ग्रुप ग्रामपंचायत वरसे चे सरपंच चषक धुम -धडाक्यात संपन्न-सरपंच अमित मोहिते यांचा बोलबाला...!

रोहा तालुक्यातील बलाढ्य ग्रामपंचायत मधील एक मानाची स्पर्धा...!

 प्रतिनिधी दीप वायडेकर

          रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे ही सर्वात मोठी आणि बलाढ्य ग्रामपंचायत मानली जाते. तालुक्यात ही ग्रामपंचायत अतिशय मानाची अशी ग्रामपंचायत मानली जाते. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिनांक 20 आणि 21 मार्च रोजी भव्य दिव्य अशा सरपंच चषकाचे आयोजन करण्यात आले होते.हे आयोजन सरपंच अमित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. ग्रामपंचायतचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या सामन्याचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक 25,000 आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 15,000 आणि आकर्षक चषक,  , तृतीय क्रमांक 10,000,आणि आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक 10,000आणि आकर्षक चषक तसेच मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज अशी पारितोषिक देण्यात आली . 

          या स्पर्धेमध्ये ग्रामपंचायतीमधील वरसे ,भुवनेश्वर, निवी या गावातील १६ संघांचा समावेश होता. या स्पर्धेचा अंतिम विजेता सनी इलेव्हन वरसे, उपविजेता दीपेश इलेव्हन आदर्श नगर भुवनेश्वर ,तसेच तृतीय क्रमांक‌ गणराज 11 भुवनेश्वर तर चतुर्थ क्रमांक सनी इलेव्हन बी वरसे हे ठरले. यांना रोख रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेकरिता रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे हे उपस्थिती होते. यावेळी सरपंच अमित मोहिते ,उपसरपंच शांतीशील तांबे ,माजी सरपंच नरेश पाटील, रामा म्हात्रे तसेच उद्योजक राम नाकती ,गणेश शिवलकर ,तुषार शिंदे ,उद्देश कांबळे ,अतिश पडवळ ,दुर्गेश नाडकर्णी ,किशोर पाटील, राजू केरकर ,समीर देवरे ,अमित चिपळूणकर ज्येष्ठ वालेकर‌ अण्णा, मास्तर पंडित हे मान्यवर उपस्थित होते...


Comments

Popular posts from this blog