परोपकारी वृत्तीचे नामदेव धोंडू मगर यांचे निधन

ओबीसी संघर्ष समन्वय समिती रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर यांना बंधू शोक

खारी/ रोहा -केशव म्हस्के

रोहे तालुक्यातील वाशी ग्राम पंचायतीचे माजी सरपंच,कुणबी समाज नेते तथा ओबीसी संघर्ष समन्वय समिती रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर यांचे जेष्ठ वडीलबंधू नामदेव धोंडू मगर यांचे शनिवार दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले..

     वाशी गावचे शांत- संयमी मितभाषी प्रेमळ व दयाळू अंत:करणाचे प्रत्येकाला हवाहवासे वाटणारे मनमिळावू सुस्वभावाचे व्यक्तिमत्व होते.स्वर्गीय नामदेव धोंडू मगर यांनी आपल्या वडिलोपार्जित शेती व्यवसाय मोठ्या निष्ठेने सांभाळीत कुटुंबाचे चरितार्थ चालविण्याबरोबरच कुणबी समाजासाठी मोठे योगदान दिले. आपल्या गावामध्ये अध्यात्मिक,धार्मिक सामाजिक,शैक्षणिक,कला- क्रीडा,आदी क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान दिले.

 त्यांच्या निधनाने वाशी गावासह संपूर्ण धाटाव - किल्ला पंचक्रोशीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या निधनाने समाजामध्ये पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

     त्याच्या निधनाचे वृत्त समजताच रा.काँ.प.रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील,रोहा तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशीलकर, रोहे तालुका संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष विजयराव मोरे,माजी उपसभापती अनिल भगत,रोठ बु!माजी सरपंच ज्ञानेश्वर साळुंके, माजी तालुकाध्यक्ष विष्णू लोखंडे,ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील, देवकान्हे सरपंच वसंत भोईर, माजी उपसरपंच अमित मोहिते,सामाजिक कार्यकर्ते नवनीत डोलकर, माजी शिवसेना रोहा तालुकाध्यक्ष संतोष खटावकर, नितीन तेंडुलकर,रा.काँ.प.धाटाव विभागीय अध्यक्ष  दत्ता चव्हाण, दैनिक पुढारी उपसंपादक पत्रकार महादेव सरसंबे,अधिस्वीकृत जेष्ठ पत्रकार मिलिंद अष्टिवकर,माजी नगरसेवक समीर सकपाळ ,सलील खातू, रायगड जिल्हा कुणबी समाज उपाध्यक्ष  शंकर भगत,तळाघर,धाटाव,किल्ला आदी ग्राम पंचायतींचे सरपंच,उपसरपंच  तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळीसह पंचक्रोशीतील समाज बांधवांनी अंत्यविधी करिता उपस्थित दर्शवत मगर कुटुंबीयांचे सांत्वन केले.

      त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, एक मुलगी,दोन भाऊ,दोन बहिणी,पुतणे,सूना,जावई,नातवंडे, पतवांडे सगे -सोयरे,नातेवाईक असा मोठा परिवार आहे.

 त्यांचे दशक्रिया विधी सोमवार दि.२९/०८/२०२२ रोजी महादेव मंदिर - तळाघर येथे होतील तर अंतिम धार्मिक विधी अकरावे मंगळवार दि.३०/०८/२०२२ रोजी सकाळी ०९:०० ते १२:०० दरम्यान राहत्या घरी मु. वाशी, पो. वरसे, रोहा - रायगड येथे होतील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog