तळा बाजारपेठेतून महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून अज्ञात चोरट्यांचा पोबारा


तळा किशोर पितळे

              तळा चंडीका नाका ते बाजारपेठ कडे येणाऱ्या रस्त्यावर मुलगी व फिर्यादी वैशाली वाघमारे राहणार हनूमान नगर ता.तळा या काल ४ मे रोजी खरेदीसाठी बाजारात पायी चालत येत असता डाॅ.आंबेडकर चौक तळा येथे  बाजारपेठेतून काळ्या मोटार सायकल वरुन अज्ञात आरोपी व साथीदार यांनी फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची १२०,०००/-किमतीची सोन्याची गंठण हिसकावून पोबारा करून इंदापूर रोड कडे निघून गेला.अशी माहिती पोलीस सुत्राकडून मिळाली असून पोलिस निरीक्षक गोविंदओमासे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो निरीक्षक शिवराज खराडे करीत असून सदर गुन्हा रोजी.नं.५४/२०२३ भा.द.वि.क.३९३,३४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.या घटने नंतर आमच्या प्रतिनीधीनी पोलीसाशी संपर्क साधला असता तळ्यातील ही पहिलीच घटना असून महीला वर्गानी सावध रहावे लग्न,समारंभ, बाजार खरेदी, गर्दीचे ठिकाणी चोरीचे घटना घडत असतात.अनोळखी व्यक्तीपासून व त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे संशय वाटल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले. या घटनेने महीला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.आजच्या काळात सुरक्षीतेचा प्रश्र ऐरणीवर आला आहे.२मे रोजी दुकान फोडीची घटना ताजी असताना चौवीस तासात ही दुसरी घटना घडली असून‌ पोलिसांपुढे अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आहे. 

               लग्नसराई व शाळांना सुट्टी असल्याने चाकरमानी गावाकडे आले असून शहरातून चोरटे आले असावेत असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.शहरात खाजगी वाहनांचा सुळसुळाट वाढला असून शहरात पोलीस गस्ती नसल्याने चोरट्यांचे फावले आहे.तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फक्त शो चे झाले असून बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनात आले असून नगर पंचायत प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे शहरातील जनता किती सुरक्षित असल्याचा प्रश्र ऐरणीवर आला आहे.दोन्हीचोरीचा व आरोपीना शोधण्याची पोलीसांना कसब लागणार आहे.

Comments

Popular posts from this blog