संजीवनी प्रतिष्ठानतर्फे बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी पूजा साहित्याचे उत्साहात वाटप तळा संजय रिकामे गणेशोत्सवाचा सण जवळ आला असून धार्मिक विधी-पूजेच्या साहित्याची रेलचेल सुरू झाली आहे.मात्र, पूजेच्या साहित्याच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. संजीवनी प्रतिष्ठान तर्फे या साहित्याचे वाटप आज दि.२८ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठानचे संस्थापक माजी पंचायत समिती सभापती रवींद्र नटे यांच्या शुभ हस्ते कोनथरे ग्रामस्थांना करण्यात आले ज्यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे बाप्पाची प्रतिष्ठापना करताना लागणाऱ्या सर्व वस्तू देण्यात आल्या आहेत.या पॅकेटमध्ये हळद, कुंकू, गुलाल, अभिर, कापूर, जानवी, उदबत्ती, अत्तर, समईवात,गणेश मूर्ती साठी उपरणे अशा वस्तू देण्यात आल्या आहेत.यावेळी प्रकाश बाईत,विनोद गायकर,राजु शिंदे,निलेश कदम,प्रमोद महागावकर,अविनाश शिंदे,अजित काते,दिनेश ठसाळ कोनथरे ग्रामस्थ महिला मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वसामान्य लोकांच्या मागणीनुसार व विनंतीला मान देऊन संज
Posts
Showing posts from August, 2023
- Get link
- Other Apps
सहयोगी अपंग कल्याणकारी संस्थेचे वतीने शैक्षणिक साहित्य वाटप... खारी /रोहा (केशव म्हस्के)२८ ऑगस्ट :- रोहे तालुक्यातील सहयोगी अपंग कल्याणकारी संस्थेचे धडाडीचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, अभ्यासु उपाध्यक्ष नंदलाल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग अपंग व्यक्ती करिता सातत्याने शासन दरबारी अपंगांसाठीच्या कल्याणकारी योजनांची यशस्वीरित्या अंमलबजावणी व्हावी आणि त्याचा लाभ दुर्गम तळागाळातील दिव्यांग व्यक्तींना मिळावा आदी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये क्रियाशील व कार्यशील असणाऱ्या सहयोगी अपंग कल्याणकारी संस्थेच्या वतीने रविवार दि.२७ ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर बाजार पेठ रोहा येथे शहरासह ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थांना व दिव्यांग व्यक्तींच्या पाल्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.. यावेळी दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली व सहकार्याने जिल्ह्यातील विविध अपंग संघटनांच्या माध्यमातून ०२ ऑगस्ट रोजी मोर्चा दरम्यान मंत्रालयीन सचिवांकडे संजय गांधी नि.यो.पेन्
- Get link
- Other Apps
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहाच्या वतीने मासिक सभा व कवी संमेलन उत्साहात संपन्न रोहा प्रतिनिधी २४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहाच्या वतीने मासिक सभा व कवी संमेलन आयोजित करण्यात आले . कु नेहल प्रधान यांच्या निवासस्थानी सदर सभा संपन्न झाली . सभेचे अध्यक्षस्थान शाखेच्या उपाध्यक्ष आरती धारप यांनी स्वीकारावे असे सचिव श्री विजय दिवकर यांनी सुचित केले आणि श्री .नारायण पानवकर यांनी अनुमोदन दिले . सभेला सुरुवात करण्यापूर्वी रानकवी ना धो महानोर तसेच मराठी चित्रपट अभिनेत्रीं सीमा देव यांना सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली . लगेचच सभेला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम सभेचा अहवाल व जमाखर्च सचिव श्री .विजय दिवकर यांनी वाचून दाखवला तो सर्वांनुमते मंजूर करण्यात आला . पुढील विषय नवीन सभासद करणेबाबत घेण्यात आला . सभेनंतर कवी संमेलन आयोजित करण्यात आले . विषय - स्वर्गीय ना धों महानोर यांच्या कविता व गाणी . कवी संमेलनाला सुरुवात स्वर्गीय महानोर यांच्या कव
- Get link
- Other Apps
धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती दिना निमित्त फळ वाटप तळा संजय रिकामे आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती दिना निमित्ताने तळा तालुका व शहराच्या वतीने तळा येथील शिवसेना शाखेत आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याच प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र तळा, डॉक्टर वडके दवाखाना येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ,शहरप्रमुख राकेश वडके,नगरसेविका नेहा पांढरकामे विद्यकिय अधिकारी डॉ. मोदे नगरसेवक,शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
- Get link
- Other Apps
नाना नानी पार्कचे होणार सुशोभीकरण! विरोधी पक्ष नेत्या नेहा पांढरकामे यांच्या हस्ते भूमिपूजन तळा संजय रिकामे नाना-नानी पार्क तळा शहराची शान असून आबालवृध्दांसाठी हे विरंगुळ्याचे ठिकाण असून लहान मुलांना खेळण्यासाठी बरीच खेळणी सुध्दा आहेत.या नाना नानी पार्कची डागडुजी करण्याची मागणी तळेवासियांनी केली होती त्या अनुषंगाने नगरसेवकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती.आ.भरतशेट गोगावले, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या पाठपुराव्याने तळा शहरातील नाना पार्कसाठी 7 लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन विरोधी पक्ष नेत्या सौ.नेहा पांढरकामे यांच्या हस्ते आज पडले यावेळी तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ,शहरप्रमुख राकेश वडके,जिल्हा कोअर कमिटी सदस्य लीलाधर खातु,तालुका सपंर्क ॲड. चेतन चव्हाण,नगरसेवक मंगेश शिगवण, नगरसेवक नरेश सुर्वे, सिराज खाचे, मंगेश पोळेकर, भास्कर गोळे अविनाश पिसाळ युवासेना तालुका प्रमुख अनंत खराडे उपतालुका प्रमुख शरद सारगे तालुक्यातील व शहरातील पदाधिकार
- Get link
- Other Apps
भाजपाला मुरुड मध्ये मोठा धक्का! -भाजपा उप तालुका प्रमुख परेश किल्लेकर यांचा असंख्य कार्यकर्ते महिला भगिनीसह उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटात जाहीर प्रवेश... शिवसेना भवन मुंबई येथे माजी मंत्री खासदार आनंत गीते यांच्या हस्ते जाहीर प्रवेश- युवासेना उपजिल्हाधिकारी पदाची दिली जबाबदारी... परेश किल्लेकर यांनी भाजप सोडल्याने भाजपाचे मुरुड मधील अस्तित्व शून्य? मुरुड मध्ये चर्चेला उधान... प्नतिनिधी दीप वायडेकर. मुरुडचे भाजपा उपतालुकाप्रमुख परेश किल्लेेकर यांनी काल दिनांक 24 ऑगस्ट रोजी भाजपा पक्षाला रामराम ठोकत शिवसेना भवन मुंबई येथे जाऊन रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र दादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री खासदार अनंत गीते यांच्या हस्ते असंख्य कार्यकर्त्या महिला भगिनींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटात जाहीर प्रवेश केला. भाजपा पक्षांतर्गत नाराजगी मुळे त्यांनी पक्ष सोडण्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे हिंदू बंधू भगिनींसह मुस्लिम बंधू भगिनी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. हे प्रवेशाच्या माध्यमातून पाहण्यात आले. परेश किल्लेकर यांनी भाजपात असता
- Get link
- Other Apps
जल्लोष! चांद्रयान मोहीम यशस्वी होताच तळा येथे ढोल ताशांचा घुमाला आवाज तळा-संजय रिकामे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ या मोहिमेकडे लागलं होत.चांद्रयान ३ हे काल संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरले.विक्रम लॅंडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले.भारताची चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यावर सर्वत्र जल्लोष साजरा केला जाऊ लागला. चांद्रयान मोहिम फत्ते झाल्यावर देशभरात आनंद साजरा केला जाऊ लागला.अनेक जण इस्रोला शुभेच्छा देत आहेत. तळा शहरातही नागरिकांनी इस्रोचे कौतुक करत ढोल ताशांच्या गजरात जोरदार जल्लोष केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ उतरताच तळा येथे फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेत काल सायंकाळी अखेरचा व महत्वाचा टप्पा होता. हा दुर्मिळ क्षण अनेक नागरिक समाज माध्यमांसह दूरचित्रवाणीवर पाहत होते.चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच तरुणांनी रस्त्यावर उतरत फटाक्यांची आतषबाजी करत भारत माता की जयच्या घोषणा देत शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत जल्लोष केला. यावेळी पेढे देखील व
- Get link
- Other Apps
तळा शहरात पोलिसांचा रुट मार्च तळा-संजय रिकामे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व्यवस्था सुरळीत राहावा यासाठी तळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रुट मार्च काढण्यात आला.बुधवारी सायं पाच वाजता तळा पोलिसांच्या पथकाकडून रुट मार्च काढण्यात आला.यात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.पोंडफुले,तळा पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे, माणगाव पोलीस निरीक्षक श्री.पाटील सहपोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, ५० पोलिस अंमलदार, महिला पोलिस अंमलदार, बीट मार्शल यांचा समावेश होता. तळा पोलिस ठाणे ते बळीचा नाका, बाजारपेठ,तळा नगरपंचायत कार्यालय,वरचा मोहल्ला,कासार अळी,तळा प्राथमिक आरोग्य केंद्र,ते पुन्हा तळा पोलिस ठाण्यापर्यंत हा रुट मार्च काढण्यात आला. या रुट मार्चमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी पोंडफुले यांनी स्वतः नेतृत्व केले. तळा शहरामध्ये पोलि सांच्या वतीने रूट मार्च काढण्यात येत आहे या मागचा उद्देश हा एकच आहे की तळा येथील सर्व नागरिकांनी शांततेने आणि आनंदाने रहावे कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव न येता सर्वांचा सलोखा अबाधित रह
- Get link
- Other Apps
आत्मा योजने मार्फत शेतकऱ्यांना मत्स्य बीजाचे वाटप तळा संजय रिकामे तळा तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतला आहे परंतु सदर शेततळ्यांचा वापर शेतीच्या पाण्याची गरज भागवणे इतपर्यंतच सिमित होते यामध्ये बदल करण्यासाठी व शासनाचा शेती व शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे व आर्थिक स्तर उंचावणे हा मुख्य हेतू नजरेसमोर ठेवून कृषी विभाग व आत्मा मार्फत तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांच्या विशेष प्रयत्नातून १४ शेतकरी बांधवांना ७००० रोहू व ७००० कटला या जातीचे बोटुकली मत्स्य बीज वाटप तालुका कृषी अधिकारी आनंद कंबळे यांच्या हस्ते करण्यात आले . मत्स्य बीजाचे संगोपन व संवर्धन कसे करावे त्यांना खाद्य कोणते व कसे द्यावे या विषयी विस्तृत माहिती आनंद कांबळे यांनी दिली.या मत्स्य बीज वाटपाचे लाभार्थी म्हणून सुरेश महादेव कदम- साळशेत, रविंद्र गणपत मांडवकर - वाशी महागाव, सुमित्रा कृष्णा कडू- बारपे,नारायण द
- Get link
- Other Apps
श्रीमती ईन्दुमती वसंतलाल शाह चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे मोफत वह्या वाटप व वृक्ष लागवड उत्साहात संपन्न तळा- संजय रिकामे अशोक लोखंडे विद्यामंदिर पिटसई येथे समाजसेवक गणेश बाळाराम सावंत यांच्या सहकार्याने श्रीमती ईन्दुमती वसंतलाल शाह चॅरीटेबल ट्रस्ट संस्थापक स्वर्गीय ईन्दुमती वसंतलाल शाह व स्वर्गीय वसंतलाल मणिलाल शाह यांच्या स्मरणार्थ ट्रस्टचे अध्यक्ष उमेश वसंतलाल शाह ,सचिव सौ.संध्या उमेश शाह यांच्याकडून विनामूल्य वह्यांचे आणि टीशर्टचे वाटप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला. या प्रसंगी अशोक लोखंडे विद्यामंदिर पिटसईचे चेअरमन खेळू वाजे,समाजसेवक गणेश सावंत सचिव संजय रेडिज,मुख्याध्यापक श्री रेडीज,रसिका पवार शिक्षक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती ईन्दुमती वसंतलाल शाह चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश वसंतलाल शाह यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण, वैद्यकीय मदत, गोशाळेचे सामाजिक उपक्रम आणि इतर धर्मादाय गोष्टींसाठी ट्रस्ट गेली 13 वर्षे काम करत असल्याचे समाजसेवक गणेश सावंत यांनी सांगितले त्याचप्रमाणे ट्रस्टने दारिद्र्यरेषेखालील अन
- Get link
- Other Apps
अजय बिरवटकर यांची महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट अध्यक्ष पदी निवड. तळा- संजय रिकामे महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट या संस्थेच्या विश्वस्तांची पंचवार्षिक निवडणूक २० ऑगस्ट २०२३ रोजी श्रीकृष्ण सभागृह दादर मुंबई येथे पार पडली या निवडणुकी मध्ये श्रीकृष्ण पॅनलचे सर्वच्या सर्व १७ उमेदवार यांनी दणदणीत विजय मिळवला या विजयी उमेदवारांंनी मिळून दि- २१ ऑगस्ट २०२३ रोजी अध्यक्ष पदी अजय शांताराम बिरवटकर व उपाध्यक्षपदी युवराज गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बिरवटकर हे मन मिळावू शांत स्वभाव अभ्यासू व नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत असल्याने त्यांची महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट शिखर संस्था अध्यक्ष पदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे वर अभिनदंन होत आहे.संपूर्ण गवळी समाजाला एकत्रित करण्याचे काम आम्ही करणार असून समाजाच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबविण्यावर आमचा अधिक भर असणार आहे. समाजाच्या समस्या सोडविण्या बरोबरच युवकांशी संपर्क साधून त्यांना समाजकार्यासाठी जोडण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे नव नियुक्त अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी म्हटले आहे.
- Get link
- Other Apps
किरण धनवी एक दानशूर व्यक्तिमत्व किरण धनवी हे एक मराठी उद्योजक म्हणून रोह्यात ओळखले जातात .दत्ताराम धनवी हे त्यांचे वडील. दत्ताराम धनवी यांनी पंचक्रोशीतील मंदिरे बांधली,दानधर्म केले परंतु या गोष्टीचा कुठेही बोलबाला कधीच केला नाही. प्रसिद्धीपासून ते लांबच राहत,मानसन्मान याची कधीही अपेक्षा त्यांनी केली नाही. गावातील, पंचक्रोशीतील कोणीही व्यक्ती आजारी पडल्यास त्याला पहिली मदत ते करत असत. वडिलांनी चालवलेला हा वारसा किरण धनवी यांनी पुढे चालवला. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय त्यानी पुढे नेला. रोह्यात नावाजलेला बिल्डर म्हणून त्याची ओळख आहे. वडिलांनी संपूर्ण जबाबदारी आपल्या मुलावर सोपवली आणि ती जबाबदारी किरण धनवी यांनी उत्कृष्टपणे सांभाळली देखील परंतु रोहा तालुक्यातील धामणसई परिसरात जादूटोणासारखा अघोरी प्रकार घडला होता.ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले त्यानंतर गावागावात नागरिकांत चर्चा सुरू झाली.अनेकांनी या घडलेल्या घटने संदर्भात निषेध व्यक्त केला. मतमतांतरे झाली या घटनेनंतर चांगल्या वाईट प्रतिक्रिया उ