"एक घास,चिऊ काऊ साठी " शिववंदना वाचनालय वाशीच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

खारी/ रोहा - केशव म्हस्के

 रोहे तालुक्यातील मौजे वाशी येथील छत्रपती शिवरायांच्या विचारांने प्रेरित झालेल्या "एकच ध्यास शिव विचारांचा प्रचार" हे ब्रीदवाक्याची जोपासना करीत असलेल्या शिववंदना वाचनालय वाशी द्वारे दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वन्य मुक्या पक्षी - प्राण्यांबद्दल भुतदया बाळगणे हे मानवी कर्तव्य समजून  सामाजिक बांधिलकी जपली जाते.

  आजघडीला आपल्या घरी, अंगणामध्ये चिमणी/ चिऊ ताई कुठे फिरकताना फारसी पाहवयास मिळत नाही. काही जाती - प्रजाती तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय वातावरणीय बदलानुसार दिवसेंदिवस तीव्र उन्हाचे चटके बसत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे असे असताना जंगल परिसरातील डोंगराळ भागातील पक्षांचे काय होत असेल? याचा  अभ्यास करूनच काही पक्षी प्रेमी सुशिक्षित समाज बांधव संघटितपणे समाज हिताचे कार्य करताना दिसत आहेत.त्यापैकी एक "शिव वंदना वाचनालय" वाशीचे संस्थापक  प्रशांत बर्डे यांच्या नेतृत्वाने व मार्गदर्शनाखाली गावांतील युवक शिव पुत्र व शिव कन्या यांच्या सहकार्याने समाज हिताचे उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियान, तालुक्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण,किल्ले रायगड वरून मशाल ज्योत पूजन मिरवणूक,शिव जयंती उत्सव, विद्यार्थ्यांना ऐतिहासिक परंपरेचे मार्गदर्शन आदी विविध अध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम सातत्याने प्रयत्न पूर्वक सामाजिक भान ठेवून दरवर्षी रखत्या रखत्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वन्य मुक्या पक्षी - प्राण्यांबद्दल भुत दया बाळगणे हे मानवी कर्तव्यच आहे आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण स्तुत्य उपक्रमाचेच एक भाग म्हणून चैत्र प्रतिपदा गुढी पाडवयाच्या साडे तीन मुहूर्ताच्या मराठी नवं वर्षाच्या प्रथम दिवसापासूनच प्रतीवर्षा प्रमाणे आपल्या आजूबाजूच्या जंगल परिसरातील डोंगराळ भागात पक्षांना पिण्याच्या पाण्याची सहजगत्या व्यवस्था व्हावी त्याकरिता पाणवठे तयार करणेकामी खड्डे करून टाकाऊ प्लास्टिक ड्रम्स अर्ध्यावर कापून त्यामध्ये दररोज नित्यनेमाने एक घास - चिऊ काऊ साठी दाना - पिण्याचे पाणी ठेवून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संतुलन राखण्याचे कार्य हे एका विशिष्ट साखळीच्या माध्यमातून होत असते.

       शिववंदना वाचनालय वाशी रोहा वतीने पर्यावरणाचा संतुलन आणि एक घास चिऊ काऊ साठीच्या एक छोटासा स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत असल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपण सर्वांनी मिळून केलेल्या कामाचे आत्मिक व मानसिक समाधान मिळत असल्याच्या भावना दिसत आहेत.


.शिव वंदना वाचनालय संस्थापक अध्यक्ष प्रशांत बर्डे, शिवकन्या प्रमुख मेघा लहाने ,शिवप्रेमी प्रमुख विक्रांत बाकडे ,विराज बाकडे, आयुष बामणे, बाल शिवव्याख्याते आर्यन बर्डे ,श्रवण भोईर, अनुष्का बाकडे ,समृद्धी जंगम, अंतरा जोगडे,जानवी बामणे ,सनम जोगडे, प्रतीक्षा बामणे,प्रणाली भोईर, शर्वरी बर्डे व वाचनालयात सर्व छोटे शिवप्रेमी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog