रोहा मच्छी मार्केटच्या नुतन वास्तुचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते व पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेतभाई तटकरेंच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण संपन्न
कोळी बांधवांकडून तटकरे कुटूबीयांचे जल्लोषात स्वागतरोहा-प्रतिनिधी
मच्छी मार्केट म्हटले कि हातात कात्या (सुरे) घेऊन गिऱ्हाईकाला,"ये दादा हावर ये,ये ताई इकडे ये,ओ भाऊ काय पाहिजे?" अशा आवाजात साद घालणाऱ्या कोळी भगिनी हे चित्र नित्याचे झाले आहे.रोह्याच्या त्याच मच्छी मार्केटचे आज रुपडे पालटले होते.सर्वत्र रांगोळ्यांचे सडे काढले होते.तर कुठे फुलांची तोरणे कार्यक्रमाची शोभा वाढवीत होती.
आपल्या पारंपारिक वेषभुषेत सजलेल्या महिलांनी कोळी गीतांच्या संगीतावर ठेका धरला होता.पाहणारास वाटावे जणूकाही नारळी पौर्णिमेप्रमाणे आज कोणता तरी कोळी बांधवांचा सण आहे.
सारा कोळीवाडा आज रोह्यात लोटला होता,निमित्त होते मच्छी मार्केटच्या नुतन वास्तुचे लोकार्पण कार्यक्रमाचे.
रोहा नगरपालिकेने बांधलेल्या सुसज्ज मच्छी मार्केटचे लोकार्पण खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत भाई तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोळी बांधवांकडून तटकरे कुटूंबीयांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
प्रास्तविकात नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी सांगितले कि, स्वतंत्र व विस्तृत भाजी मार्केट,मटन मार्केट व मच्छी मार्केट अशा सुविधा असलेली रोहा नगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील सर्व सुविधायुक्त एकमेव नगरपालिका असावी.त्यांनी ह्या सुविधा पुर्ततेसाठी तटकरे साहेबांचे आभार मानुन कोळी भगिनींना मच्छीमार्केटचा सुयोग्य वापर करण्याचे अवाहन केले.
खासदार सुनिल तटकरे यांनी मच्छी मार्केटचे लोकार्पण करताना आनंद होत असल्याचे स्पष्ट करुन रोहेकरांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण वचनबध्द असल्याचे सांगितले.पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नगरपालिकेने विकासकामे सुचवावित,त्यासाठी आपण विकासनिधी कमी पडू देणार नाही असे सांगितले.
यावेळी रोह्यातील विविध संघटनांच्या माध्यमातून तटकरे कुटूंबीयांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी व्यासपिठावर खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे,नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,सरचिटणीस विजयराव मोरे,जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील,तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर,शहर अध्यक्ष अमित उकडे,सुरेश मगर,तालुका अध्यक्षा प्रितम पाटील,युवती अध्यक्षा रविना मालुसरे,रोहा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष,सर्व नगरसेवक,नगरपालिका क्षेत्रातील विविध विभाग अध्यक्ष उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी अष्टमी कोळीवाडा, खारगांव,खारापटी,निडी कोळीवाड्याच्या कोळी भगिनी,ज्ञानगंगा कोळी संस्थेचे पदाधिकारी व रोह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या लोकनेत्यांचे स्वागत करताना कोळी भगिनी.video पहा.👇👇👇
Comments
Post a Comment