"उडदवणे गाव विकासकामांपासून वंचित राहणार नाही"- आमदार अनिकेतभाई तटकरे

उडदवणे येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न 

रोहा-प्रतिनिधी

"उडदवणे गावातील अनेक वर्षे रखडलेल्या विकास कामांचा शुभारंभ आता झाला आहे.महिलांना येणारी पाण्याची समस्या लवकरच पूर्ण करण्यात येईल.विभागातील कालव्याच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढला जाईल, त्याचप्रमाणे काळभैरव मंदिरासमोरील सुशोभीकरणासाठी ही निधी उपलब्ध करून दिला जाईल. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत नाही तर कायमच विकास कामे करण्यासाठी सज्ज असणार आहे,उडदवणे गाव विकासकामांपासून आता वंचित राहणार नाही" याची ग्वाही आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी दिली.ते उडदवणे कालभैरव मंदिरात आयोजित सभेत बोलत होते.कार्यक्रमासाठी उडदवणे ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. विशेषतः महिलांच्या उपस्थितीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी कौतुक केले.

तत्पुर्वी आमदार अनिकेतभाई तटकरे व मान्यवरांच्या शुभहस्ते उडदवणे पालदाड पुलाच्या डांबरीकरणाचे लोकार्पण,उडदवणे फाटा येथे एस.टी.बस थांबा निवारा शेड शुभारंभ,उडदवणे गावातील पाण्याच्या टाकीचे, अंतर्गत रस्ते इत्यादी कामांचे भूमिपूजन आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

उडदवणे येथील कार्यक्रमास आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मधुकर पाटील,जिल्हा सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर,दक्षता समिती अध्यक्ष हेमंत कांबळे,माजी सभापती अनिल भगत,विभागाचे नेते अनंत देशमुख,लीलाधर मोरे, जनार्दन मोरे,ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य, कर्मचारी वर्ग ,युवक, महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भरगच्च उपस्थिती,उत्कृष्ट नियोजन असणारा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा कार्यकर्ते रविंद्र ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते घनश्याम कराळे, रोहिदास कोल्हटकर, ग्रामपंचायत सदस्या सरिता गायकर, संतोष गायकर किशोर ठाकूर, पांडुरंग कासारे, गणपत गायकर,चांगदेव गायकर,संदीप कोल्हटकर,प्रदीप कासारे, तुकाराम गायकर,दमयंती ठाकूर व उडदवणे गावातील युवक  कार्यकर्ते, ग्रामस्थ ,महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.

आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या उडदवणे येथील कार्यक्रमामुळे पिंगळसई विभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबुत झाल्याचे बोलले जात आहे.

Comments

Popular posts from this blog