रोहा नगर पालिका शाळेच्या आवारात मुलांचा फुलला आठवडा बाजार


रोहा प्रतिनिधी 


        रोहा नगरपालिका कै. प्रफुल्ल शेट बारटक्के शाळा क्रमांक १० या शाळेच्या आवारात आज विद्यार्थ्यांचा आठवडा बाजार भरला होता.विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान प्रत्यक्ष कृतीतून व्हावे या उद्देशाने शाळा क्रमांक १० च्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा आठवडा बाजार भरविण्यात आला होता. या आठवड्या बाजाराचे नियोजन शाळा क्रमांक १० च्या शिक्षकांनी केले होते. तसेच व्यवस्थापन समितीचे विशेष सहकार्य लाभले. रोहा नगर परिषद शाळा क्र १० या शाळेचे  मुख्याध्यापक श्री .तुळशीदास कुसळकर ,शिक्षिका सुचिता टेंगळे,शिक्षक भाऊसाहेब धोत्रे ,सौ संध्या दिवकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.


            ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थी आपापल्या मालाची जाहिरात करत होते. गरम गरम बटाटेवडा, चटकदार भेळ, लाल भडक कलिंगड, इडली चटणी, झणझणीत पावभाजी, लज्जतदार अप्पे, रसरशीत चायनीज भेळ, बटाटा चिप्स, चिंचा, बोरे ,चिक्की, स्टार फ्रुट, थंडगार सरबत अशा एक ना अनेक पदार्थांचे  स्टाल लावण्यात आले होते. . मुले वेगवेगळ्या ढंगात ओरडून आपल्या मालाची जाहिरात करत आपाआपल्या स्टॉलकडे लक्ष वेधून घेत होती . त्यांच्या आवाजाने व गिऱ्हाइक बनून आलेल्या रोहा न .प . च्या शाळा क्र १०,९ व १ च्या सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग, व्यवस्थापन समिती व पालकवर्ग यामुळे जणू शाळेच्या प्रांगणात खरोखरचा आठवडा बाजार भरल्याचे चित्र दिसत होते . शालेय मुलांना व्यवहार ज्ञान येणे . शाळेत शिकलेले हिशोब प्रत्यक्ष कृतीतून करता येणे . वजन मापांची ओळख होणे . पैशाचे व्यवहार अचूकपणे करता येणे . नफा - तोटा, खरेदी विक्री करता ग्राहक व विक्रेता यांच्यातील संभाषण कौशल्य आत्मसात करता येणे, मुलांची आकलन शक्ती वाढवणे, पैसे प्रत्यक्ष कमावण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते याचे प्रात्यक्षिक , प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देणे इत्यादी उद्देश लक्षात घेवून या बाजाराचे नियोजन करण्यात आल्याचे शिक्षिका सौ संध्या दिवकर यांनी सांगितले .

       शालेय व्यवस्थापन समिती शाळा क्र १०चे अध्यक्ष अमीत सावंत, उपाध्यक्ष संदीप शेवाळे, पल्लवी शेलार, प्राची खेरटकर, तृणाली पाटील,सौ वनिता धोत्रे,रुपाली म्हात्रे, ऋता पाटील, सीमा पाटील, पूनम देशमुख, उदय जोगडे, श्री व सौ भालवणे इत्यादीनी सहकार्य केले .

          पालक व शालेय विद्यार्थांचा, ग्रामस्थांचा ,शिक्षकांचा खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे प्रफुलित झाले होते .यावेळी पहिली ते सातवीचे पालक वर्ग व्यवस्थापन कमिटी शाळा क्रमांक 10 मंगलवाडी संकुलातील तिन्ही शाळेचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते . आपणही मोठया माणसांप्रमाणे कमाई करू शकलो अशा समाधानाचे तेज  आपले स्वमत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसले .

Comments

Popular posts from this blog