मेढेकरांची पाणी समस्या मिटणार
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर
तळा - संजय रिकामे
मेढे गावाची पाणीटंचाई हटविण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मेढे पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. यासाठी तब्बल ८४ लक्ष ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आज दि.(3 ऑक्टोबर ) रोजी याबाबतचे पत्र खा.सुनिल तटकरे यांनी सुतारवाडी येथील कार्यालयात मेढे ग्रामस्थ यांना दिले.यावेळी खा.सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड.उत्तम जाधव,तळा तालुका अध्यक्ष नाना भौड,कैलास पायगुडे, युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,किशोर शिंदे, मंगेश भगत, जगदीश शिंदे, सुनिल भौड प्रवीण अंबारले मेढे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यापूर्वी अपेक्षित पाणीपुरवठा मेढे गावाला झाला नाही. त्यामुळे गावचा पाणीप्रश्न सुटला नाही. जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर झालेल्या या योजनेमुळे मेढे येथील पाणी पुरवठा सुरळीत होईल असा विश्वास खा.सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
विकासाची वाट सुकर…
माजी मंत्री आ.अदिती तटकरे यांच्या पाठपुरव्याने ही योजना मार्गी लागल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. या योजनेमुळे मेढे गावाचा पाणीप्रश्न कायमचा संपुष्टात येणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. या योजनेसाठी खा.सुनिल तटकरे आ.अनिकेत तटकरे यांचेही सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले. गावाच्या विकासात पूर्वी आडकाठी घातली जात होती. आता संपूर्ण गावाने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केल्याने विकासाची वाट सुकर झाल्याचे मेढे ग्रामस्थांनी सांगितले.
Comments
Post a Comment