Posts

Showing posts from October, 2022
Image
आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ८८ भारतीय आजी- माजी सैनिकांचा विशेष सन्मान महेश बामुगडे आणि रूपेश बामुगडे यांचा स्तुत्य उपक्रम खारी-रोहे-केशव म्हस्के देशासाठी सर्वस्व समर्पण करणारे व अखंड देशसेवेचे व्रत अंगिकारून देशसेवा करणा-या आजी माजी भारतीय सैनिकांचा सन्मानाचा कार्यक्रम रोहे तालुक्यातील किल्ला गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते महेश बामुगडे आणि रूपेश बामुगडे यांच्या सहयोगाने व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जेष्ठ नेते व युवा कार्यकर्ते यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.         महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विद्यमान आ.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व खा.सुनील तटकरे यांच्या प्रेरणेतून,आ.आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे,तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यातंर्गत  रोहे शहर आणि परिसर तसेच नागोठणे,खांब,क़ोलाड,चणेरा,धाटाव,सुतारवाडी, पिंगळसई,आदी विभागातील भारतमातेचे शूरवीर आजी माजी सैनिक व त्यां
Image
बाहे येथे जागतिक ग्रामीण महिला किसान दिवस,जागतिक विद्यार्थी दिन तसेच जागतिक अन्न दिनानिमित्ताने विविध उपक्रम संपन्न रोहा-प्रतिनिधी दिनांक १५ ऑक्टोबर जागतिक ग्रामीण महिला किसान दिवस,जागतिक विद्यार्थी दिन तसेच १६ ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस यांचे औचित्य साधून,कृषी विज्ञान केंद्र-किल्ला यांच्या सौजन्याने मौजे बाहे ता.रोहा येथे दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ठिक ११ वाजता हनुमान मंदिर येथे कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे विशेष कार्यक्रम समन्वयक अधिकारी डाॅक्टर मनोज मांडवकर साहेब,डाॅक्टर संजय मांजरेकर साहेब,श्री.जिवन आरेकर सर,श्री.माधव गिते सर आवर्जून उपस्थित होते.तसेच बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचे प्रमुख पदाधिकारी श्री.बामुगडे साहेब,के.व्ही.के.शास्त्रीय सल्लागार समन्वय समिती सदस्य सौ.रूपाली सचिन देवकर,तसेच एकता ग्राम संघाच्या crp सौ.प्रियांका गणेश पवार,व  त्यांच्या समवेंत असलेल्या ग्रामसंघामधील सर्व महिला समूह बहुसंख्येने उपस्थित होत्या.तसेच याच गावांतील रा.जि.प.शाळेंतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.गिते सर यांनी केले.व्यास मंचाव
Image
ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे रक्तदान शिबिर संपन्न  रोहा-निखिल दाते रविवार दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या सहकार्याने श्री ओंकारेश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले ,यावेळी 65 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.  रोह्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग चिकित्सक डॉ. रघुनाथ भट व जिल्हा रक्तसंक्रमण आधिकारी डॉ. दिपक गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी शिबिराचे चांगल्या पद्धतीने  आयोजन केल्याबद्दल डॉ. रघुनाथ भट यांनी ब्राह्मण मंडळ रोहा कार्यकारणीचे विशेष कौतुक केले.  शिबिराचा समारोप रोह्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर रोहित क्षीरसागर व डॉ. अपूर्वा क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.  यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. अपूर्वा क्षीरसागर यांनी ब्राह्मण मंडळ रोहाच्या कमिटीतर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  सदर रक्तदान शिबिराला रायगडच्या माजी पालकमंत्री श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे, रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, माजी नगरसेवक महेंद्र गुज
Image
आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचा जल्लोष शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची सुतारवाडीतील गीताबागेत प्रचंड गर्दी         कोलाड़ नाका-शरद जाधव         कोकणचे युवा नेतृत्व, कोकण विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे या युवा नेतृत्वाच्या वाढदिवसाचा जल्लोष सुतारवाडीतील गीता बागेत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी  सामाजिक , राजकिय, शैक्षणिक क्षेत्रातील तसेच तळागाळातील कार्यकर्ते, यांनी अनिकेत तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.                 सकाळी नऊ वाजल्या पासुन गीता बाग गर्दीने फुलून गेली होती.त्या अगोदर त्यांच्या आई सौ.वरदाताई तटकरे, पत्नी वेदांती तटकरे, बहिण माजी मंत्री आदिती ताई तटकरे, खासदार सुनिल तटकरे व विशेष म्हणजे नव्वद वर्षाच्या आजी गीताबाई तटकरे या सर्व कुटुंबीयाँनी त्यांना," तुम जियो हजारो साल" अशा शुभेच्छा दिल्या.              आमदार अनिकेत तटकरे यांनी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून सामजिक कार्याला सुरवात केली. त्यानंतर ते राजकारणात आले. अनेकांना त्यावेळी वाटले असेल की राजकारणात अनिकेत तटकरे कितपत भरारी घेतील. मात्र ही शंका त्यांनी खोडून
Image
कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेची मासिक सभा व "कवितेचे चांदणे" हा कार्यक्रम संपन्न रोहा-प्रतिनिधी दि . ११/ ११/ २०२२ रोजी कोकण मराठी साहित्य परिषद रोहे शाखेची मासिक सभा व कोजागिरी पौर्णिमे निर्मित्त "कवितेचे चांदणे" हा कार्यक्रम श्री . सुधीर क्षीरसागर यांचे अष्टमी रोहा येथील निवासस्थानी घेण्यात आला . सदर  कार्यक्रमास रोहा शाखाध्यक्षा सौ संध्या दिवकर ,श्री सुखद राणे , श्री विजय दिवकर, नारायण पानवकर ,आरती धारप, अचला धारप, सुधीर क्षीरसागर , संजीव शेरमकर , शरद कदम , अजित पाशिलकर, नेहल प्रधान , अमिषा बारस्कर, स्वराज दिवकर इ . कवी कवयित्री उपस्थित होत्या . मागील सभेचा इतिवृत्तांत सचीव श्री विजय दिवकर यांनी वाचून दाखविला . तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला . सभेपुढील विविध विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली . कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उपस्थितांचे कविसंमेलन  "कवितेचे चांदणे" या कार्यक्रमात शारदाचं चांदण, ग्रामदैवत धावीर महाराज, निसर्ग, तुजला आठवतो का? शब्दफुले, चूल,विठ्ठला,चंद्र ,चांदण्या,शरदपौर्णिमा इ . अनेकविविध विषयांवर आधारीत कवितांच्या टिपूर चांदण्यात सर्व श्रोते
Image
मेढेकरांची पाणी समस्या मिटणार जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर तळा - संजय रिकामे मेढे गावाची पाणीटंचाई हटविण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मेढे पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. यासाठी तब्बल ८४ लक्ष ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आज दि.(3 ऑक्टोबर ) रोजी याबाबतचे पत्र खा.सुनिल तटकरे यांनी  सुतारवाडी येथील कार्यालयात मेढे ग्रामस्थ यांना दिले.यावेळी खा.सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव,तळा तालुका अध्यक्ष नाना भौड,कैलास पायगुडे, युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,किशोर शिंदे, मंगेश भगत, जगदीश शिंदे, सुनिल भौड प्रवीण अंबारले मेढे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यापूर्वी अपेक्षित पाणीपुरवठा मेढे गावाला झाला नाही. त्यामुळे गावचा पाणीप्रश्न सुटला नाही. जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर झालेल्या या योजनेमुळे मेढे येथील पाणी पुरवठा सुरळीत होईल असा विश्वास खा.सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. विकासाची वाट सुकर… माजी मंत्री आ.अदिती तटकरे यांच्या पाठपुरव्याने ही योजना मार्गी लागल्याचे ग्रामपंचायतीच्या
Image
अवचितगड प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान आमदार अनिकेत तटकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य  रोहा-प्रतिनिधी रोहा तालुक्यातील मेढे येथील अवचितगड प्रतिष्ठान हे सामाजिक, शैक्षणिक, कला,क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने सतत उल्लेखनीय कार्य करत आहे.प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण जेष्ठ पत्रकार उदय मोरे यांचे संकल्पनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. याच धर्तीवर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था युवा कार्यसम्राट आमदार अनिकेत तटकरे यांचे वाढदिवसाच्या औचित्याने कोरोना,निसर्ग वादळ या  काळात अविरत सेवा देणारे, सामाजिक कार्य करणाऱ्या १५ सेवाभावी व्यक्तिमत्वांचा  सन्मान करण्यात येणार आहे.अशी माहिती अध्यक्ष उदय मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.    मागील दोन वर्षे कोरोना,निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी या संकटांचा सामना आपण सर्वांनीच केला. अश्या संकटकाळी समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्तीनी आपणही समाजाच काही देण लागतो ही भावना जोपासत आपत्ती ग्रस्तांची सेवा व गरजवंताला मदतीचा हात दिला. त्यामुळे यासर्व संकटांचा सामना करण्यात आपण सर्व यशस्वी ठरलो. अ