Posts

Showing posts from January, 2023
Image
आदर्श युवा आमदार पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल आमदार आदिती तटकरेंवर अभिनंदनाचा वर्षाव  रोहा -प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तसेच रायगडच्या माजी पालकमंत्री आदिती तटकरेंचा जाधवर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने झालेल्या सहाव्या युवा संवादात आदर्श युवा आमदार म्हणून सन्मान करण्यात आल्याने आ. आदिती तटकरे यांच्यावर रोह्यासह संपुर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहॆ.  आ. आदिती तटकरे यांनी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या विधानसभेतील युवा पिढीतील एक अभ्यासू व संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण केली असून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहॆ.  2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निर्वाचित झाल्यानंतर आ. आदिती तटकरे यांना लगेचच राज्याच्या मंत्रिमंडळात आठ ते दहा खात्यांच्या राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.  कोव्हिड व निसर्ग चक्रीवादळासारखे मोठे संकट असतांनाही आव्हानात्मक परिस्थितीत उत्तम काम करत आदिती तटकरेंनी मिळालेल्या संधीचे सोने केले.  आदर्श युवा आमदार पुरस
Image
बोरीचामाळ येथे बिबट्याची दहशत; बिबट्याने पाडला बैलाचा फडशा तळा-संजय रिकामे तळा तालुक्यातील बोरीचामाळ येथे दिनांक २९ जानेवारी 2023रोजी शेतकरी गणपत गायकर यांच्या मालकीचा नांगरणीचा ७/८वर्षाचा बैल नेहमीप्रमाणे चरायला सोडला असताना घरी न आल्याने शोधा -शोध केली असता काल सकाळी  बिबट्यानी फस्त केल्याचे आढळून आले. यावेळी आजूबाजूला बघितले असता बिबट्याच्या पायाची ठसे आढळून आले. गावाजवळ हि घटना घडली असल्याने मोठी दहशत वाढली आहे त्यामुळे या बिबट्याने बैलाचा भक्ष्य केले असल्याचे आढळून आले वन्य प्राण्यांनी मोठा हैदोस मांडला असून अनेक गावातून उनाड ढोर यांच्या भक्ष्यस्थानी  होत आहेत या शेतकऱ्याचे जवळपास रुपये २५०००/- चे नुकसान झाले आहे.दिवसेंदिवस हिंस्त्र प्राणी यांचा उपद्रव झाला असून शेतकरी याला कंटाळलेआहेत तरी वनविभागाने याची त्वरित दखल घेऊन रितसर पंचनामा करून शेतकऱ्याचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.त्याचबरोबर या बिबट्याचा त्रास पन्हेळी(गायमुख) पासून ते कुडतुडी गावापर्यं तमोठ्या प्रमाणामध्ये होत असून  गावांमध्ये देखील अशाच ढोरा गुरांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे वन विभागान
Image
रोहे वर्धमान रेसिडेन्सी येथे माघी गणेश जयंती निमित्ताने अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम संपन्न खारी/ रोहा -केशव म्हस्के  रोहा तालुक्यातील वरसे ग्राम पंचायत हद्दीतील वर्धमान रेसिडेन्सी येथील श्री गणपती मंदिरामध्ये माघी गणेश जयंती निमित्ताने बुधवार दि.२५ जानेवारी २०२३ रोजी संस्थेचे अध्यक्ष दयानंद कृष्णा टिकोणे,जेष्ठ नागरिक विनायक घरत,जोशी काका,देवजी जाईलकर अन्य मान्यवर मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली माघी गणेश जन्मोत्सव पुष्पवृष्टीपर प्रवचन आरती,"श्रीं "ची पालखी मिरवणूक सोहोळा,हरिपाठ तद्नंतर महा प्रसाद आदी अध्यात्मिक व धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषामय उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाले.      माघ शुद्ध चतुर्थी श्री गणेश जयंती जन्मोत्सव वार्षिक सोहळया निमित्ताने सकाळी विधिवत श्रीसत्यनारायणाची महापूजा,श्री गणेश जन्मोत्सव पुष्पवृष्टी पर हभप.भूषण महाराज वरखले (खांब - नडवली) यांची प्रवचन सेवा आरती,सायंकाळी ठिक चार वाजताच्या दरम्यान हभप.राम महाराज सावंत यांच्या नेतृत्वाखाली भजन मंडळ मुठवली खुर्द यांच्या साथीने फटाक्यांच्या आतषबाजीने"श्रीं "ची पालखी मिरवणूक सोहोळया द
Image
"परीक्षा पे चर्चा" उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेस रोह्यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 614 विद्यार्थ्यांनी घेतला चित्रकलेचा आनंद रोहा- प्रतिनिधी भाटे सार्वजनिक वाचनालय व पंचायत समिती शिक्षण विभाग रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व "परीक्षा पे चर्चा" पर्व-६ उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेचे रोह्यात आयोजन करण्यात आले होते. बुधवार दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ११ वाजता भाटे सार्वजनिक वाचनालय रोहा येथे चित्रकला स्पर्धेस मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली.  विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सुबक-सुंदर व कल्पक चित्रे रेखाटली.  चित्रकला स्पर्धेचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी भाटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री. किशोर तावडे तसेच श्री. महेश शशिकांत कुलकर्णी, सहकार्यवाहक यांनी मोलाची भूमिका बजावली.  रोहा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ. मेघना धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख रत्नाकर कनोजे,विजय वेळे, दिपक पाबरेकर, विद्या रोहेकर, नारायण गायकर, संतोष यादव,लिना मोरे,शिक्षक नरेश पाटील,अरुण आग
Image
 "शुद्धलेखनाच्या दिशेने" मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त रोह्यात कार्यशाळा संपन्न   रोहा-प्रतिनिधी शासनाने घोषित केलेला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. याचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखा आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी शुद्धलेखनाची कार्यशाळा घेण्यात आली. श्री. वैभव चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली "शुद्ध लेखनाच्या दिशेने" ही कार्यशाळा आयोजित केली होती.        रोहा प्रांताचे उपविभागीय दंडाधिकारी श्री ज्ञानेश्वर खुटवड, रोहा तहसीलदार सौ. कविता जाधव, पाली तहसीलदार श्री. उत्तम कुंभार कोमसाप रोहा शाखेच्या अध्यक्षा सौ. संध्या दिवकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. सुखद राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत मुख्य व्याख्याते श्री. वैभव चाळके यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केले.  मराठी व्याकरण आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज यातील चुका कशा टाळता येतात याचे अतिशय मार्मिक भाषेत गमतीशीर उदाहरणे देत वैभव चाळके यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपविभागीय दंडाधिकारी श्री.
Image
रोहे दमखाडी क्रांतीज्योत मित्रमंडळ आयोजित रोहा ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रेस प्रारंभ   साईबाबांच्या जयघोषाने रोहे नगरी दुमदुमली खारी/रोहा-केशव म्हस्के  रोहे शहरातील दमखाडी येथील अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर असलेल्या क्रांती ज्योत मित्र मंडळाच्यावतीने आयोजित श्री क्षेत्र संत गोरोबानगर दमखाडी ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रेस परमश्रद्धेय आराध्य ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या कृपाशिर्वादाने रोहा ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रेचे शुक्रवार दि.१३ जानेवारी रोजी प्रारंभ झाला. मोठ्या उत्साही व आनंददायी वातावरणामध्ये "साईनाथ महाराज की जय,"साईबाबांच्या जयघोषाने रोहे नगरी दुमदुमली.            सालाबादप्रमाणे यावर्षी १७ वर्षांची लाभलेली परंपरा, अविरत व अखंडितपणे राखत दमखाडी येथून सकाळी ०९:०० वाजता साई भक्तांसमवेत परमश्रद्धेय रोहे नगरीचे आराध्य ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचे दर्शन व कृपाशिर्वादाने श्री धाविर महाराज की जय,छत्रपती शिवाजी महाराज की जय,ओम साई राम,साईनाथ महाराज की जय,साईबाबा की जय,पायी हळू हळू चाला मुखाने साई साई बोला !तुला खांद्यावर घेईल! तुला पालखीत मिरविन
Image
"पुस्तके ही माणसाची मूलभूत गरज"-उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे पत्रकार पुरुषोत्तम मुळे लिखित 'चाफ्याचे फूल' कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न तळा -संजय रिकामे पत्रकार पुरुषोत्तम गोविंद मुळे यांनी लिहिलेल्या "चाफ्याचे फूल"या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रायगड भूषण एल. बी. पाटील यांचे शुभ हस्ते, कोमसापचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सी. डी. देशमुख जयंती व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा याचे औचित्य साधून शनिवार दि १४ जानेवारी, २०२३ रोजी मोठया उत्साहात पार पडला.                  याप्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त मारोती शिर्के, सचिव मंगेश देशमुख, गो म वेदक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन महेंद्र कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन किरण देशमुख, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्रीराम कजबजे, कोमसापचे मुरुड तालुका अध्यक्ष संजय गुंजाळ, दुर्ग अभ्यासक सुखद राणे, कोमसापचे रायगड जिल्हा समन्वयक अ. वि. जंगम, तळे
Image
रोह्यात कुणबी एल्गार   समाज परिवर्तनामध्ये " कुणबी जोडो अभियान" ठरणार मैलाचा दगड गावो-गावी कुणबी युवकांच्या संघटनांचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर रोहा-प्रतिनिधी समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समाज संघटन व समाज जागृतीसाठी "कुणबी जोडो"अभियान अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे दृष्टिपथात येत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी,तद्नंतर रायगडात "कुणबी जोडो" अभियानाला सुरूवात झाली.रायगड जिल्ह्यातील  पोलादपूर,महाड, माणगाव, तळा, म्हसळा पाठोपाठ आज दिनांक 13 जानेवारी रोजी हे वादळ रोह्यात धडकले.रोहा तालुक्यातील कोलाड -आंबेवाडी पासून समाजनेते स्व.माजी आमदार पा.रा. सानप कुणबी भवन रोहा पर्यंत अभुतपूर्व बाईक रॅली काढण्यात आली. रस्तात अनेक ठिकाणी ह्या रॕलीचे स्वागत करण्यात आले.               यावेळी आयोजित सभेत,विचार मंचावर संघाचे अध्यक्ष भूषण बरे,हरिश्चंद्र पाटील,कार्याध्यक्ष कृष्णा कोबनाक,ज्ञानदेव पवार,सदानंद काष्ठे,अशोक करंजे, शंकरराव म्हसकर,सुरेश मगर,शिवराम शिंदे,रामचंद्र सपकाळ,मारुती खांडेकर,शिवराम महाबळे,शंकरराव भगत,रामचंद्र चितळकर, खेळू ढमाल,विष्णू लोखंडे,पां
Image
सुदर्शन सिएसआर फाऊंडेशनच्या सुधा सितारा शिष्यवृत्ती योजनेच्या ४६ विद्यार्थीनी ठरल्या लाभार्थी माजी मंत्री आमदार अदिती तटकरे यांसह असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न  धाटाव-शशिकांत मोरे      पिगमेंट निर्मिती मधे भारतात प्रथम तर जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुदर्शन केमिकल लिमिटेड या कारखान्यातील सुदर्शन सिएसआर फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थिनी करिता राबविण्यात येणाऱ्या सुधा सितारा या शिष्यवृत्ती योजनेतील सन २०२२-२३ वर्षाच्या रोह्यातील विविध विद्यालयाच्या ४६ गोर गरीब विद्यार्थीनींनी  लाभ मिळाला आहे.या लाभार्थी विद्यार्नीसह त्यांच्या कुटुंबीयांना हा मोठा आर्थिक आधार मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.       आज शुक्रवार दि.१३ जाने रोजी सकाळी ११ वाजता रोठ्खुर्द येथील सुदर्शन कॉलनी हॉल मध्ये आयोजित शिष्यवृत्ती मागदर्शन शिबिरात चिंतामणराव देशमुख विद्यालय, द.ग.तटकरे विद्यालय,कोकण एज्युकेशन सोसायटी मेहंदळे हायस्कूल,कनिष्ठ विद्यालय व एम.बी.मोरे फाऊंडेशन विद्यालयतील एकूण ४६ विद्यार्थीनींना माजी मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.याप्रसंगी कंपनीचे
Image
ग्रुप ग्रामपंचायत तळवली तर्फे अष्टमी सरपंचपदी रविंद्र मरवडे विराजमान ; तर उपसरपंचपदी संदीप महाडिक यांची नियुक्ती खांब-रोहा/नंदकुमार मरवडे   रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रा.पंचायतीच्या निवडणुकीत थेट सरप़च म्हणून निवडून आलेले रविंद्र मरवडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून  संदीप महाडिक यांची उपसरपंचपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.           ग्रामपंचायतीचे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप व भाजप आघाडी यांनी ग्रामविकास आघाडीची स्थापना करून या निवडणुकीत थेट सरपंचासह शंभर टक्के यश संपादित केले.तर या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून निवडून आलेले रविंद्र मरवडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला तर उपसरपंचपदी संदीप महाडिक या़ंची सर्वानुमते निवड करण्यात आली.या प्रक्रियेमध्ये मनोज जाबोरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.         यावेळी विभागीय जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, माजी सरपंच राम मरवडे,वसंत मरवडे, मारूती खांडेकर, राम महाडिक, शांताराम महाडिक, नामदेव मरवडे, गजानन बामणे, सुरेश वाघमारे,नाना शिंदे, रामचंद्र बामणे,एकनाथ मरवडे,शंकर शेलार, पांडुरंग नागावक
Image
रोहा तालुका गणित-विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्षपदी टिळक खाडे यांची सर्वानुमते नियुक्ती रोहा-प्रतिनिधी       शिक्षण क्षेत्रातील महत्वाचे व क्रियाशील समजल्या जाणा-या रोहा तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष म्हणून वांगणी हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक टिळक खाडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.       रोहा पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली मेहेंदळे हायस्कूल येथे संपन्न झालेल्या गणित-विज्ञान अध्यापक मंडळाच्या  सभेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.     यावेळी विस्तार अधिकारी रत्नाकर कनोजे व गट साधनव्यक्ती मनिषा पाटील , संगीता धामणसे व तालुक्यातील केंद्रप्रमुख व विविध शाळांतील मुख्याध्यापक उपस्थित होते.नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून व्ही.बी.जाधव व ए. ए.रेडीज,सचिवपदी नितीन गोरीवले, सहसचिव विनय मार्गे व यतिन म्हात्रे, खजिनदार रमेश दडवे कार्यकारी सदस्य म्हणून शिल्पा मरवडे , सुमैय्या मुल्ला ,प्रदीप दिवकर , विजय वेळे , एस्. व्ही. जाधव, विनोद कुथे , रमजान उस्ताद , अर्चना साटम , शिवाजी मोटे , महेंद्र  जवरत , भाऊसाहे
Image
वारकरी संप्रदायाचे निस्सिम अनुयायी ह.भ.प. शिवराम महाराज भोईर यांना देवाज्ञा अध्यात्मिक व्यक्तीमत्वाच्या निधनाने परिसरात शोककळा खांब/रोहा-नंदकुमार मरवडे रोहा तालुक्यातील देवकान्हे गावचे रहिवासी तथा वारकरी संप्रदायाचे पाईक असणारे जेष्ठ वारकरी ह.भ.प.शिवराम धोंडू भोईर यांना शुक्रवार दिनांक ३१ डिसे.रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथे एका इस्पितळात उपचारादरम्यान देवाज्ञा झाली.         ह.भ.प.शिवराम भोईर हे वारकरी संप्रदायाचे निस्सिम भक्त होते.तर देवकान्हे गावाचे सांप्रदायाचे जेष्ठ मार्गदर्शक होते.त्यांनी आपल्या आयुष्यात नियमितपणे आळंदी व पंढरपूरची वारी केली.शांत,संयमी व प्रेमळ स्वभावाचे शिवराम भोईर यांनी आपली हयात शेती क्षेत्रासाठी व वारकरी संप्रदायासाठी व्यथित केली.त्यांच्या दु:खद निधनाने देवकान्हे गावची सांप्रदायाचे क्षेत्रात फार मोठी हानी झाली असल्र्याची प्रतिक्रिया समाजमनातून व्यक्त होऊ लागली आहे.         ह.भ.प.शिवराम भोईर यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह वारकरी संप्रदायातील हरिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात तीन मुलगे,एक