*इवलेसे रोप लावियले द्वारी,त्याचा वेळू गेला गगणावरी |"

गावठाण येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

अखंड ३९ वर्षांची यशस्वी परंपरा

रोहा-रविना मालुसरे-भोसले

रोहा तालुक्यातील धामणसई पंचक्रोशी यांच्या वतीने दरवर्षी संपन्न होणारा व ४० व्या वर्षात पदार्पण करणारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण या धार्मिक कार्यक्रमास सोम.दि.२७ मार्च पासून प्रारंभ करण्यात आला आहे.

       स्वा.सु.गुरूवर्य अलिबागकर बाबा,गोपाळबाबा वाजे, धोंडू बाबा कोलाटकर यांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प.नारायण महाराज वाजे(पंढरपूर) ,गुरूवर्य ह.भ.प.सखाराम महाराज निकम (धामणसई)

ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील (धाटाव) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच ह.भ.प.रघुनाथ महाराज भोकटे व ह.भ.प.मारूती महाराज साळवी यांच्या प्रेरणेने संपन्न होणाऱ्या या सप्तास सोहळ्यात दररोज पहाटे  ४ :३० ते ६ वा.काकड आरती,स.८ ते १२ वा. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण,सायं.४ ते ५ वा.प्रवचन,५:३० ते ७

सामुदायिक हरिपाठ,सायं.७ ते ९ हरिकिर्तन तदनंतर महाप्रसाद व जागर भजन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

      यावेळी सोम.दि.२७ मार्च ह.भ.प.नारायण महाराज वाजे (पंढरपूर),मंगळ.दि.२८ मार्च ह.भ.प.शिवाजी महाराज बोकारे,भागवताचार्य(आळंदी),बुध.दि.२९ मार्च ह.भ.प.निवृत्ती महाराज पाटील (कल्याण),गुरू.दि.३० मार्च  ह.भ.प.स.१० ते १२ श्री.राम जन्म पुष्पवृष्टीपर किर्तन ह.भ.प.महादेव महाराज सानप(गावठाण) तर सायं.ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील (धाटाव)

शुक्र.दि. ३१मार्च ह.भ.प.बाबाजी महाराज काटकर(कामशेत-मावळ),शनि.दि.१ एप्रिल ह.भ.प.कृष्णा महाराज पडवळ(मावळ),रवि.दि.२ एप्रिल ह.भ.प.नित्यानंद महाराज मांडवकर (चणेरा) तर सोम.दि.३ एप्रिल रोजी स..१० ते १२ यावेळेत काल्याचे किर्तन ह.भ.प.दिनेश महाराज कडव(वांदोळी) आदी सुप्रसिद्ध किर्तनकार यांची किर्तन सेवा संपन्न होणार आहे.तर या सप्ताहाचे यशस्वीतेसाठी धामणसई पंचक्रोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच शिवमुद्रा मित्र मंडळ गावठाण मोलाचे सहकार्य करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog