कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेच्या वतीने मासिक सभा व कविसंमेलन संपन्न
रोहा -प्रतिनिधी
सभेच्या सुरुवातीलाच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करुन बुधवार दि.२२ मार्च २०२३ रोजी मासिक सभा व कवींच्या कविसंमेलनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. गुढीपाडवा व मराठी नववर्षदिनाचे औचित्य साधून रोहा भुवनेश्वर येथील कवी, साहित्यीक अजित पाशिलकर यांचे अकल्पित, निवासस्थानी सदर कार्यक्रम पार पडला. या वेळी रोहा शाखेच्या नवीन कार्यकारीणीचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने शाखेची धुरा यशस्वीपणे सांभाळणा-या अध्यक्षा सौ. संध्या दिवकर मॅडम व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
या गत वर्षा मध्ये शाखे तर्फे घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल सचिव विजय दिवकर यांनी सादर करून पुढील वर्षामध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयीचा आढावा घेतला.
अखंड वर्षात एकूण १२ मासिक सभा व १ जिल्हा सभे व्यतिरिक्त व्याख्यान , कार्यशाळा, कविसंमेलने इ.जवळ जवळ इतर १८ कार्यक्रम कोकण मराठी साहित्य परीषद शाखा रोहा च्या वतीने घेण्यात आले.भरगच्च कार्यक्रमाने नटलेल्या याच वर्षात एकूण १३ नवीन सभासदांची नोंदणी करण्यात आली. असे शाखेच्या अध्यक्षा सौ.संध्या दिवकर यांनी सांगितले.
कवी हनुमंत शिंदे,नारायण पानावकर, शरद कदम, भरत चौधरी सर, अजित पाशिलकर, अमिषा बारस्कर, नेहल प्रधान व स्वत: अध्यक्षा सौ.संध्या दिवकर यांनी कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली या प्रसंगी गडदुर्ग अभ्यासक श्री सुखद राणे यांनी त्यांच्या गडदुर्ग भ्रमंती विषयीचे काही अनुभव सांगितले. सदर मासिक सभा व कविसंमेलनास उपस्थित सौ.संध्या दिवकर,सुखद राणे, विजय दिवकर, हनुमंत शिंदे, सुधीर क्षीरसागर, नारायण पानवकर, शरद कदम, अमिषा बारस्कर,नेहल प्रधान, अजित पाशिलकर,कु.स्वराज दिवकर,अनघा पाशिलकर,ओम पाशिलकर श्रोते म्हणून सेवानिवृत्त माजी सहाय्यक निबंधक शासकीय अधिकारी श्री अनंत पाशिलकर साहेब यांनी सपत्नी उपस्थित राहून कवितांचा आस्वाद घेतला.
शेवटी खास खांबेरे, चणेरा येथून उपस्थित राहिलेले शाखेचे सदस्य व कवी गणेश भगत यांनी कोकण मराठी साहित्य परिषद, रोहा शाखेतर्फे सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती करून दिली.तसेच शाखेला पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करून उपस्थितीचे आभार मानले.
Comments
Post a Comment