल लावून शंभर टक्के निकालाची हॕट्रिक केली आहे.    विद्यालयातून प्रथम क्रमांक -कुमारी लोखंडे रोशनी राम (84.80%) द्वितीय क्रमांक- कुमार तिटे सुमित बबन (81.60%) तृतीय क्रमांक- कुमार जंगम साहिल रमेश(80.60%) अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष शेखरजी ताडफळे,संस्था संचालक अक्षय ताडफळे ,शाळा समिती अध्यक्ष दत्ताराम मोरे, उपाध्यक्ष सुरेश मोरे, सदस्य संदीप सपकाळ,शाळेचे मुख्याध्यापक अनंत शेलार, संस्था सहसचिव संतोष महाडिक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.        जनहित सेवा संस्था महाड संचलित कै. तात्यासाहेब नातू माध्यमिक विद्यालय कुर्ले तालुका महाड यांनी सलग तीन वर्ष शालांत शालांत प्रमाणपत्र प
Image
"उडदवणे गाव विकासकामांपासून वंचित राहणार नाही"- आमदार अनिकेतभाई तटकरे उडदवणे येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न  रोहा-प्रतिनिधी "उडदवणे गावातील अनेक वर्षे रखडलेल्या विकास कामांचा शुभारंभ आता झाला आहे.महिलांना येणारी पाण्याची समस्या लवकरच पूर्ण करण्यात येईल.विभागातील कालव्याच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढला जाईल, त्याचप्रमाणे काळभैरव मंदिरासमोरील सुशोभीकरणासाठी ही निधी उपलब्ध करून दिला जाईल. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत नाही तर कायमच विकास कामे करण्यासाठी सज्ज असणार आहे,उडदवणे गाव विकासकामांपासून आता वंचित राहणार नाही" याची ग्वाही आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी दिली.ते उडदवणे कालभैरव मंदिरात आयोजित सभेत बोलत होते. कार्यक्रमासाठी उडदवणे ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. विशेषतः महिलांच्या उपस्थितीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी कौतुक केले. तत्पुर्वी आमदार अनिकेतभाई तटकरे व मान्यवरांच्या शुभहस्ते  उडदवणे पालदाड पुलाच्या डांबरीकरणाचे लोकार्पण,उडदवणे फाटा येथे एस.टी.बस थांबा निवारा शेड शुभारंभ,उडदवणे
Image
अपघातास निमंत्रण देणारे वाळलेले झाड रस्त्यावरून काढले बाहेर भालगांव-घोसाळे विभागातील प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास दुरदृष्टी लाभलेल्या खासदार सुनिल तटकरेंना विभागातील जनतेकडून धन्यवाद  रोहा-प्रतिनिधी बऱ्याचदा एखादा अपघात घडला  की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाला जाग येते ,याची अनेक उदाहरणे आपल्याला माहिती आहे.मात्र हि घटना याहून वेगळी आहे.अपघात घडणार याची पुर्वकल्पना येत असताना त्यासाठी घेतलेल्या खबरदारीची आहे.दिसायला गोष्ट साधी असली तरी लाखमोलाचे जीव जपणारी आहे. त्याचे असे झाले,रोहा हनुमान टेकडी मार्गाने  घोसाळे ,भालगांव, मुरूडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक  वाळलेले भलेमोठे झाड कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीत उभे होते.पावसाळ्यात हे झाड पडून मोठी जीवित हानी होऊ शकते ही बाब रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंढे यांच्या निदर्शनास आली.त्यांनी याबाबतीतचे निवेदन रायगड चे खासदार मा.श्री सुनिल तटकरे साहेब,रायगड जिल्हाच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे,आमदार अनिकेतभाई तटकरे,रायगड जिल्हा कार्यध्यक्ष मधूकर पाटील, रोहा तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर ह्यांना दिले. ह्या
Image
घोसाळे विभागातील वीज समस्येवरुन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर कामात कुचराई करणाऱ्यांना दिली तंबी रोहा-प्रतिनिधी रोहा तालुक्यातील घोसाळे विभागात विजेचा लपंडाव सतत सुरू असतो.त्यामुळे जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.जनतेच्या ह्या संतप्त भावना घोसाळे विभागातील कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिल्यावर आज सोमवार दिनांक १३ जुन २०२२ रोजी सकाळी ११ वाजता वीज मंडळाचे अधिकारी व घोसाळे विभागातील कार्यकर्त्यांच्या एका संयुक्त बैठकीचे आयोजन गीताबाग सुतारवाडी येथे करण्यात आले होते.यावेळी पालकमंत्र्यांनी विज मंडळातील अधिकाऱ्यांना अक्षरशः फैलावर घेतले.पावसाळ्यात या विभागात विजेची कोणतीही समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी,आशा सुचना अधिकारी वर्गाला दिल्या. आज आयोजित केलेल्या बैठकीत पालकमंत्र्यां समवेत वीज मंडळाचे वरिष्ठ  अधिकारी, तसेच घोसाळे विभागातील संतोष पार्टे, स्वप्नील शिंदे, परेश धुमाळ, चंद्रकांत पार्टे, नामदेव घडशी, भाग्येश घोसाळकर ,रविना मालुसरे-भोसले यांचे समवेत तालुक्यातील  प्रसाद देशमुख,राकेश शिंदे,मयुर खैरे,घनश्याम कराळे, अमोल टेमकर, गौरव सुर
Image
पालदाड पुल दुरुस्तीसह चकाचक डांबरी रस्त्याने सजला खासदार सुनिल तटकरेंच्या कार्यकुशलतेला स्थानिकांचा सलाम रोहा-प्रतिनिधी "बोले तैसा चाले,त्याची वंदावी पाऊले" ह्या उक्तीची प्रचिती आज रोह्याच्या पालदाड पुल व उडदवणे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी झटणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना आली. निमित्त होते उडदवणे ग्रामस्थांना फक्त चारच दिवसांपुर्वी खासदार तटकरे साहेबांनी दिलेल्या एका शब्दाचे आणि त्या शब्दाच्या वचन पुर्ततेचे. पालदाड पुलावरील खड्ड्यांनी नागरिक प्रचंड त्रस्त होते.ह्या विषयावर उडदवणे ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खासदार सुनिल तटकरे यांना साकडे घातले होते.ह्या पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्या रस्त्याने प्रवास करताना खुपच त्रास सहन करावा लागत असे.हि बाब खासदार सुनिल तटकरे साहेबांनी समजुन घेतली.आणि अवघ्या चार दिवसात पुलावरील खड्डे बुजवून पुर्ण केले.अवघ्या चार दिवसांत हा डबल धमाका फक्त खासदार सुनिल तटकरे साहेबच करु शकतात याची अनुभूती उडदवणे विभागातील नागरिक अनुभवत आहेत.   ह्या कामामुळे उडदवणे पुलावरून ये- जा करणारे अनेक गावातील नागरिक, एमआयडीसी मधील कामगार अत्यंत ख
Image
नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्याचे रोह्यात पडसाद पैंगबरांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याबद्दल रोहा-अष्टमी मुस्लिम समाजाच्यावतीने नूपुर शर्मांचा निषेध      रोहा-प्रतिनिरोहा- रोहा-प्रतिनिधी नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशासह, परदेशातही तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.  ईस्लाम धर्माचे प्रेषित ( पैंगबर ) हजरत मोहम्मद ( स.अ. स.) यांच्याबद्दल भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याबद्दल मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.  पैंगबरांबद्दल बेताल वक्तव्य केल्याचा निषेध करत रोहा - अष्टमी मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने शुक्रवारी दुपारी २ वा. तहसीलदार व पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देत श्रीमती नूपुर शर्मा यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, आपल्या भावना व निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवून या विषयाची दखल घेतली जाईल असे सांगत समाज बांधवांनी  शांतता प्रस्थापित करण्यासाठी  पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी अमोलकुमार झेंडे यांनी केले.                                     रोहा- अष्टमी येथील पाच म
Image
रोहा पोलिसांची दमदार कामगिरी मोटारसायकल चोराला मुद्देमालासह केली अटक रोहा-प्रतिनिधी रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बाबर यांनी रोहा पोलीस स्टेशनचा चार्ज घेताच आपल्या कार्यकुशलतेची चुणुक  दाखवली आहे.या अगोदर एम. एस.ई. बी. ची डीपी चोरी करणाऱ्यांना त्यांनी गजाआड पाठवलेची घटना ताजी असतानाच त्यांचे कर्तबगार कर्मचारी पोउनि.धनाजी साठे, अक्षय जाधव,सुनिल खराटे यांनी आणखी एका चोरीचा छडा लावला आहे. रोहा व खोपोली शहरातून मोटरसायकलींची चोरी करणार्‍या विलास नारायण ढुमणे वय वर्षे एकवीस राहणार फणस वाडी तालुका रोहा याला घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पॅशन प्रो व युनिकॉन या दोन चोरीला गेलेल्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या. रोहा पोलीस ठाणे मध्ये गुन्हे रजिस्टर नंबर 99/ 2022 भारवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे खोपोली पोलीस स्टेशनमध्ये 149 /2022 नुसार कलम 379 नुसार गुन्हा दाखल आहे.  आरोपीला अटक केल्यानंतर त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे.रोहा  पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनाजी
Image
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन रोह्यात उत्साहात साजरा          रोहा-प्रतिनिधी रोहा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एस टी स्टॅण्ड परिसरातील पक्ष कार्यालया समोर तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. पवार साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, तटकरे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या.  खा. सुनील तटकरे, पालकमंत्री ना. आदिती तटकरे व आम. अनिकेत तटकरे यांनी अनेक वर्षांपासून केलेल्या विकासात्मक व सामाजिक कामांमुळे शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज नंबर एकवर आहे. असे सांगत जि. प. प.सं. व नगर पालिके बरोबर असंख्य ग्राम पंचायतीत विजयाची घोडदौड अशाच पद्धतीने चालू राहील असा विश्वास तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर यांनी व्यक्त केला.                         यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, तालुका महिला अध्यक्षा सौ. प्रीतम पाटील, तालुका युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंडे
Image
  खासदार सुनिल तटकरे व एक्सेल कंपनीच्या सहकार्याने, उडदवणे ग्रामस्थांच्या श्रमदानातुन पालदाड पुलाची डागडुजी नागरिकांनी मानले उडदवणे ग्रामस्थांचे आभार रोहा-प्रतिनिधी रोहा शहर, MIDC व रोह्याचे उत्तर खोरे यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे कुंडलिका नदीवरील पालदाड पुल. ब्रिटिश काळात टाटा कंपनीने सर्व प्रथम दगडी पुलाची निर्मिती केली. पुढे काही वर्षानंतर सुनिल तटकरे साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्याच पुलाचे नुतनीकरण करण्यात आले.मात्र पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग बंद होत असे.अनेकांना पाण्यातुन पुल पार करताना आपला जीव गमवावा लागला.स्थानिकांच्या आंदोलना नंतर अखेर ह्या पुला शेजारी नव्या व उंच पुलाची निर्मिती करण्यात आली. कालांतराने जुन्या फरशी पुलावर व नव्या पुलावर मोठे-मोठे खड्डे पडल्यामुळे,पुलावरुन प्रवास करणे अत्यंत धोकादायक व कष्टप्रद झाले होते. उडदवणे ग्रामस्थ व पालदाड पुलाचा वापर करणाऱ्या नागरिकांनी आपली व्यथा खासदार सुनिल तटकरे साहेबांकडे व्यक्त केली. खासदार सुनिल तटकरे साहेबांकडे केलेल्या मागणीनुसार ,त्यांच्याकडून मिळालेल्या निधीतुन नविन पुलाच्या दुरुस्तीच्या का
Image
पत्रकार संजय रिकामे समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल भानंगकोंड ग्रामस्थांसह अनेक कार्यकर्त्यांनी मनगटावर बांधले घड्याळ तळा :किशोर पितळे कोकणचे भाग्य विधाते रायगड रत्नागिरीचे खासदार सुनिलजी तटकरे यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास दाखवून एक गांव एक पक्ष या संकल्पनेतून दि.५जून रोजी भानंगकोंड येथील शिवगर्जना मित्रमंडळ व ग्रामस्थांनी सुतारवाडी येथे तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यावेळी तळा तालुका अध्यक्ष नाना भौड मागासवर्गीय सेल जिल्हा अध्यक्ष अँड उत्तम जाधव तळा नगरपंचायत उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे समन्वय समिती अध्यक्ष चंद्रकांत राऊत, कैलास पायगुडे ,रायगड युवती अध्यक्षा अँड.सायली दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून भानंगकोंड ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचा संबंध आहेत मधल्या काळात काही जणांनी वेगळी वाट धरली होती मात्र त्यांना कटू अनुभव आला म्हणून या संदर्भात पत्रकार संजय रिकामे यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण गावाची एकीकरण संघटन करण्या संदर्भात घेतलेल्या भुमिके बद्दल मी त्याचे व सहकारी यांचे मनापासून स्वागत करतो
Image
यशवंतखारचे युवा नेतृत्व योगेश ठाकुर यांची जिल्हा परिषद गट युवक अध्यक्षपदी नियुक्ती  भातसई गणातील युवकांमध्ये उत्साहाला उधाण रोहा-प्रतिनिधी यशवंतखार तालुका रोहा येथील उत्तम संघटक,युवा नेतृत्व योगेश धर्मा ठाकुर यांचे पक्षातील योगदान व विभागातील कार्यकर्त्यांनी केलेल्या शिफारशींची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली.योगेश ठाकुर यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन खासदार सुनिल तटकरे,राज्यमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेतभाई तटकरे व युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंढे यांनी योगेश ठाकुर यांची निडी तर्फे अष्टमी जिल्हा परिषद गटाच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योगेश ठाकुर यांच्या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.मागील काही दिवसांपासुन भातसई पंचायत समिती गणामध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे.योगेश ठाकुर यांचे ह्या विभागातील तरुणांबरोबर असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता ते ह्या पदाला न्याय देऊन पक्ष संघटन अधिक मजबूत करतील ह्या हेतूने ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ करून दाखवू असा आशावाद योगेश
Image
भातसई पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू  वावे पोटगे ग्रामपंचायतीचे उपसरपंच स्वप्निल ठाकुर यांचा आपल्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश रोहा-प्रतिनिधी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भातसई पंचायत समिती गणावर संपुर्ण रोहा तालुक्यासह अलिबाग विधानसभा मतदार संघाचे लक्ष लागले आहे.तालुक्याचे राजकीय भुकंपाचे केंद्र ठरलेल्या ह्या विभागात,आज पुन्हा एकदा राजकीय हादरा जाणवला.रोहा तालुक्यात नव्याने दहा पंचायत समिती गण गठीत झाले आहेत.यापैकी नऊ पंचायत समिती गणांमध्ये शांतता आहे.तथापि मागील काही दिवसांपासून भातसई पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.अशातच आज झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाने मागील घटनेची परतफेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झाल्याची चर्चा आज सर्वत्र ऐकण्यास मिळत आहे. आज सुतारवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत वावे पोटगे ग्रामपंचायतीचे धडाडीचे डॅशिंग युवा उपसरपंच श्री. स्वप्नील ठाकुर तसेच वावे पोटगे आदिवासीवाडीचे युवक कार्यकर्ते मदन वाघमारे यांचे