Posts

Showing posts from May, 2023
Image
  श्री स्वामी समर्थ मठाचा भूमिपूजन सोहळा संपन्न . तळा-किशोर पितळे                 श्रीस्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्र अंबरनाथ संचलित उपकेंद्र राणेचीवाडी येथे श्री स्वामी समर्थ मठाचा भूमिपूजन समारंभ श्री आत्माराम चव्हाण यांच्या सपत्नीक करण्यात आले. शनिवार दिनांक ६ मे.रोजी सकाळी १० वाजता माननीय प्रमोद घोसाळकर जिल्हाप्रमुख शिवसेना यांच्या हस्ते पुजा व श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर प्रद्युम्न ठसाळ तालुका प्रमुख, शहर प्रमुख राकेश वडके,नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे अॅड.चेतन चव्हाण,शरद सारगे, उपतालुका प्रमुख कोअर कमिटी सदस्य लिलाधर खातू माजी सरपंच नमित पांढरकामे भास्कर गोळे,माधुरी घोलप,सिराजखाचे,नरेश पोळेकर,मंगेश पोळेकर, कैलास पायगुडे,नगरसेवक, नगरसेविका जेष्ठ स्वामी सेवेकरी आबा मोरजकर,दामले काका (पुणे) श्री स्वामी सेवेकरी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीस्वामी समर्थ मठासाठी महाड -पोलादपूरचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या आमदार निधीतून २५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला असून त्याचे भूमिपूजन करण्यात आले.                श्री स्वामी समर्
Image
  तळा बाजारपेठेतून महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून अज्ञात चोरट्यांचा पोबारा तळा किशोर पितळे               तळा चंडीका नाका ते बाजारपेठ कडे येणाऱ्या रस्त्यावर मुलगी व फिर्यादी वैशाली वाघमारे राहणार हनूमान नगर ता.तळा या काल ४ मे रोजी खरेदीसाठी बाजारात पायी चालत येत असता डाॅ.आंबेडकर चौक तळा येथे  बाजारपेठेतून काळ्या मोटार सायकल वरुन अज्ञात आरोपी व साथीदार यांनी फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची १२०,०००/-किमतीची सोन्याची गंठण हिसकावून पोबारा करून इंदापूर रोड कडे निघून गेला.अशी माहिती पोलीस सुत्राकडून मिळाली असून पोलिस निरीक्षक गोविंदओमासे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो निरीक्षक शिवराज खराडे करीत असून सदर गुन्हा रोजी.नं.५४/२०२३ भा.द.वि.क.३९३,३४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.या घटने नंतर आमच्या प्रतिनीधीनी पोलीसाशी संपर्क साधला असता तळ्यातील ही पहिलीच घटना असून महीला वर्गानी सावध रहावे लग्न,समारंभ, बाजार खरेदी, गर्दीचे ठिकाणी चोरीचे घटना घडत असतात.अनोळखी व्यक्तीपासून व त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे संशय वाटल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले. या घटनेने महीला वर्गात भीतीचे वा
Image
  रोहे येथील किशोर ता वडे मित्र परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी..  खारी/ रोहा ( केशव म्हस्के)              रोहे शहरातील भाटे सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष किशोर रविंद्र तावडे मित्र मंडळाच्या वतीने ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनी कामगार दिनाचे औचित्य साधत  शहरातील आडवी बाजारपेठ येथील दुकानामध्ये मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या कामगांराना आदरपूर्वक सन्मानित करीत जपली सामाजिक बांधिलकी..            यावेळी किशोर तावडे यांच्या समवेत सुरेश मेथा,आकिल रोहावाला, मयुर जैन, हेमंत ओक,पत्रकार विश्वजित लुमण,महादेवबुवा साळवी, मनोज जैन, दिलदार नाडकर,राजेश मेहता, समीर दर्जी, समीर आलेकर,इक्बाल अनवरे आदी मित्र परिवार उपस्थित होते.