Posts

Showing posts from February, 2023
Image
रोहे वाशी शिववंदना वाचनालयाच्यावतीने शिवजयंती  थाटामाटात संपन्न. किल्ले रायगडावरील मशालशिवज्योतीचे जल्लोषात स्वागत खारी/रोहा -केशव म्हस्के  रोहे तालुक्यातील मौजे वाशी येथील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवरायांच्या विचारांचे जाज्वल्य इतिहास,ऐतिहासिक गड किल्ल्यांचे संवर्धन बाबत प्रसार आणि प्रचार व्हावे या एकमेव उद्देशाने प्रेरित झालेल्या शिववंदना वाचनालय चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रेमी तरुण युवक युवतींच्या नेतृत्वाने स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथील मशाल शिवज्योत प्रज्वलित करीत महाराजांच्या साक्षीने अभिवादन करून गावामध्ये शिवजयंती सोहोळा मोठ्या थाटामाटात उत्साही वातावरण संपन्न करण्यात आला.          सालाबादप्रमाणे याहीवर्षी गेली ७ वर्षांची परंपरा अबाधित राखत रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिव विचारांची ज्वलंत शिवज्योत मशाल आणण्यासाठी आई कुलस्वामिनी जगदंब जय,भवानी माते की जय, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज गो ब्राम्हण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय,हर हर महादेव गर्जना करीत संपूर्ण गावातील शिवप्रेमी तरुण युवक-युवती मोठ
Image
आरे बुद्रुक येथील दिड दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरण संपन्न   हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला खारी/रोहे-केशव म्हस्के रोहा तालुक्यातील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेल्या श्री क्षेत्र आरे बुद्रुक येथे अखिलकोट ब्रम्हांडनायक श्री विठ्ठल रुक्मिणी व विश्वमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या प्रांगणामध्ये फाल्गुन शु. सप्तमी रविवार दि.२६ फेब्रुवारी आणि सोमवार २७फेब्रुवारी २०२३ रोजी  फाल्गुन शु.अष्टमीच्या पवित्र शुभ मुहूर्ताचे औचित्य साधत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी चे सामुदायिक पारायण सोहळा आदी अध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमांतर्गत दिड दिवसीय विश्र्वशांती अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या थाटामाटात व भावपुर्ण भक्तिमय उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.   सालाबाद प्रमाणे २३ वर्षांची यशस्वी परंपरा अबाधित राखत स्वानंद सुख निवासी सद्गुरू गणपत बाबा गुडेकर अलिबागकर महाराज,स्वा.नि.सु.गुरुवर्य हभप.गोपाळ बाबा वाजे, स्वा.नि.सु.गुरुवर्य हभप.धोंडू बाबा कोलाटकर महाराजांच्या कृपाशिर्वादाने,गुरुवर्य हभप.गुरुवर्य नारायण दादा वाजे अलिबागकर (मठाधिपती पंढरपूर) यांच्य
Image
आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी घेतली धाटाव येथील मोरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट खारी/रोहा-केशव म्हस्के  रोहे तालुक्यातील मौजे धाटाव गावचे स्थानिक रहिवासी तथा  रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सरचिटणीस शशिकांत मोरे यांच्या वडिलांचे तथा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प.स्व.चंद्रकांत शिवराम मोरे  यांचे धाटाव येथील राहत्या घरी नुकतेच दुःखद निधन झाले.   त्यांच्या सांत्वन भेटीकरिता कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद सदस्य आ.अनिकेतभाई तटकरे यांनी मोरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. आपल्या दु:खामध्ये आम्ही सगळे सहभागी असून आपल्या सोबत आहोत अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो देवो हीच प्रार्थना.     याप्रसंगी त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर, राष्ट्रवादी रोहा तालुका युवक अध्यक्ष जयवंत मुंढे, युवा कार्यकर्ते राकेश शिंदे आदींसह धाटाव - किल्ला विभागातील पदाधिकारी,कार्यकर्ते व प्रतिष्ठित मान्यवर मंडळी उपस्थित होते.
Image
वरसगांव येथे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आमदार अदितीताई तटकरे रंगल्या माऊलींच्या गजरामध्ये  खारी/ रोहा- केशव म्हस्के  रोहे तालुक्यातील मौजे वरसगांव येथील आराध्य ग्रामदैवत सापया देवस्थानच्या प्रंगणामध्ये आदिनाथ सेवा मंडळ,वारकरी सांप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने ३० वर्षांची परंपरा लाभलेला अखंडित व अविरतपणे चालू असलेल्या हरिनाम सप्ताह साजरा होत आहे.यावेळी माजी मंत्री तथा श्रीवर्धन विधानसभा सदस्या आमदार कु.अदितीताई तटकरे यांनी हरिपाठ "ज्ञानोबा तुकोबांच्या" गजरामध्ये तल्लीन होत वारकरी भजनाचा ठेका धरला.     महाशिवरात्रीच्या पर्वणी योगाचे औचित्य साधत गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आदिनाथ सेवा मंडळ वारकरी सांप्रदाय गुरुवर्य हभप. ब्रहमुर्ती जगन्नाथ महाराज गोसावी (लांजा) यांच्या मार्गदर्शनाने युवा कीर्तनकार हभप.अनिल मोहन सानप यांच्या नेतृत्वाखाली सालाबादप्रमाणे गेली ३० वर्षांची परंपरा लाभलेला अखंडित व अविरतपणे चालू असलेल्या हरिनाम सप्ताह साजरा होत आहे.शनिवार दि.१८ फेब्रुवारी ते शनिवार दि.२५ फेब्रुवारी २०२३ अखेर सप्ताहाचे निमित्ताने खांब, आंबेवाडी, महादेववाडी, कोलाड - वरसगांव,तळवली तर्फे दि
Image
म्हसळा तालुक्यातील घुम गावचे स्वयंभू श्री घुमेश्वर भाविकांचे श्रध्दास्थान स्वयंभू श्री घुमेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी म्हसळा -  श्रीकांत बिरवाडकर   महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भुतलावर अनेक देवदेवतांची प्राचीन इतिहास काळातील ऐतिहासिक मंदिरे खेड्यापाड्यात- गाववस्तीवर पहावयास मिळतात. याचाच एक भाग म्हणजे पेशव्यांच्या इतिहासाचा साक्षीदार व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन होऊन स्वराज्याची राजधानी असलेल्या आणि महाराष्ट्र भूषण, थोर निरुपणकार डॉ.नानासाहेब तथा नारायण विष्णू धर्माधिकारी यांच्या निरुपणातून अमूल्य वाणीने रायगड जिल्ह्याचे नाव आज भारतात आणि जगातील काही देशात पोहोचले आहे. त्या रायगड जिल्ह्यामध्ये म्हसळा तालुक्यातील घुम या गावी फार वर्षांपूर्वी जमिनीतून स्वयंभू महादेवाची पिंडी उत्पन्न झाल्याचा इतिहास आहे. घुम येथील महादेवाच्या स्वयंभू पिंडी उत्पन्नाची महती दुरवर पसरत गेली आणि काही वर्षातच घुम या गावाची घुमेश्वराच्या नावाने ओळख निर्माण झाली. म्हसळा तालुक्यापासून घुमेश्वर हे गाव दहा किलोमीटर अंतरावर आहे. सद्यस्थितीत श्री घुमेश्वर ग्रामस्थ मंडळाने या ठिका
Image
  सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचा उपक्रम;   "गाथा महाराष्ट्राची" सांस्कृतिक कार्यक्रमाने आणली रंगत तळा:संजय रिकामे सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान व तळा तालुका राष्ट्वादी काॅग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून गाथा महाराष्ट्राची लोककला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  तळा तालूक्यातील रसिक प्रेक्षकांसाठी गाथा महाराष्ट्राची  आर्केस्ट्रा कार्यक्रम दि २० फेब्रु.आयोजीत केला होता.प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना पूष्पहार अर्पण करुन श्री.गणेशाचे पूजन, दिपप्रज्वलन आणि श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी आ.अनिकेत तटकरे आ.अदिती तटकरे नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे तालुका अध्यक्ष नाना भौड अॕड. उत्तम जाधव, युवक अध्यक्ष नागेश लोखंडे, महीला तालुका अध्यक्षा जान्हवी शिंदे शहर अध्यक्षा मेघना सुतार माजी सभापती अक्षरा कदम,गिरणे सरपंचा ज्योती पायगुडे, दिग्दर्शक राकेश नाईक आर जे.अमित मंगेश शेट देशमुख राष्ट्वादी जिल्हा उपाध्यक्ष कैलास पायगुडे निजामपूरचे बाबुशेठ खानविलकर.इंदापूर येथील अशोक ज
Image
आमदार अनिकेत तटकरे व आमदार आदिती तटकरे  यांच्या पाठपुराव्याला यश पुगांव येथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई  कोलाड- शरद जाधव रोहा तालुक्यातील पुगांव येथील शेतकऱ्यांचे गेली ५ वर्ष रखडलेले शेती नुकसान भरपाई चे पैसे मिळवून देण्यात कोकण विधानपरिषदेचे दमदार आमदार अनिकेत तटकरे व माजी पालकमंत्री व श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांना अखेर यश आले आहे.अर्थिक मंदिच्या काळात हि नुकसान भरपाई मिळवून दिल्याने दोन्ही आमदारांचे ग्रामस्थ विशेष आभार मानत आहेत. डोळवहाळ बंधारामधून उजवा तीर कालव्याद्वारे आर. सी.एफ्. व इतर कंपन्यांना पाणी दिले जाते. यामध्ये कालव्यातून होणाऱ्या पाणी गळतीमुळे शेती सतत पाण्याखाली राहत असल्याने शेतकरी वर्गाचे खुप नुकसान होते. गेली अनेक वर्ष शेतीत पाणी असल्याने शेती सुद्धा नापिक झाली आहे.असे असताना संबंधीत कंपन्या तुटपुंजी नुकसान भरपाईही देण्यास सुध्दा कित्येक वर्ष टाळाटाळ करीत होत्या. सदर बाब ग्रामस्थ व युवा वर्गानी आमदार अनिकेत तटकरे व आदिती तटकरे यांच्या कानावर घालताच अधिकारी वर्गाशी ग्रामस्थांची भेट घडवून पाठपुरावा करण्यात आला.त्याचीच फलश्रृती म्हणून तब्बल १ कोटी २५ ला
Image
आमदार अदिती तटकरे यांनी घेतलेला हळदीकुंकू सोहळा ठरतोय आदर्श   महिलांचा उत्स्फूर्त सहभाग तळा- संजय रिकामे तळा शहरात चंडिका देवी मैदानात श्रीवर्धन मतदार संघाच्या लोकप्रिय आ.अदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने घेतलेला हळदी कुंकूचा सोहळा शहरात आदर्श ठरत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला आहे.                  गेल्या अनेक वर्षांपासून आ.अदिती तटकरे या सामाजिक बांधिलकी म्हणून परिसरातील महिला वर्गाला एकत्र करून विविध उपक्रम पार पडत असतात त्याचाच एक भाग म्हणून हा हळदीकुंकू सोहळा पार पाडण्यात आला या सोहळ्यास महिलांचाही उदंड प्रतिसाद लाभत आहे. यावेळी आ.अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते महिलांना वाण म्हणून संसारोपयोगी साहित्य देण्यात आले.महिलांमधील स्नेह आणि गोडवा कायमचा टिकावा या उद्देशाने तिळगुळ वाटप देखील करण्यात आले.        राष्ट्रवादी काँग्रेसने हळदी कुंकू उपक्रम राबवित एकप्रकारे आपलेपणा जपल्याने उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित
Image
"स्वर्गीय आमदार पा.रा. सानप यांनी समाजाची निस्वार्थीपणे सेवा केली"-कोलाड विभाग कुणबी युवक अध्यक्ष संदेश लोखंडे कोलाड़-शरद जाधव रोहा -माणगावचे आमदार ,कुणबी समाजाचे नेते, शेतकरी कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज स्वर्गीय पा.रा.सानप यांनी कुणबी समाजासाठी निस्वार्थपणे सेवा केली .यांचा आदर्श आजच्या युवकांनी जपावा, असे उद्रगार कोलाड विभाग अध्यक्ष संदेश लोखंडे यांनी व्यक्त केले. स्वर्गीय पा.रा सानप यांच्या संभे या मूळ गावी त्यांच्या परिवार तर्फे 23 व्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . पा.रा.सानप यांच्या स्मृतिदिनानिमित्त संभे प्राथंमिक शालेय मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.   यावेळी स्वर्गीय पा.रा सानप यांचे मोठे सुपुत्र देविदास सानप, माजी सरपंच संजय सानप, पोलीस पाटील अनंत सानप, ज्येष्ठ नागरिक होनाजी सानप, गणेश सानप, श्री. किजबिले मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते . आमदार पा.रा सानप यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची सेवा केली. शेतकरी लढ्यात ते उतरले म्हणूनच त्यांचे नाव अजरामर आहे. आपण कुणबी समाज पा.रा.सानपां सारख्या एका आमदारांचे सामाजिक कार्य आ
Image
"सरकारकडून श्रीवर्धन मतदार संघात पर्यटन विकासाच्या मंजूर निधीला ब्रेक" -खासदार सुनिल तटकरे तळा- संजय रिकामे  शिंदे- फडणवीस सरकारने श्रीवर्धन मतदार संघात पर्यटन विकासाच्या मंजूर निधीला ब्रेक लावला असल्याचे सांगून;  हा प्रश्न आता न्यायालयात प्रलंबित असून त्याचा निकाल आपल्या बाजूने लागेल असा विश्वास खा.सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. मालाठे येथे श्री द्रोणगिरी देवस्थान मंदिर भूमिपूजन सोहळा खा.तटकरे यांच्या शुभ हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते या भूमिपूजन सोहळ्यासाठी गीरणे ग्रामपंचायत सरपंच ज्योती पयगुडे,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नाना भौड,सामाजिक विभाग रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव,जिल्हा उपाध्यक्ष कैलास पायगुडे,माजी राजीप सभापती हिराचंद तांबे, शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे, युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,निखिल लोखंडे,माजी उपसभापती चंद्रकांत राऊत,धनराज गायकवाड,रमेश लोखंडे,मंगेश भगत मलाठे ग्रामस्थ मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.                        महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जि
Image
रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू वावे पोटगे येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश  कोलाड-शरद जाधव रोहा तालुक्यातील वावे पोटगे येथील बहुसंख्य ग्रामस्थांनी खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे अलिबाग विधानसभा मतदार संघात पक्षाची ताकद वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीही लागतील असे चित्र असताना राष्ट्रवादी पक्षातील  नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरूच राहणार असल्याचं यावरून दिसून येत आहे. वावे पोटगे घेतील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी आमदार अनिकेत तटकरे यांची भेट घेऊन विकासाच्या समस्या मांडताच तात्काळ मार्गी लावल्या व राष्ट्रवादी पक्षच विकास कामे करू शकतो हे ग्रामस्थांनी जाणले. आमदार अनिकेत तटकरे यांचे नेतृत्वच आपल्याला काहीतरी दिशा देऊ शकेल त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला गेला.  या गावातील उपसरपंच स्वप्निल ठाकूर, गजानन मेंदले, दिलीप गीजे, जितेंद्र गिजे, नामदेव गीजे, नथुराम गीजे, कैलास गिजे, उदय धारवे व ग
Image
संघर्षाचा महामेरू, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील बुलंद आवाज कुणबी समाजनेते माजी आमदार कै.पा.रा.सानप कोलाड-श्याम लोखंडे  ग्रामीण भागातील जनतेला तसेच दुर्बल समाजघटकाला त्यांच्यावर होत असलेल्या अन्याया विरोधाची चळवळ उभी करत त्या समाज घटकाला योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी आपले जीव की प्राण असा संघर्षाचा लढा उभारत शेतकरी वर्गाचा बेदखल कुळांचा प्रश्न विधानसभेच्या पटलावर मांडणारा नेता कुणबी समाजासाठी सदैव झटणारा नेता माजी आमदार स्व.पा.रा. सानप (दादा साहेब सानप ) आशा महान कर्तृत्ववान नेत्याचे आज 11 फेब्रुवारी रोजी पुण्यस्मरण प्रित्यर्थ विनम्र अभिवादन.  त्यांच्या जीवनातील एक संघर्षमय प्रवास.तसेच विधिमंडळात सरकारला अन्याया विरोधात जाब विचारणारा असा आमचा नेता . सामाजिक राजकीय शैक्षणिक चळवळीतील समाज नेते ,सलग तीनवेळा विधानसभा गाजविणारे नेते म्हणजे माजी आमदार स्व.पां.रा.(दादा) सानप यांचा जन्म रोहा तालुक्यातील संभे या गावी झाला.  त्यांचे शालेय शिक्षण मॅट्रिकपर्यंत रोहा येथे झाले व पुढील शिक्षण पुणे येथे झाले. तद्नंतर सन 1945 साली त्यांच्या वडिलांचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची सारी जब
Image
रोहा पोलिसांची दमदार कामगिरी  रेकाॕर्डवर असलेले कुख्यात गुन्हेगार गजाआड रोहा-प्रतिनिधी        रोहा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक श्री.प्रमोद बाबर साहेब व त्यांचे सहकारी यांनी अज्ञात गुन्हेगारा विरुध्द रोहा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 06/2023 भा.द.वि.कलम 454,380 हा गुन्हा दि. 20 जानेवारी रोजी  दाखल केला होता.पोलिस सदरच्या अज्ञात आरोपीचा शोध घेत होते.     तसेच सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.उ.नि. साठे व टिम यांचेकडून चालू होता.      तपासाचे दरम्यान PSI साठे आणि टीम यांनी प्राप्त सीसीटीव्ही फुटेजचे मार्फतीने अज्ञात आरोपीतांचे फोटो निष्पन्न करून सदर आरोपीत हे शिर्डी व पुणे येथील राहणारे असल्याचे माहिती काढून सदर आरोपीतांना शिर्डी व पुणे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.    सदर आरोपीतांकडे अधिक तपास करता त्यांनी अलिबाग व रसायनी पोलीस ठाण्याचे अंतर्गत देखील घरफोडीचे खालील गुन्हे केल्याची कबुली दिली दिली आहे. आरोपीतांचे नाव व पत्ता- 1) नवनाथ साहेबराव गोरडे, वय 34 वर्षे रा. पोहेगाव, कोपरगाव जवळ, शिर्डी,
Image
संत विचारांच्या उजळणीने, रोह्यात संत रोहिदास जयंती साजरी   रोहा-प्रतिनिधी  रोहा तालुका चर्मकार समाजाच्यावतीने रोहा येथे संत रोहिदास जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात संत रोहिदासांच्या मौलिक विचारांची उजळणी करण्यात आली. या कार्यक्रमात संतवाणीच्या उजळणीने एक वेगळी ऊर्जा निर्मिती केली, तर संतांच्या मौलिक विचारांनी उपस्थित समाजबांधवांचे प्रबोधन झाले.        रोहा तालुका चर्मकार समाजातर्फे संत रोहिदास जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर चर्मकार समाजाचे जिल्हा सरचिटणीस राकेश केळकर, रोहा तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष दिपक आंबडकर, दिलीप पाबरेकर, रोहा तालुकाध्यक्ष समीर नागोठकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाले. यावेळी प्रमुख वक्ते राकेश केळकर, राजेंद्र जाधव यांनी संताचे विचार मांडले, संतवाणीसह विविध विषयांवरील व्याख्यानाने त्यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले.  समाजाचे रोहा तालुका सरचिटणीस गणेश चांदोरकर यांनी सूत्रसंचालन
Image
"विरजोली ग्रामस्थ विकासाच्या वाटेवर आलेत,त्यांचे मनपुर्वक स्वागत करतो"-खासदार सुनिल तटकरे रोहा-प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा स्विकारुन श्री.दामोदर घरटकर व त्यांचे शेकडो सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेत त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो.विरजोली ग्रामस्थांनी विकासाची वाट पकडली आहे त्यांची भ्रमनिराशा होणार नाही.त्यांनी सुचविलेली सर्व कामे मार्गी लागतील असा मी शब्द देतो असे विधान खासदार सुनिल तटकरे यांनी विरजोली येथील कार्यक्रमात केले. शनिवार दिनांक ४फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २ वाजता विरजोली येथील गणेश मंदिरात खासदार सुनिल तटकरे यांनी पक्षप्रवेश केलेल्या विरजोली ग्रामस्थांची सदिच्छा भेट घेतली ,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मधुशेठ पाटील,तालुका अध्यक्ष  विनोदभाऊ पाशिलकर, ओ.बी.सी.सेल अध्यक्ष संतोष भोईर,संतोष पार्टे,जगन्नाथ कुंडे,किरण मोरे,किसनराव मोरे, संजय मारुती नाकती,पांडुरंग धुमाळ,नवनाथ पैर, मालती पैर,  सुनील शिंदे,स्वप्निल शिंदे,उद्देश देवघरकर, प्रदीप कदम, गजानन गीते,हरेश नायणेकर, मोरेश्वर नाकती, तुकाराम धुळे, नारायण
Image
रोहे खारगांव येथे गावदेवी भवानी मातेचा वार्षिक पालखी उत्सव सोहळा उत्साहात संपन्न खारी/रोहा -केशव म्हस्के  रोहे तालुक्यातील मौजे खारगांव येथील आराध्य ग्रामदैवत गावदेवी भवानी मातेचा वार्षिक पालखी मिरवणूक सोहळा माघ शुद्ध एकादशी शके १९४४ दि.०१ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी मोठ्या थाटामाटात व जल्लोषमय वातावरणामध्ये संपन्न झाला.        सालाबादप्रमाणे याहीवर्षी बुधवार रोजी खारगाव गावची ग्रामदैवत, नवसाला पावणारी हाकेला धावणारी गावदेवी भवानी मातेची वार्षिक पालखी मिरवणूक सोहोळयानिमित्ताने पहाटे अभिषेक धार्मिक पूजा विधी सायंकाळी पालखी मिरवणूक सोहोळयाप्रसंगी आरे पंचक्रोशी वारकरी सांप्रदायिक भजन - हरिपाठ,बेंजो पथक, ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथक, खालू बाजाच्या साथीने व पारंपारीक पद्धतीने  साजरा करीत संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक घरोघरी जात महिला मंडळ,अबालवृद्ध, बाळ गोपाळ,जेष्ठ नागरिक,तरुण मित्र मंडळ तसेच रोहा - चणेरा पंचक्रोशी परिसरातील तसेच सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवत भाविक भक्तांनी आपल्या मित्र परिवारासमवेत भवानी मातेचे मनोभावे पूजा आरती करून
Image
रोहा प्रेसक्लबची नुतन कार्यकारणी जाहिर   प्रेसक्लब रोहा तालुका अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव यांची निवड रोहा-प्रतिनिधी रोह्यातील सक्रिय पत्रकारांची समाजसेवी संस्था असलेल्या रोहा प्रेस क्लबचे विद्यमान अध्यक्ष श्री.शशिकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी पत्रकार परिषद कार्याध्यक्ष मा.मिलिंदजी अष्टिवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता कुणबी भवन रोहा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.सदरच्या सभेमध्ये नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. प्रेसक्लबचे पदाधिकारी म्हणून खालील सन्माननिय पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. तालुका अध्यक्षपदी श्री. राजेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे,राजेंद्र जाधव हे अनेक वर्षे रोहा तालुक्यात सक्रिय व डॕशिंग पत्रकार म्हणून सुपरिचित आहेत.राजेंद्र जाधव यांनी "दैनिक रायगड टाइम्सचे " रोहा कार्यालय प्रमुख म्हणून आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक गरजुंना न्याय मिळवून दिला आहे.तसेच "सलाम रायगड " पोर्टल व युट्युब चॕनेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांन