संजीवनी प्रतिष्ठानतर्फे बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी पूजा साहित्याचे उत्साहात वाटप
तळा संजय रिकामे
गणेशोत्सवाचा सण जवळ आला असून धार्मिक विधी-पूजेच्या साहित्याची रेलचेल सुरू झाली आहे.मात्र, पूजेच्या साहित्याच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. संजीवनी प्रतिष्ठान तर्फे या साहित्याचे वाटप आज दि.२८ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठानचे संस्थापक माजी पंचायत समिती सभापती रवींद्र नटे यांच्या शुभ हस्ते कोनथरे ग्रामस्थांना करण्यात आले ज्यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे बाप्पाची प्रतिष्ठापना करताना लागणाऱ्या सर्व वस्तू देण्यात आल्या आहेत.या पॅकेटमध्ये हळद, कुंकू, गुलाल, अभिर, कापूर, जानवी, उदबत्ती, अत्तर, समईवात,गणेश मूर्ती साठी उपरणे अशा वस्तू देण्यात आल्या आहेत.यावेळी प्रकाश बाईत,विनोद गायकर,राजु शिंदे,निलेश कदम,प्रमोद महागावकर,अविनाश शिंदे,अजित काते,दिनेश ठसाळ कोनथरे ग्रामस्थ महिला मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वसामान्य लोकांच्या मागणीनुसार व विनंतीला मान देऊन संजीवनी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून बहु समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य करण्यात येईल असा विश्वास संजिवनी प्रतिष्ठानचे संस्थापक रवींद्र नटे यांनी व्यक्त केला प्रतिष्ठानच्या कार्याची सुरवात गणपती बाप्पाच्या उत्सवात प्रतिष्ठापनेसाठी पूजा साहित्याचे वाटप करून करण्यात आल्यामुळे एक वेगळाच आनंद झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कोनथरे, चरई गौळवाडी, बोरिचामाळ,काकल गौळवाडी,वृंदावन,काकडशेत गौळवाडी या ठिकाणी ५०० गणेश भक्तांना बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणाऱ्या पूजा साहित्याचे वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment