चला आळंदीला जाऊ.

आमदार अनिकेत तटकरे यांची दिंडी सोहोळयास उपस्थिती.

श्रीक्षेत्र संत गोरोबा नगर रोहा ते आळंदी पायी वारी दिंडी सोहळयास प्रारंभ

खारी/ रोहा (केशव म्हस्के)

कार्तिकी एकादशी निमित्ताने विश्व माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहोळयाकरिता स्वा.सु.नि.गुरुवर्य अलिबागकर महाराज प्रेमवर्धक वारकरी सांप्रदायिक मंडळ रोहा श्रीक्षेत्र संत गोरोबा नगर दमखाडी ते श्रीक्षेत्र आळंदी पायी वारी दिंडी सोहळयास आ.अनिकेत तटकरे,माजी उपनगराध्यक्ष महेश दादा कोलाटकर,काशिनाथ धाटावकर,नरेश पडवळ,नगरसेविका गिताताई पडवळ,मयूर दिवेकर,समाधान शिंदे, रामाशेठ म्हात्रे आदीं प्रमुख मान्यवरांसह ग्रामस्थ संत गोरोबा नगर दमखाडी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिंडीचे सोहोळयास मोठ्या थाटामाटात उत्साही वातावरण हरिनामाच्या गजरात,ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने पायी वारी पालखी मिरवणूक सोहोळयास आज प्रारंभ झाले. 

    याप्रसंगी रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील स्वा.सु.नि.गुरुवर्य अलिबागकर महाराज प्रेमवर्धक वारकरी सांप्रदायिक मंडळ संस्थापक रायगड भूषण हभप दळवी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हभप गुरुवर्य बाळाराम महाराज शेळके,गुरुवर्य मारुती महाराज कोलाटकर, गुरुवर्य नामदेव महाराज यादव, माजी अध्यक्ष मधुकर बुवा पाटील (सर्व रायगड भूषण),मनोहर पाटील,सेक्रेटरी सहदेव महाडिक,खजिनदार हभप अनिल सानप, सह सेक्रेटरी केशव म्हस्के,अमोल बिरवाडकर,दिंडी चालक गायनाचार्य रविंद्र मरवडे,वैभव खांडेकर,अनिकेत महाबले,अभिजित बामुगडे,दिंडी अध्यक्ष प्रदिप महाबले,महादेव महाबले,अशोक राजिवले,मारुती शिंदे,ज्योस्ना खांडेकर,कल्पिता म्हस्के,रश्मी भांबर,मोनिका बिरवाडकर,मनीषा महाबले आदी वारकरी सांप्रदायिक भाविक भक्तांच्या साथीने हरिनामाच्या गजराने ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या जयघोषाने पालखी मिरवणूक सोहोळयाचे प्रारंभ झाले.

       चला आळंदीला जाऊ ! ज्ञानेश्वर डोळा पाहू!! ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ! मुखी म्हणता चुकती फेर!!संपूर्ण महाराष्ट्रासह जगाच्या काना कोपऱ्यातून वारकरी सांप्रदायिक भाविक भक्त श्री क्षेत्र आळंदी येथे कार्तिकी एकादशी निमित्ताने विश्व माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहोळयाकरिता मोठ्या थाटामाटात पायी वारी दिंडी पालखी सोहळयाच्या माध्यमातून ग्रामीण भागासह शहरी भागातून वारकरी सांप्रदायिक भाविक भक्त प्रती वर्षी आपल्या लाडक्या विश्व माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी हरिनामाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने मजल दर मजल करीत आळंदीकडे रवाना होत असतात.

Comments

Popular posts from this blog