गोवे गावचे अंकुश जाधव यांचे निधन

 साधी राहणी असलेल्या एका सेवाव्रतीची चटका लावणारी एक्झिट

रोहा-प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील गोवे गावचे कुणबी समाज बांधव अंकुश विठ्ठल जाधव यांचे राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या निधनाने त्यांच्या परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.मृत्यू समयी ते 59 वर्षाचे होते.

  अंकुश विठ्ठल जाधव हे कष्टाळू शेतकरी  होते.साधा स्वभाव, साधी राहणी असे जीवन ते हयातभर जगले. गावातील कौटुंबिक कार्यक्रमात ते सहकार्य करण्यासाठी सदैव  पुढे असत. 

    महावितरण कंपनीचे सेवानिवृत कर्मचारी हरिचंद्र जाधव,सुरेश जाधव यांचे ते लहान बंधू होते. तर गोवे ग्रामपंचायतीच्या सदस्या रंजिता राजेंद्र जाधव यांचे ते दिर होते.

गोवे गावचे पत्रकार शरद जाधव यांचे ते चुलते होते.

 त्यांच्या अंत्ययात्रेस कुणबी समाजबांधव व आप्त, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दशक्रिया विधी मंगळवार दिनांक 4 जानेवारी रोजी तर उत्तरकार्य 7 जानेवारी रोजी गोवे येथे होणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी , जावई असा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog