Posts

Showing posts from August, 2022
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलिसांचा रुट मार्च संपन्न  नागरिकांना सण-उत्सव शांततेत साजरे करता यावेत यासाठी पोलिस यंत्रणा दक्ष रोहा-प्रतिनिधी दिनांक 27/08/2022 रोजी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोणताहि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करिता रोहा पोलीस दक्ष झाले आहेत. रोहा पोलिस ठाण्याचे हद्दीत मॉबड्रिल, दंगा काबू योजना व रूट मार्च चे प्रत्यक्षित घेण्यात आले. सदर वेळेस रोहा उपविभागा मधून 2 पोलीस निरीक्षक, 4 पोलीस उपनिरीक्षक, 2 आरसीपी प्लाटून व रोहा विभागातून एकूण 30 पोलीस अंमलदार हजर होते. सदरची मॉबड्रिल दंगा काबू योजना व रूट मार्च दुपारी 2.30 वाजता सुरू करून सायंकाळी 3.45 वाजता पूर्ण करण्यात आले.
Image
ग्रुप ग्राम पंचायत शेडसई तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी  श्री.चंद्रकांत गायकर व उपाध्यक्षपदी श्री.ज्ञानेश्वर कोळी यांची निवड रोहा-प्रतिनिधी ग्रुप ग्रामपंचायत शेडसई येथे दिनांक 25/8/22 रोजी 3.30 वाजता ग्रामसभा घेण्यात आली.या ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.  ग्रामसभेमध्ये तंटामुक्त कमिटीची स्थापना करण्यात आली. शेडसई तंटामुक्त कमिटीच्या अध्यक्षपदी शेडसई गावचे श्री.चंद्रकांत महादेव गायकर यांची बिनविरोध सर्व सहमतीने निवड करण्यात आली. तसेच श्री.ज्ञानेश्वर धर्माजी कोळी यांची तंटामुक्ती उपाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली.  तंटामुक्त गाव कमिटी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाअध्यक्ष यांना शेडसई ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. प्राजक्ता प्रभाकर कडू, सदस्या सौ.राजेश्री राजन पाटील, सौ. कल्याणी कृष्णा मढवी तसेच ग्रामस्थ राजन पाटील, कृष्णा मढवी, दिपक कडू, गोरख कडू,  प्रभाकर कडू, ज्ञानेश्वर कडू, राकेश संगम, निलेश कडू यांनी पुष्पगुछ देऊन सन्मानित केले.त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Image
परोपकारी वृत्तीचे नामदेव धोंडू मगर यांचे निधन ओबीसी संघर्ष समन्वय समिती रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर यांना बंधू शोक खारी/ रोहा -केशव म्हस्के रोहे तालुक्यातील वाशी ग्राम पंचायतीचे माजी सरपंच,कुणबी समाज नेते तथा ओबीसी संघर्ष समन्वय समिती रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर यांचे जेष्ठ वडीलबंधू नामदेव धोंडू मगर यांचे शनिवार दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले..      वाशी गावचे शांत- संयमी मितभाषी प्रेमळ व दयाळू अंत:करणाचे प्रत्येकाला हवाहवासे वाटणारे मनमिळावू सुस्वभावाचे व्यक्तिमत्व होते.स्वर्गीय नामदेव धोंडू मगर यांनी आपल्या वडिलोपार्जित शेती व्यवसाय मोठ्या निष्ठेने सांभाळीत कुटुंबाचे चरितार्थ चालविण्याबरोबरच कुणबी समाजासाठी मोठे योगदान दिले. आपल्या गावामध्ये अध्यात्मिक,धार्मिक सामाजिक,शैक्षणिक,कला- क्रीडा,आदी क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान दिले.  त्यांच्या निधनाने वाशी गावासह संपूर्ण धाटाव - किल्ला पंचक्रोशीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या निधनाने समाजामध्ये पोकळी
Image
  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शंकरसुत यांच्या "मातृभूमी" प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन  रोहे-प्रतिनिधी  दापोडे, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कोकण प्रदेश अंतर्गत, राजापूर तालुका शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या " बालगुणगौरव महोत्सव २०२२ "  या कार्यक्रमात संदिप तोडकर उर्फ शंकरसूत कोकण प्रदेश कार्याध्यक्ष यांनी संकलित/संपादित केलेल्या १०५ देशभक्तीपर काव्यरचनांचा  " मातृभूमी " या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार डाॕ. अ. ना. रसनकुटे कोकण प्रदेश अध्यक्ष यांच्या शुभहस्ते करण्यात आले.         यावेळी शरद गोरे राष्ट्रीय अध्यक्ष, बाल गुणगौरव महोत्सवाच्या अध्यक्षा शुभांगी काळभोर राष्ट्रीय उपाध्यक्षा, डाॕ. अलका नाईक कोकण प्रदेश उपाध्यक्षा, सुरेश मेहता महाड तालुका अध्यक्ष व व्यासपीठावरील  अन्य मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला. या काव्यसंग्रहाला डाॕ. अ. ना. रसनकुटे यांची दर्जेदार प्रस्तावना लाभली आहे.         सदरहू काव्यसंग्रहाच्या निर्मित
Image
श्रीवर्धन मतदार संघामुळे मी खासदार आणि अदिती आमदार -खा.सुनिल तटकरे जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनता दरबार सुरू ठेवणार-आ.अदिती तटकरे तळा,म्हसळा,श्रीवर्धन तालुका मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा उत्साहात संपन्न तळा -संजय रिकामे श्रीवर्धन मतदार संघामुळे मी खासदार आणि अदिती आमदार झाली असल्याचे प्रतिपादन खा.सुनील तटकरे यांनी साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे पार पडलेल्या तळा, म्हसळा, श्रीवर्धन तालुका मुंबई कार्यकर्ता मेळाव्यात केले या मेळाव्यासाठी श्रीवर्धन मतदार संघाच्या आ.अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे,राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई प्रदेश उपाध्यक्ष दाजी विचारे,प्रदेश सरचिटणीस अली कौचाली, रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील,नझिम हसवारे,अॅड. उत्तम जाधव,हिराचंद तांबे या प्रमुख मान्यवरांसह पक्षाचे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, तालुका अध्यक्ष, सचिव, विविध सेल अध्यक्ष,ग्रामीण व मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.                     श्रीवर्धन मतदार संघातील तळा, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस
Image
"सोनगांव विभाग कुणबी समाज संघटनेत क्रांती घडविण्याची ताकद"-श्री.शंकरराव म्हसकर मालसई येथे सोनगांव विभाग कुणबी समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न   रोहा-प्रतिनिधी " ज्या वेळी सोनगांव विभागातील कुणबी समाज संघटित होऊन एखादे कार्य हाती घेतो त्यावेळी सामाजिक क्रांती निश्चितच घडते हा इतिहास आहे," असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा कुणबी उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हसकर यांनी केले. मालसई येथे सोनगांव सलग्न ग्रुप कुणबी समाज  आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.कुणबी समाजाने एकत्र येऊन काम केले पाहिजे व संघटना बळकट केली पाहिजे यासाठी तरुणांनी अधिक योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी युवकांना केले.जातीच्या दाखल्यासाठीचा लढा व संघर्ष सुरुच ठेवण्याचे सुचोवात त्यांनी केले. रोहा तालुका कुणबी समाजाचे अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे यांनी समाजाचा असणाऱ्या समस्या आम्ही वारंवार मंत्रिमंडळापर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले. दहावी व बारावीचा मुलांनी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहोचले पाहिजे व आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे.त्यासाठ
Image
रोह्यात स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या शोकसभेचे आयोजन रायगड जिल्ह्यातील असंख्य चाहत्यांची उपस्थिती  अनेकांना अश्रू अनावर रोहा-प्रतिनिधी         बहुजन समाज यांसह अखंड मराठा समाजाच्या हितासाठी अविरत झटणारे, सकल मराठा आरक्षणाचे खंदे पुरस्कर्ते, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे रविवारी १४ ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले.त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रोह्यात सकल मराठा रोहा तालुका यांच्या वतीने रविवार दिनांक २१ आॕगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जेष्ठ नागरिक सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.समुद्रामधे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक व्हावे ही भावना जोपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झटणारा लोकनेता हरवल्याने आयोजित शोकसभेत असंख्य चाहत्यांना मात्र अश्रू अनावर झाल्याचे पहावयास मिळाले.         सुरुवातीला रोहा तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप(आप्पा) देशमुख यांनी स्व.मेटे साहेबांच्या संपर्कात आल्यानंतरच्या आठवणींनी जाग्या केल्या.शिवसग्रामचे जिल्ह्याध्यक्ष अविनाश सावंत यांनी समाजाचे आरक्षण व शिवाजी महाराजांचे शिवस्मारकाचे मेटे साहेबांचे स्वप्न आपण साकार करूया असे सांगित
Image
  रोटरी क्लब रोह्याला फुलांचे शहर बनविणार रोटरीच्या उपक्रमाला आमदार अनिकेतभाई तटकरेंची कौतुकाची थाप रोहा -प्रतिनिधी अजान वृक्षाचे रोप रोह्याच्या श्री धावीर देवस्थान परिसरात लावून या स्थानाची अध्यात्मिक उंची इतकी वाढली आहे की इंद्रायणी नदी अथवा चंद्रभागेच्या प्रवाहात स्नान करून श्री ज्ञानेश्वर माऊली व श्री पंढरीरायाचे दर्शन घेतल्यानंतर जे पुण्य लाभते तेच पुण्य श्री धावीर मंदिरात ध्यान धारणेसाठी येऊन इथल्या अजान वृक्षाचे सान्निध्यात बसून मिळेल. अध्यात्मिक व शास्त्रीय महत्त्व असलेल्या या वृक्षाची जोपासना रोहेकर नक्कीच करतील व दर स्वातंत्र्यदिनाला आज लावलेल्या झाडांचे वाढदिवस साजरा करू असा विश्वास आमदार अनिकेत तटकरे यांनी रोहा येथे व्यक्त केला. रोटरी क्लब रोहा च्या वतीने ७५० रंगीबेरंगी फुलांची झाडे लावून रोहा शहराला फुलांचे शहर करण्याच्या उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केले. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते श्री धावीर मंदिर परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला, त्याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ
Image
अंशुल कंपनीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा रोहा-प्रतिनिधी  भारतीय स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२२ रोजी  ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अंशुल स्पेशाल्टि मोलेक्युक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने उपाध्यक्ष लक्ष्मण शिट्यालकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आले.      भारतीय अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये हातभार लावण्यात अग्रगण्य असणाऱ्या धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अंशुल स्पेशाल्टि मोलेक्युक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये देशप्रेम,देशभक्ती,राष्ट्रभक्ती,जागृत व्हावी या उद्देशाने देशभक्तीपर गीते व भाषणे सादर करून विविध कार्यक्रम राबविण्यात आले.      यावेळी वरिष्ठ सी. ई.ओ.शिरीष सातपुते यांच्या मार्गदर्शनाने वरिष्ठ उपाध्यक्ष एम.मुर्तुझा,उपाध्यक्ष लक्ष्मण
Image
  वाली ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने कर्तृत्ववान नागरिकांचा सन्मान माजी पालकमंत्री आमदार आदितीताई तटकरे यांची उपस्थिती   रोहा-प्रतिनिधी दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत वाली यांच्या वतीने विशेष नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. वाली ग्रामपंचायतीच्यावतीने पोलीस, डॉक्टर,शेतकरी, व्यवसायिक, शिक्षक, पत्रकार, वकील, निवृत्त सरकारी कर्मचारी, विद्यार्थी, सरपंच, समाजसेवक, वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व अशा समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे आदर्श गाव,कला, संस्कृती,व्यसनमुक्ती गाव अशा विविध प्रकारचे पुरस्कारांचे देखील वितरण माजी पालकमंत्री आमदार आदितीताई तटकरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत वाली अंतर्गत सर्व गावांतील नागरिकांनी,विशेषतः महिलांनी वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा केली होती. तसेच विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. माजी पालकमंत्री आमदार आदितीताई तटकरे यांनी वाली ग्रामपंचायतीकडून आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले.  डॉक्टर-वकील यांसारखे आपल्या भा
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने रोहा लायन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम   रोहा लायन्स क्लब च्या रक्तदान शिबिरात ५० पिशव्या रक्त संकलित  रोहा-प्रतिनिधी     स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त लायन्स क्लब रोहा च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५० पिशव्या रक्त संकलित झाले. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या शिबिराला तहसीलदार कविता जाधव, नायब तहसीलदार राजेश थोरे, पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती पाटील, नगरसेवक महेंद्र गुजर, शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे, संदीप सरफळे, महेश सरदार, रोटरी क्लबचे सुरेंद्र निंबाळकर, स्वप्नील धनावडे, सतीश महाडिक, विक्रम जैन, सृष्टी फाऊंडेशन चे सुखद राणे, समीधा अष्टीवकर आदींनी सदिच्छा भेट दिली. हे शिबिर यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी  जयदेव पवार व भावेश दामाणी यांच्या नेतृत्वाखाली झोन चेअरपर्सन नुरूद्दीन रोहावाला, अध्यक्ष अब्बास रोहावाला, उपाध्यक्ष सौ सुश्मिता शिट्याळकर, भाऊसाहेब माने, सेक्रेटरी डाॅ कृष्णा जरग, खजिनदार पराग फुकणे, संचालक प्रमोद जैन, सैफी रोहावाला, डाॅ तुषार राजपूत, अलेफिया रोहावाला, माया शहा, अनघा माने, जुमाना रोहावाला,
Image
कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेची मासिक सभा व कविसंमेलन उत्साहात संपन्न रोहा-प्रतिनिधी को.म.सा.प शाखा रोहाची मासिक सभा दि. ७ ऑगस्ट २०२२ रोजी श्रीयोग निवास येथे  कोमसाप रोह्याच्या शाखाध्यक्षा सौ. संध्या विजय दिवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी उपस्थित कवींनी उत्फुर्तपणे आपल्या काव्यरचना प्रस्तुत केल्या. "थेंब टपोरे डूल डोलती हलती कानात ...लवलवणाऱ्या हरित तृणांचे कंकण हातात .... टपटपणाऱ्या पागोळ्यांचा नाद करी पैंजण .....सजून आली भुरभुरणारी अल्लड श्रावणसर"  या ओळी आहेत सौ . संध्या दिवकर यांच्या  मासिक सभेनंतर "आला श्रावण श्रावण" या विषयावर आधारीत कविसंमेलनात कवी हनुमंत शिंदे म्हणतात . "रित्या ओंजळी केल्या पुरत्या रानात पावसाने ...अंकुरलेले शिवार माझे हिरवळीच्या रफाराने"  तर कवी नारायण पानवकर सरांनी अतिशय गोड आवाजात गेय कविता  "रातवा झुलू लागला" स्वरबध्द करून सर्वांना मंत्रमुग्ध केले . पाऊस कसा असतो, हे आपल्या कवितेतून आरती धारप यांनी सांगितले .  "रिम झिम रिमझिम बरसत बरसत पाऊस पाऊसधारा" अतिशय सुंदर कविता श्री.अजित पाशिलकर
Image
रोह्यातील स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी दौड कार्यक्रमास अभुतपुर्व प्रतिसाद पोलीस,महसुल,शासकीय अधिकारी,शिक्षक,विद्यार्थी,सामाजिक संस्थासह रोहेकरांचा उत्फुर्त सहभाग    रोहा-प्रतिनिधी गुरुवार दिनांक 04 आॕगस्ट 2022 रोजी सकाळी 08.00 ते 10.30 वा.चे दरम्यान भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र-राज्य शासनाच्या सूचनेनुसार " हर घर तिरंगा " व "स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी दौड" हा कार्यक्रम रोहा विभागातील कोलाड, नागोठणे, पाली व रोहा पोलीस ठाणे याचे सयुक्त विद्यमानाने पोलीस अधिक्षक रायगड अलिबाग, अप्पर पोलीस अधिक्षक रायगड अलिबाग व उप विभागीय पोलीस अधिकारी रोहा विभाग रोहा यांचे नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला.  सदर"अमृत महोत्सवी दौड" हि कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथून सुरु होऊन नवरत्न हाॕटेल-दमखाडी नाका- मेंहंदळे हायस्कुल-बाजार पेठ रोहा - तीन बत्ती नाका- रोहा एस.टी.स्टॅन्ड व पुन्हा कुंडलिका नदी संवर्धन गार्डन यामार्गे मार्गक्रमण केले. पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताचे गायन करुन सांगता करण्यात आली.  सदर कार्यक्रमा दरम्यान रोहा विभागातील १२