रोहा तालुक्यातील गोफण येथे कडू परिवाराचे कुलदैवताचे प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा रोहा प्रतिनिधी रोहा तालुक्यातील गोफण येथील कडू परिवाराचे कुलदैवताचे प्राणप्रतिष्ठा सोहळा व त्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. कडू परिवाराचे कुलदैवताचे प्राणप्रतिष्ठा सोहळा हा दोन दिवस उत्साहात पार पडला. ह.भ.प.नितीन महाराज मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम करण्यात आले.गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी दुपारी कार्यक्रमाची सुरुवात झाली,होम हवन करण्यात आले.सायंकाळी हरिपाठ,कीर्तन नंतर महाप्रसाद झाले. दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता संपूर्ण गावातून कुलदैवताची मिरवणूक व ग्रामदैवेद्यांची भेट करण्यात आली. यात कडू परिवार मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते.सकाळी नऊ वाजता प्राणप्रतिष्ठा, होम व सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. सायंकाळी चार वाजता महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सौ.वरदा सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.ह.भ.प.दिनेश महाराज कडव यांचे नेतृत्वाखाली हरिपाठ झाले. आळंदी येथ
Posts
- Get link
- Other Apps
रोह्यात राजकीय भूकंप , लाल सलाम ला राम राम करणार रोहा तालुक्यातील शेकापचे दोन बडे नेते खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार रोहा : प्रतिनिधी रायगड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रोह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून भातसई विभागातील व मेढा विभागातील शेतकरी कामगार पक्षातील दोन दिग्गज नेते रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार सध्याचे विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत अशी विश्वसनीय माहिती सूत्रांनी आदिशक्ती ला दिली आहे.लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर शेकापला दिलेला धक्का मानला जात आहे. याचा नक्कीच फायदा हा सुनिल तटकरे यांना होणार असे भाकीत राजकिय बुजुर्ग मंडळी बोलत आहे. आगामी लोकसभा निवडणुका यांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रायगड लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते व महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांची नावे जाहीर केली गेली आहेत. प्रचार सभेला सुरुवात होण्यापूर्वीच सुनिल तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षांचे नेते जयंत पाटील यांनी तटकरे यांच्या वर केलेल्या जहरी टिकेला उत्तर
- Get link
- Other Apps
तळा येथील शिमग्याची संस्कृती पंरपरा आजच्या युगात देखील कायम तळा- किशोर-पितळे तळा येथे शिमग्याला विशेष महत्त्व आहे. ऐतिहासिक व पौराणिक धार्मिक असे महत्व असून परंपरा आधूनिक काळात देखील जपली आहे .बदलत्या काळानुसार थोडा फार बदल होत गेला आहे. ग्रामदेवता श्री चंडिका देवी फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पोर्णिमा ते रंगपंचमी पर्यंत साजरी केली जाते.श्री.चंडिका देवीचे मुळ स्थान तळगड किल्लावर मुघलांच्या साम्राज्य होते. त्या काळात सिध्दी जोहारने या देवतेला बाटवण्याचा प्रयत्न केला.व देवीने गावाच्या बाहेर उडी घेतली ते आजचे ग्रामदेवी चंडीकेचे मंदिर आहे.त्यावेळी पुजा,अर्चा गोसावी समाज करीत असत.व नैवद्य गावात जोगवा मागून शिजवून दाखवला जात असे म्हणून या वाडीचे नाव जोगवाडी असे पडले असा इतिहास दाखवला आहे. देवीचे मुखवटे वेदक यांच्या गादीवरुन नेऊन जोगवाडी ग्रामस्थ हा उत्सव सण भक्ती भावाने, श्रध्देने साजरा करीत आहेत.जोगवाडी पोळेकर (गोसावी )ग्रामस्थ वाजत गाजत चांदीच्या पालखीतून मुख्य वतनदार देशमुख यांच्या घरातून ग्रामदेवता श्री चंडिका देवी मंदिरात नेली जाते व मुळ पाषाणाजवळ मनोभावे प्रार्थना केली ज
- Get link
- Other Apps
ग्रुप ग्रामपंचायत वरसे चे सरपंच चषक धुम -धडाक्यात संपन्न-सरपंच अमित मोहिते यांचा बोलबाला...! रोहा तालुक्यातील बलाढ्य ग्रामपंचायत मधील एक मानाची स्पर्धा...! प्रतिनिधी दीप वायडेकर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे ही सर्वात मोठी आणि बलाढ्य ग्रामपंचायत मानली जाते. तालुक्यात ही ग्रामपंचायत अतिशय मानाची अशी ग्रामपंचायत मानली जाते. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिनांक 20 आणि 21 मार्च रोजी भव्य दिव्य अशा सरपंच चषकाचे आयोजन करण्यात आले होते.हे आयोजन सरपंच अमित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. ग्रामपंचायतचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या सामन्याचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक 25,000 आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 15,000 आणि आकर्षक चषक, , तृतीय क्रमांक 10,000,आणि आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक 10,000आणि आकर्षक चषक तसेच मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज अशी पारितोषिक देण्यात आली . या स्पर्धेमध्ये ग्र
- Get link
- Other Apps
पर्यावरण टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी शेतकरी नेते पाशा पटेल! विशेष प्रतिनिधी शेतकरी नेते आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुख्यमंत्र्यांच्या पर्यावरण टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे, मुंबईसह राज्यात वाढत्या वायु प्रदुषणामुळे अनेक आराेग्य विषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत आणखी अभ्यास करण्यासाठी राज्याच्या आराेग्य विभागाकडून ‘टास्क फाेर्स’ ची स्थापना करण्यात आली. हा टास्क फोर्स पृथ्वी आणि महाराष्ट्र राज्याला प्रभावित करणाऱ्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांचा प्रभाव कमी करण्याचे मार्ग शोधण्यासाठी समर्पित आहे. महाराष्ट्राच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांची या समितीच्या सह-अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारच्या विविध संबंधित विभागांचे सचिव टास्क फोर्सच्या कार्यकारी स
- Get link
- Other Apps
महिला व बालविकास विभागामार्फत महिलांकरिता साहित्य वाटप ना.अदितीताई तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन तळा-किशोर पितळे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अलिबाग, महिला व बालविकास विभागा मार्फत आयोजित महिलांकरिता साहित्य वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन मा.नामदार अदितीताई तटकरे महिला बालविकास मंत्री व अलिबाग -मुरुडचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते १२ मार्च रोजी करण्यात आले.सदर कार्यक्रमात आमदार महेंद्रशेठ दळवी,शिवसेना नेत्या रणरागिणी मानसी दळवी,अतीरिक्त सी.ई.ओ.सत्यजीत बडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी गिताजंली पाटील,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आम.महेंद्र दळवी यांनी महिलांकरिता स्वच्छता, आरोग्य,कुटुंब, कायदे विषयक व इतर विषयावर मार्गदर्शन केले.त्यावेळी लाभार्थी,मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित होत्या. यावेळी उपस्थीत मान्यवरांचे हस्ते अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप, लेक लाडकी योजना प्रथम हप्ता धनादेश वाटप,अंगणवाडी स्मार्ट किट वाटप तसेच महिला बचत गटांना विविध साहित्य वाटप करण्यात आले.
- Get link
- Other Apps
मेढा येथील यश पानसरे गुवाहाटीमध्ये चमकला रोहा (शैलेश गावंड) रोहा तालुक्यातील मेढा येथील यश विकास पानसरे त्याच्या पुणे येथील (VIT) महाविद्यालया च्या टीम एकलव्य गटाचे नेतृत्व बजावत गुवाहाटी आसाम येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), यांच्या अलचेरिंगा या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवांमधील राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( VIT ) महाविद्यालय पुणे तसेच रायगड जिल्हा आणि मेढा आणि गावाची शान वाढवली आहे यश हा विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( VIT ) पुणे या महाविद्यालयाचा विद्यार्थी असून शालेय अभ्यासात हुशार आहेच तसेच इतर कला, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली आहे.यशने रोहा येथील स्पंदन नाट्य संस्थेच्या माध्यमातून अनेक बालनाट्य स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धांमधून तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तम अभिनय आणि नृत्यकला सादर करून अनेक पारितोषिके मिळवली आहेत.याबाबत यश चे वडील विकास पानसरे यांच्याशी संपर्क साधला असता मिळालेला माहितीनुसार ८ ते १० मार्च दरम्यान गुवाहाटी येथे ही स्पर्धा पार पडली अलचेरिंगा ला "अ