शिवसेना उद्धव ठाकरे गटाला हादरा; ग्रा.पं.उमेदवार आणि ग्रामस्थ यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश
तळा संजय रिकामे
तळा तालुक्यात मांदाड ग्रामपंचायतीमध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच आणि सदस्य पदाचे उमेदवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुतारवाडी येथील पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेश केला. यावेळी तालुका अध्यक्ष नाना भौड, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, सामाजिक न्याय विभाग रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. उत्तम जाधव, उपजिल्हाध्यक्ष कैलास पायगुडे,युवक अध्यक्ष नागेश लोखंडे,माजी उपसभापती गणेश वाघमारे जगदीश शिंदे नरेश पाजणे,अनंत लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.या पक्ष प्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून त्यांना हा मोठा हादरा बसला आहे. मांदाड ग्रामपंचायत येथील विकास कामे केवळ सुनील तटकरे साहेबांनी केली असून पुढील देखील विकास कामे तटकरे साहेब करतील असा असा विश्वास बसल्याने व योग्य तो मान सन्मान मिळणार असल्यानेच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
मागील पाच वर्षे मांदाड ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असून विकास कामांच्या जोरावर पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सज्ज झाले असून या ग्रामपंचायत मध्ये हा पक्ष आघाडी घेताना दिसत आहे.लता उमेश करंजे गितिषा गणेश दांडेकर,गणेश हरिश्चंद्र दांडेकर,उमेश करंजे,सुरेश दांडेकर,अक्षय करंजे प्रशांत दांडेकर,दिलीप दानेकर, नदीम दांडेकर, सूरज भोरावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला खा.सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाल घालून सर्वांचे स्वागत केले.
Comments
Post a Comment