रोहा तालुक्यातील सुखदरवाडी येथे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

रोहा-प्रतिनिधी

           रोहा तालुक्यातील सुखदरवाडी येथे दत्त जयंती निमित्ताने दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बुधवार दिनांक ७ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली.दरवर्षी सुखदरवाडी येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होते.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जन्म उत्सव, हरिपाठ इत्यादी नियोजित कार्यक्रम पार पाडले. घोसाळे ग्रामपंचायत सरपंच सौ.प्रतिभा  पार्टे यांनी महिलांसाठी हळदीकुंकू केले. 

रात्री साडेनऊ ते अकरा पर्यंत ह.भ.प. विनायक हरिभाऊ शिंदे महाराज यांचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कीर्तन झाल्यानंतर महिलांनी संगीत खुर्ची, कबड्डी यांसारखे खेळ खेळून आनंद लुटला.

 दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक ८ डिसेंबर सकाळी ठीक नऊ वाजता पालखी सोहळा संपन्न झाला. या पालखी सोहळ्यात सुखदरवाडीतील तरुण, तरुणी, ग्रामस्थ ,महिला मंडळ यांनी लेझीमच्या तालावर नाचत पालखी सोहळा पार पाडला. यावेळी गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. 

पालखी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ,महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog