"समाजाने केलेला सन्मान मनाला समाधान देणारा"-आमदार आदिती तटकरे

तळा -संजय रिकामे 

यशाचे शिखर गाठत असताना सर्वत्र स्वागत व सन्मान केला जातो.परंतु समाजाने केलेला सन्मान हा मनाला समाधान देणारा असल्याचे मत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.यादव गवळी समाजाचे रायगड, ठाणे,मुंबई,सोलापूर या चार जिल्ह्यांचे क्रीडा महोत्सव व वार्षिक अधिवेशन तालुक्यातील बोरघर क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की गवळी समाजाच्या वतीने क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आल्यामुळे समाजातील खेळाडूंना एकप्रकारे प्रोत्साहन मिळतो.व यामुळे भविष्यात माझ्या समाजातील खेळाडू अंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून समाजाचे नाव नक्कीच मोठे करेल आणि त्यावेळी त्या खेळाडूचा सन्मान करताना मलाही अभिमान वाटेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी यादव गवळी समाज अध्यक्ष राजेश मेहत्तर,सेक्रेटरी प्रफुल्ल वालेकर, समाजरत्न मनोहर पाडगे,राकेश कासार,नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, सर्व नगरसेवक यांसह यादव गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog