खारी येथील बेवारस गाई वर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून गाईला दिले जीवनदान

पशु -पक्षी जीवनदान संघटना आणि तालुका पशु वैद्यकीय अधिकारी यांनी बजावली महत्वपूर्ण भूमिका

खारी/रोहा -केशव म्हस्के 

 रोहे तालुक्यातील मौजे खारी येथे अपघातामुळे दोन दिवसांपूर्वी रस्त्यालगत एक बेवारस गाय जखमी अवस्थेत  आढळून आली.सदरच्या गाईवर पशु पक्षी जीवनदान संघटनेचे पदाधिकारी यांच्या सहाय्याने आणि तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय सांगळे आणि टिमने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून गाईला जीवदान देण्याचे महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि गाई चे प्राण वाचविले.

     खारी येथे अपघातामुळे दोन दिवसांपूर्वी रस्त्यालगत आढळलेल्या अपघातग्रस्त गाईवर पशु पक्षी जीवनदान संघटनेचे अनिकेत पाडसे, निरज म्हात्रे,दिनेश शिर्के यांच्या निदर्शनास आल्यावर तातडीने प्रथमोपचार करण्यासाठीचे प्रयत्न केले. 

पहिल्या दिवशी पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने पशु पक्षी जीवनदान संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या सहकाऱ्यांनी रायगड जिल्हा पशु वैद्यकीय व पशु संवर्धन अधीक्षक डॉ.श्याम कदम यांच्याकडे संपर्क साधला असता कर्मचारी वृंद कमी असल्याचे सांगत तातडीने यंत्रणा/ सूत्रे फिरवीताच दुसऱ्याच दिवशी अधीक्षक डॉ.कदम यांच्या निर्देशानुसार पशु वैद्यकीय अधिकारी वर्ग खारी येथील अपघाताग्रस्त गाईच्या पायाचे निरीक्षण व तपासणी करून  एका पायाचे चुरा झाल्याने ते कट करीत तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय सांगळे आणि त्यांचे सहकारी डॉ. रवि राठोड,डॉ.वसंत गोगटे यांनी शर्तीचे प्रयत्न करीत आज दि.२५/०३/२०२३ रोजी बेवारस गाई वर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून गाईला जीवदान देण्याचे महत्वपूर्ण कामगिरी बजावल्याने सर्व डॉ. टीम, पशु पक्षी जीवनदान संघटनेचे अनिकेत पाडसे, निरज म्हात्रे,दिनेश शिर्के यांच्या अनमोल उल्लेखनीय कार्याचे कौतुक होत असून सर्वत्र अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

        पशु पक्षी जीवनदान,सर्प मित्र संघटनेला नेहमीच उत्तम प्रकारे मदत करणारे रोहा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर साहेब यांचे देखील सातत्याने मोलाचे सहकार्य लाभत असतोच याकामी सुद्धा पो.नि. बाबर साहेब,जिल्हा पशु संवर्धन अधीक्षक डॉ श्याम कदम सर,तसेच खारी ग्रामस्थांचे देखील मोलाचे योगदान मिळाले..

   सदरील जखमी गाई खारी येथीलच श्रीदेवी खन्ना यांच्या निवासस्थानी उपचार व देखरेखी करिता काही दिवस ठेवण्यात आले असून जखम पूर्ण बरी होताच गाईला गो शाळेमध्ये पाठविले जाणार असल्याचे मुक्या प्राणी -पशु पक्षी जीवनदान संघटनेचे अनिकेत पाडसे यांनी पत्रकारांना माहिती देताना  सांगितले.

Comments

Popular posts from this blog