Posts

Showing posts from February, 2024
Image
  रोहा येथे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा  रोहा प्रतिनिधी          धावीर देवस्थान ट्रस्टचे जेष्ठ पदाधिकारी सन्माननीय श्री. मकरंदभाऊ बारटके यांच्या उपस्थितीत मराठी राजभाषा दिन उत्साहात पार पडला. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानाचे मराठी भाषेतील महत्व अतिशय सोप्या शब्दात मकरंदजींनी उपस्थितांना सांगितले.       दुर्ग अभ्यासक, लेखक, रायगड भूषण सुखद राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा शुद्धीकरणासाठी घेतलेली भूमिका उपस्थितांना विशद केली.       शाखा अध्यक्षा संध्या दिवकर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेच्या कार्याचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला. उपाध्यक्षा आरती धारप यांनी वि. वा. शिरवाडकरांच्या साहित्य प्रवासाचा थोडक्यात आढावा घेतला.       मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास निवृत्त नायब तहसीलदार शरद पोकळे, सौ. पोकळे, कोलाड हायस्कुलचे शिक्षक सदानंद तांडेल, मंगलवाडी शाळेच्या शिक्षिका स्नेहा तांडेल, पुगाव हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री निवास थळे, अष्टमीच्या रिद्धी बोथरे आदी मान्यवर उपस्थि
Image
निरंकारी चैरिसंतटेबल फाउंडेशन तर्फे ‘प्रोजेक्ट अमृत”चे देशभरात आयोजन चोरवली येथे रा.जि.प शाळेजवळ राबविण्यात आले स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियान जल परमात्म्याचे वरदान आहे आपण त्याचे अमृता प्रमाणे रक्षण करावे  सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज तळा : कृष्णा भोसले.          सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली रविवारी सकाळी 8.00 वाजता ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या द्वितीय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छठ घाट, आई.टी.ओ. दिल्ली येथून करण्यात आला. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीच्या प्रेरणेतून साकारलेली ही परियोजना भारतवर्षातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील 1 हजार 533 ठिकाणी एकाच वेळी राबविण्यात आली ज्यामध्ये 11 लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला.         प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन ही परियोजना चोरवली येथील सार्वजनिक विहीर व नाळा चोरवली रा. जि .प शाळे जवळ राबविण्यात आली. या कार्यक्रमामध्ये चोरवली ब्रांच मुखी गणेश राणे जी , ग्रामस्थ अध्यक्ष मधुकर अंबावले  तसेच निरंकारी सेवादल अन्य निरं
Image
तळा तालुक्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला नागरीकांचा अभुतपूर्व प्रतिसाद महिला व बालकल्याण मंत्री ना. अदिती तटकरे यांचे हस्ते विविध योजनांचे लाभार्थी प्रमाण पत्र वाटप .  तळा- कृष्णा भोसले.        तळा तालुक्यातील शासन आपल्या दारी या द. ग. तटकरे कॉलेजच्या  झालेल्या प्रांगणात तालुक्यातील लाभार्थी व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून अभुतपूर्व प्रतिसाद नोंदवला. त्यामुळे या कार्यक्रमाला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.    सुरवातीला उभारलेल्या स्टॉलला मंत्री अदिती तटकरे यांनी भेट दिली. बचत गट, विविध शासकीय विभागाने योजनांची उभारलेल्या स्टॉलला भेटी व माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करुन महाराष्ट्र गीत विदयार्थीनी गायले त्याचा सन्मान ठेवत नागरीकांनी उभे राहून गीत गायले. उपस्थित मान्यवरांचा शाल श्री फळ देत स्वागत करण्यात आले.            यावेळी शेकडो लाभार्थींना महसुली विभाग, पंचायत समिती विभाग, कृषी विभाग, यांच्या विविध योजना त्यामध्ये घरकुल, अपंग व्यक्तींना,शेतकरी, मागासवर्गीय विभागाच्या अशा विविध योजनांच्या लाभार्थींना प्रमाणपत्र, चेक वाटप, मंत्र
Image
तळा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाअंतर्गत उदया होणार  विविध शासकीय योजनांचा लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ वाटप पत्र   उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत व महिला बालकल्याण  मंत्री अदिती तटकरे यांचे शुभहस्ते होणार उद्घाटन खा. सुनिल तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांची विशेष उपस्थिती लाभणार!  तळा कृष्णा भोसले.        तळा तालुका स्तरीय शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ वाटप पत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तळा येथील गो. म. वेदक हायस्कूल समोरील  भव्य प्रांगणात रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, महीला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचे शुभ हस्ते होत असून प्रमुख अतिथी रायगड चे खा. सुनील तटकरे, विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांची विशेष उपस्थितीत लाभणार असुन या कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिकांनी, लाभार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.      या कार्यक्रमासाठी  प्रांताधिकारी संदीपान सानप यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार स्वाती पाट
Image
  तळा तालुक्यातील वाशी हवेली गावाला " स्वप्नातील गाव " मानांकन तळा- कृष्णा भोसले.          दि.२१ फेब्रुवारी २०२४ रोजी वाशी कोळीवाडा येथे स्वदेश फाउंडेशन मार्फत स्वप्नातील गाव हे मानांकन मिळालेला आहे. पण या मानांकनासाठी गेली पाच वर्ष म्हणजेच गाव विकास समिती वाशी हवेली कोळीवाडा याची स्थापना २४ जुलै २०१९  साली व तेथून जवळ जवळ पाच वर्ष म्हणजेच स्वच्छ सुंदर स्वास्थ्य, सक्षम साक्षर स्वावलंबन या सर्व बाबींवर वाशी हवेली कोळीवाडा येथे काम करण्यात आले.तरी गावातील गटारे उघडे होती ते शंभर टक्के बंदिस्त केली तसेच गावात शंभर टक्के सीसीटीव्हीच्या कक्षेत गाव आहे तसेच १३७ घरांना ग्रामपंचायत मार्फत सुका कचरा व ओल्या कचऱ्यासाठी डस्टबिन देण्यात आलेले आहेत. तसेच वाशी हवेली ग्रामपंचायत मार्फत १३७ घरांना डिस्पेन्सर देण्यात आलेले आहेत तसेच फाउंडेशन मार्फत प्रत्येक घरावर सोलर लाईट देण्यात आलेले आहे.               तसेच शंभर टक्के लोकांकडे शौचालय आहेत व ते शौचालयाचा वापर करतात त्याच्यामुळे हागणदारी मुक्त गाव आहे. तसेच शंभर टक्के शोष खड्डे आहेत तरी गावातील सर्व बाबींवर चांगल्या प्रकारे काम करून यावेळी क
Image
राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना म्हसळा आणि कोकण युवा प्रतिष्ठान म्हसळा यांच्या वतीने १२ वी च्या परीक्षार्थीना पेनाचे वाटप म्हसळा -प्रतिनिधी                खासदार सुनील जी तटकरे साहेब आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती ताई तटकरे आणि विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांचे सर्वांचे प्रयत्नाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस म्हसळा शहर अध्यक्ष शाहनवाज उकये यांच्या संकल्पनेतून उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा २०२४ इयत्ता १२ वी च्या परीक्षार्थीना पेन भेट देऊन शुभेच्छा देत प्रोत्साहित करण्यात आले. हे पेन नसुन विद्यार्थ्यांच्या भविष्याचे छोटस शस्त्र आहे. अंजुमन हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्राचार्य अब्दुल रहिमान घराडे सर, कोकण युवा प्रतिष्ठानचे  संस्थापक अकमल अस्लम कादिरी,नवाझ नझिरी, मनोहर तांबे, नदीम दफेदार, अभय कळमकर, इमरान दरोगे,असीम चोगले, अनस हसपाटील, इरशाद खान, यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व सदस्य, शिक्षक वर्ग या वेळी उपस्थित होते.
Image
  सुखदरवाडी येथे आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी रोहा प्रतिनिधी        सुखदरवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला.सकाळी गावातील सर्व तरुण तळा येथून शिवज्योत आणून पूजा केली, त्यानंतर महाराजांच्या मूर्तीस अभिषेक व पूजा करण्यात आली. शिवजयंती निमित्ताने आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, विविध योजनांचे देखील आयोजन केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवजयंती निमित्त महिला व बालविकास मंत्री नामदार अदिती ताई तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिवस्मारक सुखदरवाडी रंगमंच याचे उद्घाटन नामदार आदिती ताई तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. लेझीम पथकाने आदिती ताईंचे स्वागत करण्यात आले. गावातील दोन लहान भावंडांनी पोवाडा गायन केले.त्यानंतर विरझोली पथकाने शिवकालीन शस्त्र चालवणे,असे विविध कार्यक्रम सादर केले.ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.          गावातून मशाल, पालखी घेऊन ढोल ताश्याच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. तरुण,तरुणीने मिरवणूक आनंदाने लेझीम खेळत उत्साहात पार पडली. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लहान मुलांनी मोठ्या ह
Image
शिवमुद्रा मित्र मंडळ गावठण येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी  रोहा प्रतिनिधी          शिवमुद्रा मित्र मंडळ गावठण हे प्रत्येक सण, उत्सव मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटाने साजरे करतात.या वर्षी देखील शिवजयंती त्याच जल्लोषात साजरी केली. दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी मशाल आणण्यासाठी अवचितगडाकडे प्रस्थान केले. दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी मशाल आगमन झाले. नंतर मशाल पूजन व मूर्तीचे मनोभावे पूजन करण्यात आले.           सायंकाळी कुमारी सिद्धीताई सुरेश पवार रा. गोवे हिचे शिवव्याख्यान झाले.कमी अगदी लहान वयात खणखणीत आवाजात तिने शिवविचार सांगितले तिच्या विचाराने आणि आवाजाने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला. त्या अगोदर गावातील लहान मुलींच्या भाषणाने सर्वांचे मन जिंकले. सिद्धीताई पवार यांचे सन्मान मंडळाचे सचिव श्री. सागर सानप यांनी केले. व्याख्यान नंतर महाराजांची पालखी मिरवणूक वाजत गाजत पारंपरिक नृत्य करून अतिशय उत्साहात पार पडले. सर्व ग्रामस्थ, महिला व तरुण मंडळ सहभागी झाले होते. गावातील सर्व महिला व मुली यांच्या पारंपरिक वेशभूषेने सर्वांचं लक्ष वेधले. शेवटी महाराजांची महाआरती झाली व कार्यक्रमाची सांगता झाल
Image
  लोकसभेची रायगडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच असल्याचे दिले संकेत-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  तळा-किशोर पितळे             तळा शहराच्या १३ कोटी ७० लक्ष रू.खर्चाच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपुजन सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात १७ फेब्रु.२४रोजी पार पडला. तळा नगर पंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरीकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत तळा शहरासाठी खास करून १३ कोटी ७० लक्ष इतक्या मोठ्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तळा हायस्कूलच्या समोरील मैदानात खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या स्वागत आणि पक्ष म
Image
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील कथामाला सांगता समारंभ रोहा नगर पालिका मंगलवाडी शाळा क्र.१० येथे संपन्न रोहा प्रतिनिधी                आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी कै.प्रफुलशेठ बारटक्के मंगलवाडी शाळा क्रमांक १० या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कथामालेचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभासाठी गड किल्ले अभ्यासक व "इये देशीचे दुर्ग" या पुस्तकाचे लेखक श्री सुखद राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध कथा सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले .इतिहास आणि वर्तमान काळ यांची सांगड घालत आपले जीवन कसे समृद्ध करावे .इतिहासातून आपण काय शिकावे  .याचा पाठ श्री सुखद राणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सांगितला.तसेच स्वत: लिहीलेले "इये देशीचे दुर्ग" हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचनासाठी शाळेला भेट म्हणून दिले.             दिनांक  ८/२/२०२४ रोजी कथामाला कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती .छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध कथा जसे त्यावेळचा महाराष्ट्र ,शिवरायांचे बालपण ,रायरेश्वराची प्रतिज्ञा, स्वराज्या
Image
  शेडसई ग्रामपंचातीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा  रोहा प्रतिनिधी                           मा.खासदार श्री.सुनीलजी तटकरे साहेब,मा.आमदार श्री.अनिकेत भाई तटकरे ,महिला व बाल कल्याण मंत्री मा.कु.अदिती ताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा शेडसई ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकवला. या वेळी सरपंच पदी सौ.कल्याणी कृष्णा मढवी तर उपसरपंच पदी सौ.राजश्री राजन पाटील यांची ६ पैकी ४-४ मतांनी निवडून आल्या .या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचे सर्व ग्रामस्थ, विशेषत: महिला वर्गानी अभिनंदन केले. सरपंच, उपसरपंच या दोन्ही पदी महिला निवडून आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे.                 यावेळी श्री.संतोष भोईर,श्री.विठोबा गुंड, श्री.नामदेव मढवी, श्री. सुभाष दिवकर ,श्री.प्रभाकर कडू, श्री.दीपक कडू, श्री.ज्ञानेश्वर कोळी,माजी उपसरपंच सौ.प्राजक्ता कडू,शेडसई गाव अध्यक्ष चंद्रकांत गायकर,माजी उपसरपंच श्री.जयराम गायकर,सदस्य श्री.मंगेश कोटकर,कु.जयेश कडू श्री.कृष्णा मढवी,श्री.राजन पाटील, श्री.ओमकार कडू,श्री.महेश कडू,श्री.काशिनाथ मांडलेकर ,महिला विभाग संघटिका सौ.वृषाली कडू,सौ.गीता कडू,सौ
Image
 पी.एम किसान अंतर्गत गाव पातळी वरील विशेष मोहिम प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तळा कृषी विभागाचे प्रयत्न तळा कृष्णा भोसले             शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणा-या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेच्या संपृक्तता (Saturation) साध्यतेसाठी तालुक्यात डिसेंबर ते जानेवारी, २०२४ या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत तालुक्यातून १२३  स्वयं नोंदणीकृत शेतक-यांची नव्याने नोदणी करण्यात आली, तथापि, तालुक्यात एकुण ५१५ शेतक-यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई-केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतक-यांचे मुख्यतः सामाईक सुविधा केंद्रांमार्फत (CSCs) eKYC प्रमाणिकरण करण्यासाठी दि. १२ फेब्रुवारी ते दि. २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आणखी १० दिवसांची संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची क्षेत्रीयस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) यांना निर्देश दिले आहेत. या मोहिमे दरम्यान केवळ eKYC प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकचे सामाईक सुविधा क
Image
विद्यार्थ्यांनी मोबाईल,इंटरनेट व्यसनापेक्षा अभ्यासाचं व्यसन करावं-पोलीस निरीक्षक गणेश कराड    तळा हायस्कूल व कॉलेजमध्ये व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या यावर पोस्टर व निबंध स्पर्धा संपन्न तळा :किशोर पितळे                 रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग  यांच्या वतीने तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो म वेदक विद्यामंदिर तळा येथे पोस्टर स्पर्धा तर कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या या विषयावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कराड म्हणाले की विद्यार्थ्यांनी मोबाईल,इंटरनेट वापरताना योग्य त्या प्रमाणात वापर करावा त्याचा जास्त वापर करणं टाळावं त्या ऐवजी अभ्यासाचं व्यसन लावा.त्याचानिश्चीतच भावी जीवनात फायदा होईल.असे मौलिक मार्गदर्शन केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक  दिलीप ढाकणे, सुहास वावेकर,विनोद कोलवणकर, विनायक महाडकर,गायकवाड मॅडम, पोलीस काॅन्टेबल मनोहर पाटील, पुजा साळुंखे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पोस्टर स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे पोस्टर पाहून ए.पी.आय. गणेश कराड यांनी कौतुक केले
Image
  संघर्षाचा महामेरू सामाजिक व राजकीय क्षेत्रातील बुलंद आवाज कुणबी समाजनेते माजी आमदार स्व. पा.रा. सानप  कोलाड (श्याम लोखंडे )  ग्रामीण भागातील जनतेला तसेच दुर्लब समाजघटकला त्यांच्यावर होत असलेल्या अन्याविरोधाची चळवळ उभी करत त्या समाज घटकाला योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे या साठी आपले जीव की प्राण असा संघर्षाचा लढा उभारत शेतकरी वर्गाचा बेदखल कुळांचा प्रश्न विधानसभेच्या पटलावर मांडणारा कुशल प्रशासक नेता कुणबी समाजासाठी सदैव झटणारा नेता माजी आमदार स्व.पा.रा. सानप (दादा साहेब सानप ) आशा महान कर्तृत्ववान नेत्याचे आज 11 फेब्रुवारी रोजी पुण्य स्मरण प्रित्यर्थ विनम्र अभिवादन व त्यांच्या जीवनातील एक संघर्षमय प्रवास ,सामाजिक राजकीय शैक्षणिक चळवळीतील समाजनेते सलग तीनवेळा विधानसभा गाजविणारे माजी आमदार स्व.पां.रा. (दादा) सानप यांचा जन्म रोहा तालुक्यातील संभे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मॅट्रिकपर्यंत रोहा येथे झाले व पुढील शिक्षण पुणे येथे झाले तद्नंतर सन 1945 साली त्यांच्या वडिलांचे आकस्मित निधन झाले त्यामुळे कुटुंबाची सारी जबाबदारी त्यांच्यावर पडली त्यामुळे दादासाहेबांचे उच्च शिक्षणाचे स्वप्
Image
  तळा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना मेळावा संपन्न तळा- किशोर पितळे            तळा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना मेळावा व ११ वा वर्धापन दिन श्री गणेश मंगल कार्यालय येथे ९ फेब्रुवारी २४ रोजी सकाळी११वा.मा.श्रीम.शोभा म. भागवत यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष मा. धुरंधर मढवी सरचिटणीस एम पी वावेकर, कोषाध्यक्ष सुरेंद्र जाधव, पाटील, काशिनाथ जाधव, कर्णीक सर मुरूड अध्यक्ष तालुका अध्यक्ष भा.स.मंचेकर, उपाध्यक्ष बाळाराम चव्हाण अनंत वारे गुरूजी होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व श्रीगणेश प्रतिमेचे पुजन करण्यात आले.संघटनेचे प्रवर्तक कै.नारायणराव वेदक व मयत सदस्यांना भावपुर्ण आदरांजली वाहिली.स्वागत गीत अरविंद जंगम यांनी करुन मान्यवरांना शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्ष भानू मंचेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा लेखा जोखा व आर्थिक परिस्थिती सादर करून सेवानिवृत्त संघटना गेली ११ वर्ष उत्तम रितीने काम करीत असून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी झालो आहोत.नियमित सभा घेऊन सभासदांच्या सेवानिवृत्ती वेतनामधील अडी
Image
रोहा नगर पालिका शाळेच्या आवारात मुलांचा फुलला आठवडा बाजार रोहा प्रतिनिधी          रोहा नगरपालिका कै. प्रफुल्ल शेट बारटक्के शाळा क्रमांक १० या शाळेच्या आवारात आज विद्यार्थ्यांचा आठवडा बाजार भरला होता.विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान प्रत्यक्ष कृतीतून व्हावे या उद्देशाने शाळा क्रमांक १० च्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा आठवडा बाजार भरविण्यात आला होता. या आठवड्या बाजाराचे नियोजन शाळा क्रमांक १० च्या शिक्षकांनी केले होते. तसेच व्यवस्थापन समितीचे विशेष सहकार्य लाभले. रोहा नगर परिषद शाळा क्र १० या शाळेचे  मुख्याध्यापक श्री .तुळशीदास कुसळकर ,शिक्षिका सुचिता टेंगळे,शिक्षक भाऊसाहेब धोत्रे ,सौ संध्या दिवकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.             ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थी आपापल्या मालाची जाहिरात करत होते. गरम गरम बटाटेवडा, चटकदार भेळ, लाल भडक कलिंगड, इडली चटणी, झणझणीत पावभाजी, लज्जतदार अप्पे, रसरशीत चायनीज भेळ, बटाटा चिप्स, चिंचा, बोरे ,चिक्की, स्टार फ्रुट, थंडगार सरबत अशा एक ना अनेक पदार्थांचे  स्टाल लावण्यात आले होते. . मुले वेगवेगळ्या ढंगात ओरडून आपल्या मालाची जाहिरात कर
Image
  कुणबी समाज सामाजिक उपक्रमाला नेहमीच सहकार्य राहील ; ना. आदिती तटकरे  पा.रा सानप कुणबी भवन नवीन सभागृहाचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन कोलाड (श्याम लोखंडे)               कुणबी समाजाच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी कुणबी भवन व्हावे अशी मागणी कुणबी समाज बांधव यांनी केली होती. आमदार, लोकप्रतिनिधी असताना निधी देण्यात काही मर्यादा असतात. पण ज्यावेळी सर्वांनी कुणबी भवन बांधकामाचे ठरविले, त्यावेळी खा. तटकरे साहेबांनी एका वर्षात जवळपास तीन आमदारांचा  निधी मंजूर करुन या इमारतीला उपलब्ध करून दिला. कुणबी समाजातील वेगवेगळ्या मान्यवरांच्या पुढाकाराने व लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितपणे उभारलेली कुणबी भवन या इमारतीमध्ये एक व्हाल, येथील विभागीय ग्रूप करता स्वतंत्र खोल्या त्याच बरोबर विविध उपक्रम राबविले जावे या कार्यक्रमासाठी सामाजिक सभागृह त्यात सामाजिक उपक्रम राबवले जावे, त्यासाठी लागणारे सहकार्य कायम आमचे सर्वांचे राहील असल्याचे प्रतिपादन कुणबी समाज नेते माजी आमदार स्व.पा.रा. सानप कुणबी भवन नवीन सभागृहाचे शुभारंभ महिला व बालविकास मंत्री ना.अदिती तटकरे यांच्या हस्ते  करण्यात आ
Image
  तळा तालुका शेतकरी संघटना संवाद बैठक संपन्न तळा कृष्णा भोसले           तळा तालुक्यातील शेतकरी संघटनेने, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज याना हार घालून विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन विविध शेतकऱ्यांच्या साठी योजना  जाणून घेऊन शेतकरी व प्रशासन यांच्या मधील दुवा बनून शेतकरी संघटना प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शेतकरी संघटनेचे सचिव श्री कैलास मुकुंद पायगुडे प्रस्तावना मांडून चर्चेला सुरुवात केली.         नायब तहसीलदार पालांडे साहेब यांनी तहसील कार्यालयाचे विविध योजनांची उपयुक्त माहिती सांगितली ,आणि त्याचे लागणारे कागद पत्र याची पण माहिती सांगितली.ज्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना त्याचा चागंला लाभ होईल.तसेच त्यांनी सांगितले की माननीय तहसीलदार स्वाती पाटील यांच्याशी बोलून लवकरच प्रशासन व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त पणे शासनाच्या विविध योजनांचा शिबिर तहसील कार्यालयात प्रांगणात  लावण्यात येईल असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.त्याचे शेतकरी संघटनेने स्वागत केले व त्यांचे आभार मानले.           गटविकास अधिकारी यांच्याकडे म्हसळा तालुका येथील
Image
 नागपूर येथे झालेल्या स्पेशल ऑलिंपिक जलतरण स्पर्धेमध्ये श्रेयस ने पटकावले सुवर्णपदक  रोहा- शैलेश गावंड  मेढा येथील कविवर्य श्री नारायण पराडकर यांचे नातू आणि श्री.दिपक पराडकर यांचे चिरंजीव श्रेयस याने नागपूर येथे झालेल्या राज्य स्तरीय  स्पेशल ऑलिंपिक मध्ये जलतरण स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. नागपूर येथे दिनांक 30 आणि 31 जानेवारी 2024 दरम्यान झालेल्या राज्य स्तरीय स्पेशल ऑलिम्पिक - भारत या स्पर्धेत कु.श्रेयस दिपक पराडकर याने स्विमिंग स्पर्धा 25 मीटर आणि 50 मीटर या स्पर्धेत प्रत्येकी सुवर्ण पदक पटकावले. एकूण दोन सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेला कु. श्रेयस दिपक पराडकर याने 28 जिल्ह्यातुन स्विमिंग स्पर्धेसाठी आलेल्या सर्व स्पेशल स्विमिंग स्पर्धकांमध्ये पहिला क्रमांक मिळवून रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आता तो स्पेशल नॅशनल ऑलिम्पिक स्विमिंग स्पर्धेची तयारी करत असून पुढील दोन महिन्यात ती नॅशनल ऑलिम्पिक स्पर्धा गुजरात , पौंडेचरी किंवा मुंबई अंधेरी येथे होणार आहे जिथे की सर्वच राज्यातुन पात्र असलेले स्पेशल स्विमिंग स्पर्धक येणार आहेत. स्पेशल नॅशनल ऑलिम्पिक स्पर्धेत क
Image
  रायगड जिल्हा परिषदेचा ODF PLUS चा पहिला बहुमान तळा तालुक्याला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांच्या हस्ते गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी स्विकारला तळा कृष्णा भोसले.           रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन. या अंतर्गत रायगड जिल्हा परिषद मधुन जिल्ह्यातील तळा तालुक्याला ODF PLUS चा पहिला बहुमान मिळाला आहे.      रायगड जिल्हा परिषद येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांचे शुभहस्ते १ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या कार्यक्रमात तळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी तालुक्याच्या वतीने स्विकारला आहे. यावेळी श्रीमती शुभांगी नाखले  प्रकल्प संचालक   तथा  उपमुख्य कार्यकारी ( पाणी व स्वच्छता), श्रीमती प्रियदर्शिनी मोरे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड जिल्हा परिषद अलिबाग व इतर मान्यवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दिलेल्या प्रशस्तीपत्रात त्यांनी ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी केन्द्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) या राष्ट्रीय योजनेची अंमलबजावणी दरवर्षी केली. मात्र या अभिया