Posts

Showing posts from December, 2021
Image
🔱 आदिशक्ती न्युज🔱 ह्या वेब न्युज पोर्टलच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून आम्ही आपणांस वृत्तसेवा पुरवित आहोत.अनेक वाचकांनी आम्हांला उत्तम प्रतिसाद दिला.आम्हांला प्रोत्साहित केले.त्यामुळेच "आदिशक्ती न्युज" हे अल्पावधित दर्जेदार न्युज पोर्टल म्हणून नावारुपाला आले.आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आपले मनःपूर्वक आभार.       नुतन वर्ष २०२२ मध्ये हा विश्वास असाच राहावा.आपल्या सहकार्याने पुढे वाटचाल करण्याचा आमचा संकल्प आहे.यासाठी आपल्या सदिच्छा,आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहावेत हिच अपेक्षा. आपणांस व कुटूंबीयांस नुतन वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.             कु.रविना नारायण मालुसरे                 संपादिका  🔱 आदिशक्ती न्युज🔱
Image
गिरणे ग्रामपंचायत हद्दित १६० जॉबकार्डांचे वाटप शासनाच्या उपक्रमात अव्वल. तळा :किशोर पितळे गिरणे ग्रामपंचायत तालुक्यातील एक आदर्शवंत ग्रामपंचायत असून शासनाचे विविध उपक्रम तळा गाळापर्यत पोहचवण्यात प्रगती पथावर असून अनेक उपक्रम राबविले जात आहेत कोविड लसीकरण कँप घेऊन गावातच संपूर्ण गावात प्रत्येक नागरिकांना देण्यात येऊन शासनाला सहकार्य केले असे विविध उपक्रम राबवीत असतानाच रोजगारा अभावी ग्रामीण भागातील जनतेचे वाढते स्थलांतर थांबावे त्याकरता केंद्र आणि राज्य शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमीयोजना अमलांत आणली आहे या योजने मध्ये ज्या कुटुंबाने किंवा व्यक्तीने रोजगाराची मागणी केली त्याला वर्षाकाठी शंभर दिवस रोजगार देण्याची हमी सदर योजनेत देण्यात आलेली आहे.गिरणे  ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. ज्योती कैलास पायगुडे यांनी रोजगार हमी योजनेचे महत्व सर्व सामान्यांना पटवून १६० जॉब कार्डचे वाटपगिरणेग्रामपंचायतीत केले भारत सरकारचा रोजगार हमी योजनेचा कायदा आहे. त्यात वर्षातले किमान शंभर दिवस रोजगार मिळण्याची हमी आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचीही स्वतंत्र रोजगार हमी योजना असून, त्यामध्ये मागेल तितके दिवस
Image
पुष्कर राजस्थान येथील राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पॅरा कबड्डी संघ द्वितीय तर मुंबई पॅरा कब्बडी संघ तृतीय तळा: किशोर पितळे पुष्कर,राज्यस्थान येथे पार पडलेल्या,माजी मुख्यमंत्री जनार्दनसिंह गहलोत याच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय पॅरा कब्बडी स्पर्धेत स्पर्धेत महाराष्ट्र व मुंबई पॅरा कब्बडी संघाने चांगली कामगिरी करत आज महाराष्ट्र दिव्यांग कब्बडी संघ द्वितीय तर मुंबई दिव्यांग कब्बडी संघाने तृतीय स्थान प्रस्थापित केले.  अंतिम फेरीतील महाराष्ट्र व राजस्थान या संघाच्या चुरसीच्या सामन्यात राजस्थान संघाने महाराष्ट्र संघास ४१-४० अशा फरकाने प्रथम क्रमांकाचे स्थान व महाराष्ट्राने द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकाविले तर मुंबई संघ आणि राजस्थान संघाच्या उपांत्य  सामन्यांत राजस्थान संघाने मुंबई संघास ४७-३८ या फरकाने हरविले. गुणांनुसार मुंबई संघाने तृतीय स्थान व पंजाब संघास चतुर्थ स्थान प्राप्त केले महाराष्ट्र संघाकडून रायगड जिल्ह्यातील राजेश मोकल, अक्षय निकम, ओमकार महाडिक व कर्णधार रमेश संकपाळ, मुकुल खाडे नंदुरबार जिल्ह्यातील महेश वसावे, सांगली जिल्ह्यातील आरिफ शेख नंदुरबार जिल्ह्यातील रायस
Image
लक्ष्मण पवार यांच्या अपघाती निधनाने पालेखुर्द गावावर दुःखाचे सावट कर्तबगार तरुण गेल्याने कुटूंब झाले पोरके | रोहा-शरद जाधव आपल्या नातेवाईकाच्या लग्नाला गेलेल्या पालेखुर्द येथील लक्ष्मण पवार या ३२ वर्षीय तरुणाला भीषण आपघातात आपला जीव गमवावा लागला.लग्न सोहळ्यातील आनंद फार काळ टिकला नाही.परतीच्या प्रवासात वडखळ येथे आल्यावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता कि यात लक्ष्मण पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेले कुटूंबीय जखमी झाले आहेत.यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.दरम्यान जखमी अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे. लक्ष्मण पवार तरुण हा शांत, मनमिळाऊ, निर्व्यसनी म्हणून परिचित होता.धाटाव येथील निलिकाॕन कंपनीत तो कायम स्वरुपी कामगार म्हणून कार्यरत  होता.        निधनाची वार्ता समजताच निलिकाॕन कंपनीचे अधिकारी,मित्र परिवार,नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्यने त्यांच्या घरी जाऊन कुटूंबीयांचे सांत्वन केले.        या दुर्दैवी घटनेसंबंधी माहिती देताना या गावचे सामाजिक कार्यकर्ते महेश ठाकुर यांनी संगितले की,हि अतिशय दुखःद घटना असुन लक्ष्मण पवार या तरुणाच्या जाण्यान
Image
धामणसईचा अक्षय निकम राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत चमकला राजस्थान येथील राष्ट्रीय दिव्यांग पॅराकबड्डी स्पर्धेवर महाराष्ट्रचा झेंडा  तळा-किशोर पितळे कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या रोहा तालुक्यातील एका दिव्यांग्याने केलेल्या चमकदार कामगिरीने रोहा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबाबत सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे      पुष्कर,राज्यस्थान येथे चालू असणाऱ्या राष्ट्रीय दिव्यांग पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र व मुंबई पॅरा कबड्डी संघाने चांगली कामगिरी करत आपले स्थान प्रस्थापित करून आज उपांत्य फेरीत सहभागी झाले आहेत.राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जनार्दनसिंह गहलोत याच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय पॅराकबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने अ- गटात झारखंड बिहार, मुंबई व उत्तर प्रदेश या संघाना हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला तर मुंबई संघाने झारखंड, बिहार व उत्तर प्रदेश या संघाना हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.      महाराष्ट्र संघाकडून  रायगड जिल्ह्यातील राजेश मोकल, अक्षय निकम,ओमकार महाडिक व कर्णधार रमेश संकपाळ, मुकुल खाडे नंदुरबार जिल्ह्यातील महेश वसावे, सांगली जिल्ह्यातील आरिफ शेख आणि मुं
Image
गोवे गावचे अंकुश जाधव यांचे निधन   साधी राहणी असलेल्या एका सेवाव्रतीची चटका लावणारी एक्झिट रोहा-प्रतिनिधी रोहा तालुक्यातील गोवे गावचे कुणबी समाज बांधव अंकुश विठ्ठल जाधव यांचे राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या निधनाने त्यांच्या परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.मृत्यू समयी ते 59 वर्षाचे होते.   अंकुश विठ्ठल जाधव हे कष्टाळू शेतकरी  होते.साधा स्वभाव, साधी राहणी असे जीवन ते हयातभर जगले. गावातील कौटुंबिक कार्यक्रमात ते सहकार्य करण्यासाठी सदैव  पुढे असत.      महावितरण कंपनीचे सेवानिवृत कर्मचारी हरिचंद्र जाधव,सुरेश जाधव यांचे ते लहान बंधू होते. तर गोवे ग्रामपंचायतीच्या सदस्या रंजिता राजेंद्र जाधव यांचे ते दिर होते. गोवे गावचे पत्रकार शरद जाधव यांचे ते चुलते होते.  त्यांच्या अंत्ययात्रेस कुणबी समाजबांधव व आप्त, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दशक्रिया विधी मंगळवार दिनांक 4 जानेवारी रोजी तर उत्तरकार्य 7 जानेवारी रोजी गोवे येथे होणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी , जावई असा परिवार आहे.
Image
देवकान्हे येथील मोफत अस्थिरोग तपासणीला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला  मोफत औषोधोपचाराचा लाभ | कोलाड - श्याम लोखंडे   रोहा तालुक्यातील देवकान्हे येथे लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा आणि दिपक फाऊंडेशन रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रुप ग्रामपंचायत देवकान्हे यांच्या सहकार्याने डॉ.नमिता दिघे,डॉ.प्रशांत गोसावी,डॉ.स्नेहल शेलार,डॉ.विनोद गांधी,आशा तज्ञांमार्फत अस्थिरोग रुग्णांना प्राथमिक तपासणी तसेच त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले.                यावेळी लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाचे उपाध्यक्ष डॉ.मंगेश सानप,दिपक फाऊंडेशन अजय आवाडे, देवकान्हे ग्राम पंचायत चे उपसरपंच सूरज कचरे,सदस्य दयाराम भोईर,शाळेचे मुख्याध्यापक टिकुळे,लायन्स क्लब कोलाड चे सेक्रेटरी रविंद्र लोखंडे,खजिनदार डॉ श्यामभाऊ लोखंडे ,बोर्ड ऑफ डायरेक्टर अनिल महाडिक,लायन महेश तुपकर,राजेंदर कोप्पू,विश्वास निकम,सौ पूजा लोखंडे,दीपक फाऊंडेशनचे सहकारी अश्विनी ऐत,अक्षरा जाधव,नाजुका चौलकर,मारुती निगडे,मल्लेश हंचली,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वास थिटे,आशाताई,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आदी मान्यवर व ग्रामस्थ,महिला
Image
कुणबी युवक सोनगांव ग्रुप संघटना पुन्हा सक्रिय जुन्या-जाणत्या समाज नेत्यांकडून स्वागत | रोहा-शरद जाधव कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न रोहे तालुका कुणबी समाज अंतर्गत सोनगांव कुणबी ग्रुप आपल्या ग्रुपमध्ये व तालुक्यात सामाजिक कार्य करण्यास पुन्हा सक्रिय झाला आहे.समाजकार्यासाठी तरूण युवा पिढी जोमाने कामाला लागली असल्याचे दिसून येत आहे.       रोहे तालुक्यात बहुसंख्येने असलेला कुणबी समाज आज सर्वच बाबतीत पुढारलेला दिसून येत आहे.पुर्वाश्रमीच्या समाजनेत्यांनी संघटनेचे रोपटे लावाले.त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. समाजाचे कार्य व्यापक गतीने पुढे घेऊन जाण्यासाठी कुणबी युवक आता पुढे येत आहेत. सोनगांव विभागात युवा संघटनेला आलेली मरगळ दूर सारून युवावर्ग नव्या जोमाने सामाजिक कार्यात सक्रिय झाला आहे.जुन्या जाणत्या समाज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील तरूण पिढी सामाजिक कार्यात पुढे येऊन गावागावात गाठीभेटी घेताना दिसत आहेत.सध्या रोहे तालुक्यात राजकारणाचा प्रचंड बोलबाला सुरु आहे.नव्या दमा चे  तरुण,यूवा नेत्यांकडे आकर्षित होत आहेत.असे असले तरी राजकारण विरहित गावाची समाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. समाज
Image
" स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड" च्या दिनदर्शिकेचे खासदार तटकरेंच्या हस्ते प्रकाशन    |  कोलाड- श्याम लोखंडे   रोहा तालुक्यातील " स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड " यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सुतारवाडी  गीताबाग येथे रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साह वातावरणात दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन करण्यात आले.  यावेळी अध्यक्ष मारुती राऊत, गोरखनाथ कुर्ले,अविनाश म्हात्रे सर, अशोक कदम, उदय राजपुरकर, प्रविण गांधी, शांताराम महाडिक, मोहन दोशी,खांडेकर,दगडू बामुगडे तसेच स्नेह जेष्ट नागरिक कल्याणकारी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित  होते.
Image
परोपकारी लक्ष्मीबाई म्हस्के यांचे अल्पशा आजाराने निधन पत्रकार केशव म्हस्के यांना मातृशोक रोहा-प्रतिनिधी   रोहा तालुक्यातील खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे खारी-काजुवाडी(दामाणी नगर) येथील रहिवाशी लक्ष्मीबाई रघुनाथ म्हस्के यांचे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बुधवार दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ०३:०८ वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले.     त्यांच्या निधनाची वार्ता समजताच रोहा-आरे दशक्रोशीमध्ये शोककला पसरली आहे.त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.         त्यांच्या पश्चात तीन मुलगे,तीन मुली,सूना, जावई,नातवंडे,पतवांडे असा मोठा परिवार आहे दररोज सायंकाळी "हरिपाठ"आणि"स्वर्गरोहण" या धार्मिक ग्रंथाचे पारायण सुरु असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्रवार दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी ०९:०० ते ११:०० वाजेपर्यंत स्वयंभू श्री शिवालय मंदिर काजुवाडी येथे होतील. तर अंतिम धार्मिक विधी बारावे रविवार दि.०२ जानेवारी २०२२ रोजी राहत्या घरी होतील.   याप्रसंगी रायगड भूषण गुरुवर्य ह.भ.प.मारुती महाराज कोलाटकर(तळवली तर्फे अष्टमी) यांची किर्तनसेवा सकाळी १०
Image
गावदेवी बाहे आयोजित क्रिकेट सामन्यात शिरवली संघ अंतिम विजेता कोलाड- श्याम लोखंडे   रोहा तालुक्यातील गावदेवी बाहे आयोजित  क्रिकेट सामन्यात रॉयल किंग शिरवली संघ अंतिम विजेता ठरला आहे.अंतिम सामना शिरवली व धाकसुद चिल्हे यांच्यात झालेल्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर रॉयलकिंग शिरवली संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला.चिल्हे संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.तसेच स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा गावदेवी बाहे हा संघ मानकरी ठरला.सामनावीर शिरवली संघाचा संकेत लहाने स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज शुभम भोईर, तर उत्कृष्ट  फलंदाज म्हणून चिल्हे संघाचा  संघाचा नितेश कोंडे यांना प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते गौरविण्यात आले . खांब विभागीय क्रिकेट असोसिएशन च्या मान्यतेने गावदेवी बाहे यांच्यावतीने आयोजित केलेल्या स्पर्धा निसर्गरम्य महिसदरा नदिपात्राच्या प्रांगणात भव्यदिव्य असे क्रिकेट सामन्यांचे उद्धघाटन प्रगतशील शेतकरी लिंबाजी थिटे, क्रीडाप्रेमी कपिल बामणे, देवकान्हे ग्रामपंचायत सदस्य रविंद्र राऊत,मोरया डी जे साउंड सर्व्हिस चे मालक ज्ञानेश्वर थिटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उत्स्फुर्तपणे प्रतिसा
Image
शिक्षण महर्षी उमाजी गोरीवले यांचे निधन शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व हरपल्याने सर्वत्र शोककळा  कोलाड - श्याम लोखंडे  रोहा तालुक्यातील तिसे गावचे बहूआयामी व्याक्तिमत्व तालुक्याचे वैभव तथा शिक्षण महर्षी शैक्षणिक, सामाजिक आध्यात्मिक, सांस्कृतिक, कला क्रीडा व राजकीय क्षेत्रात अग्रेसर, करारी बाणा, मलखंबा खेळाचे खेळाडू, वीर हनुमान मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच ग्रुप ग्राम पंचायत ति चे माजी सरपंच,पंधरा वर्षे सरपंच पद भूषविलेले, कुडली विभाग शेतकरी सेवा संघाचे माजी अध्यक्ष अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गावात माध्यमिक शाळा उभारण्यात यशस्वी झाले. त्यामुळे या परिसरातील विविध समाज घटकातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे या करिता सन 2000 साली दिनाभाई मोरे शिक्षण संस्था सानेगाव संचालित शाळा तिसे गावात स्वतःच्या मालकीची शेत जमीन देत कै.कृष्णाजी संभाजी गोरीवले यांच्या नावाने पहिले माध्यमिक हायस्कूल सुरू केले.  महान कर्तबगार थोर बुद्धिमान व्यक्तिमत्व असलेले उमाजी गोरीवले यांचे 24 डिसेंबर रोजी मध्यरात्री वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे गोरीवले कुटूंबावर दुःखाचा डो
Image
कमळाकर चोरगे(गुरुजी)यांचा षष्ठ्यब्दिपुर्ती सोहळा साजरा. अनेक मान्यवरांची उपस्थिती. तळा- किशोर पितळे तळा फोंडळवाडीचे सुपुत्र तथा सेवानिवृत्त शिक्षक कमलाकर चोरगे (गुरूजी) यांचा (६०) षष्ठयब्दीपुर्ती सोहळ्याचे आयोजन काल २४ डिसेंबर २१ रोजी करण्यात आले होते.तसेच या आनंददायी सोहळ्याचे औचित्य साधून नातीचे नामकरण विधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक मित्र मंडळी सन १९७८ सालच्या एस् एस् सी बँचच्या वर्ग मित्रांनी खास आकर्षण होते. हितचिंतक,आजी माजी शिक्षक वर्ग,नगराध्यक्षा रेश्मा मुंढे भाजप प्रदेश सचिव रवीभाऊ मुंढे, डॉ.वडके अँड चेतन चव्हाण,सप्रे मेडिकलचे मालक राजू सप्रे उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी कमळाकर चोरगे (गुरूजी)यांच्या जीवनपटाची पाने उलगडून गरीब कुटुंबात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्ध आत्मविश्वास च्या बळावर शिक्षण घेऊन आदर्श शिक्षक,आदर्श कुटुंब, विद्यार्थी कसे घडविले याबाबत मनोगतात व्यक्त केले. याआनंददायी सोहळ्यात मित्र मंडळी आप्तेष्टनातेवाईक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्र संचालन विजय
Image
  माणगांव तालुक्यातील कालवण गावच्या महिलांची यशोगाथा महिलांच्या उपक्रमाला गावातील तरुण आणि ग्रामस्थांची साथ    | माणगांव-प्रतिनिधी माणगांव तालुक्यातील कालवण गावात महिलांनी सृजनात्मक काम हाती घेऊन नवा आदर्श निर्माण केला.त्या कामास गावातील तरुणवर्ग आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.महिलांच्या पुढाकाराने जुन्या विहिरीची साफसफाई व विहिरीच्या मार्गाचे नूतनीकरण करण्याचे कार्य पूर्ण झाले.या जुन्या विहिरीला नवीन नयनरम्य असे सुंदर रूप आले. ह्या ऐतिहासिक विहिरीमुळेच आजवर एकदाही कालवण ग्रामस्थांवर पाणीटंचाईची वेळ आलेली नाही.निसर्गाच मोठ देणं या गावाला लाभले आहे असे म्हणता येईल. कालवण ग्रामस्थ पूर्वपार ह्या विहिरीचा वापर हा पिण्याच्या पाण्यासाठी करित होते.परंतु काही वर्षांपूर्वी गावात नळपाणीपुरवठा सुविधा सुरू झाल्याने या जुन्या विहिरीचा वापर कमी होत गेला.परिणामी या विहिरीकडे दुर्लक्ष होऊ लागले.त्यामुळे विहिरीत मोठ्या प्रमाणावर गाळ निर्माण झाला.  तसेच विहिरीकडे येणाऱ्या मार्गाची सुद्धा दुरावस्था झाली. यावर उपाय म्हणून सर्व महिलांनी एकत्र येऊन आणि तरुणांच्या सहकार्याने या विहिरीची साफसफाई आणि रस्ता-दुर
Image
तळा नगरपंचायत ४ जागांचे आरक्षण जाहिर दोन जागा महिलांसाठी राखीव तर दोन प्रभाग सर्वसाधारण | तळा-किशोर पितळे  तळा नगरपंचायतीची चार जागांसाठी सुधारीत आरक्षणाची सोडत गुरुवार दि. २३ डिसेंबर रोजी काढण्यात आली.यामध्ये दोन जागा या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत तर दोन जागा या सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.तळा नगरपंचायतीची मुदत गतवर्षीच संपली असून राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणाची सुधारित सोडत काढण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता.त्यानुसार रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तळा नगरपंचायत सदस्यपदाची चार जागांसाठी सुधारित आरक्षण सोडत डॉ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृह पंचायत समिती तळा येथे पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार,तहसीलदार आण्णापा कनशेट्टी ,मुख्याधिकारी माधुरी मडके यांचे नियंत्रणाखाली काढण्यात आली आहे. सुधारीत आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक १(पुसाटी,वडाची वाडी) सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र.३ (बामणघर,बौद्धवाडी,गौळवाडी) सर्वसाधारणमहिला,प्रभाग क्र.१०(सोनार आळी,फोंडळ आळी) सर्वसाधारण, प्रभाग क्र.१४(मेट मोहल्ला फोंडळवाडी) सर्वसाधारण अशी आरक्षणे पडली आहेत.नव्याने काढण्यात आलेल्या या आ
Image
नागोठणे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश पिंपळे यांनी शिवसेनेचे उमदेवार संजय पिंपळे यांचा केला 47 मतांनी पराभव   | नागोठणे-प्रतिनिधी नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कै.शैलेंद्र देशपांडे यांच्या अकाली निधनाने झालेल्या रिक्त जागेसाठी दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी पोटनिवडणुक पार पडली.त्या निवडणुकीचे चित्र आज निकालातुन स्पष्ट झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश पिंपळे यांनी शिवसेनेचे उमदेवार संजय पिंपळे यांचा 47 मतांनी पराभव केला. ह्या पोटनिवडणुकीत प्रभागातील एकूण 1308 मतदारांपैकी 988 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.झालेल्या मतदानानुसार राजेश पिंपळे यांना 513 मते तर संजय पिंपळे यांना 466 मते मिळाली आणि नऊ मतदारांनी नोटा म्हणजेच यापैकी नाहीला पसंती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार श्री.अनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे मधील जेष्ठ कार्यकर्त्यांनी आखलेल्या रणनितीला व राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांच्या मेहनतीला अखेर यश आले.शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य श्री.किशोरभाई जैन तसेच सरपंच आणि कार
Image
तळा नगरपंचायतीच्या दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद एकुण ७३.८२% मतदान, तर  निकालासाठी १९ जानेवारी पर्यंत करावी लागणार प्रतिक्षा | तळा - किशोर पितळे तळा नगरपंचायतीच्या निवडणूकीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.राज्यातील १०५ नगरपंचायतीच्या निवडणुका आज २१ डिसेंबर २०२१ रोजी पार पडल्या.रायगडातील सहा नगरपंचायतीपैकी पाली-सुधागड नव निर्मिती झाली आहे.तळा, माणगांव,पोलादपूर,खालापूर,म्हसळा या नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या.  तळा नगरपंचायत ही शिवसेना पक्षाकडे आहे. तळ्यात एकुण मतदार ५९२९ असून स्त्री मतदार २९१९ व पुरूष ३०१० मतदार आहेत .१७ प्रभागापैकी १२ प्रभागात  निवडणूक पार पडली. शिवसेना ११ राष्ट्रवादी ९ भाजप ४ शेकाप २ मनसे ३ बहुजन वंचित आघाडी १ बहुजन समाजपार्टी १ अपक्ष ५ पैकी १ जागा बिनविरोध विजयी असे  एकूण ३६ उमेदवार उभे होते. खरी लढत ही शिवसेना × राष्ट्रवादी ×भाजप यांच्यात होणार आहे.उमेदवार आपले नशीब आजमावणार असून या सर्व ३५ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले. एकुण ७३.८२% मतदान झाले आहे .यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे.दरम्यान उपविभागीय पोलीस अधिक्षक महाड श्
Image
शिक्षकांच्या कल्पकतेला प्रशासनाचे बळ रायगड जिल्हा परिषदेच्या आदिवासीवाडी  शाळेचा  अभिनव उपक्रम अलिबाग-प्रतिनिधी       कोविड १९ या महामारीमुळे संपूर्ण देशात शिक्षणाची मोठी हानी झालेली दिसून येते.कोरोना मध्ये शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भाषिक मूलभूत अध्ययन कौशल्य व गणिती संबोध विस्मरणात गेल्या आहेत.  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.किरण पाटील साहेब व शिक्षणाधिकारी मा.ज्योत्स्ना शिंदे पवार मॅडम यांनी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग व उपक्रमांना चालना देण्यासाठी गुणवत्ता विकास कक्ष सुरू केला आहे. उपक्रमशील,तंत्रस्नेही व आदर्श शिक्षक श्री.संदीप दत्तात्रय वारगे यांना जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्त करून जिल्हा व तालुका स्तरावर टास्कफोर्स तयार केले आहेत. वारगे सरांनी स्वतःच्या शाळेपासून सुरुवात करीत या उपक्रमामुळे एक आदर्श जिल्ह्यासाठी घालून दिला आहे.  त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम या कार्यक्रमाअंतर्गत "शिक्षणाची वाडी -दिवीवाडी" या शीर्षकाखाली अनेक शैक्षणिक तक्ते व वर्गामध्ये
Image
शिववंदना वाचनालय वाशी ता.रोहा यांच्यावतीने "वेध शिवविचारांचा" ह्या अभिनव उपक्रमाचे आयोजन  रोहा-प्रतिनिधी शनिवार दिनांक डिसेंबर २०२१ रोजी शिववंदना वाचनालय वाशी ता.रोहा यांच्यावतीने "वेध शिवविचारांचा" ह्या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मागील पाच वर्षांपासून शिववंदनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मागील उपक्रमांतुन आपण काय विचार घेतले?आपण काय शिकलो?याचा आढावा घेतला गेला.ह्या छोटेखानी ऊपक्रमात सर्व शिवकन्या आणि शिवप्रेमींनी उत्तम विचार मांडले. कु.विक्रांती जोगडे,कु.गायत्री जंगम,कु.शर्वरी बर्डे,कु.प्रणाली भोईर इ.शिवकन्यांनी आपली मते परखडपणे मांडली. शिवप्रेमी विक्रांत बाकाडे,आयुष बामणे,विराज बाकाडे,श्री.सौरभ खांडेकर यांनी उत्तम नियोजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आर्यन बर्डे याने केले.  शिववंदना वाचनालय वाशी यांच्या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Image
दत्तजयंती उत्सव देवकान्हे- पिंपळवाडी येथे उत्साहात संपन्न        विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन | कोलाड -श्याम लोखंडे  रोहा तालुक्यातील पिंपळवाडी- देवकान्हे येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या उत्सवानिमित्ताने श्री गुरू दत्तात्रेय जन्मोत्सव,सत्य नारायण महापुजा,सायंकाळी रोहा तालुका कोकणदिंडी वारकरी सांप्रदाय यांचे हरिपाठ व ह.भ.प.दिनेशमहाराज कडव यांचे सुश्राव्य हरिकिर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर रात्री महाप्रसाद,महिलांसाठी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री दत्त जयंती निमित्ताने परिसरातील राजकीय,सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार,उद्योजक व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी कार्यक्रमास भेट देऊन दत्तप्रभुंचे दर्शन घेतले.      तर अनेक मान्यवर दानशुर व्यक्तींनी सढळ हस्ते कार्यक्रमासाठी अर्थिक व वस्तूरुप मदत केली.त्यांचे श्री दत्तगुरु मंडळाच्यावतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  पिंपळवाडी-देवकान्हे ग्रामस्थ, महिला व तरुण मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतल
Image
कुंडलिका नागरी सहकारी पतसंस्थेचे भव्य नुतन वास्तूत पदार्पण  केंद्र सरकारने सहकार खाते आपल्या आखत्यारित आणल्याने सहकार क्षेत्राला सुवर्णदिन येणार-खासदार विनय सहस्रबुद्धे सर्व सोयी-सुविधायुक्त शंभर खाटांचे व खास महीलांसाठी सुसज्ज रुग्णालय आपल्या गावांसाठी लवकर मंजूर करून आणणारं-खासदार सुनिल तटकरे | रोहा/अष्टमी-नरेश कुशवाहा  रोहा तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यात सहकार क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात नाव लौकीक कमावलेल्या 28 वर्षे जनतेची अविरत सेवा करणारी कुंडलिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रोहाचा नूतन वास्तुचा उद्धघाटन सोहळा खासदार विनय सहस्रबुद्धे व खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.यावेळी त्यांच्या समवेत कुंडलिका पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, उपाध्यक्ष विवेक वत्सराज ,सहायक निबंधक तुषार लाटणे , सुमुख कुलकर्णी, चार्टर्ड अकाउंटट सतीश मेडी ,सुमुख कुलकर्णी , कमल नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे आदी उपस्थित होते. प्रास्तविक कुंडलिका पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी केले व सुत्र संचालन व आभार प्रदर्शन अशोक जोशी यांनी केले या कार्यक्रमाचे आय
Image
रोह्यात सेवानिवृत्त पेन्शन दिन उत्साहात साजरा  - कोलाड-श्याम लोखंडे  रोहा तालुका शासकीय निमशासकीय सेवा निवृत्त संघटनेमार्फत १७ डिसेंबर हा सेवा निवृत्त वेतन दिवास ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा येथे उत्साह वातावरणात  साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गामुळे मागील दीड -पावणे दोन वर्षाच्या कालखंडात वाढत्या वयोमानानुसार कोरोना महामारीच्या भीतीमुळे सेवा निवृतांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता.परंतु केंद्र सरकार सह राज्य शासनाने राबविलेल्या उपाय योजनामुळे कोरोना महामारी आटोक्यात आली. म्हणूनच आम्हां सेवानिवृत्तांचे जीवन सुरक्षित राहिले व हा समारंभ शासनाने घालून दिलेले नियम पाळून आनंदाने पार पाडू शकलो अशी प्रतिक्रिया उपस्थित सभासदाने यावेळी व्यक्त केली. सर्व सभासदांनी आपले कौटुंबिक जीवन सुख समाधानाने व शांततेने जगावे याकरिता सालाबाद प्रमाणे संघटनेने श्री सत्य नारायण महापुजेचे आयोजन केले असता उपस्थित सर्व सभासदांनी श्रद्धेने व भक्ती भावाने देवतेच्या दर्शनाचा व प्रसादाचा लाभ यावेळी घेतला. सदरचा कार्यक्रम साजरा करत असतांना त्या ठिकाणी उपस्थित सभासदांसाठी संघटनेचे अध्यक्ष मारुती राऊत यांचे अध्यक्षतेखाली एक
Image
उरणमधील अनधिकृत कंटेनर यार्डवर कारवाई करा अन्यथा 26 जानेवारीला पत्रकार करणार लाक्षणिक उपोषण !!! उरण -विशेष प्रतिनिधी        उरण तालुक्यात सततच्या वाहतूक कोंडीला आणि अपघातांना कारणीभूत ठरणारे सर्व अनधिकृत कंटेनर यार्ड आणि गोदामांवर कारवाई करून ते बंद करावेत अन्यथा उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उरण मधील पत्रकार तहसील कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करतील असा इशारा उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी उरणच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, माय मराठी संपादक विरेश मोडखरकर, संजय गायकवाड, अजित पाटील, दिलीप कडू, आशिष पाटील, पूजा चव्हाण, पंकज ठाकूर, विशाल गाडे, प्रवीण कोलापटे, सुयोग  गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते.              उरण तालुक्यातील  राज्यमहामार्ग ५४ आणि राष्ट्रीय महामार्ग ४ ब लगत अनेक बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामे उभी राहिली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या या बेकायदा कंटेनर यार्ड आणि गोदामांची केवळ यादी तहसील कार्यालयाकडून दिली जात असली तरीह