अवकाळी पावसाने जनजीवन पुन्हा- पुन्हा विस्कळीतपोलादपूर -ऋषाली पवार

       सोमवार दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते.         पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांचे नुकसान झाले आहे त्यातील एक म्हणजे पोलादपूर जवळ असलेले देशमुख कांबळे या गावाची ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

         अवकाळी पावसामुळे देशमुख कांबळे येथील अंगणवाडी व ग्रामस्थांच्या घराचे तसेच गोठ्याचे प्रचंड नुकसान झालेले संजय देशमुख यांच्या घरावरती आंब्याचे झाड कोलमडून पडल्याने त्यांच्या घराचे छत कोसळल्याने मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व शशिकांत देशमुख यांच्या गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले.

अशा अनेक गावांचे या अवकाळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे गेले काही दिवस हे संकट सुरूच आहे बागायतदारांचे ही नैसर्गिक आपत्तीने सावरणे कठीण झाले आहेत या अवकाळी पावसाची तीव्रता इतकी होती की घराचे पत्रे उडाले भिंती कोसळल्याने घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य व घरातील इतर सामानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे लोकांना अश्रू अनावर होत आहे.

सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही बागायतदारांचे शेतकरी पंचनाम्याची वाट बघत असतानाच आणखी एक संकट उभे राहून आत्तापर्यंत बागायतदारांचे नुकसान झाले होते आता घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येते नागरिकांची प्रशासनाकडून मदतीची आस.

Comments

Popular posts from this blog