राम नवमी उत्साहात साजरी; भाविकांची मांदियाळी, शोभा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद
तळा- संजय रिकामे
रोषणाईने सजविलेल्या मंदिरांमध्ये दुपारी श्रीरामाचा जयघोष झाला अन् 'राम जन्मला गं सखी, राम जन्मला', 'सियावर रामचंद्र की जय... पवनसुत हनुमान की जय... प्रभू रामचंद्र भगवान की जय'... अशा जयघोषाने तळा शहरातील श्रीराम मंदिर परिसर दुमदुमदून गेला.श्रीरामाच्या नामस्मरणाने मंदिरातील वातावरण भारावले. शहराच्या विविध भागांतील मंदिरांमध्ये रामजन्म उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील प्रमुख राममंदिरांमध्ये दिवसभर भाविकांची वर्दळ सुरू होती.जन्मोत्सवानिमित्त श्रीरामाची मूर्ती, गाभारा, सभामंडप आणि मंदिराचा परिसर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. रामजन्म सोहळ्यानंतर प्रसाददेखील भाविकांना देण्यात आला.
रामनवमी दिनी हिंदुत्ववादी संघटना आणि रामभक्तांच्या वतीने शहरात शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले रामनवमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पहिल्यांदाच हजारो लोक सहभागी झाले होते. संपूर्ण शहर ‘जय श्री राम’च्या घोषणांनी दुमदुमले.बळीचा नाका पासून निघालेली मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून राम मंदिर येथे नेण्यात आली. ढोल-ताशे आणि डीजेच्या साथीने मिरवणुक काढण्यात आली.संपूर्ण शहरातील वातावरण भगवेमय झाले होते.राम मंदिरात आरती झाल्या नंतर शोभा यात्रेची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment