ग्रुप ग्रामपंचायत तळवली तर्फे अष्टमी सरपंचपदी रविंद्र मरवडे विराजमान ; तर उपसरपंचपदी संदीप महाडिक यांची नियुक्ती

खांब-रोहा/नंदकुमार मरवडे 

रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रा.पंचायतीच्या निवडणुकीत थेट सरप़च म्हणून निवडून आलेले रविंद्र मरवडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून संदीप महाडिक यांची उपसरपंचपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

          ग्रामपंचायतीचे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप व भाजप आघाडी यांनी ग्रामविकास आघाडीची स्थापना करून या निवडणुकीत थेट सरपंचासह शंभर टक्के यश संपादित केले.तर या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून निवडून आलेले रविंद्र मरवडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला तर उपसरपंचपदी संदीप महाडिक या़ंची सर्वानुमते निवड करण्यात आली.या प्रक्रियेमध्ये मनोज जाबोरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

        यावेळी विभागीय जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, माजी सरपंच राम मरवडे,वसंत मरवडे, मारूती खांडेकर, राम महाडिक, शांताराम महाडिक, नामदेव मरवडे, गजानन बामणे, सुरेश वाघमारे,नाना शिंदे, रामचंद्र बामणे,एकनाथ मरवडे,शंकर शेलार, पांडुरंग नागावकर, मोरेश्वर मरवडे, रामचंद्र मरवडे,देवजी मरवडे,ठमाजी महाडिक,विनायक महाडिक,प्रमोद शिंदे, प्रमोद लोखंडे,आदी प्रमुख नेते व कार्यकर्ते नवनिर्वाचित सदस्य हरिश्चंद्र मांगुळकर, दयाराम मरवडे,निलम वाळंज,अनघा खांडेकर,सुकेशिनी महाडिक,तारामती पवार,या़च्यासह मोठ्या संख्येने आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

      सरपंचपदी विराजमान झालेले रविंद्र मरवडे आणि उपसरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आलेले संदीप महाडिक यांचे उपस्थितीतांनी अभिनंदन व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog