"हरी उच्चाराने मोक्ष प्राप्त होतो"- ह.भ.प.अक्षय ओव्हाळ यांचे प्रतिपादन खारी/रोहा -केशव म्हस्के जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला निसर्ग सृष्टीच्या नियमानुसार एक दिवस त्या शिवाकडे जाणे आहेच परंतु जन्माला जीव हे सारे विसरून प्रपंचामध्ये एवढा गुंतला आहे की, प्रत्येकजण घरदार,पत्नी,पुत्र,धनसंपदा,आप्तस्वकीय नातेवाईक आदी संसारातील नाशिवंत गोष्टींना माझे माझे म्हणत असून हरी उच्चाराच्या नामस्मरणापासून वंचित राहू लागला आहे.खरे पाहता हरी उच्चाराने मोक्ष प्राप्त होतो कारण हरी हरी हरी मंत्र हा शिवाचा! म्हणती जे वाचा तया मोक्ष असे आरे बुद्रुक येथील वैकुंठवासी हभप. मंजुळा पांडुरंग पवार यांच्या अकराव्या अंतिम धार्मिक विधी निमित्ताने गुरूवार दिनांक.२७/एप्रिल रोजी कीर्तन सेवेप्रसंगी ह.भ.प.अक्षय महाराज ओव्हाळ(कोलाड - रोहा ) यांनी उपस्थितांना उदाहरणादाखल मौलिक मार्गदर्शन करताना सांगितले. तालुक्यातील आरे बुद्रुक येथील नित्यनेमाने आळंदी - पंढरपूर वारी करणाऱ्या वारकरी सांप्रदायिक वैकुंठवासी हभप.मंजुळा पांडुरंग पवार यांच्या अंतिम धार्मिक विधी अकराव्या प्रसंगी कुणबी समाज नेते सुरेश मगर,लोक शाहीर अन
Posts
Showing posts from April, 2023
- Get link
- Other Apps
मानसी चापेकर यांच्या कविता संग्रहाचा शानदार प्रकाशन सोहळा संपन्न रोहा-निखिल दाते रोहा येथील प्रतिभासंपन्न कवयित्री मानसी चेतन चापेकर ह्यांच्या 'हळुवार मनाची शाई' ह्या कवितासंग्रहाचे रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी डोंबिवली येथे वक्रतुंड हॉलमध्ये पुस्तक प्रकाशन झाले. सदर सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अशोक बागवे ,श्रीयुत प्रसाद कुलकर्णी हे उपस्थित होते तर प्रकाशक संजय शिंदे आणि कवी जनार्दन म्हात्रे ह्यांची सुद्धा सोहळ्याला उपस्थिती होती. अतिशय संवेदनशील आणि हळव्या मनाची असलेली ही कवयित्री निसर्ग प्रेम आणि अनेक नातेसंबंध यावरती उत्तम लिखाण करते मानसी चापेकर यांचा मला हेवा वाटतो असे गौरवोद्गार प्रा. अशोक बागवे यांनी सौ. मानसी चापेकर यांच्याबद्दल बोलतांना काढले. प्रसाद कुलकर्णी यांनी मानसी चापेकर हिला 'कस्तुरी मृग' असे म्हणून तिच्यापाशी उत्तम अभिव्यक्ती आहे तिने उत्तरोत्तर उत्तम लिखाण करावे व वाचन करावे असे सुचवले सोबत असलेले नातेवाईक स्नेही मित्र-मैत्रिणी यांची लाभलेली साथ आणि आशीर्वादाच्या रूपात सोबत असलेले तिची आई तिचा भाऊ आणि तिच्या
- Get link
- Other Apps
म्हसळा तालुक्यात 'रंग दे माझी शाळा" उपक्रमातून शाळांना मिळणार नवी झळाळी ● 'आम्ही गिरगांवकर टीम' आणि 'श्री रविप्रभा मित्र संस्था" रायगड यांचा संयुक्त उपक्रम ● जिल्हा परिषदेच्या दुरवस्था झालेल्या शाळांची केली पाहणी म्हसळा - प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर ' रंग दे माझी शाळा' हा सामाजिक उपक्रम घेऊन आम्ही गिरगावकर टीम आणि श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड संयुक्तपणे शनिवार, दि.22 एप्रिल 2023 रोजी आम्ही गिरगावकर टीमचे अध्यक्ष गौरव सागवेकर, सचिव मिलींद वेदपाठक, महिला सचिव शिल्पा नाईक यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळा इमारती व स्वच्छतागृहांची पाहणी केली. राज्यात अनेक जिल्ह्यातील तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची व स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली पहायला मिळत आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सोयीसुविधांबाबतीत विशेष लक्ष देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम कसे राहील यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
- Get link
- Other Apps
रायगड जिल्ह्यात सी-फोर्ट सर्किट टुरिझम करावे! किल्ले रायगडाचे संवर्धन शास्त्रोक्त पद्धतीनेच होणार! दुर्दैवाने सध्या द्वेषाचे राजकारण चाललंय ; हा महाराष्ट्राचा इतिहास नाही! छत्रपती संभाजीराजे यांचे रोह्यात प्रतिपादन रोहा प्रतिनिधी- अवघ्या जगामध्ये सागरी किल्ले केवळ महाराष्ट्रामध्ये आहेत, जलदुर्ग आणि गडदुर्गांनी रायगड जिल्हा समृद्ध आहे, या रायगड मध्ये सी-फोर्ट सर्किट टुरिझम करण्यात यावे, किल्ले रायगडाचे संवर्धन हे शास्त्रोक्त पद्धतीनेच केले जाईल, दुर्दैवाने आताचे राजकारण द्वेषापोटी चाललंय, मला राजकारणावर बोलायचे नाही परंतु हा आपला इतिहास नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास नाही असे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे यांनी रोहा येथे केले. ज्येष्ठ गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. रायगड जिल्ह्यातील ५९ किल्ल्यांची ओळख सांगणाऱ्या " इये देशीचे दुर्ग " या पुस्तकाचे प्रकाशन रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते झाले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. सुनिल तटकरे होते, याप्र
- Get link
- Other Apps
आरे बुद्रुक येथील मंजुळा पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन. खारी/ रोहा (केशव म्हस्के)२३एप्रिल:- रोहे तालुक्यातील मौजे आरे बुद्रुक येथील परोपकारी वृत्तीच्या मंजुळा पांडुरंग पवार यांचे सोमवार दि.१७/०४/२०२३ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मंजुळाबाई यांचे गावात सर्वांसोबत आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नातेसंबंध होते. गावातील ग्रामस्थांच्या सुख, दुःखाच्या आणि अन्य सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. त्यांना भजन,हरिपाठ, किर्तन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमाची प्रचंड आवड असे. त्यांच्या चांगल्या व्यक्तिमत्वामुळे अनेकांना मंजुळाबाई आपल्यास्या वाटायच्या.. त्यांच्या निधनाने पवार,भोईर,शेळके,भगत,लहाने परिवारासह संपूर्ण आरे बुद्रुक परिसरावर दुःखाचे सावट पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.. त्यांच्या पश्चात ३ मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्ययात्रेसाठी असंख्यांचा जनसागर लोटला होता. त्यांचे दशक्रिया विधी बुधवार ता.२६/०४/२०२३ रोजी राहत्या घरी होतील तर अंतिम धार्मिक विधी उत्तरकार्य अकरावे गुरूवार ता.२७/०४/२०२३ रोजी रा
- Get link
- Other Apps
ब्राह्मण मंडळ रोहाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाला उत्साहात सुरूवात रोहा प्रतिनिधी रोहे शहर व परिसरातील ब्राह्मण ज्ञातीबांधवांची संस्था असलेल्या ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे परशुराम जयंतीचे औचित्य साधून शनिवार दिनांक 22 एप्रिल रोजी रौप्यमहोत्सवी वर्षाला उत्साहात सुरुवात करण्यात झाली. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध व्याख्याते तसेच प्रवचनकार डॉ.नंदकुमार मराठे यांचे भगवान परशुराम व ब्राह्मण्य या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष शरद म्हसकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ब्राह्मण समाजातील ज्ञातीबांधवांनी या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे पुढील वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे ब्राह्मण मंडळ रोहाचे अध्यक्ष अमित आठवले व रौप्यमहोत्सवी समितीचे समन्वयक किशोर सोमण यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी ब्राह्मण मंडळाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या मंडळाच्या माजी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन मंडळाचे
- Get link
- Other Apps
खारघर येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात म्हसळा तालुक्यातील मृत्यू झालेल्या श्री सदस्यांची आमदार अदिती ताई तटकरे यांनी घेतली सांत्वन पर भेट खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार या कार्यक्रमात म्हसळा तालुक्यातील वारळ व मेंदडी या गावातील श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.उष्माघात व चेंगराचेंगरी मध्ये मृत्यू झाले. या दोन गावातील श्री सदस्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जनतेच्या हाकेला नेहमीच धावून जाणाऱ्या आमदार अदिती ताई तटकरे यांनी दोन्ही कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले व धीर दिला. खारघर येथील कार्यक्रमास आदिती ताई तटकरे उपस्थित होत्या. मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या आत्म्यास शांती लाभो
- Get link
- Other Apps
सर्व सामान्य घटकांना सोबत घेत समस्त कोकण विठ्ठल परिवार विश्र्वशांती अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न प्रतिनिधी:- केशव म्हस्के (रोहा) समाजातील सर्व घटकांचा समावेश करून विठ्ठल परिवार रोहा यांच्या वतीने तळाघर येथील स्वंयभू तथा जागृत देवस्थान असलेल्या महादेव मंदिर येथे विश्र्वशांती अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तीभावाने संपन्न करण्यात आला. सालाबाद प्रमाणे याहीवर्षी २०१९ पासून सुरू करण्यात आलेला हा विश्र्वशांती अखंड हरिनाम सप्ताह समाजातील सर्वच घटकांना समाविष्ट करून साजरा करण्यात येत आहे.रायगड भूषण बाळाराम महाराज शेळके व नारायण महाराज दहिंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आलेल्या या सप्ताहप्रसंगी हरिपाठाचे नेतृत्व राम महाराज सावंत यांनी केले.तर शब्दसाधक ह.भ.प.अनिल महाराज महाकले,जामखेड-अहमदनगर यांची सुश्राव्य किर्तनरूपी सेवा झाली.याप्रसंगी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस विजय मोरे,महिला अध्यक्षा प्रितम पाटील,निलेश वारंगे,दिनेश पाशिलकर,राम नाकती,नरेश पाटील,अमित घाग,संदेश मोरे,विष्णू लोखंडे,अमित मोहिते,सतिश भगत,संतोष माने,महेश ठाकूर,यशवंत रटाटे,नारायण ठाकूर,संजयकाका