डॉ.सी.डी.देशमुख शहर सभागृह भुमिपुजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रोह्यात येणार

नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ दादांची तोफ धडाडणार

तटकरे कुटुंबीयांकडून जय्यत तयारी 

रोहा- प्रतिनिधी 

भारताचे पहिले अर्थमंत्री, थोर अर्थतज्ज्ञ डॉ.सी.डी.देशमुख यांच्या जन्मभुमीत त्यांच्या नावाने साकारत असलेल्या शहर समागृहाचे भुमिपुजन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रोहे नगरीत येत आहेत.रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०-३० वाजता हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

कोकणचे विकासपुरुष खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे कार्यक्रमाची जय्यत तयारी करीत आहेत.

अजितदादांच्या स्वागतासाठी रोहे नगरी सज्ज झालेली दिसत आहे.कार्यकर्त्यांनी जागोजागी लावलेल्या कमानी,फ्लेक्स बॕनर लक्ष वेधून घेत आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रोहा नगरपालिका व ग्रामीण भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे.आगामी नगरपालिका,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळणार याची कार्यकर्त्यांना खात्री आहे.

भुमिपुजन कार्यक्रमानंतर रोहा नदी संवर्धन प्रकल्प पार्किंगमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस नेते नबाब मलिक यांना झालेली अटक व केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यात घातलेला धुमाकुळ या गोष्टींचा अजितदादा कसा समाचार घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog