उच्च न्यायालयीन आदेशानुसार प्रिया दिनेश कडू यांचे सरपंच पद रद्द
रोहा प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायत मध्ये दिनांक 31/5/2023 रोजी शेडसई सरपंच सौ.प्रिया दिनेश कडू यांच्या विरोधात ग्रामपंचायत उपसरपंच प्राजक्ता प्रभाकर कडू, सदस्य कल्याणी मढवी, राजश्री पाटील, जनीबाई पवार, मीनाक्षी म्हात्रे, तानाजी म्हात्रे अशा सहा सदस्यांनी रोहा तहसीलदार यांच्याकडे येथे अविश्वास ठरावाच्या प्रस्तावाची नोटीस तहसीलदार श्री किशोर देशमुख यांच्याकडे दिली त्यानंतर ५/६/२०२३ रोजी शेडसई ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठरावाची विशेष सभा घेण्यात आली होती. त्यामध्ये प्रिया कडू यांच्या मागणीनुसार गुप्त पद्धतीने मतदान घेतले व अविश्वास ठरावाच्या बाजूने सात पैकी सहा सदस्यांनी मतदान केले. अशा प्रकारे शेडसई सरपंच प्रिया कडू यांचे विरोधात अविश्वास ठराव संमत झाला व त्यांचे सरपंच पद रद्द झाले.यानंतर सरपंच प्रिया कडू यांनी जिल्हाधिकारी योगेश म्हस्के यांच्याकडे अपील केले त्यांची सुनावणी ५/७/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.जिल्ह्यातील साहेबांनी या अविश्वास ठरावाचा निकाल दिनांक ३१/७/२०२३ रोजी प्रिया कडू यांच्या बाजूने दिला. त्यानंतर दिनांक १०/८/२०२३ रोजी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात सौ.प्राजक्ता प्रभाकर कडू व सदस्य यांनी उच्च न्यायालयात अर्ज श्री जमदाडे यांच्याकडे दाखल केला. दि. ११/८/२०२३ रोजी सरपंच प्रिया कडू यांच्या धोरणात्मक निर्णयावर बंधन देण्यात आले. प्राजक्ता कडू यांचे ऍडव्होकेट कमलेश घुमरे व श्री सोनाली जाधव यांनी मांडलेल्या युक्तिवादातून दिनांक सात ७/११/२०२३ रोजी अविश्वास ठरावाला जिल्हाधिकारी यांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे. असा निर्णय उच्च न्यायालयात दिला आहे. उच्च न्यायालयात श्री जमदाडे यांनी प्रिया कडू यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले आहे असा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. या निर्णयाने शेडसई ग्रामपंचायत सदस्य यांना योग्य न्याय मिळाला आहे.
खासदार सुनिल तटकरे,आमदार अनिकेत भाई तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांना यश मिळाले.
Comments
Post a Comment