किशोर मालुसरे आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित तळा- कृष्णा भोसले तळा तालुक्यातील सोनसडे सजाचे तलाठी किशोर मालुसरे यांच्या कामाची दखल घेत माणगाव तालुका पत्रकार संघाचेवतीने कुणबी भवन माणगाव येथे दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सन्मानपुर्वक गौरविण्यात आले. माणगाव तालुका पत्रकार संघाचे वतीने पालकमंत्री अदिती तटकरे,आमदार भरतशेठ गोगावले यांचे हस्ते मानपत्र,शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर सभापती अलका जाधव, संजय ढवळे भाजपा तालुकाध्यक्ष माणगाव, राजीव साबळे अध्यक्ष माणगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव, आनंदशेठ यादव माजी नगराध्यक्ष माणगाव, सुभाष केकाणे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दिलदार पुरकर संपादक दैनिक रायगडचा आवाज,बाबुशेठ खानविलकर अध्यक्ष महाड मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस, सचिन बोंबले उपनगराध्यक्ष ,रचना थोरे सदस्या पं.स.अलिबाग, रामभाऊ टेंबे जेष्ठ नेते कुणबी समाज,योगीता चव्हाण माजी नगराध्यक्ष माणगाव,दिपकशेठ जाधव प्रदेश युवक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस,विजयशेठ मेथा उद्योजक, सुभाषशेठ दळवी मराठी उद्योजक, दिनेश रातवडकर , राजेश मेथा नगरसेव
Posts
Showing posts from February, 2022
- Get link
- Other Apps
तळा कॉलेजमध्ये मोफत कॅन्सर जनजागृती व तपासणी शिबीर संपन्न तळा : किशोर पितळे तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा आणि इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तहसील कार्यालय तळा, तळा नगरपंचायत, तालुका आरोग्य कार्यालय व डॉक्टर्स असोसिएशन तळा यांचे सहकार्याने शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी व रविवार दिनांक २७ फेब्रुवारी,२०२२ सकाळी ८ ते सांयकाळी ५ या वेळेत द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा येथे मोफत कॅन्सर जनजागृती व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्धघाटन प्रसंगी, तहसीलदार श्री अण्णाप्पा कनशेट्टी, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री मंगेश देशमुख, चित्राताई साळसकर, द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉ.श्रीनिवास वेदक गो.म.वेदक विद्यालयाचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री. किरणशेठ देशमुख,तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ अस्मिता भोरावकर,सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व शिक्षण सभापती सौ. अर्चना तांबे,डॉ. कुरुक्कर,श्री. खातू, शिर्के गुरुजी, श्
- Get link
- Other Apps
हिंदू संस्कृतीतील 'महाशिवरात्र' व्रताचे महत्त्व कोलाड -श्याम लोखंडे शिव ही सहज प्रसन्न होणारी देवता असल्यामुळे शिवाचे भक्त पृथ्वीतलावर मोठ्या प्रमाणात आहेत. महाशिवरात्र हे शिवाचे व्रत असून या व्रताचे महत्त्व, व्रत करण्याची पद्धत आणि महाशिवरात्र व्रताचा विधी यांविषयीची शास्त्रीय माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया. १. तिथी - महाशिवरात्र हे व्रत माघ वद्य चतुर्दशी या तिथीला करतात. २. देवता - महाशिवरात्र हे शिवाचे व्रत आहे. ३. महत्त्व: महाशिवरात्र या दिवशी शिवतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. शिवतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी महाशिवरात्रीला शिवाची भावपूर्णरित्या पूजाअर्चा करण्यासह ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. ४. प्रकार : काम्य आणि नैमित्तिक. ५. महाशिवरात्र व्रत करण्याची पद्धत : उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. ६. महाशिवरात्र व्रताचा विधी : माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान कराव
- Get link
- Other Apps
संध्या विजय दिवकर यांची कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा शाखेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड रोहा-सचिन साळुंखे कोमसापच्या अध्यक्षपदी संध्या विजय दिवकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा शाखेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नविन अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. सुखद राणे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर, रिक्त पदासाठी निवड करण्यात आली, संध्या विजय दिवकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच कार्याध्यक्षपदी आरती धारप यांची निवड झाली. संध्या दिवकर ह्या रोहा नगरपरिषदेच्या आदर्श प्राथमिक शिक्षिका, प्राथमिक शिक्षक पतपेढी रोहा शाखेच्या मा.चेअरमन व विद्यमान संचालिका असून उत्कृष्ट सुत्रसंचालिका,गजलकारा, आगरी कवयित्री म्हणून नावारुपास आलेल्या आहेत. कविता, गझलच्या माध्यमातून आपल्याला कार्याचा ठसा उमटवला आहे. रोहा येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सभेच्या अध्यक्षस्थानी सुखद दादा राणे, हणमंत शिंदे,आरती धारप,संध्या दिवकर,आचला धारप,साधना जोशी,मानसी चाफेकर, ज्योती शिंदे, पत्रकार सचिन साळूख
- Get link
- Other Apps
महाशिवरात्री निमित्ताने दुरटोली येथे शाहिरी पोवाड्याचे आयोजन रोहा-शरद जाधव रोहा तालुक्यातील दुरटोली येथे स्वयंभू मंदीरांमध्ये दिनांक १ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर सांस्कृतिक अशा शाहिरी पोवड्या चे आयोजन करण्यात आले आहे. पेण येथील नव्या दमाचे शाहिर वैभव घरत आपल्या शाहिरीच्या माध्यमातून छत्रपती शिवराय यांचा जीवनपट उलगडणार आहेत. त्यामुळे या देखण्या कार्यक्रमाचे वेध दूरटोली पंचक्रोशी व शिवभक्तांना लागले आहेत. 1 मार्च रोजी रात्री 9 ते 11 या दरम्यान कार्यक्रम होईल. सदर कार्यक्रमाचे आयोजन दुरटोली पंचक्रोशी व येथील सामाजिक व राजकिय कार्यकर्ते, कमेटी उपाध्यक्ष दशरथ साळवी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे दुरटोलीचे हे शंकर मंदीर स्वयंभू मंदीर आहे.सुतारवाडी विभागाचे, पंचक्रोशीचे श्रद्धा स्थान आहे. या मंदीराला खासदार सुनिल तटकरे साहेब यांनी भरघोस निधी प्राप्त करुन दिला आहे. मंदीर दिमाखात उभे झाले आहे. आपल्या गावचे मंदीर असल्याने आमदार अनिकेत तटकरे यांनी मंदीर उभारणीत जातीने लक्ष घालीत आहेत.मंदि
- Get link
- Other Apps
अभंग सेवा मंडळातर्फे स्नेहमेळावा उत्साहात संपन्न रोहा -निखिल दाते गेली 30 वर्ष रोहे शहर व परिसरामध्ये सेवाभाव जपणारी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या अभंग सेवा मंडळातर्फे रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील कलाकारांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला . या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रातील सुमारे 25 कलाकारांनी आपली कला सादर करून उत्तम सांस्कृतिक कलागुणदर्शन व प्रबोधन केले . विविध क्षेत्रातील जाणकारांची मनोगते ,बहारदार न्रुत्य ,प्रकाश कुंटे यांनी सादर केलेल्या नकला,वाद्य वादन ,काव्य सादरीकरण ,एकपात्री अभिनय यासारख्या विविध कलागुणदर्शनांमुळे ही संध्याकाळ उत्तरोत्तर रंगत गेली . आकाशवाणीचे ज्येष्ठ निवेदक किशोर सोमण ,रोह्यातील ज्येष्ठ विधीज्ञ प्राची भिडे यांनी या विविध कलागुणदर्शनाचे परीक्षण केले ,यामध्ये विनय गोगटे यांच्या सादरीकरणाला प्रथम ,निखिल दाते यांच्या सादरीकरणाला द्वितीय तर कु.शमिका रत्नपारखी हिच्या सादरीकरणाला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी अभंग सेवा मंडळातर्फे क
- Get link
- Other Apps
"महाराष्ट्राच्या परंपरेला शोभेल असे मत मांडा,चुकीच्या विधानांनी राजकारणाचा दर्जा ढासळता कामा नये" - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन रोहा येथे डॉ.सी.डी.देशमुख शहर सभागृहाचे भुमिपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न रोहा-सचिन साळूंखे भारताचे पहिले अर्थमंत्री,थोर अर्थतज्ज्ञ डॉ.सी.डी.देशमुख यांच्या जन्मभुमीत त्यांच्या नावाने साकारत असलेल्या शहर सभागृहाचे भुमिपुजन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रोहे नगरीत होते.त्यावेळी व्यासपिठावरुन बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना वरील वक्तव्य केले. रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ठिक १०-३० वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. कोकणचे विकासपुरुष खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती.अजितदादांच्या स्वागतासाठी रोहे नगरी सज्ज झालेली दिसत होती.कार्यकर्त्यांनी जागोजागी लावलेल्या कमानी,फ्लेक्स बॕनर लक्ष वेधून घेत होत्या.सुतारवाडी पासून रोह्यापर्यंत राष्ट्रवादी कार्यकर्ते अजितदादांच्या स्व
- Get link
- Other Apps
डॉ.सी.डी.देशमुख शहर सभागृह भुमिपुजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रोह्यात येणार नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ दादांची तोफ धडाडणार तटकरे कुटुंबीयांकडून जय्यत तयारी रोहा- प्रतिनिधी भारताचे पहिले अर्थमंत्री, थोर अर्थतज्ज्ञ डॉ.सी.डी.देशमुख यांच्या जन्मभुमीत त्यांच्या नावाने साकारत असलेल्या शहर समागृहाचे भुमिपुजन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रोहे नगरीत येत आहेत.रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०-३० वाजता हा कार्यक्रम संपन्न होत आहे. कोकणचे विकासपुरुष खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे कार्यक्रमाची जय्यत तयारी करीत आहेत. अजितदादांच्या स्वागतासाठी रोहे नगरी सज्ज झालेली दिसत आहे.कार्यकर्त्यांनी जागोजागी लावलेल्या कमानी,फ्लेक्स बॕनर लक्ष वेधून घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रोहा नगरपालिका व ग्रामीण भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे.आगामी नगरपालिका,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळणार याची कार्यकर्त्यांना खात्री आहे. भुमिपुजन कार्यक्रमानंतर रोहा नदी संवर्धन
- Get link
- Other Apps
मेढा येथे विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन खासदार सुनिल तटकरे साहेबांची प्रमुख उपस्थिती रोहा-शरद जाधव रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मेढा येथे खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री अदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा दिनांक २६ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.सदर सोहळ्याची जय्यत तयारी मेढा ग्राम पंचायत तसेच भिसे ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली असल्याची माहिती मेढा विभागाचे यूवा नेते मयुर खैरे यांनी दिली. सदर सोहळ्यास मधुकर पाटील,विनोद पाशिलकर, विजयराव मोरे,नंदकुमार म्हात्रे, लक्ष्मण महाले ,राजेश्री पोकळे, राजू पोकळे अनंता देशमुख, प्रितम पाटील ,प्रदीप देशमुख जयवंत मुंडे, संतोष भोईर, प्रसाद देशमुख, नवनीत डोलकर,गजानन खांडेकर, रघुनाथ करंजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मेढा विभाग हा स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे यांच्या पासुन तटकरे कुटूंबाचा बालेकिल्ला आहे.आज तटकरे घराण्याची चौथी पिढी अदितीताई,अनिकेतभाई हे राजकिय घराण्याचा वारसा समर्थपणे संभाळताना दिसत आहेत,या बालेकिल्ल्यात वाकेश्वर मंदीर लोक
- Get link
- Other Apps
पत्रकार विराज टिळक तळा शहरातील विविध समस्ये बाबत करणार उपोषण तळा:किशोर पितळे तळा शहरातील विविध समस्ये बाबत पत्रकार विराज टिळक यांनी प्रशासनाला उपोषणाचा ईशारा दिला आहे.तळा तालुका निर्मिती होऊन जवळपास २२ वर्षे उलटून गेली आहेत. परंतु तळा शहरातील नागरिकांना नेहमी भेडसावणाऱ्या समस्या कायम आहेत.शहरातील नागरिकांना दररोज वेळेवर पाणी न मिळता ते एक दिवसाआड रात्री अपरात्री मिळते.या कारणामुळे नोकरदार वर्ग तळा शहरात न राहता आजूबाजूच्या तालुक्यात राहणे पसंत करतात. यामुळे तळा शहरातील बाजारपेठेवर आर्थिक परिणाम होत आहे. व्यवसाय होत नसल्याने लहान व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत. कित्येकांचे व्यवसाय बंद झाले आहेत तर काही व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे बाजारपेठ देखील ओस पडत चालली आहे.यासाठी तळा शहराला मुबलक व दररोज वेळेवर पाणी मिळावे अन्यथा वार्षिक पाणी कर निम्मा करावा,गटारावर झाकणे टाकावीत जेणेकरून अपघात टळतील,नाना नानी पार्क ची दुरुस्ती करण्यात यावी,शहराचे सुशोभीकरण करण्यात यावे,मोकाट गुरांसाठी कोंडवाडा करावा जेणेकरून अपघात टळतील,डम्पिंग ग्राऊंड ची व्यवस्था करणे,पाण्याच्या व्हॉल्वच्या ठिकाण
- Get link
- Other Apps
पोलीस मिनीबसचा गंभीर अपघात खांब कोलाड मार्गावर घडली घटना ,चार कर्मचारी जखमी, टपरी धारकाचे मोठे नुकसान कोलाड-श्याम लोखंडे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील नागोठणे कोलाड मार्गावरील खांब नजीक पुगाव गावाजवळ स्टॉपवर असणाऱ्या रुपेश अधिकारी यांच्या चहाच्या टपरीत गाडी घुसून हा अपघात घडला आहे. यातील प्रवास करणारे चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून मिनीबस सह टपरीचे अतोनात नुकसान झाले आहे . या बाबत सविस्तर माहिती खांब कडून कोलाड कडे जाणारी पोलीस मिनीबस गाडी क्र. एम. एच.०६ के ९९३० ही शुक्रवारी 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता सदरच्या मार्गावरून प्रवास करीत असता यावरील वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे. सदर घडलेल्या अपघात घटनेत चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर कोलाड आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ताबडतोब उपचारासाठी हलविण्यात आले. जखमीचे नाव- 1) पोहवा /91 चव्हाण किरकोळ 2)पोशी /825 बोरकर किरकोळ 3) पोशी 859 पांचाळ किरकोळ 4) पोशी/992पोशी पांचाळ किरकोळ 5)पोशी /8486 दळवे मुकामार ) पोशी /1426 धुळगडे मुकामार 7)पोशी /986 चव्हाण मुकामार 8)पोशी
- Get link
- Other Apps
रोहा डोलवहाळ येथे आधार ग्राम संघाची स्थापना विविध योजनेचा लाभ मिळणार कोलाड - श्याम लोखंडे रोहा तालुक्यातील ऐनवहाल ग्राम पंचायत हद्दितील डोलवहाळ येथे ' उमेद 'महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान ग्राम संघाच्या वतीने 20 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत येथील बचत गटातील महिलांना उमेद अंतर्गत आधार ग्रामसंघाला वर्धा येथून आलेल्या वर्धिनींकडून प्रशिक्षण देत या ठिकाणी आधार ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता येथील बचत गटांना विविध योजनेचा लाभ घेता येईल . उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती संघ अभियान अंतर्गत तालुक्यातील ऐनवहाल ग्राम पंचायतील मौजे डोलवहाळ येथे आधार ग्राम संघाची स्थापन करण्यात आली तसेच त्यांच्या समित्या यावेळी नेमण्यात आल्या.20 ते 23 फेब्रुवारी 2022 रोजी वर्धा येथून आलेल्या ग्राम संघाच्या वरिष्ठ वर्धिनी जयश्रीताई ठोबंरे सविताताई नेहारे,संध्याताई विरखडे,यांनी येथील उपस्थित व प्रशिक्षणार्थी बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण दिले. यावेळी आधार ग्राम संघाची स्थापना त्या अंतर्गत त्यांच्या दहा बचत गटांच्या समित्या यावेळी तयार करून सदरच्या महिलांना ग्राम
- Get link
- Other Apps
ग्रुप ग्रामपंचायत मेढा उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र जाधव बिनविरोध कोलाड - श्याम लोखंडे रोहा तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत मेढा या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच स्नेहा महेंद्र खैरे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली. यामध्ये उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रविंद्र एकनाथ जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर रविंद्र एकनाथ जाधव यांचा अर्ज वैध ठरवून त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक अधिकारी तथा सरपंच स्नेहा खैरे यांनी केली. या झालेल्या निवडणुक प्रक्रियेत सरपंच स्नेहा खैरे मावळते उपसरपंच उदय मोरे, सदस्या नम्रता सुतार, नम्रता महाले, श्रेजल उंबरे, ज्ञानेश्वरी गोवर्धने, समिक्षा जवके शेवंती शिद यांनी सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली. मावळते उपसरपंच उदय मोरे यांनी आपला उपसरपंच पदाचा कार्यकाळ पुर्ण केल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने सदर उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली. उपसरपंचपदी रविंद्र जाधव यांची निवड झाल्यानंतर सरपंच स्नेहा खैरे, मावळते
- Get link
- Other Apps
तळा तहसिल कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती शिबिर तळा-कृष्णा भोसले आपत्ती व्यवस्थापन जनजागृती करणेसाठी मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशाने जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रम राबवित येतआहे.त्याचाच भाग म्हणुन तळा तहसिल कार्यालयात व प्रांगणात या शिबिराचे आयोजन २३ व २४ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आले होते. या शिबिराला तळा तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी, नायब तहसिलदार स्मिता जाधव, महसुल नायब तहसिलदार सुरेखा घुगे, सर्व कर्मचारी,मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबीरात अनेक प्रात्यक्षिक शशिकांत शिरसाठ सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षक उरण यांनी दाखविली. सदरच्या शिबिरात प्रथमोपचार ,पुर, व दरडी कोसळणे,अग्नी, विमोचन,इत्यादी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.ही प्रात्यक्षिके पाहील्यानंतर यांचा अशा प्रसंगात नक्कीच फायदा होणार आहे.
- Get link
- Other Apps
सप्तसुत्री कार्यक्रमांतर्गत आदिवासी बांधवांना दाखले वाटप संपन्न तळा तालुक्यात कातकरी उत्थान अभियानांतर्गत महागाव आदिवासीवाडीत प्रभावी अमंलबजावणी तळा- कृष्णा भोसले तळा तालुक्यातील महागाव आदिवासीवाडीवर सप्तसुत्री कार्यक्रमांतर्गत कातकरी उत्थान अभियानाची प्रभावी अमंलबजावणी निमित्ताने रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर यांचे आदेशाने व तळा तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी यांचे मार्गदर्शनाखाली दाखले वाटप करण्यात आले. स्वातत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या तालुक्यातील आदिवासी बांधवांना दाखले वाटप करताना महागाव आदिवासीवाडी येथे जातीचे दाखले -१५०, सातबारा उतारा १७५,उत्पन्नाचे दाखले त्याचबरोबर शिधापत्रिका यांचे वाटप करण्यात आले. यावेळी महसुल सहाय्यक विश्वास पाटील यांनी आदिवासी बांधवांना, महसुल,कृषी योजना, याविषयी विस्तृत माहिती दिली.सर्वहरा जनआदोंलनाचे ज.वि.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.उपस्थितांना महागाव तलाठी बी.जी.बासांबेकर यांनी मार्गदर्शन केले.गावचे पोलीस पाटील कमलाकर मांगले,निवृत्त शिक्षक अनंत वारे आदी मान्यवर यावेळी उपस्थ
- Get link
- Other Apps
शिवजयंती निमित्त ढोल-ताशांच्या गजरात धाटावमधे भव्य मिरवणूक " छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बाणेदारपणा आजच्या राजकारण्यांत नाही"- इतिहास संशोधक प्रा.विक्रम कदम धाटाव-शशिकांत मोरे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा शौर्य व धैर्याचा होता.त्यांचा अंधश्रद्धा,अनिष्ट प्रथा परंपरा रुढी यावर बिलकुल विश्वास नव्हता.शिवरायांनी राज्य केले ते रयतेसाठी.,स्वत:चा कधी विचारही केला नाही.म्हणून तर शिवरायांवर जीव ओवाळून टाकण्यासाठी विविध धर्म व जातीपातीचे मावळे प्राण तळहातावर घेऊन तयार असत.लढाया या मनगटावर नव्हे तर बुद्धी कौशल्यावर जिंकायच्या असतात हे तत्व व्यवहारात व खासगी जीवनात तंतोतंत लागू पडते निष्ठा आणि जबाबदारी यांची खरी जाणीव ही शिवचरित्राचा अभ्यास केल्यावर होते.आज जगातील अनेक देशांची शासन प्रणाली ही शिवचरित्रावर आधारित चालली असल्याचे पदोपदी दिसत आहे.आजच्या राजकीय परिस्थितीत सर्वत्र बजबजपुरी माजली आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी सदाचाराची सारी तत्वे बाजूला ठेवली जात आहेत.राजकारण हा सेवा नव्हे तर धंदा झाला आहे.राजकारणाला भ्रष्टाचार व घराणेशाहीची किड लागलेली दिसत आहे.त्यामुळे छत्रपती शिवा
- Get link
- Other Apps
खांब-चिल्हे-देवकान्हे विभागात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा कोलाड- श्याम लोखंडे रोहा तालुक्यातील खांब चिल्हे देवकान्हे विभागात मौजे खांब, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे, बाहे, देवकान्हेसह विभागात अनेक ठिकाणी बहुजन प्रतिपालक ,कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. अखिल मानव जातीचे उद्गाते,सर्व धर्म समभाव ,समतेचे प्रतीक म्हणून लौकिक मिळवलेल्या एकमेवाद्वितीय छ. शिवरायांची शिवजयंती भारतवासियांचा राष्ट्रीय उत्सव आहे. या उत्सवाचे औचित्य साधून स्वा.सु.नि.अलीबागकर महाराज,गोपालबाबा वाजे,धोंडू बाबा कोल्हटकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खांब पंचक्रोशीतील मौजे चिल्हे येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा ३९२ वे जन्मोत्सव सोहळा शनिवार दि.१९/२/२०२२ रोजी खांब देवकान्हे विभागात राजे शिवरायांची जयंती विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात आली, ज्ञानांकुर इंग्लिश मिडियम स्कूल खांब,राजिप शाळा खांब,नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा. ग .पोटफोडे मास्तर विद्यालय व कै. द. ग. तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब,राजिप शाळा नडवली,राजिप शाळा
- Get link
- Other Apps
" धामणसई पंचक्रोशीत विकासकामांना गती मिळणार"- आमदार अनिकेतभाई तटकरे रोहा-शरद जाधव रोहा तालुक्यातील धामणसई पंचक्रोशीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळणार असल्याचे वक्तव्य कोकणचे आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी केले. मालसई ग्रामपंचायत हद्दीतील मुठवली खुर्द येथील स्मशानभुमी व निवारा शेड तसेच मालसई येथील साकव, सांगडे बौद्ध विहार शेड ,अशा विविध विकास कामांच्या उद्नघाटन प्रसंगी ते बोलत होते. या भागाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे, आजही हा वारसा समर्थपणे सांभाळला जात आहे. रोहा शहराला लागुन गावे असुनही पाहिजे तेवढा विकास झाला नाही. पेण मतदार संघाला ही गावे जोडल्यामुळे विकास काय असतो? हे येथील लोकांना माहितच नाही.झाले ते गेले आज येथील तरुणाई माझ्यावर जीवापाड प्रेम करते आहे.त्याच पध्दतीत त्यांचीही मने जपून त्यांना प्रेम देणार आहे.भविष्यात विकासाच्या बाबतीत या भागाला मागे वळून पहायची वेळ येणार नाही,असा ठाम विश्वास अनिकेतभाई तटकरे यांनी व्यक्त केला. यावेळी तालुकाध्यक्ष
- Get link
- Other Apps
तळा शहरात असंख्य रंगीत खड्यांनी साकारली शिवरायांची भव्य प्रतिमा तळा- कृष्णा भोसले तळा शहरात शिवजयंती निमित्त गोपीनाथ महादेव वेदक महाविद्यालयाच्या पटांगणावर छत्रपती शिवाजी महाराजांची ३० फूट अशी भव्य प्रतिमा साकारण्यात आली.ही कलाकृती साकारण्यासाठी दोन ब्रास खडी,चुना यांसह विविध रंगांचा वापर करण्यात आला आहे.महाविद्यालयाचे कला शिक्षक विनोद कोळवणकर व सुहास वावेकर यांच्या संकल्पनेतून त्यांचे विद्यार्थी आकाश शिंदे, कैलास सातांबेकर,ओमकार कजबजे,योगेश सुतार, अजिंक्य मुळे, कौस्तुभ मेकडे,राज शिंदे यांनी ही प्रतिमा साकारण्यासाठी गेली तीन दिवस विशेष मेहनत घेतली. यावेळी उपस्थित आ. अनिकेत तटकरे यांनी सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष कौतुक केले तसेच आजच्या तरुण पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे विचार व त्यांचा जाज्वल्य इतिहास किती खोलवर रुजलेला आहे याची प्रचिती या प्रतिमेकडे पाहून समजते असे मत व्यक्त केले.
- Get link
- Other Apps
रोहा तालुका चर्मकार समाजाच्या वतीने जामगाव येथे संत रोहिदास जयंती साजरी संत विचारांच्या उजळणीने समाजबांधव झाले मंत्रमुग्ध रोहा- प्रतिनिधी रोहा तालुका चर्मकार समाजाच्या वतीने जामगाव येथे संत रोहिदास जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात संत रोहिदासांच्या मौलिक विचारांची उजळणी करण्यात आली. यंदा छोटेखानी स्वरूपात आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संतवाणीच्या उजळणीने एक वेगळी ऊर्जा निर्मिती केली, तर संतांच्या मौलिक विचारांनी उपस्थित समाजबांधवांचे प्रबोधन झाले. रोहा तालुका चर्मकार संघटना व संत रोहिदास नगर जामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संत रोहिदास जयंतीउत्सवाचे छोटेखानी स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर चर्मकार समाजाचे रोहा तालुकाध्यक्ष समीर नागोठकर, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत म्हशीलकर, सरचिटणीस गणेश चांदोरकर,जामगाव स्थानिक पंचायतीचे अनंत जांभळे, सहचिटणीस राजन बिरवाडकर, जगदीश नागोठकर, ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश पाबरेकर, उमेश चिपळूणकर, परेश सिलिमकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची प्रतिमापूजन व दिपप्रज
- Get link
- Other Apps
पालकमंत्री आदिती तटकरे यांची तळ्यातील द्रोणागिरी पर्वताला भेट कामांबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा तर खाबंवली-मालाठे ग्रामस्थांसमवेत संवाद तळा- कृष्णा भोसले तळा तालुक्यातील द्रोणागिरी पर्वत विकासासाठी राज्य सरकारने पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत १.५० कोटी रुपये मंजूर केले असुन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून या विकासकामांना गती मिळणार आहे.त्याअनुषगांने त्यांनी या भागातील ग्रामस्थांशी चर्चा करुन त्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला.अधिकारी वर्गाशी या कामाबाबत चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.ग्रामस्थांचेवतीने नरेंद्र लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी तळा उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपसभापती गणेश वाघमारे,जि.प.सदस्य बबन चाचले,निकिता गायकवाड सरपंच शेणवली, गोविंद हिरवे ग्रा.पं.सदस्य, नागेश लोखंडे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तळा तालुका, जगदीश शिंदे विभागीय अध्यक्ष मंगेश भगत, तन्वीर पल्लवकर, युवा कार्यकर्ते देविदास रामाणे, मालाठे ग्रामस्थ, मालाठे धनगरवाडी, खांबवली धनगरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
- Get link
- Other Apps
धाटावमध्ये शिवजयंती उत्सव सोहळ्याची जय्यत तयारी साताऱ्यातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक विक्रम कदम यांची तोफ धडाडणार शरद जाधव-कोलाड रोहा तालुक्यातील धाटावमध्ये शिवजयंती निमित्त सातारा येथील प्राध्यापक तथा सुप्रसिद्ध वक्ते,इतिहास अभ्यासक विक्रम कदम यांची तोफ धडधडणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवंत इतिहास ते आपल्या व्याख्यानात सादर करणार आहेत.शिवजयंती निमित्त नियोजन केलेल्या या भरगच्च कार्यक्रमात कदम यांच्या व्याख्यानाने हा परिसर दणाणुन जाणार आहे.कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आल्याने येथील वातावरण शिवमय झाले असून येणाऱ्या शिवभक्तांच्या स्वागतासाठी धाटाव मधील तरुण वर्ग सज्ज झाले आहेत. सालाबाद प्रमाणे यावर्षीही सोनारसिद्ध ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान शुक्रवार १८ रोजी गावातील युवक शिवज्योत आणण्यासाठी किल्ले रायगड कडे जाणार आहेत.तर शनिवारी १९ रोजी पहाटे ४:०० वा. एक धाव माझ्या राजासाठी या संकल्पनेवर किल्ले रायगड ते धाटाव असा शिवज्योत घेऊन प्रवास असणार आहे.त्यानंतर १० वाजता एम,आय.डी.सी,मोरे वसाहत व बारसोली ग्रामस्थांच
- Get link
- Other Apps
तळा नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या सभापतींची निवड जाहिर तळा-किशोर पितळे तळा नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या सभापतींची निवड नगरपंचायत कार्यालयात बुधवार दि.१६ रोजी जाहिर करण्यात आली. त्यामध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्षा सौ.अस्मिता चंद्रकांत भोरावकर, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व शिक्षण सभापतीपदी सौ.अर्चना विजय तांबे, महिला, बालकल्याण क्रिडा व सांस्कृतिक सभापतीपदी कुमारी यामिनी जनार्दन मेहत्तर, सार्वजनिक बांधकाम व दिवाबत्ती सभापतीपदी उपनगराध्यक्ष चंद्रकांत महादेव रोडे,पाणीपुरवठा व जलनि:सारण सभापतीपदी गटनेते मंगेश रामचंद्र शिगवण,पर्यटन विकास व नियोजन सभापतीपदी अविनाश रविंद्र पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्या त आली.तसेच स्विकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी कडून प्रकाश गायकवाड तर शिवसेनेकडून भास्कर गोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निवड झालेल्या सर्व सभापती व स्विकृत नगरसेवकांचे पिठासीन अधिकारी विठ्ठल इनामदार व दयानंद गोरे यांनी अभिनंदन केले. या प्रसंगी शिवसेना,भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
- Get link
- Other Apps
उभारे परिवारातील विवाह सोहळ्यास पालकमंत्री अदिती तटकरे यांची सदिच्छा भेट कोलाड-शरद जाधव इंदापुर येथील उभारे परिवारातील विवाह सोहळ्यास रायगड च्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांनी गांधी हॉल (माणगांव)येथे हजेरी लाऊन नव दांपत्यास शुभेच्छा दिल्या. रायगड पाटबंधारे विभाग कोलाड शाखा अभियंता राजेंद्र उभारे(रावसाहेब) यांचे सुपुत्र चिरंजीव प्रतिक याच्या विवाह सोहळ्यास पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी आवर्जून उपस्थिती लावली व चिरंजीव प्रतिक व चि. सौ.का. जागृती यांना पुढील वाटचाली च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांसमवेत दिपक जाधव ,राजेश मेहता ,उदय अधिकारी, संदेश मालोरे, काका नवगणे व इतर मान्यवर उपस्थित होते.तसेच पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी सहाय्यक श्वेता चिंचुळकर, कर्मचारी बांधव, सगे -सोयरे,आप्तईस्ट मंडळी विवाह सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी राजेंद्र उभारे परिवारातर्फे अदितीताई यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातुन वेळ काढून विवाह सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
- Get link
- Other Apps
" बेस्ट टिचर अवाॕर्ड " मिळाल्याबद्दल आदर्श शिक्षक सहदेव कापसे यांचा खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते सत्कार कोलाड-प्रतिनिधी वरसगांव ता.रोहा येथे आयोजित विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात खासदार श्री.सुनिल तटकरे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक श्री.सहदेव कापसे यांना सन्मानित करण्यात आले.रा.जि.प.केंद्रशाळा तिसे ता.रोहा येथे विषयशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री.सहदेव कापसे यांना,अविष्कार फौंडेशन सामाजिक व एज्युकेशनल संस्था कोल्हापूर यांच्यावतीने सन 2021 चा "बेस्ट टिचर अवार्ड" मिळाल्याबद्दल खासदारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर जि.प.सदस्य श्री.दयाराम पवार, रोहा पं.स.सदस्या सौ.सिद्धि राजिवले,पं.स.सदस्या सौ.सुनिता महाबळे, श्री.रामचंद्र चितळकर, गोवे सरपंच श्री.महेंद्र पोटफोडे,श्री.नरेंद्र जाधव- जि.प.गट अध्यक्ष,श्री.मनोज शिर्के- पं .स.गण अध्यक्ष, श्री.प्रकाश थिटे,श्री.नारायण धनवी,सौ.प्रितम पाटील-रोहा तालुका महिला अध्यक्ष,श्री.राम मरवडे तसेच पंचक्रोशीतील सर्व सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते. श्री.सहदेव कापसे सर म्हणजे,बत्तीस वर्षांची प्रदिर्घ यशस