Posts

Showing posts from April, 2022
Image
शेणवई गावाचे सामाजिक कार्यकर्ते शंकर महाडिक यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ    धाटाव-शशिकांत मोरे        रोहा तालुक्यातील शेणवई गावचे सामाजिक कार्यकर्ते शंकर महाडिक यांचे अप्लशा आजाराने नुकतेच निधन झाले.त्यांच्या निधनाने सबंध महाडिक कुटुंबियांसह  पंचक्रोशीतील वातावरण शोकाकुल झाले आहे.महाडिक यांच्या निधनाचे वृत्त समजताच असंख्य चाहत्यांनी त्यांच्या  अंत्यदर्शनासाठी धाव घेतली.         अत्यंत प्रेमळ स्वभावाचे आणि  मनमिळावू वॄत्तीचे असलेले स्व.शंकर सखाराम महाडिक शांत,संयमी आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणूनही सर्वपरिचित होते.त्यांना धार्मिक तसेच सामाजिक विषयांत विशेष आवड होती.मागील काही दिवस ते आजारी होते.त्याचबरोबर त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा यासाठी पत्नी, मुले,नातवंडे यांनी त्यांना वृध्दपणात यातना होऊ नयेत यासाठी नितांत सेवा करीत त्यांची काळजी घेतली.अखेर वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेणवई येथे त्यांच्या निवासस्थानी मोठा जनसमुदाय लोटला होता.त्यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक,राजकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवर,नातेवाईक,ग्रामस्थ मोठ्या संख्
Image
पोलादपूर तालुक्यातील स्वरा हिंगोलीकर हिने पटकावला देशात चौदावा क्रमांक पोलादपुर - - ऋषाली पवार   स्पर्धा परीक्षांची तयारी लहान वयापासून करावे तसेच पारंपरिक पाठांतर करून शिक्षण घेऊ नये यासाठी पहिली ते नववी या वर्गामध्ये वेगवेगळ्या शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. त्यातील सर्वात अवघड समजली जाणारी व राष्ट्रीय पातळीवर मूल्यांकन करण्यात येणारी परीक्षा म्हणजे बीडीएस ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा.         पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा येथील दुसरी मध्ये शिकणारी स्वरा विजय भिंगोलीकर  ही बीडीएस परीक्षेमध्ये रायगड जिल्ह्यात इंग्रजी माध्यमात प्रथम क्रमांक क्रमांक पटकावला आहे तसेच देशात गुणवत्ता यादीत 14 वा क्रमांक पटकावला आहे.               स्वरा हिने यश संपादन केले आहे त्यासाठी तिच्या शाळेतील शिक्षकांची ही तिला मोठी मदत मिळाली होती शिक्षकांकडून तिच्या प्रत्येक शंकांचे निरसन केले जात होते तसे तिचा सराव करुन घेतला होता शाळेतील सर्व शिक्षकांनी तिला आपल्या परीने योग्य मार्गदर्शन केले.                 मुलांना बारावी नंतर होणाऱ्या सर्व स्पर्धापरीक्षांची तयारी लहान वयात सुरू करावीत असे
Image
अवकाळी पावसाने जनजीवन पुन्हा- पुन्हा विस्कळीत पोलादपूर -ऋषाली पवार        सोमवार दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला या अवकाळी पावसामुळे  मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते.           पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांचे नुकसान झाले आहे त्यातील एक म्हणजे पोलादपूर जवळ असलेले देशमुख कांबळे या गावाची ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.          अवकाळी पावसामुळे देशमुख कांबळे येथील अंगणवाडी व ग्रामस्थांच्या घराचे तसेच गोठ्याचे प्रचंड नुकसान झालेले संजय देशमुख यांच्या घरावरती आंब्याचे झाड कोलमडून पडल्याने त्यांच्या घराचे छत कोसळल्याने मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व शशिकांत देशमुख यांच्या गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले. अशा अनेक गावांचे या अवकाळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे गेले काही दिवस हे संकट सुरूच आहे बागायतदारांचे ही नैसर्गिक आपत्तीने सावरणे कठीण झाले आहेत या अवकाळी पावसाची तीव्रता इतकी होती की घराचे पत्रे उडाले भिंती कोसळल्याने घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य व घरातील इ
Image
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नांने भोराव ते सवाद धारवली निगडे रस्त्याच्या कामासाठी ८ कोटी रुपये मंजूर पोलादपुर -आमिर तारलेकर   महाड पोलादपुर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विशेष प्रयत्नाने भोराव ते सवाद धारवली निगडे रस्त्याच्या कामासाठी ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असुन, येत्या २ मे रोजी या रस्त्याच्या कामाचे टेंडर काढणार असुन लवकरच रस्त्याच्या कामाची सुरुवात केली जाणार असल्याचे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन सांगण्यात आले आहे. भोराव ते सवाद-धारवली रस्त्यावर खड्डे पडुन रस्त्याची बिकट अवस्था झाली असल्याने या विभागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होते या विभागातील नागरिकांकडुन भोराव ते सवाद धारवली रस्त्याच्या नुतनिकरणाची मागणी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कडे करण्यात आली होती या मागणी ची आमदार भरतशेठ गोगावले यांनी दखल घेवून शासना कडे सततचा पाठपुरावा केला असल्यामुळे शासनाच्या बजेट मधून ८ कोटी रुपये निधी भोराव ते सवाद धारवली निगडे रस्त्याच्या कामासाठी मंजूर करुन घेतले आहे.
Image
  पिंगळसई केंद्रातर्फे श्री.दिनेश कडव सरांचा सत्कार रोहा-प्रतिनिधी समर्थ वैभव वृत्तपत्राचा २०२२ या वर्षाचा जिल्हास्तरीय आदर्श किर्तनकार पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.दिनेश कडव सर शाळा-वांदोली आदिवासीवाडी ता.रोहा यांचा पिंगळसई केंद्राच्यावतीने सत्कार करण्यात आला.केंद्रप्रमुख सौ.रश्मी साळी यांचे शुभहस्ते श्री.दिनेश कडव सरांना सन्मानित करणेत आले.यावेळी व्यासपिठावर केंद्रप्रमुख सौ.रश्मी साळी यांचे समवेत पत्रकार रविना मालुसरे,धामणसई मुख्याध्यापक घनश्याम म्हात्रे,पिंगळसई मुख्याध्यापक राजाराम खरिवले,मालसई मुख्याध्यापिका पुष्पलता शिंदे,गावठण मुख्याध्यापक पाटील ,सोनगांव मुख्याध्यापिका वैशाली वेळे मॕडम,टिकुळे सर,तिपुळे सर,अनिता पाटील,अमोल म्हस्के,शिंदे सर,दिपक मांडलुस्कर व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आपली शैक्षणिक सेवा उत्तमरितीने सांभाळून श्री.दिनेश कडव सरांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली आहे.धामणसई पंचक्रोशी मधील वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.ह.भ.प.दिनेश कडव महाराज या नावाने किर्तन क्षेत्रात अल्पावधीत नाव निर्माण केले आहे."भाई"ह्या
Image
  रा.जि.प.शाळा खारी येथे शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण व मेळावा उत्साहात संपन्न विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग खारी/रोहा-केशव म्हस्के                       रोहे तालुक्यातील आरे बु.केंद्रांतर्गत  रा.जि.प.प्राथमिक शाळा खारी येथे शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण व मेळावा मंगळवार दि.१९ एप्रिल रोजी उत्साहात संपन्न झाला.       मेळाव्याची सुरुवात प्रमुख पाहुणे,स्कूल कमिटी कार्यकारणी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय काळे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विद्येची देवता श्री सरस्वती पूजनाने करण्यात आली. उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. रोहा.पं.समिती गट शिक्षणाधिकारी सादूराम बांगारे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापिका सुजाता मोकल यांच्या लाभलेल्या विशेष सहकार्याने संपन्न झालेल्या या मेळाव्याप्रसंगी पदवीधर शिक्षक श्री.मंगेश शरमकर सर व सायली दिवकर मॅडम या तज्ञ मार्गदर्शकांनी शाळा पूर्वतयारी प्रशिक्षणाची संपूर्ण रुपरेषा सांगून उद्दिष्ट सांगितली ,कोरोना काळात विद्यार्थ्यांचा मागिल तीन वर्षाचा झालेला लर्निंग लाँस भरून काढणे,इ.१ लीत दाखल होणार्-या विद्यार्थ्यांची तयारी करणे,शिकविण्य
Image
"विकासकामांच्या पुर्ततेसाठी पश्चिम खोरा आपण दत्तक घेत आहोत"-आमदार अनिकेत तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हनुमान जयंती निमित्ताने पश्चिम खोऱ्यात सदिच्छा भेटी रोहा-प्रतिनिधी रोहा तालुक्यातील पश्चिम खोऱ्यात हनुमान जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.हनुमान जयंतीचे औचित्य साधून आमदार अनिकेत तटकरे यांनी विविध गावातील हनुमान मंदिरांना भेटी देऊन दर्शन घेतले.पश्चिम खोऱ्यातील यशवंतखार,करंजविरा,भातसई इ.गावांत आमदारांनी भेटी दिल्याबद्दल ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले व दर्शनास आल्याबद्दल आभार मानले.   यशवंतखार येथे श्री भैरवनाथ उत्सवानिमित्ताने अनिकेत तटकरे आले असता ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना त्यांनी श्री भैरवनाथ मंदिर सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच श्री अमृतेश्वर मंदिर सुशोभीकरण व जोड रस्त्याचे काम करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.   रोहा तालुक्याची कुस्ती पंढरी म्हणून ओळख असलेल्या यशवंत खार येथील पैलवानांना आधुनिक पद्धत
Image
मेढा विभाग राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला; कोण इकडे-तिकडे गेले तरी बालेकिल्ला कधीच हलणार नाही--- खासदार सुनिल तटकरे रोहा-शरद जाधव ब-याच वर्षांपूर्वी मा.मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मेढा या ठिकाणी पाणी योजनेसाठी आणले होते.त्यावेळी या विभागातील अनेक जेष्ठ बुजूर्ग मंडळींनी आम्हांला राजकारणात ताकद मिळवून दिली.स्व.अण्णा देखील या विभागातून निवडून आले. तेव्हापासून आजपर्यंत या विभागात ऋणानुबंधांचे नाते दृढ झाले आहे. व ते नाते आजदेखील अनिकेत व आदिती जपत आहेत.म्हणूनच ४३ वर्षांनंतर सुद्धा मेढा विभाग राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच राहिला असून  कोण इकडे तिकडे गेले तरी बालेकिल्ला कधीच हलणार नसल्याचा ठाम विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.    रोहे तालुक्यातील मेढा हनुमान आळी येथे श्री हनुमान मंदिर मंडप सभागृह लोकार्पण सोहळ्यानिमित्त उपस्थितांसमोर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अनिकेत तटकरे, मा.सभापती राजेश्री पोकळे,महिला तालुकाध्या प्रितम पाटील, सरपंच स्नेहा खैरे,अनंत देशमुख, राजेंद्र पोकळे,भगवान गोवर्धने,मयूर खैरे,गजानन खांडेकर, रघुनाथ करंजे,अप्पा देशमुख, मयूर दिवेकर, चंद्रकांत ठमक
Image
अलिबागमध्ये माणुसकी वॉकेथॉन 2022 ला उत्स्फूर्त प्रतिसाद  सेवाभावी संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक अलिबाग-प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, माझी वसुंधरा जन जलजागृती अभियान अंतर्गत व रायगड जिल्हा परिषद, नगरपालिका अलिबाग व माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने वॉकेथॉन 2022 चे आयोजन करण्यात आले होते.  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीचे औचित्य साधून आज दि.14 एप्रिल 2022 रोजी स. 6 ते 8.30 दरम्यान अलिबाग बीच येथून या वॉकेथॉनची सुरुवात झाली.यामध्ये झाडे लावा झाडे जगवा, झाडांचे संवर्धन करा, पाण्याचा वापर कमी करून पाणी वाचवणे, तसेच पावसाचे पाणी शक्य होईल तेवढे जमिनीत मुरवणे, प्लास्टिक मुक्तीचा संदेश , प्लास्टिक कचरा गोळा करत 5 किलोमीटर वोकेथॉन अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाले. या वेळी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अलिबाग नगरपालिका मुख्यधिकारी श्रीम.अंगाई साळुंखे, उपमूख्य कार्यकारी अधिकरी (ग्राप) श्री राजेंद्र भालेराव ,समाजकल्याण अधिकरी श्री लें
Image
रोठ खुर्द गावचे सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र मोरे  यांचे अल्पशा आजाराने निधन    धाटाव-शशिकांत मोरे        रोहा तालुक्यातील रोठ खुर्द गावचे सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र महादेव मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने मोरे कुटुंबियांसह सबंध पंचक्रोशीतील वातावरण शोकाकुल झाले आहे.मोरे यांच्या अंत्यदर्शनासाठी असंख्य चाहत्यांचा जनसमुदाय उपस्थित होता.          अत्यंत मनमिळावू, प्रेमळ स्वभावाचे आणी परोपकारी वॄत्तीचे असलेले स्व.हरिश्चंद्र महादेव मोरे शांत,संयमी आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणूनही सर्वपरिचित होते.धार्मिक तसेच सामाजिक विषयांत त्यांना विशेष आवड होती.स्वतःचा टेम्पो व्यवसाय सांभाळून त्यांनी मुलांना शिक्षण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार केले.गेले काही दिवस ते आजारी होते.त्याचबरोबर त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा यासाठी पत्नी, मुले,नातवंडे यांनी त्यांना वृध्दपणात यातना होऊ नयेत यासाठी नितांत सेवा करीत त्यांची काळजी घेतली.शनिवारी रात्री वयाच्या ६२ व्या वर्षी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच रोठखुर्द येथील वाघेश्र्वर नगर येथे त्यांच्या निवासस
Image
खारगांव ग्रामपंचायत हद्दितील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न पालकमंत्री आदितीताई तटकरे यांची विशेष उपस्थिती विस्तारीत गावठाण भू-धारकांना ७/१२ वाटप, वन हक्क दावे प्रमाणपत्र वितरण प्रदूषित झालेल्या नापीक भातशेती नुकसान भरपाईचे लाभार्थ्यांना चेक वाटपाचा कार्यक्रम संपन्न  खारी/ रोहा-केशव म्हस्के   महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे व अन्य मान्यवरांच्या हस्ते रोहा तालुक्यातील खारगांव ग्रामपंचायत हद्दितील खारी-काजुवाडी-गुरुनगर येथील विविध समाजोपयोगी कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.  काजुवाडी येथील पाणी साठवण बंधाऱ्याचे लोकार्पण, काजुवाडी अंतर्गत डांबरीकरण साईड पट्टी गटार बांधणे, खारी गाव अंतर्गत रस्ता, गुरूनगर अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण,स्वयंभू श्री शिव शंकर मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन,व्यायाम शाळेचे भूमिपूजन आदी विविध समाजोपयोगी विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्याचवेळी काजुवाडी विस्तारीत गावठाण भू - धारकांना ७/१२ वाटप एम.आय.डी.सी. च्या पाण्याने प्रदूषित होऊन नापीक झालेल्या भातशेत  नुकसान भरपा
Image
रोह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड आक्रमक  खासदार शरद पवारांच्या घरावरील भ्याड हल्ल्याचा केला निषेध रोहा-प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या घरावरील भ्याड हल्ल्याचा रोहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करुन जाहिर निषेध करण्यात आला.रोहा नगरपालिका चौकात दि.९ एप्रिल रोजी सकाळी १०-३० वाजता हे आंदोलन करण्यात आले.यावेळी हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. दरम्यान S.T.कर्मचाऱ्यांना कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे पालन करणे गरजेचे होते.मात्र गेले पाच महिने विविध लोकांच्या नादी लागून आंदोलन तथ्यहिन व दिशाहिन झालेले होते.अपुरे वेतन असतानाही हे कर्मचारी इतके दिवस कसे तग धरु शकले?ह्या आंदोलनासाठी कोणते तरी अज्ञात हात मदत करीत असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला.त्याच अज्ञात शक्तीला हे आंदोलन शांततेच्या मार्गाने जाऊ नये असे वाटत आहे.हा विषय सतत धगधगता ठेवण्याचा पाच माहिने प्रयत्न केला गेला.शरद पवारांच्या घरावरील हल्ला हा ह्याच नियोजनबध्द कटाचा भाग असल्याचे ह्यावेळी सांगण्यात आले.सरकारने सखोल चौकशी करुन ह्या कटात सहभागी असणाऱ्यांचा श
Image
  धर्म जपा,आई-वडील जपा आणि परमार्थ करा- ह.भ.प. राध्येशाम महाराज गाढे  बारसोली येथे शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा संपन्न दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी धाटाव-शशिकांत मोरे     मानवता या शब्दाचा सोप्या शब्दात अर्थ होतो, माणसाची एकता म्हणजे माणुसकी, प्रत्येक माणसाचा मग तो धर्म,जात कोणत्याही देश-शहराचा असो एकच उद्देश असावा म्हणून धर्माला जपा त्याचप्रमाणे मुलांचे आई-वडिलांवर प्रेम असतेच पण ते प्रेम कृतीतूनही व्यक्त व्हायला हवे.मुलांचे प्रेम कृतीतून व्यक्त झाल्यावर आई-वडिलांनाही आनंद होतो म्हणून आई वडिलांना जपा.आणि साधुसंतांनी ज्या मोठ्या अर्थाची सिद्धता किंवा प्राप्ति करून घेतली तो परमार्थ करायला विसरू नका असे एक अभ्यासू कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर ओळख असलेले येवला येथील ह भ.प. राध्येशाम महाराज गाढे यांनी आपल्या मार्गदर्शपर प्रबोधनात बोलताना सांगितले.    रोहा तालुक्यातील धाटाव (बारसोली) येथील शिवमंदीर  प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्या समयी आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना ते बोलत होते.राष्ट्रसंत जगद्गुरु तुकोबारायांच्या उभारिला हात, जगीं जाणविली मात,देव बैसले सिंहासनीं । आ
Image
  जेष्ठ नागरिक संघ रोहाच्या अध्यक्षपदी पांडूरंग सरफळे (रावसाहेब) यांची निवड  रोहा-शरद जाधव         रोहा तालुक्यातील जेष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग बाळोजी सरफळे (रावसाहेब) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.          जेष्ठ नागरिक सभागृह रोहा येथे सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हि निवड करण्यात आली.सदर बैठकित अध्यक्ष पांडूरंग सरफळे  उपाध्यक्षपदी शांताराम गायकवाड, चिटणीस सुरेश मोरे,  खजिनदार प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली. कार्यकारणी समितीवर सुधाकर वालेकर,मारुती राऊत,बाळाराम शेळके,नंदकुमार भादेकर, शैलेजा देसाई यांची देखील निवड करण्यात आली.   अध्यक्षपदावर निवड झालेले पांडूरंग सरफळे यांना सहकार क्षेत्राचा गाढा अभ्यास आहे. रोहा येथील जय भवानी पतसंस्थेच्या चेरमनपदी ते गेली 25 वर्ष कार्यरत आहेत,या पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बळ घटकांच्या आर्थिक अडचणी दुर करण्याचे समाजपयोगी काम ते करीत आहेत. शासकीय सेवेत अभियंता पदावर काम केले असल्यामुळे प्रशासनाचा अनुभव आहे.तसेच निवड झालेले सर्वच पदाधिकारी हे शा
Image
किल्ला येथील कै.तुकाराम लोखंडे चषकाचा मानकरी ठरला गौळवाडी संघ  रोहा-शरद जाधव               रोहा तालुक्यातील किल्ला येथे कै.तुकाराम लोखंडे यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य  क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर चषकाचा मानकरी ठरला गौळवाडी संघ.संघास रोख रुपये  51000 व भव्य चषक उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. रोहा तालुका शिवसेना माजी तालुका प्रमुख विष्णूभाई लोखंडे यांच्यावतीने त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते.            सदर स्पर्धेत जवळपास 32 संघांनी भाग घेतला होता. किल्ला येथील भव्य मैदानात स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. सामने रोमहर्षक झाले.अनेक अटीतटीच्या लढती पहायला मिळाल्या.           स्पर्धेत द्वितीय क्रमांक रु. 25000 व चषक सुदर्शन कंपनी, तृतीय क्रमांक रु. 15000 व चषक ,श्री गणेश खैरवाडी,चतुर्थ क्रमांक रु.15000 व चषक आंबेघर, संघास देण्यात आले. यामधे उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर यांना सन्मानित करण्यात आले.    कोरोना काळात स्पर्धा झाल्या नाहीत ,परंतु यापुढे स्पर्धेला कधीही खंड पडू न देता अधिक आकर्षक स्पर्धा कशा होतील याचे नियो
Image
धाटाव पंचक्रोशी कबड्डी स्पर्धेत सोनारसिद्ध धाटाव संघ अव्वल   धाटाव प्रतिनिधी -जितेंद्र जाधव  रोहा तालुक्यातील जय हनुमान वाशी येथे सोमवार दि. ४ एप्रिल रोजी धाटाव पंचक्रोशी विभागाच्या वतीने  कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या .कै. मारुती लहाने व कै. प्रथमेश भोईर यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत  धाटाव संघाचा भरत मालुसरे यांनी  केलेल्या उकृष्ट चढाईच्या जोरावर  व अनुभवी संदेश रटाटेनी प्रेक्षणीय पकड्डीचा नमुना पेश करित अंतिम फेरीत सोनारसिद्ध धाटाव संघाने बलाढ्य जय बजरंग रोहा संघाला पराभूत केले . या स्पर्धेत एकुण सोळा संघाने सहभाग नोंदवला होता तर प्रथम क्रमांक सोनारसिद्ध धाटाव , द्वितीय क्रमांक जय बजरंग रोहा , तृतीय क्रमांक जय बजरंग लांढर तर चंतृर्थ क्रमांक  नवतरुण तळाघर पटकविला . मालिकावीर भरत मालुसरे ( धाटाव ) ,  उकृष्ट पक्कड राकेश टेंबे ( लांढर), चढाई श्रेयश कान्हेकर ( रोहा ) , पब्लिक हिरो विराज पाटील ( रोहा )  यांना सन्मानित करण्यात आले. तर प्रंशात बर्डे व विरेंद्र जंगम उत्तम समालोचन  केले.  या स्पर्धे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव मोरे ,रोहा तालुका समन्वय समिती अध्यक
Image
  श्री क्षेत्र किल्ला हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्द बालेकिल्ला राहावा,जोमाने कामाला लागा- खासदार सुनिल तटकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन  रोहा-शरद जाधव आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. साडेतीन मुहूर्तांपेकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे कुठे मुहूर्त काढायची गरज नाही म्हणून  किल्ला या गावी आज आपण विकासाची गुढी उभी करीत असल्याचे वक्तव्य खासदार सुनिल तटकरे यांनी काढले. श्री क्षेत्र किल्ला हा अभेद्द असा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहावा, याकरिता कार्यकर्त्यांनी जोमाने पक्षाच्या कामाला लागावे असे आवाहन ही तटकरे यांनी केले.      वाकेश्वर मंदिराच्या जिर्णोध्दार सोहळा वाढीव निधी 25 लाखाच्या व किल्ला अशोक नगर रस्त्याच्या सुमारे दिड कोटी रक्कमेच्या कामाचे भुमीपूजन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.       व्यासपिठावर आमदार अनिकेत तटकरे,कार्याध्यक्ष  मधुकर पाटील , तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर,तालुका समन्वय समिती अध्यक्ष विजयराव मोरे, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, जेष्ठ नेते शंकरराव भगत ,अनिल भगत, रोहिदास पाशिलकर ,युवक अध्यक्ष जयवंत मुंडे,रामा म्हात्रे,यशवंत रटाटे,प्रदीप बामूगडे,साळुंखे,
Image
माणसाने कितीही मोठा बंगला बांधला,तरी त्या बंगल्या समोर तुमची आई बसलेली दिसली पाहिजे....हिच खरी पुण्याई-हभप अनिल महाराज तुपे पिंगळसई येथील किर्तन सोहळ्यात हभप अनिल महाराज तुपे यांचे मार्गदर्शन  रोहा-शरद जाधव माणसाने कितीही मोठा बंगला बांधला,तरी त्या बंगल्या समोर तुमची आई बसलेली दिसली पाहिजे हिच खरी तुमची पुण्याई असल्याचे मार्गदर्शन  ह.भ.प.अनिल महाराज तुपे (नाशिक) यांनी केले.   पिंगळसई येथे युवा नेतृत्व अनंतराव देशमुख यांच्या मातोश्रींच्या, लिलाबाई अंकुशराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त किर्तन सेवेचे आयोजन केले होते.त्यामध्ये मातेची महती सांगणारे किर्तन महाराजांनी सादर केले.               उपस्थित जनसमुदयाला प्रबोधन करताना अनिल महाराज यांनी आई वडिलांसारखे दैवत या जगात नाही ,म्हणून ते जीवंत असे पर्यन्त त्यांच्या डोळ्यात पाणी आणू नका,सार जग तुम्हांला एकवेळ नालायक म्हणेल पण, तुमची आई माझा राजाच म्हणेल. आई वडिलांना वेडे वाकडे बोलू नका.मरेपर्यन्त त्यांची सेवा करा.म्हातारपण आणि लहानपण सारखेच असते. वय झाले की बडबडतात सांभाळून घेतले पाहिजे. असे मौलीक विचार अनिल महाराज यांनी व्यक
Image
देवकान्हे गावचे प्रगतशील शेतकरी किसन वेटू सुटे यांचे निधन रोहा-प्रतिनिधी देवकान्हे ता.रोहा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा विभागातील प्रगतशील शेतकरी किसन वेटू सुटे यांचे अल्पशा आजाराने शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ठिक ७ वाजता दुःखद निधन झाले.तरुण वयात त्यांच्या पुढे नोकरीचे पर्याय असताना सुध्दा समाजकार्याची व शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी गावी राहून शेती करण्यास प्राधान्य दिले.स्पष्टोक्तेपणा व करारीबाणा त्यांनी अखेर पर्यंत जोपासला."आण्णा" ह्या नावाने ते परिसरात सुपरिचित होते.गाव व खांब विभागातील राजकीय,सामाजिक व शैक्षणिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.त्यांना कलेची व खेळाची आवड होती. त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगे,मुलगी ,नातवंडे,भाऊ,पुतणे,पुतण्या असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्ययात्रेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या राख पुजवणीचा कार्यक्रम सोमवार दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता होईल.त्यांचे दशपिंड सोमवार दिनांक ११ एप्रिल रोजी त्यांच्या र
Image
पत्रकार राजेंद्र जाधव यांना पितृशोक ह.भ.प.मारुती जाधव यांचे निधन रोहा-प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सुपरिचित पत्रकार श्री.राजेंद्र जाधव यांच्या वडिलांचे निधन झाले आहे.रोहा तालुक्यातील निवी गावचे मारुती भिवा जाधव, वय-८६ वर्ष यांचे गुरुवार दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजता आकस्मिक निधन झाले. मारुती भिवा जाधव हे वारकरी संप्रदायाचे पायिक होते. त्यांचा स्वभाव प्रेमळ आणि मनमिळावू होता. त्यांच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कै.मारुती जाधव यांना कुटूंबात आणि समाजात मानसन्मान व आदर होता. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या जाधव यांनी आपल्या सहा मुलांचे सुयोग्य संगोपन केले. जीवाची पराकाष्ठा करत मोठे केले. कै.मारुती जाधव यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.   त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दिनांक ९ एप्रिल रोजी तर उत्तरकार्य मंगळवार दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी राहत्या घरी निवी येथे होणार आहेत.
Image
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी दिनांक ३ एप्रिलला ३ वाजता इंदापूर येथे येणार- खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती रोहा-शरद जाधव  देशाचे आघाडीचे कार्यतत्पर, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची आपण दिल्लीत भेट घेतली. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्‍न त्यांना वेळोवेळी सांगितला. कोकणातील पर्जन्यमान व भौगोलिक परिस्थिती पाहता येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे गरजेचे आहे ही बाब आपण त्यांना समजावून सांगितली. अखेर त्याचे फलित मिळाले. पळस्पे ते इंदापूर महामार्गाचे काँक्रिटीकरणाचा शुभारंभ तसेच इंदापूर ते तळेमार्गे आगरदांडा मार्ग लोकार्पण, ताम्हाणे घाट मार्गे निजामपुर वरून माणगाव ते दिघी रस्ता लोकार्पण, अशा तिहेरी योग असलेल्या लोकार्पण व शुभारंभ कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी रविवारी तीन तारखेला इंदापूर येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी येणार  इंदापुर ते कासू रस्त्याच्या 400 कोटीच्या मंजूर कामाचे भुमीपूजन --- खासदार सुनिल तटकरे यांनी गीताबाग येथे घेतलेल