Posts

Showing posts from December, 2022
Image
"समाजात दुःख, वेदना अनेक आहेत, त्यावर फुंकर घातली गेली पाहिजे." - प्रदीप पराडकर यांचे रोह्यात प्रतिपादन जनकल्याण समितीच्या सेवारथ यात्रेचे रोह्यात समारोप रोहा- प्रतिनिधी  "समर्पित भावनेने लोकोपयोगी आणि सेवाभावी कार्य केले गेले पाहिजे, समाजातील दुःख, वेदना अनेक आहेत, त्यावर फुंकर घातली गेली पाहिजे", असे प्रतिपादन रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीचे राज्य कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर यांनी रोहा येथे केले.जनकल्याण समितीतर्फे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सेवारथ यात्रेचे समारोप रोह्यात झाले, त्यावेळी ते बोलत होते. गेली सात दिवस पाचशे किलोमीटरचा प्रवास करून आणि पाच हजार लोकांपर्यंत भेटी देऊन रोह्यात परतलेल्या सेवारथ यात्रेचे समारोप मंगळवारी सायंकाळी मातोश्री मंगल कार्यालयात झाले. यावेळी व्यासपीठावर जनकल्याण समितीचे राज्य कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर, मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोंकणचे कार्यवाह अविनाश धाट, रायगड जिल्हा संघ चालक किसन घाग, समितीचे जिल्हाध्यक्ष जयेश छेडा आदी मान्यवर उपस्थित होते.   याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रदीप पराडकर बोलत होते.
Image
मालसई येथील रामचंद्र महादू तेलंगे यांचे आकस्मिक निधन सेवानिवृत्त कर्मचारी,कब्बडीपटू,व्यावसायिक व गावाशी नाळ जोडलेले व्यक्तीमत्व हरपल्याने सर्वत्र हळहळ रोहा-प्रतिनिधी        मालसई गावातील रामचंद्र महादू तेलंगे यांचे शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी रोहा येथील राहत्या ह्दय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 74 वर्षे होते. कै.रामचंद्र महादू तेलंगे हे मालसई गावचे सल्लागार होते.गावच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभायचे.उत्कृष्ट कबड्डीपटू अशी त्यांची ओळख होती. स्वभावाने मनमिळावू असल्याने त्यांचा मोठा जनसंपर्क होता.पाटबंधारे विभागात त्यांनी  कर्मचारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष सेवा केली.ते पाटबंधारे विभागात कार्यरत असताना मालसई व त्या लगतच्या गावांना पाण्याच्या समस्या कधीही भेडसावल्या नाहीत.पाटबंधारे विभागातील सरकारी कर्मचारी म्हणून त्यांनी आपले कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडले.  सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेतीत मन रमवले.कै.रामचंद्र तेलंगे यांना "अण्णा" म्हणून संपूर्ण गाव ओळखत असे.गावातील सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार होता.कै.रामचंद्र तेलंग
Image
ग्राहकांना सेवा देणे हे दुकानदारांचे कर्तव्य उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे रास्तभाव धान्य दुकानांमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा तळा :संजय रिकामे  तळा रास्त भाव धान्य दुकान नंबर १ मध्ये २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून तहसीलदार ए.एम. कनशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, रास्त भाव धान्य दुकानदार अध्यक्ष बबन (भाऊ) भौड सचिव रमण कोलवणकर,तानाजी कालप, गणेश वाघमारे शिव भोजन केंद्राचे संचालक राजाराम तळकर पत्रकार किशोर पितळे पत्रकार आंबेगावे, महसूल लेखनिक संदीप आखाडे मोरेश्वर फुलारे, राजेंद्र कुडेकर सर मिलिंद दलाल इत्यादी उपस्थित होते.                उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी ग्राहक दिनाचे महत्व विषद केले.१९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते.ग्राहकांना सेवा देणे हे दुक
Image
"भक्ती हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे" --दिनेश महाराज कडव मुठवली येथे तुपकर परिवाराचे श्रीसत्यनारायण महापुजा प्रसंगी किर्तनरुपी सेवेप्रसंगी महाराजांनी केले मार्गदर्शन रोहा-प्रतिनिधी "भक्ती हा जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे भक्तीमय उद्गार", ह.भ.प.दिनेश महाराज कडव यांनी आपल्या हरिकिर्तनरूपी सेवेप्रसंगी उपस्थित भाविकांना संबोधित करताना काढले.        रोहे तालुक्यातील मुठवली खु.येथे समस्त तुपकर परिवाराचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुलस्वामीनी उत्सव तथा श्रीसत्यनारायणाची महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम प्रसंगी ह.भ.प.दिनेश महाराज कडव यांच्या हरिकिर्तनरूपी सेवेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.वै.गुरूवर्य अलिबागकर महाराज, गोपाळबाबा वाजे व धोंडू बाबा कोलाटकर यांचे कृपाछत्राखाली व रायगड भूषण ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील व ह.भ.प.भाऊमहाराज निकम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी श्री.सत्यनारायणाची महापूजा,महाआरती, महाप्रसाद, हरिपाठ,हरिकिर्तन व जागर भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागातील ह.भ.प. नाना महाराज देशमुख,क
Image
एम.पी.एस. एस.इंग्लिश मेडि.कोलाडचा वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा खांब-रोहा/नंदकुमार मरवडे  एम.पी.एस.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल आंबेवाडी-कोलाडचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्सव पार पडला.           दिनांक २२ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शासकीय अधिकारी सूर्यकांत विरकर व त्यांच्या पत्नी स्नेहा विरकर यांना निमंत्रित करण्यात आले होते तर सोहळ्याचे उद्घाटन शाळेचे उपाध्यक्ष सुनील महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचे आगमन होताच दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेली मानवंदना ही पाहुण्यांना भारावून टाकणारी होती क्रीडांगणावरील व्यासपीठावर पाहुणे म्हणून विराजमान होतात क्रीडा स्पर्धेची ओळख असणारी मशाल मैदानात फिरवण्यात आली .पाहुण्यांचा सत्कार सुनील महाडिक यांच्या हस्ते  करण्यात आला तसेच शाळेचे उपाध्यक्ष सुनील महाडिक, शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली महाडिक आणि स्पोर्ट्स कॅप्टन यांचेही स्वागत करण्यात आले .त्यानंतर सर्वांनी सांघिक कवायत आणि केजी पासून सातवीपर्यंतच्या प्रत्येक वर्गाने क्रीडा साहित्यावर आधारित कवायत सादर केली. य
Image
अवचितगड प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक बांधिलकीतुन रा.जि.प.शाळा रेवोली येथील विद्यार्थ्यांना ओळखपत्र व खाऊचे वाटप  रोहा-प्रतिनिधी रोहा तालुक्यातील अवचितगड प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उदय मोरे यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा रेवोली व अंगणवाडी  रेवोली मधील मुला-मुलींना ओळखपत्र व शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.           सदर साहित्य वाटपाचा कार्यक्रम रोहा पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव महाले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.गेली तीन वर्ष हा उपक्रम अवचितगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण पत्रकार उदय मोरे, सेवानिवृत्त रायगड जिल्हा परिषद चे कार्यकारी अभियंता के. वाय. बारदेस्कर यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविला जातो. अवचितगड प्रतिष्ठानच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचे कौतुक करून ग्रामीण भागातील मुलामुलींना शैक्षणिक उत्साह निर्माण करण्याचा हा चांगला प्रयत्न आहे, असे माजी सभापती लक्ष्मणराव महाले म्हणाले. मुलांमध्ये  शिक्षणाबद्दल आवड व जन जागृती निर्माण व्हावी या हेतूने अवचितगड प्रतिष्ठान ने सामाजिक बांधिलकी जपत अल्पशः प्रयत्न केला आ
Image
अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द स्वदेस श्रेष्ठ शाळा पुरस्काराने सन्मानित   प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मान  तळा-संजय रिकामे जिल्हा परिषद रायगड येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापिका झरीना स्क्रूवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, स्वदेस उपसंचालक तुषार इनामदार यांच्या हस्ते स्वदेस श्रेष्ठ शाळा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.      स्वदेस फाउंडेशनच्या वतीने माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी स्वदेस श्रेष्ठ शाळा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 126 प्राथमिक व माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. सहभागी शाळांचे मूल्यांकन शाळा सिद्धी व स्वदेस ध्येयांच्या धर्तीवर करण्यात आले होते. यानुसार अंतिम फेरीमध्ये 26 शाळा पोहोचल्या होत्या, यांचे मूल्यावर शिक्षणतज्ञांकडून करण्यात आले होते.माध्यमिक शाळेमध्ये तळा तालुक्यातील अभिनव ज्ञानमंदिर, उसर खुर्द या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला....! व   प्राथमिक शाळेमध्ये माणगाव तालुक्यातील रानवडेकोंड.                 
Image
धाटाव येथील विधी स्पेशलीटी फूड इंग्रीडेंट्स लिमिटेड मध्ये जनरल मजदुर सभा ठाणे युनियनची पुनश्च स्थापना रोहा /अष्टमी-नरेश कुशवाहा "आपण पुन्हा एकत्र येऊन माझ्या वर विश्वास ठेवत आपली जनरल मजदुर सभा ठाणे युनियन स्थापन केली आपण सर्व जण एकत्र काम करून कामगारांना न्याय मिळवून देऊ असी ग्वाही मी सर्व पदाधिकारी व कामगारांना देतो आणि आपल्या युनियन मध्ये सर्वांचे स्वागत करतो आपण जवळ जवळ दहा वर्षे लांब राहिलो त्यामुळे आपलं कामगार मित्रांचं नक्कीच नुकसान झाले आहे, पण काळजी करू नका. आपण आता एकत्र काम करुन ती भर काढु. तुम्ही विचार करत होतात, काही वर्षांपूर्वी आपण वेगळे झालो होतो. आता साहेबांसमोर कसे जाऊ. पण माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. माझ्या सोबत आहेत ते पण आपले आणि जे सोडून गेले ते पण आपले. मी माझं कर्तव्य करतो आणि न्याय मिळवून देतो" असे प्रतिपादन जनरल मजदुर सभा ठाणेचे जनरल सेक्रेटरी सुर्यकांत वढावकर यांनी केले. ते धाटाव येथील विधी स्पेसिलीटी फुड इंग्रीडेंटेस लिमिटेड कंपनीत युनियन स्थापनेच्या वेळी बोलत होते.   या वेळी युनियनचे बोर्ड कंपनी समोर लावून श्रीफळं वाढवुन अनावरण करण्यात आले. 
Image
सर्वेश थळे द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित रोहा-प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय आर्चरी खेळाडू कु. सर्वेश थळे यास द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.          रायगड जिल्ह्यतील उरण येथील अत्यंत नामांकित व मानांकित द्रोणागिरी स्पोर्ट असोसिटशन तर्फे संपन्न करण्यात आलेल्या २२ व्या क्रीडा महोत्सवात कु. सर्वेश निवास थळे या आंतराष्ट्रीय आर्चरी खेळाडूला द्रोणागिरी भूषण या राज्यस्तरीय पुरस्कार या सन्मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.           उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मनोहर भोईर, नरवीर तानाजी मालुसरे व सूर्याजी मालसुरे यांचे वंशज अनिल मालसुरे,द्रोणागिरी स्पोर्टस् असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष महादेव घरत व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला आहे.          कु.सर्वेश थळे याने अत्यंत कमी वयात आर्चरी क्रीडा प्रकारात विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणावर पारितोषिकं मिळविली आहेत.तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याने आपल्या देशाचे नेतृत्व करून आपल्या देशाचा सन्मान वाढविला आहे.सर्वेशच्या या उज्ज्वल कामगिरीची दखल घेऊन द्रोणागिरी स्पोर्ट अस
Image
ट्रस्टची ध्येय धोरण समजुन घेणे ही काळाची गरज- ट्रस्ट अध्यक्ष अशोक दाते  रायगड जिल्हा कार्यकारणी संयुक्त सभा उत्साहात संपन्न तळा-संजय रिकामे महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट यांची रायगड जिल्हा येथील स्थानिक शाखा संयुक्त सभा गुरुवार दिनांक २२.१२.२२ रोजी गोवेळे विभाग सहाय्यक समिती श्रीकृष्ण मंदिर सभागृह चिंचवलीवाडी गोरेगाव येथे पार पडली या सभेसाठी महारष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक दाते, उपाध्यक्ष सहदेव काते, सरचिटणीस राजेंद्र महाडिक,खजिनदार गंगाराम महाडिक,सह चिटणीस प्रशांत केळसकर, विश्वस्त अजय बिरवटकर, अविनाश कांबळे, चंद्रकांत चीले,सुरेश तांबडे,उदय पाटील,प्रीती खताते, सुप्रिया पगार माजी अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी विश्वस्त सुरेश पागार सर्व शाखांचे अध्यक्ष समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री कृष्ण प्रतीमेचे पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले तदनंतर प्रमुख पाहुणे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.यावेळी मृत पावलेले सभासद ज्ञाती बांधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
Image
प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध  रोहा-प्रतिनिधी            राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना राज्य शासनाने दडपशाहीने  निलंबित करण्यात आले. त्या घटनेच्या निषेधार्थ रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे,तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, शहर अध्यक्ष अमित उकडे, तालुका अध्यक्षा प्रितम पाटील ,शहर अध्यक्षा प्राजक्ता चव्हाण,मयूर दिवेकर, महेंद्र गुजर,पडवळ, समाधान शिंदे, स्वप्निल शिंदे, संतोष पार्टे, सुरेखा पार्टे,सतिश भगत आदि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. 👇👇 व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
Image
तळवली तर्फे अष्टमी ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व तर थेट सरपंचपदी रविंद्र मरवडे यांची निवड खांब-रोहा-नंदकुमार मरवडे संपुर्ण रोहे तालुक्याचे लक्ष लागलेल्या तळवली तर्फे अष्टमी ग्रु.ग्रा.पंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकीत येथील ग्राम विकास आघाडीने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून थेट सरपंचपदासह सर्वच्या सर्व उर्वरित ७ जागांवर विजय मिळवून आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.        विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून व निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप व भाजपा यांनी ग्रा.विकास आघाडी निर्माण करून ही निवडणूक लढवून हा विजय संपादित केला आहे.तर प्रत्यक्ष मतदानापूर्वीच या आघाडीची एक जागा बिनविरोध आल्याने आघाडीला शुभ शकून झाल्याने आघाडीचे मनोधैर्य अगोदरच वाढल्याने व प्रत्यक्षात निवडणूक कालावधीत केवल विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवून व विजय संपादन करून आपले विजयाचे ध्येय साध्य केले आहे.            तर  निकालाच्या दिवशी मतमोजणी नंतर निकाल हाती येऊन सर्वच्या सर्व जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी घोषित झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप व भाजपा आदी पक्षांच्या कार्यकर्त्या
Image
मालसईच्या युवतीची अभिमानास्पद कामगिरी  "अवंतिका मोहिते "ठरली आयकाॅन आॕफ महाराष्ट्र माॅडेलिंग स्पर्धेची विजेती रोहा-रविना मालुसरे-भोसले फॕशन शो,माॕडलिंग हे शहरी युवा वर्गाचे असलेले स्वप्न एका छोट्याशा खेडेगावातील युवतीने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर पुर्ण केले आहे.हि यशोगाथा आहे "अवंतिकाची". रोहे तालुक्यातील मालसई गावची सुकन्या असलेली, अवंतिका अनिल मोहिते हि माॅडेलिंग स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करून विजेती ठरली आहे.             आयकाॅन आॉफ महाराष्ट्र यांच्या वतीने सदरची माॅडेलिंग स्पर्धा ही मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध शहरं आणि विभागातून मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाले होते. ग्रामीण भागातून या मोठ्या स्पर्धेत अवंतिकाने सहभाग नोंदवून या स्पर्धेत विजयाची मोहर उमटविल्याने तिच्या या सुयशाबद्दल सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.सध्या ती एम‌.बी.मोरे महाविद्यालय धाटाव येथे आपले विद्यालयीन शिक्षण घेत आहे.        माॅडेलिंग या क्षेत्राबद्दल अवंतिकाला लहानपणापासून विशेष अशी आवड असून त्याच क्षेत्रात आपले करिअर
Image
रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या सेवारथयात्रेस रोह्यातून प्रारंभ  रोहा-प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या सुवर्ण मोहोत्सवी वर्षानिमित्त मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये सेवा रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून याचा प्रारंभ मंगळवारी रोह्याच्या श्रीराम मारुती चौकातून करण्यात आला.  गेली पन्नास वर्ष जनकल्याण समितीच्या माध्यमातून शिक्षण ,आरोग्य ,संस्कार ,कृषी ,पर्यावरण ,स्वावलंबन ,पुर्वाचल ,आपत्ती आदी विषयांमध्ये सखोल कार्य सुरू असून ,समितीचे हे सुवर्णमोहोत्सवी वर्ष असल्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहॆ.  जनकल्याण समितीचे काम जनमानसात सर्वदूर पोचावे हा या सेवारथाचा प्रमुख उद्देश असून या माध्यमातून रोहा ,पाली ,नागोठणे ,माणगाव ,पोलादपूर ,महाड ,म्हसळा ,श्रीवर्धन ,तळा ,मुरुड आदी ठिकाणी 5000 लोकांपर्यंत संपर्क करण्याचा मानस असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.  रोहे येथून ह्या सेवारथाचा माजी नगरसेविका तसेच श्री स्वामी समर्थ मठाच्या सेवेकरी सौ. अपर्णा पिंपळे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.  यावेळी श्रीराम मंदिर रोहे
Image
धाटावनगरीत अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प.नारायण वाजे महाराजांच्या किर्तनाने सारेच मंत्रमुग्ध माजी मंत्री आमदार अदिती तटकरे यांची उपस्थिती धाटाव-शशिकांत मोरे        रोहा तालुक्यात धाटावनगरीत किल्ला धाटाव पंचक्रोशी यांच्या माध्यमातून आयोजित वारकरी सांप्रदायाच्या वतीने सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात रात्री हभप नारायण वाजे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.त्यांच्या किर्तनांने संबंध रोहा तालुक्यातील वारकरी वर्गासह उपस्थित श्रोतेगणही मंत्रमुग्ध झाल्याचे पहावयास मिळाले.     पंढरपूर येथील प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प.श्री नारायण.वाजे महाराज यांनी राष्टसंत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव,आपणचि देव होय गुरू॥१ पढियें देहभावें पुरवि वासना,अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥,मागें पुढें उभा राहे सांभाळीत,आलिया आघात निवारावे,योगक्षेम जाणे त्याचे जरी । वाट दावी करीं धरूनियां,तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी हा अभंग कीर्तनासाठी घेतला होता.       आपल्या सुश्राव्य कीर्तनातून त्यांनी अनेक विषयांना स्पर्श करीत ते म्हणाले की अभंग श्रीमद्भगवद्गीयेत नाही,
Image
महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून संतांनी फार मोठी कामगिरी केली -ह.भ.प.आत्माराम महाराज कुटे(शास्त्री) धाटाव -शशिकांत मोरे          संतांचे आणि समाजाचे विशेष असे नाते आहे.त्यामुळे वारकरी संप्रदाय म्हणजे एक सामाजिक चळवळ झाली आहे.संतांच्या अभंगानी फार मोठी क्रांती केली आहे.अभंगामुळे समाजातील विविध बदल,परिवर्तन घडण्यासाठी मदत झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून संतांनी फार मोठी कामगिरी केली असल्याचे प्रबोधनात्मक भावोद्गार आळंदी देवाची येथील श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक ह.भ.प.आत्माराम महाराज कुटे(शास्त्री) यांनी केले.     हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या धाटाव किल्ला पंचक्रोशी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात प्रबोधन करताना ते बोलत होते.राष्ट्रसंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा कीर्तनासाठी घेतलेल्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी,देव न लगे देव न लगे,सांठवणाचे रुंधले जागे,देव मंदला देव मंदला, भाव बुडाला काय करूं,देव घ्या फुका देव घ्या फुका,न लगे रुका मोल कांहीं,दुबळा तुका भावेंविण, उधारा देव घेत
Image
लायन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम  उर्जा संवर्धनावर संवादाचे आयोजन रोहा-प्रतिनिधी लायन्स क्लब रोहा च्या वतीने "राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे" औचित्य साधून रोहा नगरपरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धन काळाची गरज या विषयावर 16 डिसेंबर ला संवादाचे आयोजन केले होते. यावेळी 150 विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धनाची शपथ घेतली. ऊर्जा संवर्धन क्षेत्रातील तरुण तज्ञ लिओ ऋषिकेश डाळे हे प्रमुख मार्गदर्शक होते.ऋषिकेश डाळे इशरे ह्या राष्ट्रीय संस्थेच्या ठाणे विभागाचे यूथ चेयर असुन Jacobs ह्या कंपनी मध्ये इंजीनियर पदावर काम करतात.     विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ऊर्जा म्हणजे काय, पारंपरिक आणि अपारंपारिक  ऊर्जा स्त्रोत, त्यांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर काय उपक्रम आहेत. आपण आपल्या दैन दिन जीवनात आपण प्रत्येक जण कशा प्रकारे ऊर्जेचा अपव्यय टाळू शकतो या विषयी माहिती दिली.  कार्यक्रमासाठी मुख्यध्यापक दिपक लांगे, सुविधा दांडेकर, श्रद्धा साळुंखे, स्नेहा तांडेल, अमृता बोरये, दर्शना पाटील, जान्हवी जंजिरकर, लायन्स क्लब चे वरिष्ठ सभासद लायन वेंकट माने, लायन पी बी
Image
गोफण येथील सेवावृत्तीचे नारायण कडू यांचे दुःखद निधन  रोहा-प्रतिनिधी              रोहा तालुक्यातील गोफण या गावचे रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण महादू कडू यांचे रविवारी दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले.त्यांचे वय 75 वर्षे होते. नारायण कडू, "आप्पा" हे गोरगरीब जनतेसाठी झटणारे होते.गोफण गावच्या विकास कामांमध्ये त्यांचा मोठा  वाटा होता. समाजहित व लोकसेवा करणे यामध्ये ते नेहमी तत्पर असायचे.धार्मिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असायचा. अभ्यासूवृत्ती असल्यामुळे त्यांचं वकृत्व हे नेहमी प्रभावशाली होते. त्यांनी जनतेची निस्वार्थपणे सेवा केली.ते नामधारी राधास्वामी सत्संग ब्यास पंजाब मध्ये  आयुष्य समर्पित केले.नारायण महादू कडू "आप्पा" यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या अकस्मित निधनाने कडू परिवार कुटुंब'नातेवाईक, मित्रपरिवार यांसह ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे."असा माणूस पुन्हा होणे नाही".  त्यांचे पुढील विधी दशक्रिया 20 डिसेंबर 2022 रोजी गोफण येथे होणार आहे. उत्तरकार्य 23 डिसेंबर 2022 र
Image
उडदवणे येथे लायन्स क्लब रोहा -कोलाड यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न रोहा-प्रतिनिधी  लायन्स क्लब रोहा- लायन्स क्लब कोलाड यांच्यावतीने तसेच लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग,समता फाउंडेशन मुंबई,अंशुल स्पेशलिस्ट मोलेक्युल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक १० डिसेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर प्राथमिक शाळा उडदवणे येथे संपन्न झाले.  या शिबिरामध्ये उडदवणे तसेच आजूबाजूच्या गावातील ७० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला . शिबीर यशस्वी करण्यासाठी सचिन गायकर मोरेश्वर माळी, सुधीर गायकर, प्रदीप कासारे,तेजस गायकर,गणपत गायकवाड,रोशन ठाकूर ,रोहित माळी, दिपक कोल्हटकर, संतोष गायकर,नितेश शिंदे, महेश तुपकर ,सागर मांटे,संदीप कोल्हटकर,चंद्रकांत गायकर,रुचिता गायकर,पूजा गायकर, साक्षी गायकर, काजळ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सरिता गायकर तसेच युवा नेतृत्व रविंद्र ठाकूर आणि ग्रामस्थ मंडळ उडदवणे यांनी अथक परिश्रम घेतले. या सामाजिक उपक्रमाचा समाजातील तळागाळातील जनतेला लाभ झाल्यामुळे शिबीराचा हेतू साध्य झाल्याचे म्हटले जात आहे.
Image
रोहा तालुक्यातील सुखदरवाडी येथे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न रोहा-प्रतिनिधी            रोहा तालुक्यातील सुखदरवाडी येथे दत्त जयंती निमित्ताने दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दिनांक ७ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली.दरवर्षी सुखदरवाडी येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जन्म उत्सव, हरिपाठ इत्यादी नियोजित कार्यक्रम पार पाडले. घोसाळे ग्रामपंचायत सरपंच सौ.प्रतिभा  पार्टे यांनी महिलांसाठी हळदीकुंकू केले.  रात्री साडेनऊ ते अकरा पर्यंत ह.भ.प. विनायक हरिभाऊ शिंदे महाराज यांचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कीर्तन झाल्यानंतर महिलांनी संगीत खुर्ची, कबड्डी यांसारखे खेळ खेळून आनंद लुटला.  दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक ८ डिसेंबर सकाळी ठीक नऊ वाजता पालखी सोहळा संपन्न झाला. या पालखी सोहळ्यात सुखदरवाडीतील तरुण, तरुणी, ग्रामस्थ ,महिला मंडळ यांनी लेझीमच्या तालावर नाचत पालखी सोहळा पार पाडला. यावेळी गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.  पालखी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ, मुंबई
Image
"मैदान कुठलेही असो,त्याठिकाणी एकजुटीने राहायचं आणि जिंकायचं"-आ. आदित्य ठाकरे. रोह्यात राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला सुरुवात,कुमार गटात पुणे तर मुली गटात ठाण्याची विजयी सलामी कै.नथुराम पाटील क्रीडा नगरीतून        शहरी भागात खेळाची मैदाने सध्या आर्टीफिशियल बनली असली तरी मातीत खेळण्याची मजा वेगळी असून मातीचा सुगंधही वेगळा आहे.त्यामुळे मातीची मैदाने टिकली पाहिजेत.क्रिकेट या खेळाचा प्रसार झाला कारण या खेळाचे एडमिनिस्ट्रेशन गावोगावी आहे.गावातील मुले मुली या खेळात पुढे आली आणि आपण जगात क्रिकेट खेळात एक नंबर बनलो.  देशाला एकत्र आणण्याचे काम खेळ करतो. नेल्सन मंडेला यांनी फुटबॉल खेळाच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिका देश एकत्र आणला आणि देश स्वतंत्र झाला.  या स्पर्धेतून कुमार आणि मुलींची निवडचाचणी होणार आहे आणि या निवड चाचणीतून महाराष्ट्राच्या संघाचा झेंडा तुमच्या हातात येणार आहे.महाराष्ट्रासाठी मेडल आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे त्यामुळे मैदान कुठलेही असो,त्याठिकाणी एकजुटीने राहायचं आणि जिंकायचं असे आपल्या भाषणात क्रीडापटूंना सल्ला देताना शिवसेनेचे युवा सेना प्रमुख,आ.आदित्य ठाकरे म्हणा
Image
रोहे हनुमान नगर येथे श्री दत्तजन्मोत्सव व  श्रीसत्यनारायण महापूजेचे आयोजन खारी/रोहा (केशव म्हस्के ) रोहे शहरातील हनुमान नगर येथे बुधवार दि.०७ डिसेंबर २०२२ रोजी मार्गशीर्ष शु.पौर्णिमा श्रीदत्त जयंती जन्मोत्सव सोहळा व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.         सालाबाद प्रमाणे याहीवर्षी घोसाळे रोड हनुमान टेकडीच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या हनुमान नगर येथील श्री दत्त मंदिरामध्ये मार्गशीर्ष शु.पौर्णिमा श्रीदत्त जयंती जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे.   बुधवार दि.०७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ०७:३० "श्रीं"च्या मूर्तीवर अभिषेक,०९:०० वाजता श्री.सत्यनारायणाची महापूजा,दुपारी ०३:०० ते ०५:०० दरम्यान रायगड भूषण पुरस्कार प्राप्त गुरुवर्य हभप. बाळाराम महाराज शेळके (रायकरपार्क - रोहा) यांचे श्री दत्तजन्मोत्सव पर हरी कीर्तन सेवा,महाआरती पूजा विधी सायंकाळी ०७:३० ते १०:०० वाजेपर्यंत तीर्थ प्रसाद महाप्रसादि अन्नप्रसाद तद्नंतर स्थानिक महिलांकरिता विशेष मेजवानी म्हणून "होम मिनिस्टर"आदी विविध अध्यात्मिक,धार्मिक,सांस्कृतिक व मनोरंजनात्मक  कार्यक्रमाचे करण्यात आले
Image
धाटावमधे दिनांक ८ ते ११ डिसेंबर दरम्यान  स्व.नथुरामभाऊ पाटील क्रीडांगणावर ४८ वी कुमार- मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा खो-खो खेळाला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार :- आ.अनिकेत तटकरे   धाटाव-शशिकांत मोरे         देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाचा प्रचार आणि प्रसार करीत या खो खोच्या खेळाबाबतची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार तथा रायगड खो खो असोसिएशनचे जिल्ह्याध्यक्ष अनिकेत तटकरे यांनी केले.       महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे देण्यात आलेल्या मान्यतेनुसार रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील धाटावमधे परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले विद्यालयात ८ ते ११ डिसेंबर रोजी स्व.नथुरामभाऊ पाटील क्रीडांगणावर आयोजित ४८ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेच्या नियोजनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यासमयी महाराष्ट्र खो खो असो.चे उपाध्यक्ष विजय मोरे,अलंकार कोठेकर,राष्ट्रवादी का
Image
रोह्यात जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त राज्य स्तरीय कुमार व मुली खो-खो स्पर्धेचे आयोजन रोहा /अष्टमी-नरेश कुशवाहा रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान व रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन तर्फे परम पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले हायस्कूल धाटाव येथील नथुराम भाई पाटील पटांगणामध्ये 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2022  रोजी राज्य स्तरीय कुमार व मुली खो-खो स्पर्धा संपन्न होणार आहेत.  अशी माहिती रायगड जिल्हा खो-खो असोशिएशन अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.   या वेळी आमदार अनिकेत तटकरे यांच्या  समवेत महाराष्ट्र राज्य खो-खो असोशिएशन उपाध्यक्ष विजयराव मोरे , कोठेकर सर ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष प्रितम ताई पाटील, स्नेहा ताडकर ,अमित मोहिते,अनंत मगर,  सतिश भगत,घनश्याम कराळे,मयुर खैरे, किरण मोरे,प्रशांत बर्डे,महेश बामुगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी आमदार आनिकेत तटकरे यांनी माहिती देताना सांगितले की,ह्या स्पर्धेत राज्यभरातील 24 कुमा