आरे बुद्रुक येथील मंजुळा पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन.

खारी/ रोहा (केशव म्हस्के)२३एप्रिल:- 

              रोहे तालुक्यातील मौजे आरे बुद्रुक येथील परोपकारी वृत्तीच्या मंजुळा पांडुरंग पवार यांचे सोमवार दि.१७/०४/२०२३ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. 

       मंजुळाबाई यांचे गावात सर्वांसोबत आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नातेसंबंध होते. गावातील ग्रामस्थांच्या सुख, दुःखाच्या आणि अन्य सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. त्यांना भजन,हरिपाठ, किर्तन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमाची प्रचंड आवड असे. त्यांच्या चांगल्या व्यक्तिमत्वामुळे अनेकांना मंजुळाबाई आपल्यास्या वाटायच्या..

  त्यांच्या निधनाने पवार,भोईर,शेळके,भगत,लहाने परिवारासह संपूर्ण आरे बुद्रुक परिसरावर दुःखाचे सावट पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे..

       त्यांच्या पश्चात ३ मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्ययात्रेसाठी असंख्यांचा जनसागर लोटला होता.

  त्यांचे दशक्रिया विधी बुधवार ता.२६/०४/२०२३ रोजी राहत्या घरी होतील तर अंतिम धार्मिक विधी उत्तरकार्य अकरावे गुरूवार ता.२७/०४/२०२३ रोजी राहत्याघरी आरे बुद्रुक येथे होतील याप्रसंगी हभप.अक्षय महाराज ओव्हाळ (कोलाड ) यांची कीर्तन सेवा होईल असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले..

Comments

Popular posts from this blog