शिवसेनेकडून विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा
तळा -संजय रिकामे
राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेकडून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर तळा तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्याचा सपाटा सुरू केला आहे. मौजे निगुडशेत येथे स्मशानाकडे जाणारा रस्ता दहा लक्ष ,खांबोली ते शेणाटे रस्ता १५ लक्ष, दहिवली येथे स्मशानाकडे जाणारा रस्ता ८ लक्ष, आडनाळे येथे सामाजिक सभागृह ७ लक्ष भानंग येथे सामाजिक सभागृह १० लक्ष, पाचघर येथे स्मशानाकडे जाणार रस्ता १० लक्ष, चरई बुद्रुक येथे गटार बांधणे ७ लक्ष या कामांचे भूमिपूजन तळा तालुका शिवसेना प्रमुख प्रदुम्न ठसाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ शहर प्रमुख राकेश वडके,जिल्हा कोअर कमेटी सदस्य लीलाधर खातु, तालुका संपर्कप्रमुख अॕड. चेतन चव्हाण, नगरसेवक नरेश सुर्वे, सिराज खाचे, भास्कर गोळे, माजी सरपंच नामित पांढरकामे,उपतालुकाप्रमुख शरद सारगे, दीपक चिंचळकर,विभाग प्रमुख संदीप दळवी, रमेश तांदळेकर रामकृष्ण महाडिक, शशिकांत ठमके, महादेव मंचेकर रमेश पिंपळे तुकाराम शिगवण भाई शिरसागर विलास ठसाळ व गावातील स्थानिक कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद उपनेते महाडचे कार्यसम्राट आ.भरतशेठ गोगावले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तळा तालुक्यात विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मोठ्या प्रमाणावर होत असून यापुढे विकास कामांची गती अशीच सुरू राहील.ग्रामीण भागात देखील शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष प्राधान्य द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या तळा तालुक्यात शिवसेनेकडून विकास कामांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावे आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न असून भविष्यात त्यांना कशाप्रकारे यश येते याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे.
Comments
Post a Comment