Posts

Showing posts from November, 2022
Image
रोटरी आयडॉल स्पर्धेत रोह्याचे राकेश कागडा चमकले  उत्तेजनार्थ पारितोषिकासह रसिकांची मने जिंकली रोहा -प्रतिनिधी रोटरी आयडॉल स्पर्धेत रोह्याचे सुप्रसिद्ध गायक राकेश कागडा यांनी दिमाखदार कामगीरी केली असून या स्पर्धेत त्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिकासह रसिकांची मने जिंकली आहेत.  या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत संपूर्ण राज्यभरातून आलेल्या नावाजलेल्या 160 गायकांमधून अंतिम फेरीसाठी 23 स्पर्धकांची निवड करण्यात आली, या 23 स्पर्धकांमधून रोह्याच्या राकेश कागडा यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.  त्यांच्या गायनकौशल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी कौतुक केलेले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Image
जनहित सामाजिक संस्था धाटाव व पुजा मेडिकलचा स्तुत्य उपक्रम   तळाघर येथे नेत्र व मोतीबिंदू,रक्तदाब दाब व शुगर तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन रोहा/अष्टमी - नरेश कुशवाहा  जनहित सामाजिक संस्था धाटाव रोहा तर्फे नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी पुजा जेनरिक मेडिकल तर्फे मुफ्त रक्त दाब व शुगर तपासणी करण्यात आली . तळाघर हायस्कूलमध्ये रविवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन अलिबाग यांच्या विद्यमाने मेगा आय चेकअप कॅम्पचे आयोजन केले. यासाठी लायन्स क्लब रोहा, अंशुल स्पेशलिटी कंपनी यांनी आपला सहभाग नोंदविला होता. यावेळी लायन्स क्लबचे कमिटी मेंबर रवींद्र घरत, पराग फुकणे, धाटाव ग्रामपंचायत उपसरपंच अशोक मोरे, जनहित संस्थेचे अध्यक्ष अनंता म्हसकर, उपाध्यक्ष निलेश शेळके, सचिव दीपक पवार, खजिनदार महेश वाडकर, सह खजिनदार प्रज्योत गुरव, सदस्य रोहिदास भोकटे, विजय भुवड, रोशन घरट, कायदेशीर सल्लागार प्रियंका पिंपळकर, शाळेचे चेअरमन विठ्ठल मोरे, मुख्याध्यापक शिंदे सर, अंशुलचे व्यवस्थापक किशोर तावडे, डॉ. अनि
Image
रोहा पोलीस,रोहा वाहतूक पोलीस रोहा प्रेस क्लब आणि रोहा सिटीजम फोरम च्या माध्यमातून 26/11 च्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित रोहा-दीप वायडेकर 26/11 हा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. 26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ स्थानिक नागरिकांना आपला प्राण गमवायला लागला होता. 26 नोव्हेंबरच्या त्या रात्री दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. मुंबई पोलिस दलातील एएसआय तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणाची आहुती देत दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून दिले होते.लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून सुरू झालेलं हे मृत्यूचं तांडव ताजमहाल हॉटेलजवळ जाऊन संपलं होत. अश्या वीर जवानांना आदरांजली म्हणून आज रोहा पोलीस स्टेशन आणि रोहा वाहतूक पोलीस चौकी येथे दीपज्योत प्रज्वलीत करून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी रोहा पोलीस ठाण्या
Image
जेष्ठ पत्रकार श्री.मिलिंद अष्टिवकर यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती  अ.भा.म.प.परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली घोषणा रोहा-प्रतिनिधी  मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणुन परिचित असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी रायगड जिल्ह्यातील रोहा येथील श्री.मिलिंद सिताराम अष्टिवकर तर सरचिटणीसपदी अहमदनगर येथील श्री.मन्सूर शेख यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे अध्यक्ष श्री.शरद पाबळे यांनी पुणे येथील बैठकीत ही घोषणा केली.      रायगड जिल्हा प्रेस क्लब चे माजी अध्यक्ष असलेले श्री.मिलिंद अष्टिवकर हे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्याही कार्यकारिणीवर आहेत. यापूर्वी त्यांनी मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष, माजी कोकण विभागीय सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच ते कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत होते. त्यांच्या या कार्यकाळात कोकणातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. रोहा येथुन दैनिक लोकमत, दैनिक नवशक्ती अशा विविध जिल्हा दैनिकांमध्ये ते वार्ताहर, प्र
Image
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार रा.जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन  रोहा-प्रतिनिधी रायगड जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार दि.१६ नोव्हेंबर २०२२ रोजी अलिबाग येथील कार्यालयात रा. जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती त्यांना दिली.यावेळी त्यांनी आदरपूर्वक सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न जाणून घेत आगामी काळात तुमचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असे आश्वासन भेटी वेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.   यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम ग. खांडेकर,जिल्हा सरचिटणीस रमेश धों.लखिमले, सल्लागार वसंत ठ. शिंदे,जेष्ठ सदस्य बाळकृष्ण वी. पवार,नारायण शं.पाटील,रोहा तालुकाध्यक्ष गजानन र.गुरव,जिल्हा परिषद शिक्षण व क्रिडा समिती सदस्य अजय कापसे आदी उपस्थित होते.     रायगड जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना तालुकास्तरावर त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर समा
Image
रोहा तालुक्यातून ओ.बी.सीं. च्या धडक मोर्चास बहुसंख्य ओ.बी.सी. बांधव उपस्थित राहणार   धडक मोर्चाची सरकारला धडकी भरणार     कोलाड नाका- (शरद जाधव)         जातनिहाय जनगणनेसाठी गेली अनेक वर्ष सरकार उदासीन का?, या मागचे कटकारस्थान काय?. यामुळे ओबीसी समाज मागे राहिला असुन आता आमचा हक्क व सरकार दरबारी वाटा आम्हाला मिळालाच पाहिजे.यासाठी ओबीसी समाज आता जागा झाला असुन, या मोर्चाच्या तयारीसाठी नेत्यांनी संपुर्ण रायगड जिल्हा पिंजून काढला आहे.जिल्ह्यात ओबीसीं चे रान पेटल्याचे दिसून येत आहे.  रोहा तालुक्यातून कुणबी, आगरी, तेली, माळी, नाभिक, परीट, भंडारी सह ओबीसीत मोडणारे असंख्य समाज बांधव या अलिबाग येथील धडक मोर्चात सहभागी होणार आहेत.           1931 च्या जनगणनेनुसार ओबीसी समाज 52 टक्के आहे. मात्र शासन ते मान्य करीत नाही. अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याकाची जनगणना होते. त्यानुसार त्याना शासन दरबारी सवलती मिळतात. मात्र दर 10 वर्षानी जनगणना झालीच पाहिजे असा नियम असताना ती होत नाही. त्यामूळे ओबीसी ना शासन दरबारी काही मिळत नाही. मुलांना शिक्षणात सवलती मिळत नाही. वर्षानुवर्ष आपल्याला वंचित ठेवण्याचा डाव आख
Image
रायगड भूषण ह.भ.प.दगडु दळवी महाराज यांना शिवराज्य प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय आदर्श संत साहित्य वारकरी पुरस्कार खारी/रोहा (केशव म्हस्के)   रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधील मौजे वांगणी गावचे सुपुत्र सेवानिवृत्त शिक्षक तथा रायगड भूषण पुरस्कार प्राप्त समाज प्रबोधक ह.भ.प. दगडु कृष्णा दळवी गुरुजी यांना शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधत रोहा ,पेण ,सुधागड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार धैर्यशिल पाटील यांच्या हस्ते शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.रोशन पाटील,प्रवक्ते विकी कदम आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हभप दगडु कृष्णा दळवी गुरुजी यांना राज्यस्तरीय आदर्श संत साहित्य वारकरी पुरस्कार प्रदान करण्यात आले.       सेवानिवृत्त शिक्षक तथा रायगड भूषण पुरस्कार प्राप्त समाज प्रबोधक हभप दगडु कृष्णा दळवी गुरुजी यांनी कीर्तन प्रवचन सेवेच्या माध्यमातून अध्यात्मिक व धार्मिक प्रबोधना बरोबर हुंडाबळी प्रथा रोखणे,दारू बंदी, व्यसन मुक्ती आदी समाजामध्ये अनिष्ट रूढी,परंपरा समूळ नष्ट करण्यासाठी संतांनी वारकरी सांप्रदाय सुरू केला. संत साहित्याचा अभ्यास करीत संताच्या विचार
Image
रोह्यात लायन्स क्लब तर्फे ८० जणांची मधुमेह तपासणी रोहा -प्रतिनिधी १४ नोव्हेंबर २०२२ रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा होत आहे. त्या निमित्ताने रविवारी १३ नोव्हेंबर २०२२ रोजी आपल्या लायन डिस्ट्रिक्ट च्या वतीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत ६००० जणांची मधुमेह तपासणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातील सहभाग म्हणून लायन्स क्लब रोहाच्या वताने करीत मधुमेह तपासणी शिबीरात एकूण ८० जणांची मधुमेह तपासणी करण्यात आली. रोह्यातील प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी सभागृहात सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला रोहा ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अंकिता खैरकर यांनीही सदिछा भेट दिली. या शिबिरा दरम्यान उपस्थित नागरिकांना डॉ. तुषार राजपूत यांनी मार्गदर्शन करताना मधुमेह हा बहुतांशी आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होत असून अनुवांशिक पद्धतीने मधुमेह होण्याचे प्रमाण नगण्य असल्याचेही सांगितले. टाईप २ मधुमेह व अनुवांशिक मधुमेह योग्य जीवनशैली स्विकारली तर नियंत्रित होऊ शकतो, त्यासाठी नियमित आहार, व्यायाम व योग्य नियमित औषधोपाचाराची गरज डॉ.
Image
चला आळंदीला जाऊ. आमदार अनिकेत तटकरे यांची दिंडी सोहोळयास उपस्थिती. श्रीक्षेत्र संत गोरोबा नगर रोहा ते आळंदी पायी वारी दिंडी सोहळयास प्रारंभ खारी/ रोहा (केशव म्हस्के) कार्तिकी एकादशी निमित्ताने विश्व माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहोळयाकरिता स्वा.सु.नि.गुरुवर्य अलिबागकर महाराज प्रेमवर्धक वारकरी सांप्रदायिक मंडळ रोहा श्रीक्षेत्र संत गोरोबा नगर दमखाडी ते श्रीक्षेत्र आळंदी पायी वारी दिंडी सोहळयास आ.अनिकेत तटकरे,माजी उपनगराध्यक्ष महेश दादा कोलाटकर,काशिनाथ धाटावकर,नरेश पडवळ,नगरसेविका गिताताई पडवळ,मयूर दिवेकर,समाधान शिंदे, रामाशेठ म्हात्रे आदीं प्रमुख मान्यवरांसह ग्रामस्थ संत गोरोबा नगर दमखाडी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिंडीचे सोहोळयास मोठ्या थाटामाटात उत्साही वातावरण हरिनामाच्या गजरात,ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने पायी वारी पालखी मिरवणूक सोहोळयास आज प्रारंभ झाले.      याप्रसंगी रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील स्वा.सु.नि.गुरुवर्य अलिबागकर महाराज प्रेमवर्धक वारकरी सांप्रदायिक मंडळ संस्थापक रायगड भूषण हभप दळवी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हभप गुरुवर्य बाळाराम महाराज
Image
मध्य रेल्वे प्रसिद्धी पत्रक कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी २७ तासांचा विशेष ट्रॅफिक  आणि पॉवर ब्लॉक दि. १९/२०.११.२०२२ (शनिवार/रविवार) रोजी मध्य रेल्वे मुंबई विभाग दि. १९/२०.११.२०२२ रोजी अप आणि डाउन धिम्या मार्गावर, अप आणि डाउन जलद मार्गांवर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मस्जिद स्टेशन दरम्यान किमी 0/1-2 येथे रोड क्रेन वापरून कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे.ब्लॉक तपशील खालीलप्रमाणे आहेतः ब्लॉक कालावधी अप आणि डाउन धिम्या मार्गावर:  शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी  २३:०० वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजी च्या १६:००  वाजेपर्यंत = १७.०० तासांचा ब्लॉक. अप आणि डाउन जलद मार्गावर: शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी  २३:०० वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजी च्या १६:००  वाजेपर्यंत = १७.०० तासांचा ब्लॉक. अप आणि डाउन हार्बर मार्गावर: शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी  २३:०० वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजीच्या २०:००  वाजेपर्यंत = २१.०० तासांचा ब्लॉक. सातवी मार्गिका आणि यार्ड: शनिवार दि. १९.११.
Image
रखडलेल्या मुंबई- गोवा महामार्गाच्या निषेधार्थ कोलाड नाका येथे रायगड प्रेस क्लबतर्फे मानवी साखळी आंदोलन मा गील ९ महिन्यात  महामार्गावरील भागात १४५ अपघात झाले असून यामध्ये ४९ जणांचा मृत्यू तर १६० जण जखमी रोहा-प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या निषेधार्थ कोलाड नाका येथे रायगड प्रेस क्लबतर्फे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.  रायगड प्रेस क्लबने अनेक वेळा मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, शासनाकडे पत्रव्यवहार आदी मार्गाने या रस्त्याच्या प्रश्नासाठी आंदोलन केलेले आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज  दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई - गोवा महामार्गावरील कोलाड येथे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.             रायगड जिल्ह्यातील पत्रकार चौपदरीकरणच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले असून यावेळी रास्ता वाहतुकीला कोणताही स्वरूपाचा अडथळा निर्माण न करता हे आंदोलन करण्यात आले.  मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन १२ वर्षे झाली, मात्र अद्याप हे काम रखडलेले आहे.  ते काम कधी पुर्ण हो
Image
वरसगांव येथे रोहा तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची मासिक सभा संपन्न माजी मंत्री आमदार आदिती तटकरे यांची उपस्थिती  रोहा-प्रतिनिधी     माजी मंत्री आमदार कु.आदितीताई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरसगांव येथे मंगळवार दिनांक ८/११/२०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा सत्कार समारंभं मोठ्या थाटात संपन्न  झाला.       यावेळी मा. तुकाराम खांडेकर अध्यक्ष रायगड जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ, व सर्व कार्यकारिणी. तालुका अध्यक्ष श्री. गजानन गुरव व कार्यकारिणी,पंचायत समिती सदस्या सौ. सिद्धि संजय राजिवले,सौ.प्रितम पाटील अध्यक्ष  रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी,वरसगाव सरपंच सौ.विशाखा विजय राजिवले व ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच श्री. संजय राजिवले, श्री. सुशिल शिंदे, श्री. राकेश शिंदे.श्री अजित आंब्रुकर सौ. पुनम आंब्रुकर, सौ. बोरकर व पोलीस पाटील श्री. चंद्रकांत सानप,सतिष सानप,राजेश सानप , खालची आळी गणेश मंडळ अध्यक्ष रोहन आंब्रुस्कर,खजिनदार रत्नेश सानप, सिद्धेश कापसे, दिनेश कापसे, प्रणित म्हसकर, श्री अजय सानप, नामदेव सानप. रामजी सानप, संतोष खांडेकर ,अनं
Image
रोह्यात "जय माँ दुर्गा व विश्वकर्मा चॕरिटेबल ट्रस्टकडून" कुंडलीका नदी तिरावर छठ पुजा उत्साहात संपन्न रोहा-प्रतिनिधी  उत्तर भारतात दरवर्षी गुलाबी थंडीमध्ये उत्साहात संपन्न  होणारी छठ पुजा रोह्यात संपन्न झाली. पुढील वर्षभर सुख , शांती, समाधान व संपन्नता देणारी ही छठ  पुजा आहे अशी धारणा येथील उत्तर भारतातील उपासक व जनतेचीआहे. उत्तर भारतातील लोक कुठेही असले तरी ही छठ पुजा व सुर्य पुजा भक्ती भावाने व तन मन धनाने  उत्साहात साजरी करतात.  छठ देवी पुजा व सुर्य देवाची पुजा रुपरेषा काही प्रमाणात अशी असते. पुजेच्या एक दिवस अगोदर सुर्य मावळते वेळी महिला वर्ग पाण्याची सुविधा उपलब्ध होईल असे ठिकाणी जाऊन पाण्यात उभे राहून सुर्याला व जल अर्पण करतात. पुजा-अर्चा करून रात्री भजन करत जागरण करून दुसऱ्या दिवशी पहाटे जलाशयाच्या ठिकाणी जाऊन पाण्यात उभे राहून उगवत्या सुर्याची जल अर्पण करून मनोभावे पुजा अर्चा करतात. त्या अनुषंगाने काल संध्याकाळी रोहा परिसरातील उत्तर भारतातील महिलावर्गाने कुंडलीका नदी तीरी संध्याकाळी व सकाळी उपस्थित राहून पुजा- अर्चा केली. या वेळी या ट्रस्टद्वारे नदी किनारी स्वागत बॅनर