"विरजोली ग्रामस्थ विकासाच्या वाटेवर आलेत,त्यांचे मनपुर्वक स्वागत करतो"-खासदार सुनिल तटकरे

रोहा-प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा स्विकारुन श्री.दामोदर घरटकर व त्यांचे शेकडो सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेत त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो.विरजोली ग्रामस्थांनी विकासाची वाट पकडली आहे त्यांची भ्रमनिराशा होणार नाही.त्यांनी सुचविलेली सर्व कामे मार्गी लागतील असा मी शब्द देतो असे विधान खासदार सुनिल तटकरे यांनी विरजोली येथील कार्यक्रमात केले.

शनिवार दिनांक ४फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २ वाजता विरजोली येथील गणेश मंदिरात खासदार सुनिल तटकरे यांनी पक्षप्रवेश केलेल्या विरजोली ग्रामस्थांची सदिच्छा भेट घेतली ,त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मधुशेठ पाटील,तालुका अध्यक्ष  विनोदभाऊ पाशिलकर, ओ.बी.सी.सेल अध्यक्ष संतोष भोईर,संतोष पार्टे,जगन्नाथ कुंडे,किरण मोरे,किसनराव मोरे, संजय मारुती नाकती,पांडुरंग धुमाळ,नवनाथ पैर, मालती पैर,  सुनील शिंदे,स्वप्निल शिंदे,उद्देश देवघरकर, प्रदीप कदम, गजानन गीते,हरेश नायणेकर, मोरेश्वर नाकती, तुकाराम धुळे, नारायण नाकती इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

जनसामान्यांचे नेते म्हणून सुपरिचीत असलेल्या श्री.दामोदर घरटकर यांच्या समवेत सरपंच सौ.दामिनी दामोदर घरटकर,उपसरपंच शरद यशवंत बुधर, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य किरण बाळकृष्ण पानसरे, विद्यमान सदस्य-बबन श्रीपत वाघमारे,तसेच लीलाधर नवगणे-माजी पोलीस पाटील, दत्तात्रेय घरटकर ,युवा कार्यकर्ता निकेत घरटकर.मराठा समाजाचे माजी अध्यक्ष  वसंत घरटकर , चिंतन घरटकर,मारुती घुळे,शैलेश घरटकर,सुरेश घरटकर, बेबी घरटकर, वैशाली घुळे, दिपाली शिर्के, मुचणे बौद्धवाडी येथील विलास लोखंडे, रामचंद्र जाधव,नथुराम जाधव, आदिवासीवाडी मुचणे येथील पांडुरंग जाधव,किसन जाधव, बबन पवार, संगीता मुकण,तुकाराम वाघमारे, जयश्री वाघमारे, दीपक जाधव, मुचणे येथील नारायण बोबले, सुजित गिजे,तानाजी गीजे,रामदास साठले,राजू पालांडे,संजना गिजे, गीता बोबले,हाल येथील योगेश तेलंगे, नारायण सहादेव पाणसरे,दिलीप तटे,रामदास म्हात्रे, बाळकृष्ण पाणसरे,साठल्येवाडीचे अशोक बुधर,संजय केमले,उचेल गाव येथील- शंकर हटेकर माजी सरपंच- नथुराम घेवडे, माजी उपसरपंच-रमेश घडशी, दशरथ घडशी, अंबाजी गोरीवले, जाणू लोंढे, ताई आदावडे,शुभांगी घडशी,विठा घाडगे,उचेल बौद्धवाडी येथील प्रदीप पवार,आशिष पवार,संगीता पवार यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

विरजोली येथील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घोसाळे विभाग बालेकिल्ला झाला आहे.तर श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे

Comments

Popular posts from this blog