रायगड जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांच्या फळ पिक विम्याचे पैसे 3 जानेवारी पूर्वी आदा करा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश तळा कृष्णा भोसले. पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह 3 जानेवारीपूर्वी आदा करावेत असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. सन २०२२-२३ मधे रायगड जिल्ह्यातील 7500 शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 3500 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम आदा करण्यात आली आहे. मात्र महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने 2940 शेतकऱ्यांची 9 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही. याविरोधात तळा येथील शेतकऱ्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यासंदर्भात खा. सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने व उपस्थितीत आज मंत्रालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम दूरदृष्य प्रणाल
Posts
Showing posts from December, 2023
- Get link
- Other Apps
वावेहवली धरणाच्या सिंचन क्षेत्रातील कालव्याच्या दुरुस्तीची मागणी! धरणाचे पाणी कालवा दुरुस्त होत नसल्याने शेतीला पोहचत नाही कालव्याची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी खैराट ग्रामस्थांनी मंत्री अदिती तटकरे यांचेकडे केली आहे. तळा कृष्णा भोसले. तालुक्यातील वावेहवली हे धरण निर्माण होण्यासाठी अनेक शेतकरी बांधवाना भूमीहीन व्हावे लागले. परंतु या धरणाच्या सिंचन क्षेत्रातील खालील शेतकरी बांधवाच्या शेतीसाठी पाणी पोहचत नाही. या भागातील कालवा हा नादुरुस्त आहे. त्यामुळे शेतीला पाणी पोहचत नाही. मग या कालव्याची दुरुस्ती का केली जात नाही असा प्रश्न शेतकरी बांधवाच्या वतीने केला जात आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना बळीराजा संघटना तळा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर यांनी सांगितले की धरणात एवढे पाणी असुन ते शेतीसाठी सोडले जात नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे कालवा नादुरुस्त आहे.आम्ही याबाबत शेतकरी बांधवाच्या भेटी गाठी घेतल्या पण कालवा नादुरुस्त आहे. त्यामुळे शेतीला पाणी पोहचत नाही.या भागातील बामणघर ,खैराट,राणेचीवाडी, वावेहवली,येथील तरुण शेतकरी बांधवाच्या शेतीसाठी पाणी मिळत नाही हे लक्
- Get link
- Other Apps
विद्यार्थी ,पालक आणि शिक्षकाच्या सहभागाने 'कार्निव्हल २०२३' संपन्न जे.एम.राठी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून २०२३ वर्षाची जल्लोषात सांगता रोहा प्रतिनिधी जे.एम.राठी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, रोहा येथे शनिवार, १६ डिसेंबर २०२३ रोजी उत्साहपूर्ण कार्निव्हल उत्सव आनंदाने साजरा करत विद्यार्थ्यांनी जलोषात २०२३ वर्षाची सांगता केली . या कार्निव्हलने तरुण विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या आणि अनेक नवीन गोष्टी शिकून घेण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या, ज्या त्यांच्यातील उद्योजकीय कौशल्ये निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. शालेय कार्निव्हल हे असंख्य क्रियाकलापांसह संपूर्ण मनोरंजनाचे पॅकेज आहे. यामध्ये विध्यार्थ्यांना विविध प्रकारचे रुचकर खाद्य पदार्थ्यांचा आस्वाद यावेळी घेता आला. याशिवाय अनेक गमतीशीर खेळ, नृत्य, संगीत आणि अनेक कार्यक्रमाचा यात समावेश होता. हा एक असा दिवस आहे जो विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या व्यस्त वेळापत्रकातून विश्रांती देत त्यांचे ताण तणाव दूर करण्यासाठी असे उपक्रम राबवले जाते. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्य
- Get link
- Other Apps
कुडा लेणीच्या सुशोभीकरणामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार-ना.अदिती तटकरे जगाला युद्ध नको बुद्ध हवाय-माजी सभापती हिराचंद तांबे तळा संजय रिकामे. तळा तालुक्यातील कुडा लेणी या पर्यटनस्थळाचा विकास होऊन या ठिकाणी अधिकाधिक संख्येने पर्यटक यावेत, यासाठी महिला बालकल्याण मंत्री ना.आदिती तटकरे यांनी प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि कुडा लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करून कुडा लेणी सुशोभीकरणासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या कामाचे भूमिपूजन ना.अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते (दी.१८ डिसेंबर) रोजी करण्यात आले या भूमिपूजन सोहळ्यासाठी मांदाड ग्रामपंचायत सरपंच लता करंजे, उपसरपंच अनंत लोखंडे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,तहसीलदार स्वाती पाटील, चरई खुर्द सरपंच प्रवीण अंबारले, पढवण सरपंच परशुराम कदम,माजी सभापती हिराचंद तांबे,माजी सभापती अक्षरा कदम माजी सभापती गीता जाधव,माजी उपसभापती गणेश वाघमारे, नाना भौड,जान्हवी शिंदे, अॅड.उत्तम जाधव,रामदास मोरे,धनराज गायकवाड,किशोर शिंदे,सदानंद येलवे,विजय जाधव,प्रकाश गायकवाड, भीमराज जाधव,अनंत मोरे,सचिन गवाणे,भारतीय बौद्ध महासभा
- Get link
- Other Apps
धामणसई गावामध्ये उभे राहिलेल्या हनुमान मंदिराचे ग्रामस्थांनी पावित्र्य राखा-आमदार अनिकेत तटकरे रोहा दिनांक 17 मार्च (शरद जाधव) धामणसई येथे ग्रामस्थांच्या मागणी नुसार उभे राहिलेले हनुमान मंदिर सामाजिक सभागृह हे भव्य दिव्य स्वरूपात उभे राहिले असून ग्रामस्थ व तरुण वर्गांनी या मंदिराचे पावित्र्य राखा असे वक्तव्य आमदार अनिकेत तटकरे यांनी केले. धामणसई येथे हनुमान मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आमदार अनिकेत तटकरे यांनी कार्यक्रमा ठिकाणी भेट दिली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे पुढे म्हणाले की धामणसई पंचक्रोशीला वारकरी परंपरा आहे या भागाला गुरुवर्य अलिबागकर बाबा, गोपाळ बाबा वाजे, धोंडू महाराज कोल्हटकर, गुरुवर्य भाऊ महाराज निकम,यांच्या कृपा आशीर्वाद लाभले आहेत .त्यामुळे यापुढे येथील युवकांनी वारकरी परंपरा पुढे नेले पाहिजे. जुन्या पिढीने हा वारकरी संप्रदायाचा वारसा जपला आहे. पूर्वीचे कौलारू मंदिरावर कळस चढला आहे. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपत रोज मंदिरात हरिपाठ,भजन होऊ द्या असे मार्गदर्शन आमदार अनिकेत तटकरे यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी सुमारे 17 लाख रुपये चा आमदार न
- Get link
- Other Apps
रोहा (धगडवाडी) येथे अमृतधारा गोशाळेचे शंकराचार्य राघवेश्वर भारती यांच्या हस्ते उद्घघाटन रोहा -दिनांक 16 डिसेंबर रोहा तालुक्यातील सुतारवाडी परिसरातील धगडवाडी येथे दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी मा प्रतिष्ठान च्या वतीने अमृतधारा गोशाळेचे उद्धघाटन श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य राघवेश्वर भारती महास्वामी यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मा -- प्रतिष्ठानचे कृष्णा भट यांनी शंकराचार्य राघवेश्वर भारती महास्वामी यांचे जोरदार स्वागत केले महास्वामी गुरुजी हे प्रथमच आपल्या भक्तगणासाठी दर्शन देण्याकरता मुंबईत आले होते त्यामुळे धगडवाडी येथे भक्तजनांचा प्रचंड जन समुदाय जमला होता. मा - राष्ट् प्रतिष्ठान चे कृष्णा भट यांच्या भट फार्ममध्ये महास्वामी गुरुजी निवासस्थानी होते. त्या ठिकाणी आलेल्या भक्तगणा गुरुजींनी अनमोल असे मार्गदर्शन केले. कृष्णा भट हे गेली 15 ते 20 वर्ष ढोकळेवाडी येथे गोशाळा चालवीत आहेत . गाय हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे.अशा मातेचे रक्षण करणे हे हिंदूंचे काम आहे. हे काम गेले अनेक वर्ष कृष्णा भट मा- राष्ट्रा प्रतिष्ठानच्या वतीने निस्वार्थीपणे करीत आहेत. मी करित
- Get link
- Other Apps
रोह्यात जातीच्या दाखल्यासाठी कुणबी लाट उसळली... हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दिले तहसिलदार व प्रांतांना मागण्यांचे निवेदन.. खारी-रोहा,दि.१४(केशव म्हस्के):- जातीच्या दाखला मिळविण्याकामी असणा-या जाचक अटी रद्द करून समाजाचा जातीचा दाखला मिळावा या मागणीसाठी आज गुरुवार दि.१४ रोजी कुणबी समाजाची प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयावर प्रचंड कुणबी लाट उसळून व विराट मोर्चा काढून व मागण्यांचे निवेदन देऊन शासनाचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेतले... कुणबी समाजोन्नती संघ मुंबई व जिल्हा जिल्हा समन्वय समिती यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका कुणबी समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भव्य स्वरुपात मोर्चा काढून प्रशासनाने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले.जि.समन्वय अध्यक्ष ज्ञानदेव पवार शंकर म्हसकर,शिवराम शिंदे,शिवराम महाबळे, शंकर भगत, सुरेश मगर,अनंत थिटे, रोहिदास दुसार,दिनेश राटाटे,सुहास खरीवले, दत्ताराम झोलगे,गोपीनाथ गंभे, मारुती खांडेकर, रामचंद्र चितळकर,पांडुरंग बाईत,रामचंद्र सकपाळ,मुंबई शाखा युवक अध्यक्ष शरद गंभे, उपाध्यक्ष सुनील ठाकूर,बाबू इप्ते, मंगेश सानप, जिल्हा युवक अध्यक्
- Get link
- Other Apps
रोहा कुणबी समाजाला लागले मोर्चाचे वेध,सानेगाव येथे महिला आक्रमक,मेढा विभागातून जोरदार प्रतिसाद,मोर्चात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन. कोलाड (श्याम लोखंडे ) कुणबी समाजाला जातीचा दाखला मिळण्यासाठी शासनाने लादलेल्या १९६७ पूर्वीच्या पुराव्याची जाचक अट रद्द झालीच पाहिजे, ह्या प्रमुख मागणीसाठी 'रोहा तालुका कुणबी युवक मंडळ, कुणबी समाजोन्नती संघ शाखा रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुक्यातील कुणबी समाजाचा लाक्षणिक आंदोलन मोर्चा गुरुवार दि.१४ डिसेंबर रोजी रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर सकाळी १०:३० वाजता धडकणार असून या मोर्चाची जनजागृती मोहीम जोरदार तालुक्यात गावोगावी जाऊन राबवली जात आहे.या मोहिमेला गावोगावी जोरदार प्रतिसाद मिळत असून महीलांचा देखील उत्सफूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याने सदरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन जागोजागी मिळत आहे.तालुक्यातील मेढा विभागात सानेगाव येथे सोमवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी झालेल्या सभेला गावातील कुणबी समाज बांधवानसह युवक, युवती,महिला देखील बहुसंख्येने उपस्थित होत्या. कुणबी दाखल्यासाठी समाजाचा रोहा तालुक्यातील सर्व भागांमध्य
- Get link
- Other Apps
१४ डिसेंबर रोजी होणाऱ्या कुणबी भव्य मोर्चास खारी - गोफण विभागातून ५०० हून अधिक समाज बांधव सहभागी होणार.. खारी/रोहा (केशव म्हस्के ) १२ डिसें:- रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर जातीच्या दाखल्या प्रश्र्नी गुरूवार १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या भव्य मोर्चा व धरणे आंदोलनात खारी - गोफण विभागातून ५०० हून अधिक समाज बांधव सहभागी होणार.. आपण सारे जन्माने व कर्माने कुणबी आहोत,तरीही आपल्याला "कुणबी जातीचा दाखला मिळत नाही " दाखला काढण्यासाठी व जात पडताळणीसाठी १९६७ पूर्वी आपण कुणबी असल्याची नोंद शासन पुरावा म्हणून मागते.मात्र आपल्याकडे अशी नोंद लिखित स्वरूपात नसल्याने आपण जातीच्या दाखल्यापासून वंचित राहतो.केवळ नोंद नाही म्हणून कुणबी नाही असे कुणालाही नाकारण्याचा अधिकार नाही.आजवर आपल्या अनेक पिढ्या दाखल्यांअभावी OBC सवलतींचा लाभ घेऊ शकल्या नाहीत,हे आपले दुर्दैव आहे.आपल्यावर प्रचंड अन्याय झाला आहे.. जातीच्या दाखल्यासाठी व जात पडताळणी साठी १९६७ पूर्वीच्या पुराव्याची जाचक अट रद्द झालीच पाहिजे ,आदी प्रमुख मागण्यांसाठी रोहा तालुका कुणबी युवक मंडळाने, कुणबी समाजोन्नती संघ शाखा रोह
- Get link
- Other Apps
कोलाड, धगडवाडी येथे 14 डिसेंबर रोजी अमृतधारा गोशाळेचे उद्घाटन श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य श्री राघवेश्वर भारती महास्वामी उपस्थित राहणार रोहा दि. 12 डिसेंबर (शरद जाधव) रोहा तालुक्यातील धगडवाडी येथे अमृतधारा गोशाळेचे उद्घाटन गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी ठिक 12 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे .सदर उद्घाटन श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य श्री राघवेश्वर भारती महास्वामीजी यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे याकरता सर्व भक्त गणांनी उपस्थित राहावे असे आवाहन मा-- राष्ट्रा प्रतिष्ठान ट्रस्टचे कृष्णा भट यांनी केले आहे. अनेक वर्षानंतर मुंबई व पुणे भक्तगणांच्या इच्छेनुसार श्री रामचंद्रपुर मठाधिपती श्री राघवेश्वर भारती महास्वामी यांचे मुंबई येथे दिनांक 8. 12. 20 23 रोजी आगमन झाले आहे. तेथील भक्तगणांना दर्शन देऊन बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड धगडवाडी येथे भट फार्म येथे सदर गुरुजी येणार आहेत. व गुरूवार 14 डिसेंबर रोजी सकाळी ठीक बारा वाजता धगडवाडी येथील अमृतधारा गोशाळेचे उद्घाटन श्री राघवेश्वर भारती महास्वामी गुरुजी यांच्या शुभहस्
- Get link
- Other Apps
काकडशेत ग्रामपंचायतीमध्ये भारत संकल्प विकसित भारत रथयात्रेचा जोरदार स्वागत! तळा सोनसडे- कृष्णा भोसले. सध्या देशात विकसित भारत संकल्प रथयात्रा गावागावात येत असून त्याचाच भाग म्हणून काकडशेत ग्रामपंचायतीमध्ये हा रथ येताच जोरदार स्वागत करण्यात आले. सुरवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सरपंच शरद सारगे,उपसभापती तुकाराम खेडेकर, उपसरपंच अर्चना तापकीर,ग्रा.पं.सदस्य ,महीला मंडळ अध्यक्षा, पदाधिकारी, सर्व पोलीस पाटील, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई, तसेच महीला बचत गट, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रथयात्रेत चित्र फितीव्दारे विविध योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी अनेक योजना देशात मोठ्या प्रमाणात राबवत असुन त्या जनसामान्यांच्या फायदेशीर ठरत असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. तर अनेक योजनांची माहिती चित्रफिती व्दारे पहावयास मिळाल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक
- Get link
- Other Apps
रोह्यात कुणबी समाज एकवटला, कुणबी दाखल्यासाठी महिलाही आक्रमक, मोर्च्यात सहभागी होण्याचा निर्धार. रोहा (श्याम लोखंडे ) कुणबी दाखला प्रश्नांवर आता रोहा तालुक्यात कुणबी समाज बांधव तथा युवक आता चांगलाच पेटून उठला आहे. शासनाने लादलेली जातपडताळणी साठी १९६७ सालाच्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी तसेच जन्माने आणि कर्माने आम्ही कुणबी आहोत आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे यासाठी येत्या १४ डिसेंबर रोजी एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन रोहा तालुक्यात पुकारण्यात आले आहे. अभी नहीं तो कभी नहीं ही दाखला आमच्या हक्काचा अशी भूमिका येथील युवकांनी घेत कुणबी दाखल्यासाठी लक्षवेधी आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे यासाठी तालुक्यातील गावोगावी फिरून सदरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. कुणबी राजा जागा हो, समाजाचा धागा हो,आज नाही तर कधी नाही त्यामुळे आता कुणबी समाज्याच्या महीला देखील कुणबी दाखल्यासाठी गावात आक्रमक होत असताना दिसत आहेत .आमच्या मुलांचा ओबीसी कुणबी दाखल्या अभावी शैक्षणीक, नोकर भरती, व्यवसायात अर्थिक दृष्टया नुकसान होत आहे. त्यामुळे समाजाच्या भावी पिढीच्या उन्नती
- Get link
- Other Apps
कोकण पायी दिंडीचे पुणे जिल्ह्यातील मावळ मध्ये जल्लोषात स्वागत. दर्शनासाठी प्रतिष्ठित नागरिकांची लागली रिघ. मावळ-प्रतिनिधी स्वानंद सुख निवासी गुरुवर्य अलिबाग कर बाबा यांच्या कृपा छत्राखाली सद् गुरु ह.भ. प.पुरुषोत्तम महाराज पाटील (बापू) यांच्या कुशल मार्गदर्शनाने रोहा ते आळंदी पायी दिंडी सोहळा 2023 याही वर्षी रोह्यावरून प्रस्थान झाला आहे. रायगड जिल्ह्याची सीमा खोपोली येथे ओलांडून खंडाळ्याच्या घाटातून पायी दिंडी सोहळा पुणे जिल्ह्यात प्रविष्ट झाला. या पायी सोहळ्याचा चौथा दिवस हा अवर्णनीय स्वरूपाचा असतो. लोणावळ्यापासून पुढे मावळ तालुक्यातील कुरवंडे या गावी हा दिंडी सोहळा पोहोचला. ह.भ.प. सुभाष महाराज पडवळ, कुरवंडे यांनी या दिंडी सोहळ्याच्या निवासाची व महाप्रसादाचे यजमानपद स्विकारले होते. त्यामागे सुद्धा एक इतिहास आहे.फार पुर्वी ह.भ.प.सुभाष पडवळ यांचे वडील वैकुंठवासी ह. भ. प. देवराम आप्पा पडवळ यांनी कोकणातून आळंदीकडे जाणारी ही पायी वारी उंच अशा डोंगरातून जाताना पाहिली. त्यावेळी वारकऱ्यांसाठी त्यांनी उत्तम रस्ता बनवून घेतला व वारकऱ्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था केली. तेव्हापासून सुरू अ
- Get link
- Other Apps
उच्च न्यायालयीन आदेशानुसार प्रिया दिनेश कडू यांचे सरपंच पद रद्द रोहा प्रतिनिधी रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायत मध्ये दिनांक 31/5/2023 रोजी शेडसई सरपंच सौ.प्रिया दिनेश कडू यांच्या विरोधात ग्रामपंचायत उपसरपंच प्राजक्ता प्रभाकर कडू, सदस्य कल्याणी मढवी, राजश्री पाटील, जनीबाई पवार, मीनाक्षी म्हात्रे, तानाजी म्हात्रे अशा सहा सदस्यांनी रोहा तहसीलदार यांच्याकडे येथे अविश्वास ठरावाच्या प्रस्तावाची नोटीस तहसीलदार श्री किशोर देशमुख यांच्याकडे दिली त्यानंतर ५/६/२०२३ रोजी शेडसई ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठरावाची विशेष सभा घेण्यात आली होती. त्यामध्ये प्रिया कडू यांच्या मागणीनुसार गुप्त पद्धतीने मतदान घेतले व अविश्वास ठरावाच्या बाजूने सात पैकी सहा सदस्यांनी मतदान केले. अशा प्रकारे शेडसई सरपंच प्रिया कडू यांचे विरोधात अविश्वास ठराव संमत झाला व त्यांचे सरपंच पद रद्द झाले.यानंतर सरपंच प्रिया कडू यांनी जिल्हाधिकारी योगेश म्हस्के यांच्याकडे अपील केले त्यांची सुनावणी ५/७/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.जिल्ह्यातील साहेबांनी या अविश्वास ठरावाचा निकाल दिनांक ३१/७/२०२३ रोजी प्रिया
- Get link
- Other Apps
तरुणांनी नोकरीच्या शोधात शहरात न जाता विविध फळ प्रक्रिया उदयोग उभारावेत. - तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमार्फत वावेहवेली येथे काजू प्रक्रिया युनिटचे उद्घाटन. तळा : किशोर पितळे तळा तालुक्यात काजू लागवडीस पोषक वातावरण आहे व बऱ्याच शेतकऱ्यांचा काजू लागवडीकडे कल सुद्धा वाढत आहे. तसेच जुन्या उत्पादनक्षमता काजू बागा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काजू प्रक्रियेस मोठया प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे येथील तरुणांनी नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे येथे न जाता विविध फळप्रक्रिया उदयोग उभारले पाहिजेत यासारख्या विविध फळांवरील छोटी फळ प्रक्रिया युनिट प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने मार्फत सुरु करावीत यासाठी कृषीविभाग अनुदान देण्यासाठी सहकार्य करेल असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी वावेहवेली येथे केले. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजने अंतर्गत लाभ घेतलेल्या वावेहवेली येथील लाभार्थी सागर पारावे यांच्या काजू प्रक्रिया युनिटचे उद्घाटन तालुका कृषीअधिकारी आनंद कांबळे यांचे हस्ते करण्यात
- Get link
- Other Apps
वरसगाव गावचे महादेव सानप गुरुजी यांचे निधन रोहा 4 डिसेंबर (शरद जाधव) रोहा तालुक्यातील वरसगाव गावचे कुणबी सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच महादेव नथुराम सानप उर्फ सानप गुरुजी यांचे बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने जुन्या काळातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना अनेक जानकारांनी व्यक्त केली. महादेव नथुराम सानप हे सानप गुरुजी म्हणून सर्वांना परिचयाचे होते.शिक्षकी पेक्षा असल्याने अभ्यासू व्यक्तिमत्व होते. गावच्या सामाजिक अध्यात्मिक राजकीय कामात ते हिरारीने भाग घेत असत. वरसगाव ग्रामपंचायत मध्ये त्यांनी सरपंच पद भूषविले होते. त्यांच्या काळात ग्रामपंचायतीच्या कारभाराला विशेष शिस्त लागली होती गावच्या तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवले होते त्यांना वृत्तपत्र वाचनाची विशेष आवड होती. शिक्षक म्हणून तळवली शाळेत सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी गावच्या सामाजिक कामात हिरारीने सहभाग घेतला होता. त्यांनी आपले कुटुंब उत्तम सांभाळले होते. त्यांची पुढची पिढी उच्च शिक्षण घेत आहे. अंत्ययात्रेस प्रचंड जनसमुद
- Get link
- Other Apps
पतीने केला पत्नीचा खून, सपासप केले वार,या घटनेने रोहात एकच खळबळ. कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील मौजे पाले खुर्द येथे नवऱ्यानेच पत्नीवर सपासप वार करत खून केल्याची घटना घडली असुन सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे तर तालुक्यासह रायगड जिल्हा हादरला आहे. रोहा तालुक्यात कोलाड विभागातील मौजे संभे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील मौजे पाले खुर्द येथे रविवारी ३डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चक्क पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना घडली. सदरच्या घटनेने परीसर तसेच तालुका पुन्हा एकदा हादरला आहे.घर बांधण्यावरील कर्जाचा वाद अखेर पत्नीच्या जीवावर बेतलाचे समोर आले आहे तर मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या विषयाची सविस्तर माहिती अशी की मौजे पाले खुर्द येथील वैभव राम ठाकूर याने घर बांधकाम कर्ज वादातून पत्नी विद्या हिच्यावर कोयत्याने सपासप वार करत तीला जिवे ठार केले असल्याचे समोर आले आहे. घडलेल्या या घटनेमुळे सबंध परीसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस निरीक्षक अजित साबळे यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देत आरोपीस ताब्यात घेतले. क
- Get link
- Other Apps
महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात लवकरच पिंक ऑटो रिक्षा सुविधा सुरु करणार-महिला,बालविकास मंत्री आदिती तटकरे तळा किशोर पितळे राज्यातील महिलांचा प्रवास आणखी सुरक्षीत व्हावा, तसेच त्यांना रोजगारांची संधी मिळावी,यासाठी राज्यात लवकरच पिंक ऑटो रिक्षा सुविधा सुरु करणार असल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,सुरुवातीला राज्यातील काही प्रमुख शहरांत ही सुविधा सुरु केली जाईल. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पिंक ऑटो रिक्षा पाहायला मिळतील.मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विशेष बैठक पार पडली.या बैठकीत त्यांनी राज्यात पिंक ऑटो रिक्षा सुरु करण्याची माहिती दिली. आदिती तटकरे म्हणाल्या की, ही योजना परिपूर्ण करावी. सुरुवातीला मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या ठिकाणी ही योजना सुरू करण्याचा मानस आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की,राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व समावेशक असे बालधोरण महिला व बालविकास विभाग तयार करत आहे.तसेच जनतेच्या हरकती आणि सूचना म
- Get link
- Other Apps
सोनसडे ग्रामपंचायतीला जिल्हा स्तरीय समितीची भेट आर. आर. पाटील स्वच्छ व सुंदर गाव समितीकडून पहाणी तळा सोनसडे - कृष्णा भोसले. तळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सोनसडे या ग्रामपंचायतीमध्ये आज रायगड जिल्हा परिषद जिल्हा स्तरीय समितीने भेट दिली. या समितीने गावातील स्वच्छता व पाणीपुरवठा व वेगवेगळ्या प्रकारच्या सामुदायिक व वैयक्तिक लाभाच्या योजना कशा प्रकारे अमंगल बजावणी करत सुदंर व स्वच्छ गावाच्या संकल्पनेचा आढावा घेतला. या समितीमध्ये जिल्हा कृषी विकास अधिकारी तथा समितीचे अध्यक्ष मिलिंद चौधरी, पाणीपुरवठा उप अभियंता रायगड जिल्हा परिषद तथा समिती सदस्य श्रीकांत पाटील यांचे गावात प्रवेश करताच महिलांनी आरती करून औक्षण केले.तदनंतर ग्रामपंचायत मध्ये समितीचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी सरपंच माधुरी पारावे, सदस्य परशुराम वरंडे,व इतर सदस्य,गावातील जेष्ठ सदस्य, महिला मंडळ अध्यक्षा मनिषा बोंबले व महिला मंडळाच्या सदस्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिला व पुरुषांसमवेत समितीने वेगवेगळ्या प्रकारे प्रत्यक्षात माहिती घेतली. ग्रामपंचायतीमध्ये विविध