पेण कोप्रोली येथील सेवाभावी वृत्तीच्या सखुबाई खंडू पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

खारी /रोहा - (केशव म्हस्के)

पेण तालुक्यातील  मौजे कोप्रोली येथील सखुबाई खंडू पाटील यांचे रविवार दि.२६/०३/२०२३ रविवार रोजी सायं.०७:३० वाजताच्या दरम्यान वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी राहत्या घरी दुःखद निधन..

     त्या अत्यंत प्रेमळ, दयाळू, क्षमाशील, मन मिळावू स्वभावाच्या व परोपकारी,सेवाभावी वृत्तीच्या होत्या त्यांना अध्यात्मिक व धार्मिक कार्याची विशेष आवड होती.

   त्यांच्या पश्चात तीन मुलगे,तीन मुली,सून,जावई,नातवंडे, पतवांडे सगे सोयरे नातेवाईक असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने पाटील परिवारावर दुःखाचे सावट पसरले सर्वत्र असून हळहळ व्यक्त होत आहे.

      त्यांचे दशक्रिया विधी बुधवार .दि.०५/०४/२०२३ रोजी उद्धर रामेश्वर पाली सुधागड येथे होतील तर

अंतिम धार्मिक विधी उत्तर कार्य बारावे शुक्रवार दि- ०७/०४/२०२३ रोजी राहत्याघरी  मुक्काम पोस्ट- कोप्रोली तालुका-पेण, जिल्हा रायगड येथे होती असे निकटर्तीयांनी माहिती देताना सांगितले आहे..

Comments

Popular posts from this blog