आरे खुर्दवाडी येथे श्री राम जन्मोत्सवसह पालखी मिरवणूक सोहोळा मोठ्या उत्साहाने साजरा

भगवान प्रभु श्रीरामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमले

खारी/रोहा-केशव म्हस्के

रोहे तालुक्यातील आरे बुद्रुक ग्राम पंचायत हद्दीतील मौजे आरे खुर्दवाडी येथे चैत्र शुद्ध ९ गुरूवार दि.३०मार्च रोजी श्री राम जन्मोत्सव सोहोळा निमित्ताने विविध अध्यात्मिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत कीर्तन सेवा,महाप्रसाद अन्नदान तर सायंकाळी संपूर्ण गावांतून "भगवान प्रभु श्रीरामचंद्र की जय,पावन पुत्र हनुमान की जय जयघोषाने पालखी मिरवणूक सोहोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले.

      संपूर्ण देशभरामध्ये श्री राम जन्मोत्सव सण सोहळा मोठ्या थाटामाटात उत्साही वातावरणामध्ये होत असताना गेली २७ वर्षांची अविरत अबाधित व अखंडित परंपरा राखीत मोठ्या गुण्या गोविंदाने,एकोप्याने,खेळी मेळीच्या मंगलमय,प्रसन्न वातावरणामध्ये थाटामाटात उत्साहाने आरे खुर्दवाडी येथे चैत्र शुद्ध ९  श्री राम नवमी गुरूवार रोजी  येथील श्री रामाच्या मंदिरामध्ये अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांतर्गत सकाळी आरती,तद्नंतर हभप.उदय महाराज बंद्री - (खारगाव - रोहा) यांचे श्री राम जन्मोत्सव पुष्पवृष्टी पर सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली,तद्नंतर महाप्रसाद अन्नदान तर सायंकाळी ०७ वाजताच्या सुमारास भजन हरिनामाच्या गजरात,ढोल ताशांच्या साथीने डॉल्बी डि.जे.सह वाजत गाजत,मोठ्या जल्लोषात नाचत  हरिनामाच्या गजराने "प्रभु श्रीरामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय,श्री राम जय राम जय जय रामाच्या जयघोषाने संपूर्ण आसमंत दणाणून सोडले एका वर्षांनी प्रभू श्री रामाची पालखी मिरवणूक सोहोळा घरोघरी येत असल्याने प्रत्येकाच्या घरावर गुढी उभारली जात आहे त्यामुळे सर्वत्र मंगलमय,प्रसन्न वातावरण निर्मिती झाल्याने सडा- रांगोळीने संपूर्ण गाव अगदी श्री राम जन्म भूमी अयोध्या नगरी सारखे सजले होते प्रत्येकाच्या ओठावर "राम जन्मला ग, आज श्री राम जन्मला" हे अजरामर गीत गुणगुणले जात होते.

      भगवान प्रभु श्रीरामचंद्र पालखी मिरवणूक  सोहळ्याचे आरे खुर्द येथील श्री रामाचे परम भक्तराज,भक्तवत्सल पवन पुत्र हनुमंत रायांच्या मंदिरामध्ये देव आणि परम भक्ताची भेट घडविली जाते त्यानंतर पालखी मिरवणूक पुन्हा पुढे सरकत आरे खुर्द वाडीत प्रवेश करीत घरोघरी आरतीचे मान - सन्मान स्वीकारत भगवान प्रभू श्री रामाची पालखी येथील श्री रामाच्या मंदिरामध्ये आणली जाते त्यानंतर सार्वजनिक महाआरती,प्रसाद वाटप, देवाचे मानपान देत,प्रत्येकाच्या मनातील मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतोत अशी सार्वत्रिक आराधना व प्रार्थना करत ग्रामस्थांच्या महत्त्वपूर्ण योगदान सहकार्याने आनंददायी व खेळी मेळीच्या वातावरणामध्ये हा वार्षिक उत्सव सण सोहोळा याहीपेक्षा पुढील वर्षी अधिक जल्लोषामध्ये कसा साजरा करता येईल याचे देखील नियोजन करीत पालखी मिरवणूक सोहोळ्याची सांगता करण्यात आली.

      सदरील श्री राम जन्मोत्सव सोहळा वार्षिक महोत्सवाकरिता आरे पंचक्रोशी आरे बुद्रुक नारायण भोईर,किरण भोईर,नथुराम उतेकर,मिलिंद पवार,मनोहर पाडगे,ध्रुव पाडगे,पांडुरंग मोरे,मंगेश खिरीट,शिवा पवार,उमाजी गोळे, कुंभोशी, खारगाव चे कीर्तनकार हभप. उदय महाराज बंद्री,गोफण,खारी - काजुवाडी आदी गावांतील वारकरी सांप्रदायिक भाविक भक्त तसेच तालुक्यातील सामाजिक,शैक्षणिक,राजकीय , कला- क्रीडा ई. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत पालखी सोहळ्याचे दर्शन घेत धन्यता मानली व सर्व ग्रामस्थांना पालखी सोहळ्यास मनःपूर्वक शुभेच्छा देत कार्यक्रमाची शोभा वाढवावी..

    सदरील वार्षिक उत्सव यशश्र्वीतेसाठी गावांतील विद्यमान आजी - माजी सरपंच, उपसरपंच,ग्राम पंचायत सदस्य,ग्रामस्थ,महिला भगिनी,तरुण युवक युवती, बाळ गोपाळ - अबाल वृद्ध,जेष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाने अथक मेहनत व परिश्रम  घेतले.

Comments

Popular posts from this blog