खारघर येथे महिला आर्थिक विकास महामंडळ - रायगड आयोजित कार्यशाळा संपन्न

खारी /रोहा -केशव म्हस्के 

महाराष्ट्र शासन अंगीकृत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ माविम - रायगड,नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत नवी मुंबई खारघर युवा सेंटर येथे सोमवार ते बुधवार दि.२७/२८/२९/ मार्च २०२३ तीन दिवसीय निवासी पुरुष मास्टर ट्रेनर करिता लिंग समभाव संचेतना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

      महिला आर्थिक विकास महामंडळ माविम - रायगड,नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाद्वारे एकजुटीतुन अवतरेल,समृध्दीची नवप्रभात हे ब्रीद वाक्याची जपणूक करत रायगड जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण देत सावित्रीबाई फुले आर्थिक विकास महामंडळ च्या वतीने महिलांना आर्थिक धैर्य प्राप्त व्हावे घरगुती व्यावसाईक स्वरूपामध्ये अत्यल्प व्याज दराने कर्ज पुरवठा उपलब्ध करून आर्थिक भांडवल उभे करित महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण्याकामी महत्त्वपूर्ण योगदान देत महिलांना आर्थिक उत्पन्नाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे महत्त्वपूर्ण योगदान दिले व आर्थिक विषमतेची दरी कमी करण्याकामी पुरुष वर्ग देखील महिलांना सहकार्य व मदत करीतच असतात परंतु  स्त्री पुरुष समानता तसेच लिंग समभाव संचेतना निर्माण होत कोणाही महिला अथवा पुरुषांवर होणारे अन्याय,अत्याचार,हिंसाचार थांबले जावे याकरिता पुरुषांचे देखील प्रशिक्षणा द्वारे प्रबोधन व्हावे आपापसातील समज गैरसमज दुर व्हावेंत त्याबाबत कायदेविषयक मार्गदर्शन,सामाजिक भान ठेवून कौटुंबिक स्नेह जिव्हाळा निर्माण होत सुसंवाद साधला जाऊन लिंगभेदाची दरी दूर होण्यास मदत होईल आणि प्रतिमात्मक समानता,संख्यात्मक समानता, कार्यक्रमात्मक समानता येईल आदी महत्त्वपूर्ण विविधांगी सामाजिक विषयांवर सखोल विचार विनिमयपूर्वक चर्चा सत्र घडवून आणले जाणार असल्याचे कार्यक्रमाचे सम्यक ट्रस्टचे मुख्य प्रशिक्षक शेखर चोरघे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

या प्रशिक्षण शिबिराकरिता रायगड जिल्ह्यातील रोहा,महाड,मुरुड,पाली सुधागड आदी तालुक्यातील पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे.

  सदरील कार्यक्रमाचे शुभारंभ प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक व सूत्रसंचालन वर्षा पाटील रायगड जिल्हा समन्वय अधिकारी माविम - रायगड यांनी केले तर सम्यक ट्रस्ट पुणेचे मुख्य प्रशिक्षक शेखर चोरघे यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी लेखापरीक्षक माधुरी देविकर,कार्यक्रम सल्लागार MIS अधिकारी दिपक पाटील पोटभरे, MIS सहाय्यक पूजा जाधव, शामिम मॅडम आदी माविम चे कर्मचारीवृंद विशेष परिश्रम घेतले .

Comments

Popular posts from this blog