Posts

Showing posts from November, 2021
Image
मुबंई गोवा महामार्गावरील असलेल्या महिसदरा पुलावरील रस्त्याला जीवघेणे खड्डे    सहा महिन्यांपासून दुरुस्ती सुरूच               को लाड - श्याम लोखंडे  मुबंई गोवा महामार्गावरील पुई पेट्रोल पंपाच्या बाजूला  महिसदरा नदीपात्रावर पूल आहे. या पुलाच्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून हे जीवघेणे खड्डे अत्यंत धोकादायक असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांच्या जीवाशी खेळणारे खड्डे असल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे तर मागील सहा महिन्यांपासून या पुलाचे दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे दुरुस्तीचे काम सुरूच आहे. अजून त्याची दुरूस्ती किती महिने सुरू राहील? असा संतापजनक सवाल आता प्रवाशी नागरिक करत आहेत .                 खड्ड्यांबाबतीत रायगड जिल्हा अग्रेसर आहे. वास्तविक मुंबई गोवा महामार्गावर असलेले हे खड्डे बळी घेण्याची वाट पाहत आहेत काय ? असा ज्वलंत प्रश्न नागरिकांना पडला आहे. पुई येथील समाजसेवक श्री.निलेशभाई महाडिक यांनी पत्रकारांना सांगितले मुंबई महामार्गावरील हे रस्ते आहेत की खड्ड्यातील रस्ते असा ज्वलंत प्रश्न दरवर्षी रस्त्यावर जे जीवघे
Image
आळंदी-अलंकापुरीत लोटला भाविकांचा जनसागर ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात अनेक पायी दिंड्यां दाखल प्रशासकीय यंत्रणा सज्ज         कोलाड-श्याम लोखंडे                    वारी वृत्तांत    'ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पुज्यस्थानी, चिंतकांचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा...' असे म्हणत खांद्यावरील भगव्या पताका उंचावत वैष्णवांची मांदियाळी अनंत काळपासून आळंदी आलंकापुरीत माऊलींच्या संजीवन समाधी दिन पायी दिंडी सह भाविक लाखोंच्या संख्येने या समाधि सोहळ्यासाठी दाखल होत असून कार्तिकी एकादशी निमित्ताने लाखो भाविकांच्या वतीने मोठ्या भक्ती-भावाने माऊलीला प्रदक्षिणा व संजवनी समाधी सोहळ्याकरीता या ठिकाणी स्थानिक पालिका यंत्रणेसह आरोग्य व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.           मागील दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे शासकीय  निर्बंध असल्याने लाखो वारकरी भक्तगणांच्या वारीत खंड पडला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेला श्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा शासनाच्या अटी शर्ती नुसार संपन्न होत असलेल्या समाधी सोहळ्याकरीता रविवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत महाराष्ट्राच
Image
आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी दिली यशवंतखार येथील सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर यांचे निवासस्थानी सदिच्छा  भेट रोहा-प्रतिनिधी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी यशवंतखार येथील सरपंच सौ.स्वप्नाली संतोष भोईर यांचे निवासस्थानी दि.२७ नोव्हेंबर रोजी सदिच्छा भेट दिली.निमित्त होते  सानेगाव-यशवंतखार येथील युवा नेतृत्व श्री.संतोष नथुराम भोईर यांच्या पुतण्याच्या विवाहाचे. यशवंतखार ता.रोहा येथील रहिवासी असलेले व रायगड पोलीस दलातील कर्तबगार पोलीस कर्मचारी रामचंद्र नथुराम भोईर यांचे अल्पशा आजाराने काही दिवसांपुर्वी दुखद निधन झाले होते. त्यांचा जेष्ठ पुत्र चि.तुषार याचा विवाह सोहळा  दि.२८ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला आहे. त्याचे औचित्य साधुन आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी चि.तुषार याला शुभेच्छा देण्यासाठी श्री.संतोष भोईर यांच्या निमंत्रणावरुन सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी भोईर कुटूंबीयांची आपुलकीने चौकशी केली व त्यांना विवाह समारंभासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
Image
रोहा मच्छी मार्केटच्या नुतन वास्तुचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते व पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेतभाई तटकरेंच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण संपन्न कोळी बांधवांकडून तटकरे कुटूबीयांचे जल्लोषात स्वागत रोहा-प्रतिनिधी  म च्छी मार्केट म्हटले कि हातात कात्या (सुरे) घेऊन गिऱ्हाईकाला,"ये दादा हावर ये,ये ताई इकडे ये,ओ भाऊ काय पाहिजे?" अशा आवाजात साद घालणाऱ्या कोळी भगिनी हे चित्र नित्याचे झाले आहे.रोह्याच्या त्याच मच्छी मार्केटचे आज रुपडे पालटले होते.सर्वत्र रांगोळ्यांचे सडे काढले होते.तर कुठे फुलांची तोरणे कार्यक्रमाची शोभा वाढवीत होती. आपल्या पारंपारिक वेषभुषेत सजलेल्या महिलांनी कोळी गीतांच्या संगीतावर ठेका धरला होता.पाहणारास वाटावे जणूकाही नारळी पौर्णिमेप्रमाणे आज कोणता तरी कोळी बांधवांचा सण आहे. सारा कोळीवाडा आज रोह्यात लोटला होता,निमित्त होते मच्छी मार्केटच्या नुतन वास्तुचे लोकार्पण कार्यक्रमाचे. रोहा नगरपालिकेने बांधलेल्या सुसज्ज मच्छी मार्केटचे लोकार्पण खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत भाई तटकरे यांची प्रमुख उपस्थि
Image
भालगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावात अनेक ग्रामस्थांनी केला पक्षप्रवेश रोहा-प्रतिनिधी आगामी पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भालगाव विभागात सुरू असलेल्या घडामोडींकडे संपूर्ण रोहा तालुक्याचे लक्ष लागले आहे.भालगाव विभागातील विकासकामे,दलित-आदिवासींचे प्रश्न फक्त राष्ट्रवादी काँग्रेस सोडवू शकतो असा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यत पोहचला आहे.त्यामुळेच दुर्गम भालगाव पंचायत समिती गणामध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.त्याचीच परिणिती म्हणून भालगाव विभागातील अनेक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.  भालगाव ग्रामपंचायत हद्दितील कांडणे खुर्द बौद्धवाडी या गावातील शेकाप,शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.कांडणे खुर्द बौद्धवाडी गावातील विकास कामे ठप्प झाली होती.दलितांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावायचे होते ,विकास कामांना गती देणार कोण?असे प्रश्न असताना ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. खासदार सुनिलजी तटकरे साहेब,पालकमंत्री आदिती तटकरे व आमदा
Image
रोह्यातून आळंदीकडे निघालेल्या दिंडीचे कुरवंडे गावात स्वागत ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात वारकरी तल्लीन धाटाव-शशिकांत मोरे      रायगड जिल्ह्यातील रोह्यातुन पायीवारीसाठी निघालेला वैष्णवांचा मेळा नुकताच आळंदीकडे प्रस्थान झाला. हेदवली,जांभुळपाड़ा,येथून थेट पुणे जिल्ह्यात लोणावला(कुरवंडे) येथे ही दिंडी आली असता जल्लोषात स्वागत करण्यात आले.या दिंडीत हरिनामाच्या गजरात वारकरी,महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन तल्लीन झाले.ज्ञानबा तुकाराम असा जयघोष साऱ्यांच्या मुखात असल्याने किती चालतोय याचे भान मात्र वारकरी विसरले असल्याचे पहावयास मिळाले. रा यगड भूषण ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा ते आळंदी कडे निघालेल्या दिंडीचे जागो- जागी स्वागत होत असताना कुरवंडे येथे गावातील महिलांनी दिंडीचे औक्षण केले.याठिकाणी मैदानात दिंडीतील वारकरी व महिलांनी गोल रिंगण धरित मोठ्या जल्लोषात हरीनामाच्या गजरात तल्लीन होऊन नाचण्याचा आनंद घेतला.येथील ह.भ.प.सुभाष महाराज पडवळ यांच्या निवासस्थानी दिंडीतील वारकरी वर्गाची चहा,नास्ता,व भोजन व्यवस्था उत्तम पद्धतीने केली होती.या ठिकाणी पुरुषोत्तम पाटील महा
Image
रायगड जिल्ह्यावर शोककळा खालापुर,कर्जत तालुक्यातील पायी दिंडीला मावळमध्ये भीषण अपघात चार वारकऱ्यांचे देहावसान, अनेक वारकरी जखमी  खालापुर-प्रतिनिधी मावळ तालुक्यातील सातेगाव जवळ आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आळंदीकडे पायी जाणाऱ्या पालखीमध्ये भरधाव वेगातील टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात दोन महिला वारकरी जागीच मृत्युमुखी पडल्या असून सुमारे चोवीस वारकरी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वडगाव मावळ चे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले की, जखमी विविध रुग्णालयात असल्याने त्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. प्रथम सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. खालापूर तालुक्यातील उंबरे, खोपोली व कर्जत भागातील अंदाजे दोनशे वारकरी या पायी दिंडी मध्ये सहभागी झाले होते. पहाटेच्या सुमारास माऊली कृपा चॕरीटेबल ट्रस्ट उंबरे खालापूर ही पालखी आळंदीकडे जात असताना साते गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातामध्ये सविता वाळकु येरभ, वय ५८वर्षे राहणार उंबरे तालुका खालापुर जिल्हा रायगड व जयश्री आत्माराम पवा
Image
कोलाड विभागातील सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान समाजसेवक निलेशभाई महाडिक यांचा पुढाकार  रोहा अष्टमी- नरेश कुशवाहा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून  समाजाचा आरसा आहे समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट सर्व बाबींचे निरीक्षण करून तो वृत्तांकन करुन तो आपली जबाबदारी आपले कर्तव्य पार पाडत असतो पत्रकारांच्या कर्तव्याला आपण ही साथ दिली तर पत्रकारांच्या लेखणीला अधिक ताकद येईल अधिक गती येऊन पत्रकार अधिक निर्भीड होतील यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून कोलाड पुई या गावातील समाजसेवक तसेच महाराज साम्राज्य संघ रायगड जिल्हा अध्यक्ष निलेशभाई महाडिक यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून  कोलाड परिसरातील पत्रकारांचा दिनांक २५ नोव्हेंबर २०२१रोजी त्यांच्या पुई येथील निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात पत्रकार बांधवांना शाल,सन्मान प्रतिमा व पुष्पगुच्छ देत सन्मानित केले. यावेळी सुतारवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार हरिचंद्र महाडिक,चिल्हे खांब-कोलाड विभागीय पत्रकार रायगड भूषण डॉ.श्याम लोखंडे,गोवे-कोलाड येथील उत्कृष्ट पत्रकार विश्वास निकम, चिंचवली-कोलाड येथील पत्रकार भिवा पवार यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू
Image
संभे ता.रोहा येथे शंभरहून अधिक मधुमेही रुग्णांची मोफत तपासणी   लायन्स क्लब ऑफ कोलाडचा स्तुत्य उपक्रम   रोहा- नरेश कुशवाहा नोव्हेंबर हा महिना "मधुमेह जागृती माह" म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो.त्याचे औचित्य साधुन लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाच्यावतिने सामाजिक बांधीलकीतून कोलाड संभे येथे शंभरहून अधिक मधुमेह रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. इंटरनॅशनल लायन्सक्लब डिस्ट्रिक्ट 3231 A 2 रिजन थ्री झोन टू सन 2021/22 नोव्हेंबरचा उपक्रम म्हणून लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा,व Aimil pharmaceuticals india ltd व डॉ विनोद गांधी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रुप ग्रामपंचायत संभे ता.रोहा यांच्या सहकार्याने मधुमेही रुग्णांची मोफत तपासणी व प्राथमिक औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रुप ग्राम पंचायत संभे येथे सदरच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा च्या वतीने ग्राम पंचायत संभे यांना प्राथमिक उपचार किटचे वाटप करण्यात आले.  लायन्स क्लब आयोजित मधुमेह  शिबिरात शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले.यावेळी लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाचे अध
Image
जुनी पेन्शन संघर्ष समिती आयोजित भव्य पेन्शन संघर्ष सभेस महाड येथे भरघोस प्रतिसाद जिल्ह्यातील सर्व संघटनांचा एकमुखी पाठिंबा महाड-प्रतिनिधी जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती आयोजित भव्य पेन्शन संघर्ष सभा कोटेश्वरी सामाजिक सभागृह महाड जिल्हा रायगड येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती.दि.1नोव्हेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी रायगड जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी व सर्व सभासद एका झेंड्याखाली एकत्र आले होते. विशेष म्हणजे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक व शासकीय कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या मागण्यांसाठी या भव्य पेन्शन संघर्ष सभेत सहभाग घेऊन आपला पाठिंबा दर्शविला. महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करून तिला पर्याय म्हणून राज्य सरकारची डीसीपीएस/NPS योजना सुरू केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनातील रक्कम बाजारात विविध कंपन्यांमध्ये गुंतवून त्यातून कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे धोरण होते मात्र मागील सोळा वर्षातील डीसीपीएस/
Image
  जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज सानप यांची महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ रायगड सरचिटणीसपदी निवड रायगड जिल्हा कार्यकारणी जाहिर अलिबाग-प्रतिनिधी. रायगड जिल्हा माहिती अधिकारी  श्री.मनोज शिवाजी सानप यांची  महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ रायगड जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.रायगड जिल्हा हा मुंबई पासून खुप जवळ आहे.तसेच तो पर्यटन व औद्योगिकीकरणाचे केंद्र म्हणून प्रशिध्द आहे.अशा रायगड जिल्ह्यात मंत्री,वरिष्ठ अधिकारी व अतिमहत्वाच्या व्यक्तींचा सतत राबता असतो.जिल्ह्यात येणाऱ्या VIP व VVIP लोकांच्या कार्यक्रमांची माहिती ठेवणे,प्रसार  माध्यमांना सुचित करणे,शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे जनतेत पोहचविणे,शासन/प्रशासन व जनता यामध्ये समन्वय राखणे हि अवघड कामे श्री मनोज सानप अतिशय कौशल्याने करीत आहेत.त्यांच्या ह्या समन्वय कौशल्याचा विचार करुन जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांचावर सोपवली आहे.   दि.22 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार श्री.ग.दि.कुलथे यांच्या अध्यतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात
Image
शाळेची घंटा पुन्हा वाजणार राज्यात १ डिसेंबर पासुन शाळा सुरु-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मुंबई-प्रतिनिधी. राज्यात १ डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात १ ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील अनेक दिवस कोरोनामुळे शाळा बंद होत्या.अखेर सरसकट शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा सुरु होत्या. दरम्यान,आता ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  वयांनी सांगितले.   आठ दिवस आम्ही पालकांशी,अधिकाऱ्यांशी चर्चा करू.विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण कसे देता येईल यावर भर देऊ, तसेच निवासी शाळांबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ,असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. दिवाळीनंतरच्या परिस्थितीचा अभ्यास करुन आम्ही हा निर्णय घेतला आहे,असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी पुर्ववत जीवनात यायला हवेत म्हणून आम्ही आज शाळा सुरू करण्या
Image
  रोह्यातील नवरत्न हॉटेल मागील इमारतीखाली पार्क केलेल्या मोटरसायकलची चोरी  घटना सी.सी.टी.व्हि.मध्ये कैद     रोहा-प्रतिनिधी रोह्यातील नवरत्न हॉटेल मागील परमार नगर इमारतीखाली पार्क केलेल्या हिरो होंडा कंपनीची मोटर सायकल चोरीला गेली आहे .   याबाबत सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे,परमार नगर मध्ये राहणारे श्री.सतिश काशिनाथ म्हात्रे यांची MH 06 AE 6280 हिरो होंडा कंपनीची स्लेंडर मोटरसायकल बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्क करण्यात आली होती.दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये प्रवेश केला.या व्यक्तीने गाडीचे हॅण्डल पकडून गाडी हाताने खेचून बाहेरच्या रस्त्यावर नेली.तेंव्हापासुन आजतागायत गाडीचा व अज्ञात व्यक्तीचा शोध लागला नाही. सदरची घटना सी.सी.टी.व्ही.मध्ये कैद झाली आहे.      या घडलेल्या चोरीच्या घटनेची तक्रार श्री. सतिश काशिनाथ म्हात्रे यांनी रोहा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर १३४/२०२१ भारतीय दंडविधान कलम ३७९ अंतर्गत दाखल केली आहे.पोलीस निरीक्षक श्री.संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी
Image
" आदिशक्ती न्युज" डिजीटल वेब पोर्टलचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण संपन्न रोहा-प्रतिनिधी   आदिशक्ती न्युज डिजीटल वेब पोर्टलचे लोकार्पण आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या शुभहस्ते निवी ता.रोहा येथे आज दि.२४ नोव्हेंबर २०२१रोजी संपन्न झाले.    कु.रविना मालुसरे संपादित ह्या डिजीटल पोर्टल लोकार्पण कार्यक्रमास आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी जेष्ठ नेते विजयराव मोरे,रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील,तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर,पंचायत समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ,ज्येष्ठ नेते सुरेश मगर, शंकरराव भगत,अप्पा देशमुख,अनिल भगत,अनंत देशमुख,वरसे सरपंच नरेश पाटील,उपसरपंच मामा सुर्वे,हेमंत कांबळे,रामा म्हात्रे,संतोष भोईर,ज्ञानेश्वर साळुंखे,अमित मोहिते,सतिश भगत,कर्णेकर तसेच परिसरातील ग्रामपंचायत सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व निवी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.       यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी  कु.रविना मालुसरे यांचे कौतुक केले.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रात वाढला आहे.वेगवान व अचुक बातमी देण्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा खुबीन
Image
  रोहा तालुका क्रीडा संकुलाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थित,पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्धघाटन संपन्न .   पालकमंत्र्यांनी क्रिडा विश्वातील बदलांचे दिले संकेत. रोहा/प्रतिनिधी               क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड,तालुका क्रीडा अधिकारी रोहा आयोजित क्रीडा संकुल रोहा नूतनीकरण उद्धघाटन महाराष्ट्राच्या राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती होती.  ह्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काही महत्वपुर्ण बाबी स्पष्ट केल्या."खेलो इंडिया"संकल्पनेतुन रायगडच्या क्रिडा विश्वात चैतन्य निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले .तर रुपये ८० कोटी निधीची मंजुरी असलेले कोकण विभागीय क्रिडा संकुल माणगाव येथे सुरु होत आहे.त्या माध्यमातून कोकणातील खेळाडूंना चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.                  ग्रामीण भागांतील खेळांडूना प्रोत्साहन मिळावे व दर्ज
Image
ऑनलाईन रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान रोहा (प्रतिनिधी) : खासदार सुनिलजी तटकरे साहेब, पालकमंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अध्यक्षा प्रितमताई पाटील यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेसने दिवाळीमध्ये Selfi With Rangoli ह्या संकल्पनेवर आधारित ह्या ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. सुंदर रांगोळ्या रेखाटणार्‍या युवती व महिलांना प्रोत्साहित करणे व त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दुहेरी उद्देशाने, तंत्रज्ञानाचा वापर करुन ह्या स्पर्धा यशस्वीपणे राबविल्या गेल्या. स्पर्धा फक्त रोहा तालुका मर्यादित असुनही स्पर्धेला युवती व महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. ह्या अभिनव रांगोळी स्पर्धेचा निकाल रोह्याच्या कुंडलिकातटी झालेल्या भव्यदिव्य दिपोत्सव कार्यक्रमात जाहिर होऊन आदरणीय पालकमंत्र्यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले व उत्तम संयोजनाबद्दल युवती अध्यक्षा रविना मालुसरे यांचे कौतुक केले. याविषयी युवती अध्यक्षा रविना मालुसरे यांनी सांगित