Posts

Showing posts from March, 2023
Image
पेण कोप्रोली येथील सेवाभावी वृत्तीच्या सखुबाई खंडू पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन खारी /रोहा - (केशव म्हस्के) पेण तालुक्यातील  मौजे कोप्रोली येथील सखुबाई खंडू पाटील यांचे रविवार दि.२६/०३/२०२३ रविवार रोजी सायं.०७:३० वाजताच्या दरम्यान वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी राहत्या घरी दुःखद निधन..      त्या अत्यंत प्रेमळ, दयाळू, क्षमाशील, मन मिळावू स्वभावाच्या व परोपकारी,सेवाभावी वृत्तीच्या होत्या त्यांना अध्यात्मिक व धार्मिक कार्याची विशेष आवड होती.    त्यांच्या पश्चात तीन मुलगे,तीन मुली,सून,जावई,नातवंडे, पतवांडे सगे सोयरे नातेवाईक असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने पाटील परिवारावर दुःखाचे सावट पसरले सर्वत्र असून हळहळ व्यक्त होत आहे.       त्यांचे दशक्रिया विधी बुधवार .दि.०५/०४/२०२३ रोजी उद्धर रामेश्वर पाली सुधागड येथे होतील तर अंतिम धार्मिक विधी उत्तर कार्य बारावे शुक्रवार दि- ०७/०४/२०२३ रोजी राहत्याघरी  मुक्काम पोस्ट- कोप्रोली तालुका-पेण, जिल्हा रायगड येथे होती  असे निकटर्तीयांनी माहिती देताना सांगितले आहे..
Image
खारघर येथे महिला आर्थिक विकास महामंडळ - रायगड आयोजित कार्यशाळा संपन्न खारी /रोहा -केशव म्हस्के  महाराष्ट्र शासन अंगीकृत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ माविम - रायगड,नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत नवी मुंबई खारघर युवा सेंटर येथे सोमवार ते बुधवार दि.२७/२८/२९/ मार्च २०२३ तीन दिवसीय निवासी पुरुष मास्टर ट्रेनर करिता लिंग समभाव संचेतना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.       महिला आर्थिक विकास महामंडळ माविम - रायगड,नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाद्वारे एकजुटीतुन अवतरेल,समृध्दीची नवप्रभात हे ब्रीद वाक्याची जपणूक करत रायगड जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण देत सावित्रीबाई फुले आर्थिक विकास महामंडळ च्या वतीने महिलांना आर्थिक धैर्य प्राप्त व्हावे घरगुती व्यावसाईक स्वरूपामध्ये अत्यल्प व्याज दराने कर्ज पुरवठा उपलब्ध करून आर्थिक भांडवल उभे करित महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण्याकामी महत्त्वपूर्ण योगदान देत महिलांना आर्थिक उत्पन्नाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे महत्त्वपूर्ण योगदान दिले व
Image
आरे खुर्दवाडी येथे श्री राम जन्मोत्सवसह पालखी मिरवणूक सोहोळा मोठ्या उत्साहाने साजरा भगवान प्रभु श्रीरामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमले खारी/रोहा-केशव म्हस्के रोहे तालुक्यातील आरे बुद्रुक ग्राम पंचायत हद्दीतील मौजे आरे खुर्दवाडी येथे चैत्र शुद्ध ९ गुरूवार दि.३०मार्च रोजी श्री राम जन्मोत्सव सोहोळा निमित्ताने विविध अध्यात्मिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत कीर्तन सेवा,महाप्रसाद अन्नदान तर सायंकाळी संपूर्ण गावांतून "भगवान प्रभु श्रीरामचंद्र की जय,पावन पुत्र हनुमान की जय जयघोषाने पालखी मिरवणूक सोहोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले.       संपूर्ण देशभरामध्ये श्री राम जन्मोत्सव सण सोहळा मोठ्या थाटामाटात उत्साही वातावरणामध्ये होत असताना गेली २७ वर्षांची अविरत अबाधित व अखंडित परंपरा राखीत मोठ्या गुण्या गोविंदाने,एकोप्याने,खेळी मेळीच्या मंगलमय,प्रसन्न वातावरणामध्ये थाटामाटात उत्साहाने आरे खुर्दवाडी येथे चैत्र शुद्ध ९  श्री राम नवमी गुरूवार रोजी  येथील श्री रामाच्या मंदिरामध्ये अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांतर्गत सकाळी आरती,तद्नंतर हभप.उदय महाराज बंद्री - (खारगाव - रोहा) यांचे श्र
Image
 शिवसेनेकडून विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा तळा -संजय रिकामे राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेकडून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर तळा तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्याचा सपाटा सुरू केला आहे. मौजे निगुडशेत येथे स्मशानाकडे जाणारा रस्ता दहा लक्ष ,खांबोली ते शेणाटे रस्ता १५ लक्ष, दहिवली येथे स्मशानाकडे जाणारा रस्ता ८ लक्ष, आडनाळे येथे सामाजिक सभागृह ७ लक्ष भानंग येथे सामाजिक सभागृह १० लक्ष, पाचघर येथे स्मशानाकडे जाणार रस्ता १० लक्ष, चरई बुद्रुक येथे गटार बांधणे ७ लक्ष या कामांचे भूमिपूजन तळा तालुका शिवसेना प्रमुख प्रदुम्न ठसाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.                                                                        यावेळी तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ शहर प्रमुख राकेश वडके,जिल्हा कोअर कमेटी सदस्य लीलाधर खातु, तालुका संपर्कप्रमुख अॕड. चेतन चव्हाण, नगरसेवक नरेश सुर्वे, सिराज खाचे, भास्कर गोळे, माजी सरपंच नामित पांढरकामे,उपतालुकाप्रमुख शरद सारगे, दीपक चिंचळकर,विभाग प्रमुख संदीप दळवी, रमेश तांदळेकर रामकृष्ण
Image
राम नवमी उत्साहात साजरी; भाविकांची मांदियाळी, शोभा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद तळा- संजय रिकामे रोषणाईने सजविलेल्या मंदिरांमध्ये दुपारी श्रीरामाचा जयघोष झाला अन् 'राम जन्मला गं सखी, राम जन्मला', 'सियावर रामचंद्र की जय... पवनसुत हनुमान की जय... प्रभू रामचंद्र भगवान की जय'... अशा जयघोषाने तळा शहरातील श्रीराम मंदिर परिसर दुमदुमदून गेला.श्रीरामाच्या नामस्मरणाने मंदिरातील वातावरण भारावले. शहराच्या विविध भागांतील मंदिरांमध्ये रामजन्म उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील प्रमुख राममंदिरांमध्ये दिवसभर भाविकांची वर्दळ सुरू होती.जन्मोत्सवानिमित्त श्रीरामाची मूर्ती, गाभारा, सभामंडप आणि मंदिराचा परिसर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. रामजन्म सोहळ्यानंतर प्रसाददेखील भाविकांना देण्यात आला.                                                                                                                    रामनवमी दिनी हिंदुत्ववादी संघटना आणि रामभक्तांच्या वतीने शहरात शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले रामनवमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पहिल्यांदाच
Image
  मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल      --केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी     अलिबाग-रायगड मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पनवेल तालुक्यातील खारपाडा येथे केले.        कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 कि.मी. आणि मूल्य 251.96 कोटी) या रस्त्याचे काँक्रिटीकरण , राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी 13 कि.मी. आणि मूल्य 126.73 कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी 8.60 कि.मी. आणि मूल्य 35.99 कोटी ) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाडा गाव,ता.पनवेल येथे  संपन्न झाला, त्यावेळी ते
Image
*इवलेसे रोप लावियले द्वारी,त्याचा वेळू गेला गगणावरी |" गावठाण येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ अखंड ३९ वर्षांची यशस्वी परंपरा रोहा-रविना मालुसरे-भोसले रोहा तालुक्यातील धामणसई पंचक्रोशी यांच्या वतीने दरवर्षी संपन्न होणारा व ४० व्या वर्षात पदार्पण करणारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण या धार्मिक कार्यक्रमास सोम.दि.२७ मार्च पासून प्रारंभ करण्यात आला आहे.        स्वा.सु.गुरूवर्य अलिबागकर बाबा,गोपाळबाबा वाजे, धोंडू बाबा कोलाटकर यांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प.नारायण महाराज वाजे(पंढरपूर) ,गुरूवर्य ह.भ.प.सखाराम महाराज निकम (धामणसई) ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील (धाटाव) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच ह.भ.प.रघुनाथ महाराज भोकटे व ह.भ.प.मारूती महाराज साळवी यांच्या प्रेरणेने संपन्न होणाऱ्या या सप्तास सोहळ्यात दररोज पहाटे  ४ :३० ते ६ वा.काकड आरती,स.८ ते १२ वा. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण,सायं.४ ते ५ वा.प्रवचन,५:३० ते ७ सामुदायिक हरिपाठ,सायं.७ ते ९ हरिकिर्तन तदनंतर महाप्रसाद व जागर भजन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.       यावेळी सोम.दि.२७ मार्च ह.भ.प.नारायण
Image
ग्रुप ग्रामपंचायत मेढा उपसरपंच पदी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या  श्रेजल वि. उंबरे बिनविरोध मेढा -उदय मोरे रोहा तालुक्यातील प्रतिष्टीत समजल्या जाणा-या ग्रुप ग्रामपंचायत मेढा या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच स्नेहा महेंद्र खैरे यांच्या अध्यक्षखाली उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रेजल विलास उंबरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर श्रेजल उंबरे यांचा अर्ज वैध ठरवून त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक अधिकारी तथा सरपंच स्नेहा खैरे यांनी केली. या झालेल्या निवडणुक प्रक्रियेत सरपंच स्नेहा खैरे मावळते उपसरपंच ज्ञानेश्वरी गोवर्धने, सदस्य रविंद्र जाधव, सदस्य उदय मोरे, सदस्य जगदिश घरट, सदस्या नम्रता महाले, सदस्या ज्ञानेश्वरी गोवर्धने, सदस्या नम्रता सुतार, सदस्या समिक्षा जवके सदस्या, शेवंती शिद यांनी सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली. मावळते उपसरपंच ज्ञानेश्वरी गोवर्धने यांनी आपला उपसरपंच पदाचा कार्यकाल पुर्ण केल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने सदर उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली. 
Image
अपघातग्रस्तांना मदत करायला सरसावले 'रोह्यातील पत्रकार'   आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसुन एका निष्पाप माऊलीचा अंत नागरिकांकडून चौकशीची मागणी  व रोहा-प्रतिनिधी          रविवार दिनांक 26 मार्च 2023 रोजी मुंबई गोवा मार्गावर इंदापूर लगत असलेल्या भुवन गावाजवळ सकाळी ११ वा च्या सुमारास वृद्ध महिला विठाई उमाजी देवळेकर वय 65 वर्षे या रस्ता ओलांडत होत्या.त्याचवेळी भरधाव वेगाने येत असलेले वाहन वॅगनार क्रमांक एम.एच. 46 बी. क्यू. 0027 याने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत सोडून वाहन चालकाने तेथून पोबारा केला. परंतु माणगाव पोलीस स्टेशनला ही बाब समजताच त्या वाहनाचा पाठलाग करत त्याला पकडण्यात  आले.         ह्या घटनेचे सविस्तर वृत्त असे की,रोह्यातील पत्रकार दीप वायडेकर, संदीप सरफळे आणि  खरीवले हे रोहा येथून रायगड प्रेस च्या कार्यक्रमाकरीता पोलादपूर येथे निघाले होते. त्यांना रस्त्याच्या मधो-मध रक्तबंबाळ अवस्थेत एक महिला आढळून आली. हे बघताच पत्रकारांनी गाडी साईडला घेऊन तिच्याजवळ गेले. तिचा श्वास चालू होता. हे बघताच पत्रकार वायडेकर आणि पत्रकार सरफळे यांनी त्या वृद्ध महिलेला ए
Image
 " समाजाने केलेला सन्मान मनाला समाधान देणारा"-आमदार आदिती तटकरे तळा -संजय रिकामे  यशाचे शिखर गाठत असताना सर्वत्र स्वागत व सन्मान केला जातो.परंतु समाजाने केलेला सन्मान हा मनाला समाधान देणारा असल्याचे मत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.यादव गवळी समाजाचे रायगड, ठाणे,मुंबई,सोलापूर या चार जिल्ह्यांचे क्रीडा महोत्सव व वार्षिक अधिवेशन तालुक्यातील बोरघर क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले होते.  या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की गवळी समाजाच्या वतीने क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आल्यामुळे समाजातील खेळाडूंना एकप्रकारे प्रोत्साहन मिळतो.व यामुळे भविष्यात माझ्या समाजातील खेळाडू अंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून समाजाचे नाव नक्कीच मोठे करेल आणि त्यावेळी त्या खेळाडूचा सन्मान करताना मलाही अभिमान वाटेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी यादव गवळी समाज अध्यक्ष राजेश मेहत्तर,सेक्रेटरी प्रफुल्ल वालेकर, समाजरत्न मनोहर पाडगे,राकेश कासार,नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, सर्व नगरसेवक यांसह यादव गवळी स
Image
तारस्ते येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन तळा संजय रिकामे  तळा तालुक्यातील तारस्ते गावात शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद उपनेते महाडचे कार्यसम्राट आ.भरतशेठ गोगावले यांच्या विशेष प्रयत्नांतून बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाच्या जागेचे भूमीपूजन करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर,महीला जिल्हा प्रमुख नीलिमा घोसाळकर, माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार,माणगाव शहर प्रमुख सुनील पवार,तळा तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ,शहर प्रमुख राकेश वडके, गटनेत्या नगरसेविका नेहा पांढरकामे,जिल्हा कोअर कमेटी सदस्य लीलाधर खातू,महीला तालुका प्रमुख छाया ठमके,संपर्क प्रमुख अॅड.चेतन चव्हाण,नगरसेवक नरेश सुर्वे,भास्कर गोळे,सिराज खाचे, मंगेश पोळेकर,उप तलूका प्रमुख दीपक चींचाळकर,शरद सारगे, युवा तालुका अधिकारी जयवंत राणे,विभाग प्रमुख रमेश तांदळेकर तारस्ते ग्रामस्थ आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.                      काही महिन्यांपूर्वी तारस्ते गावाने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला होता यावेळी शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद उपनेते महाडचे कार्यसम्राट आ.भरतशेठ ग
Image
  खारी येथील बेवारस गाई वर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून गाईला दिले जीवनदान पशु -पक्षी जीवनदान संघटना आणि तालुका पशु वैद्यकीय अधिकारी यांनी बजावली महत्वपूर्ण भूमिका खारी/रोहा -केशव म्हस्के   रोहे तालुक्यातील मौजे खारी येथे अपघातामुळे दोन दिवसांपूर्वी रस्त्यालगत एक बेवारस गाय जखमी अवस्थेत  आढळून आली.सदरच्या गाईवर पशु पक्षी जीवनदान संघटनेचे पदाधिकारी यांच्या सहाय्याने आणि तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय सांगळे आणि टिमने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून गाईला जीवदान देण्याचे महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि गाई चे प्राण वाचविले.      खारी येथे अपघातामुळे दोन दिवसांपूर्वी रस्त्यालगत आढळलेल्या अपघातग्रस्त गाईवर पशु पक्षी जीवनदान संघटनेचे अनिकेत पाडसे, निरज म्हात्रे,दिनेश शिर्के यांच्या निदर्शनास आल्यावर तातडीने प्रथमोपचार करण्यासाठीचे प्रयत्न केले.  पहिल्या दिवशी पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने पशु पक्षी जीवनदान संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या सहकाऱ्यांनी रायगड जिल्हा पशु वैद्यकीय व पशु संवर्धन अधीक्षक डॉ.श्याम कदम यांच्याकडे संपर्क साधला असता कर्मचारी वृंद कमी असल्याचे सांगत तातडीने यंत्
Image
  कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेच्या वतीने मासिक सभा व कविसंमेलन संपन्न   रोहा -प्रतिनिधी  सभेच्या सुरुवातीलाच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करुन बुधवार दि.२२ मार्च २०२३ रोजी मासिक सभा व कवींच्या कविसंमेलनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.  गुढीपाडवा व मराठी नववर्षदिनाचे औचित्य साधून रोहा भुवनेश्वर येथील कवी, साहित्यीक अजित पाशिलकर यांचे अकल्पित, निवासस्थानी सदर कार्यक्रम पार पडला. या वेळी रोहा शाखेच्या नवीन कार्यकारीणीचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने शाखेची धुरा यशस्वीपणे सांभाळणा-या अध्यक्षा सौ. संध्या दिवकर मॅडम व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांचा यथोचित गौरव करण्यात आला.  या गत वर्षा मध्ये शाखे तर्फे घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल सचिव विजय दिवकर यांनी सादर करून पुढील वर्षामध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयीचा आढावा घेतला.    अखंड वर्षात एकूण १२ मासिक सभा व १ जिल्हा सभे व्यतिरिक्त व्याख्यान , कार्यशाळा, कविसंमेलने इ.जवळ जवळ इतर १८ कार्यक्रम कोकण मराठी साहित्य परीषद शाखा रोहा च्या वतीने घेण्यात आले.भरगच्च कार्यक्रमाने
Image
" एक घास,चिऊ काऊ साठी " शिववंदना वाचनालय वाशीच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक खारी/ रोहा - केशव म्हस्के  रोहे तालुक्यातील मौजे वाशी येथील छत्रपती शिवरायांच्या विचारांने प्रेरित झालेल्या "एकच ध्यास शिव विचारांचा प्रचार" हे ब्रीदवाक्याची जोपासना करीत असलेल्या शिववंदना वाचनालय वाशी द्वारे दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वन्य मुक्या पक्षी - प्राण्यांबद्दल भुतदया बाळगणे हे मानवी कर्तव्य समजून  सामाजिक बांधिलकी जपली जाते.   आजघडीला आपल्या घरी, अंगणामध्ये चिमणी/ चिऊ ताई कुठे फिरकताना फारसी पाहवयास मिळत नाही. काही जाती - प्रजाती तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय वातावरणीय बदलानुसार दिवसेंदिवस तीव्र उन्हाचे चटके बसत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे असे असताना जंगल परिसरातील डोंगराळ भागातील पक्षांचे काय होत असेल? याचा  अभ्यास करूनच काही पक्षी प्रेमी सुशिक्षित समाज बांधव संघटितपणे समाज हिताचे कार्य करताना दिसत आहेत.त्यापैकी एक "शिव वंदना वाचनालय" वाशीचे संस्थापक  प्